Maharashtra

Satara

cc/13/183

gita s. deshmukh - Complainant(s)

Versus

shri jotilig na. sah. pats. - Opp.Party(s)

16 Jan 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                           मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 183/2013.

                                                                                                        तक्रार दाखल दि.16-11-2013.

                                                                                                         तक्रार निकाली दि.16-1-2015. 

 

  1. गीता सर्जेराव देशमुख.
  2. शितल सर्जेराव देशमुख.

   दोघी रा.मु.पो.विखळे,

   ता.खटाव, जि.सातारा.                     ....  तक्रारदार   

         विरुध्‍द

1. श्री.ज्‍योतिर्लिंग नागरी सह.पतसंस्‍था मर्या.

   कुकुडवाड, ता.माण, जि.सातारा.

2. नारायण विठोबा काटकर, चेअरमन.

3. गंगाधर शिवाजी शिंद, व्‍हा.चेअरमन.

4. विठ्ठल कृष्‍णा काटकर, संचालक.

5. शिवाजी पांडुरंग काटकर, संचालक.

6. प्रकाश शामराव काटकर, संचालक.

7. उत्‍तम रामचंद्र काटकर, संचालक.

8. नंदकुमार बयाजी जाधव, संचालक.

9. नाथाजी विठ्ठल देशमुख, संचालक.

10. बबन महादेव कुंभार, संचालक.

11. संजय बाबासाहेब घाडगे, संचालक.

12. सुभाष दुर्योधन काटकर, संचालक.

13. पार्वती जयसिंग काटकर, संचालिका.

14. नंदा वामन काटकर, संचालिका.

15. महादेव कुंडलिक काटकर, व्‍यवस्‍थापक,

    सर्व रा. कुकुडवाड, ता.माण, जि.सातारा.              ....  जाबदार

 

                तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम.

                जाबदार 2 तर्फे अँड.एस.डी.जाधव/जे.आर.इंगळे.

                जाबदार 6 व 15 तर्फे- अँड.एच.आर.काटकर.

                जाबदार-1,3,4,5,7 ते 14- एकतर्फा.                                                      

                        न्‍यायनिर्णय

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

        तक्रारदार हे विखळे, ता.खटाव, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी असून त्‍यानी जाबदार पतसंस्‍थेत दामदुप्‍पट ठेव स्‍वरुपात पुढीलप्रमाणे रक्‍कम गुंतवली होती व आहे.

अ.क्र.

ठेवपावती क्र.

ठेवीची तारीख

ठेव रक्‍कम रु.

मुदत संपलेची तारीख

मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम रु.

1.

000622

14-10-2005

20,000/-

14-7-2012

 40,000/-

2.

000621

14-10-2005

60,000/-

14-7-2012

1,20,000/-

                                                   एकूण रु.    1,60,000/-

 

       वर नमूद ठेवपावत्‍यांची मुदत संपलेनंतर तक्रारदारानी जाबदारांकडे प्रस्‍तुत रकमेची वेळोवेळी व्‍याजासह मागणी केली, परंतु जाबदाराने तक्रारदारांना त्‍यांचे ठेवीची व्‍याजासह परतफेड करणेचे नुसतेच आश्‍वासन दिले, परंतु आजअखेर जाबदाराने तक्रारदाराना सदरची ठेवीची रक्‍कम व्‍याजासह अदा केलेली नाही व रक्‍कम देणेस टाळाटाळ केली त्‍यामुळे तक्रारदारानी जाबदारांकडून सदर ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचाकडे दाखल केलेला आहे. 

 

2.       तक्रारदारानी सदर कामी जाबदारांकडून वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराचे ठेवपावत्‍यांवरील दामदुप्‍पट रक्‍कम नमूद व्‍याजासह परत मिळावी, मुदत संपले तारखेपासून प्रस्‍तुत रकमेवर प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज जाबदाराकडून मिळावे, तक्रारदारास शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/- व तक्रारअर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे. 

 

3.       तक्रारदाराने सदर कामी नि.2 व 3 कडे प्रतिज्ञापत्र, नि.6 चे कागदयादीसोबत‍ नि.6/1 व 6/2 कडे तक्रारदारांच्‍या ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती, नि.27 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.28 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदारानी मंचात दाखल केली आहेत.

 

4.         प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.1,3,4,5,7 ते 14 यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित झाला आहे.  प्रस्‍तुत जाबदाराना नोटीसची बजावणी होऊनही ते मे.मंचात हजर नसल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित झाला आहे.  तर जाबदार क्र.2,6 व 15 यांनी सदर कामी हजर होऊन त्‍यांची कैफियत नि.15 व 20 कडे दाखल केली आहे, तर जाबदार क्र.2,6 व 15 यांनी नि.31 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व नि.33 कडे कागदपत्रे म्‍हणजेच जाबदार पतसंस्‍थेच्‍या मासिक सभेची नोटीस, जाबदार संस्‍थेच्‍या सभा क्र.11 वरील ठराव, जाबदार संस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी व जाबदार क्र.2 नारायण विठोबा काटकर यांचे राजीनामा झेरॉक्‍स प्रत वगैरे कागदपत्रे जाबदार 2,6,15 यांनी सदर कामी दाखल केली आहेत. 

 

5.       जाबदार क्र.2,6 व 15 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराच्‍या तक्रारीतील सर्व कथने फेटाळली आहेत.  त्‍यांनी पुढे कथन केले आहे की, प्रस्‍तुत तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद ठेवपावत्‍या या सर्जेराव कोंडीबा देशमुख यांचे नावे नाहीत, तसेच ठेवपावत्‍यांची मुदत 2012 मध्‍ये संपलेली नाही.  सध्‍या तक्रारदारास शिक्षणाची कोणतीही गरज  नाही.  तक्रारदारानी अकारण जाबदाराविरुध्‍द तक्रारअर्ज दाखल केलेला आहे.  तक्रारदाराने तक्रारअर्जात केलेल्‍या मागण्‍या चुकीच्‍या आहेत.  तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.  अशा प्रकारचे म्‍हणणे जाबदार क्र.2,6 व 15 यानी सदर कामी दाखल केलेले आहे.

 

6.       वर नमूद तक्रारदार व जाबदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.    मुद्दा                                                  उत्‍तर

 1. तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवा देणार आहेत काय?     होय.

 2. जाबदारानी तक्रारदारांना सदोष सेवा पुरविली आहे काय?              होय.

 3. अंतिम आदेश काय?                            शेवटी आदेशात नमूद केलेप्रमाणे.

विवेचन-

7.        वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत ठेवपावती क्र.622 ने रक्‍कम रु.20,000/- तर ठेवपावती क्र.621 ने रक्‍कम रु.60,000/- अशी रक्‍कम दामदुप्‍पट योजनेमध्‍ये गुंतवली होती व आहे.  ही बाब तक्रारदारानी नि.6 चे कागदयादीसोबत नि.6/1 कडे दाखल केलेल्‍या व्‍हेरिफाईड ठेवपावत्‍यांवरुन सिध्‍द होते, त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे सेवापुरवठादार असल्‍याचे निर्विवादपणे सत्‍य आहे.  तसेच प्रस्‍तुत ठेवपावत्‍यांची मुदत दि.14-7-2012 रोजी संपलेनंतर तक्रारदाराने प्रस्‍तुत रकमेची जाबदारांकडे मागणी केली असता जाबदारांनी प्रस्‍तुत ठेवीच्‍या रकमा तक्रारदारांना व्‍याजासह परत केल्‍या नाहीत तर रक्‍कम तक्रारदाराला परत देण्‍याची टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदारांच्‍या ठेवीच्‍या रकमा त्‍यांना परत केलेल्‍या नाहीत ही बाब तक्रारदारांनी शपथेवर प्रतिज्ञापत्रामध्‍ये कथन केलेली आहे.  तसेच जाबदारांनी ही प्रस्‍तुत ठेवीची रक्‍कम तक्रारदाराने जाबदार संस्‍थेत ठेवल्‍याचे मान्‍य केले आहे त्‍यामुळे तक्रारदारांना जाबदारांनी सदोष सेवा दिल्‍याचे सिध्‍द होते.  म्‍हणून आम्‍ही मु्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

8.      प्रस्‍तुत कामी जाबदार क्र.2 तर्फे दाखल केलेली संचालक मंडळाची यादी, नि.33 चे कागदयादीसोबत दाखल केलेले नि.33/2 व सभा क्र.11 वरील ठराव यामध्‍ये संचालकांची यादी असून सहया आहेत.  ही सभा दि.13-1-2012 रोजीची आहे.  प्रस्‍तुत संचालकांची नावे व तक्रारदारांनी तक्रारअर्जात दाखल केलेली नावे एकच आहेत.  मात्र जाबदाराने नि.33/3 कडे दाखल केलेल्‍या संचालक मंडळांची यादी ही संस्‍थेच्‍या लेटरपॅडवर आहे.  त्‍यावर उपनिबंधकांचा सहीशिक्‍का नाही, तसेच नि.33/4 कडे दाखल चेअरमन यांचा राजीनामा हा मंजूर झाला किंवा नाही हे समजून येत नाही.  सबब नि.33/3 व नि.33/4 कडे दाखल संचालक मंडळाची यादी व राजीनामा पत्र यांचा याकामी विचार करणे न्‍यायोचित होणार नाही.

         वरील सर्व विवेचनाचा उहापोह करता प्रस्‍तुत तक्रारदारांचे ठेवपावती क्र.621 व 622 वरील व्‍याजासह रक्‍कम तक्रारदारांना परत करणेसाठी जाबदार क्र.1 ते 15 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणे न्‍यायोचित होणार आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. 

9.      सबब सदर बाबतीत आम्‍ही मे.उच्‍च न्‍यायालयाचा न्‍यायनिवाडा  रिट पिटीशन क्र.117/2011 मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ महाराष्‍ट्र याचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत.

                               आदेश

1.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो. 

 

2.  तक्रारदारांच्‍या ठेवपावती क्र.621 व 622 वरील ठेवीच्‍या रकमा ठेवपावतीवरील नमूद व्‍याजासह तक्रारदाराना अदा करणेसाठी जाबदार क्र.1 ते 14 याना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरणेत येते.  जाबदार क्र.15 यांस वैयक्तिक जबाबदार न धरता त्‍यास संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरणेत येते.

 

3.   प्रस्‍तुत जाबदार क्र.1 ते 14 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.15 यानी संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारांचे ठेवपावती क्र.621 वरील ठेवीची दामदुप्‍पट रक्‍कम रु.1,20,000/- तसेच ठेवपावती क्र.622 वरील दामदुप्‍पट ठेवीची रक्‍कम रु.40,000/- तक्रारदाराना अदा करावी, तसेच प्रस्‍तुत रकमेवर ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज प्रस्‍तुत जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तर जाबदार क्र.15 यानी संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी.

 

4.   प्रस्‍तुत कामी तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- तसेच अर्जाचा खर्च म्‍हणून रु.5,000/- जाबदारानी तक्रारदाराना अदा करावी.

 

5.     वरील सर्व आदेशांचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.      

6.    सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

7.    सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.16-1-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.