Maharashtra

Kolhapur

CC/08/23

Sou. Vijaymala Balkrishna Bidre - Complainant(s)

Versus

Shri Jivheashvar Nagari Sahakari Pat Santha Maryadit, Ichalkarnji - Opp.Party(s)

Adv. A.M. Mujumdar.

22 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/08/23
1. Sou. Vijaymala Balkrishna BidreA/P. Alte, Tal.Hatkanagle, Dist. Kolhapur.KolhapurMaharastra2. Balkrishan V. VidreA/P, Alte Tal.Hatkanagle Dist. Kolhapur.KolhapurMaharastra3. Anil b. BidreA/P, Alte Tal.Hatkanagle Dist. KolhapurKolhapurMaharastra4. Mukund S.GhongadeA/P. Senapati KapshiTal. Kagal Dist.Kolhapur.KolhapurMaharastra5. Sunil D. BidreB 16 Mohan Arked Station Road Ichalkaranji.KolhapurMaharastra6. .. ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Jivheashvar Nagari Sahakari Pat Santha Maryadit, IchalkarnjiShri Jivheashvar Bhawan, Bhonemal, Ichalkaeranji.KolhapurMaharastra2. Vilas B. GawteShri. Jivheashvar Bhawan Bhonemal Ichalkaeranji.KolhapurMaharastra3. Vilas N.PandharpatteStation Road Gaikwad Near Veet Bhatti IchalkaranjiKolhapurMaharastra4. Shankar Balwant BagadeA/P Shastri Sosayti Sainath Negar IchalkaranjiKolhapurMaharastra5. Sunil R. KharadeGokul Chowk Ichalkarnji.KolhapurMaharastra6. Shrikant R. KhekerBhartmata Housing Soc.Opp. Indira Karyalay Ichalkaraji.KolhapurMaharastra7. Govind R.KambaleNear New English School Kabanur Dhuleshwar Negar Ichalkaranji.KolhapurMaharastra8. Shantaram S. GawteBhartmata Housing Soc.Opp. Indira Karyalay Ichalkaraji. KolhapurMaharastra9. Baburo S. RanbhareA/p Rendal Opp. Vitthal mandir Tal. Hatkangale Dist. Kolhapur.KolhapurMaharastra10. Tanaji B. Gawete Bhonemal IchalkaeranjiKolhapurMaharastra11. Laxman Eknath GanpateAt Post Heralge Mala, Chandur Road, Ichalkaranji, Tal.Hatkangale, Dist.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.A.M.Mujumdar for all complainants

Dated : 22 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.22.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 3 ते 8 व 11 यांनी एकत्रित म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रारदाराचे नांव
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
सौ.विजयमाला बाळकृष्‍ण बिद्रे
001614
43792/-
2.
श्री.बाळकृष्‍ण विरुपाक्ष बिद्रे
001613
43792/-
3.
श्री.अनिल बाळकृष्‍ण बिद्रे
001612
21896/-
4.
श्री.मुकुंद सदाशिव घोंगडे
001615
43792/-

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, वटमुखत्‍यारपत्र इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(5)        सामनेवाला क्र.1, 3 ते 8 व 11 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या ठेवींव्‍यतिरिक्‍त तक्रारीतील उर्वरित सर्व कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली येत नाही. दि.14.01.2008 रोजी सामनेवाला क्र.2 ते 11 यांनी सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेच्‍या ब-याचशा कर्जदारांनी कर्जफेड केली नसल्‍याने संस्‍था आर्थिक अडचणीत आलेली आहे. सदर कर्जदारांनी सामनेवाला यांची रक्‍कम भागविलेस तक्रारदारांची रक्‍कम देणेस सोईचे होणार आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेने दि.26.12.2007 व दि.02.02.2008 रोजी तक्रारदारांसारख्‍या अन्‍य ठेवीदारांना संस्‍थेकडे उपलब्‍ध असलेली रक्‍कम देत असलेबाबत जाहिर नोटीस प्रसिध्‍द केली होती. त्‍यावेळी तक्रारदारांनी संस्‍थेकडे येवून रक्‍कम उचल केली नाही. आजरोजी संस्‍थची एकरक्‍कमी तक्रारदारांची रक्‍कम देणेची ऐपत नाही. त्‍याचप्रमाणे सामनेवाला संस्‍था ही कर्जदारांविरुध्‍द म.स.का.कलम 101 अन्‍वये कारवाईदेखील करीत आहे व त्‍या वसुलीतून येणारी रक्‍कम तक्रारदारांना देत आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी.    
 
(6)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ठे़वी ठेवलेल्‍या आहेत. सामनेवाला पतसंस्‍था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
(7)        सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्‍कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्‍याने कारण घडत आहे. सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे.
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे.
 
(9)        सामनेवाला क्र.2-श्री.विलास भानुदास गवते हे मयत असलेने त्‍यांचे नांव प्रस्‍तुत तक्रारीतून वगळणेत यावे अशी तक्रारदारांनी दि.21.06.2008 रोजी पुरसिस दिली. सदर पुरसिसीचा विचार करुन या मंचाने सामनेवाला क्र.2-श्री.विलास भानुदास गवते यांना प्रस्‍तुत प्रकरणातून वगळणेबाबत आदेश पारीत केला आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 व 3 ते 11 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदार क्र.1 ते 4 मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(11)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1, 3 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रारदाराचे नांव
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
सौ.विजयमाला बाळकृष्‍ण बिद्रे
001614
43792/-
2.
श्री.बाळकृष्‍ण विरुपाक्ष बिद्रे
001613
43792/-
3.
श्री.अनिल बाळकृष्‍ण बिद्रे
001612
21896/-
4.
श्री.मुकुंद सदाशिव घोंगडे
001615
43792/-

 
(3)   सामनेवाला क्र.1, 3 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT