Maharashtra

Kolhapur

CC/10/415

Nijam Ajij Mullani, Herale, Tal.Hatkangale, Dist.Kolhapur - Complainant(s)

Versus

Shri Jaywant Nagari Sah Pat Sanstha Maryadit, Herale - Opp.Party(s)

Sudhir A. Patil

11 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/415
1. Nijam Ajij Mullani, Herale, Tal.Hatkangale, Dist.KolhapurComplainant in Complaint No.415/102. Shri Dhanbahaddur Udaysingh Gurakha, R/o.As aboveComplainant in Complaint No.416/103. Shri Sardar Dhondiba Nayakvadi, R/o. As aboveComplainant in Complaint No.417/104. Shri Mahamadshafik Mehboob Desai, R/o.As aboveComplainant in Complaint No.418/105. Kum.Ruksana Tajuddin Jamadar, R/o.As aboveComplainant in Complaint No.419/106. (a) Shri Ahmed Mehboob Desai, (b) Sou.Sofia Ahmed Desai, (c) Kum.Jayboon Mehboob Desai, All r/o. As aboveComplainants in Complaint No.420/10 ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Jaywant Nagari Sah Pat Sanstha Maryadit, HeraleHerale, Tal-Hatkanangale.Kolhapur2. Haji Badasha Balu DesaiA/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.3. Babaso Appalal JamadarA/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.4. Usman Umarali BargirA/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.5. Gaus Kamal Jamadar.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.6. Appaso Balku Koregave.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.7. Babaso Shamrao Ulaswar.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.8. Panduran Dada Chougule.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.9. Rangrao Ganpati KolekarMuje Vadgaon, Tal- Hatkanangale. Kolhapur.10. Amir Hamja Hasan Hajari.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.11. Dastgir Nabilal Jamadar.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.12. Himmat Makbul Bargir.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.13. Sou.Vimal Kumar Ingale.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur.14. Secretary.Amir Sikandar (Balaso ) Jamadar.A/p,Herale Tal- Hatkanangale. Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.Sudhir Patil for all the Complainant
Adv.S.K.Kumbhar for all opponents

Dated : 11 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 संयुक्‍त निकालपत्र :- (दि.11.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत ग्राहक तक्रार केस नं.415 ते 420/10 या सहाही तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला.   सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला यांचे वकिलांनी दुपारच्‍या सत्रात म्‍हणणे दाखल करुन घेणेतबाबतचा अर्ज दाखल केला. सदरचा अर्ज स्‍वतंत्र व विस्‍तृत आदेशान्‍वये फेटाळणेत आला. 
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट, दामतिप्‍पट, दामचौप्‍पट, कॉल डिपॉझिट ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
31.05.10 अखेर व्‍याजासहीत येणे
1.
415/10
 दामतिप्‍पट 201
10000/-
29.11.2000
29.08.2007
34134/-
2.
416/10
कॉल 144
6000/-
18.11.2006
46 दिवस
7907/-
3.
--”--
सेव्‍हींग खाते 579/5/156
1917/-
19.12.2007
--
2152/-
4.
417/10
सेव्‍हींग खाते 710/6/266
5630/-
22.10.2007
--
6387/-
5.
418/10
दामचौपट 602
15000/-
07.01.2004
07.01.2013
30347/-
6.
--”--
शेअर्स
500/-
--
--
500/-
7.
419/10
दामदुप्‍पट 678
5000/-
20.06.2005
20.06.2011
7967/-
 
8.
--”--
दामदुप्‍पट 679
3500/-
20.06.2005
20.06.2011
5577/-
9.
420/10
सेव्‍हींग खाते 6/107
13728/-
31.03.2009
--
14529/-
10.
--”--
दामचौपट 439
20000/-
24.03.2003
24.03.2012
42997/-
11.
--”--
दामचौपट 601
5000/-
07.01.2004
07.01.2013
10116/-

 
(3)        उपरोक्‍त ठेव व त्‍यावरील रितसर व्‍याज यांची मागणी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी केली होती व आहे. परंतु, अद्याप सामनेवाला यांनी सदरच्‍या ठेवी व त्‍यावरील व्‍याज अदा केलेले नाही. शेवटी तक्रारदारांनी दि.31.05.2010 रोजी सामनेवाला यांचेकडे वकिलामार्फत नोंटीस पाठवून उपरोक्‍त रक्‍कमेची मागणी केली. सदरची नोटीस मिळूनही सामनेवाला हे सदर रक्‍कमा देणेस टाळाटाळ करीत आहेत.   त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत संचालक मंडळाची यादी, ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे.   सदर ठेव रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला क्र.1 ते 14 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.14 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(6)        तक्रार क्र.415/10 मधील तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावतीचे अवलोकन केले असता सदर ठेव पावती हे दामतिप्‍पट ठेवीची असून तिची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामतिप्‍पट ठेव पावती क्र.201 वरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तक्रार क्र.418 ते 420/10 मधील तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता दामचौपट 602, दामदुप्‍पट 678, दामदुप्‍पट 679 , दामचौपट 439, दामचौपट 601 या पावत्‍यांच्‍या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्‍या नाहीत असे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे सदर तक्रारदार हे सदर ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा या भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि.16.07.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तक्रार क्र.418/10 मधील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत सामनेवाला यांचेकडून शेअर्सची रक्‍कम परत मिळणेबाबत विनंती केली आहे. शेअर्सच्‍या रक्‍कमेबाबत आदेश पारीत करणेतबाबत ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मध्‍ये तरतुद नसल्‍याने शेअर्सच्‍या रक्‍कमेबाबत हे मंच कोणतेही आदेश पारीत करीत नाही.  
 
(8)        तसेच, तक्रार क्र.416/10 मधील तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावती नं.144 च्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कम ठेवली आहे. म्‍हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्‍यांची रक्‍कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्‍कम व्‍याजासह देणे आवश्‍यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी सदर कॉल डिपॉझिट पावत्‍यांची रक्‍कम ही त्‍यांनी प्रथमत: सामनेवाला यांचेकडे दि. 31.05.2010 रोजीच्‍या वकिलामार्फत पाठविलेल्‍या नोटीसीने मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर कॉल ठेव रक्‍कमा ठेव तारखेपासून 31.05.2010 रोजीपर्यन्‍त ठेव पावत्‍यांवर नमूद म्‍हणजेच द.सा.द.शे.11 टक्‍के व्‍याजासह व त्‍यानंतर द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तसेच, तक्रार क्र.416/10, 417/10 व 420/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यांवर रक्‍कमा जमा असल्‍याचे दिसून येते. सबब, सदर तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना तक्रार क्र.415/10 मधील तक्रारदारांना दामतिप्‍पट ठेव पावती क्र.201 ची दामतिप्‍पट रक्‍कम रुपये 30,000/- (रुपये तीस हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.29.08.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट व दामचौपट ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि. 16.07.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि.17.07.2010 रोजीपासून सदर रक्‍कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
418/10
दामचौपट 602
15000/-
2.
419/10
दामदुप्‍पट 678
5000/-
3.
--”--
दामदुप्‍पट 679
3500/-
4.
420/10
दामचौपट 439
20000/-
5.
--”--
दामचौपट 601
5000/-

 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.416/10 मधील तक्रारदारांना कॉल डिपॉझिट पावती क्र.144 ची रक्‍कम रुपये 6,000/- (रुपये सहा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर ठेव तारखेपासून दि. 31.05.2010 रोजीपर्यन्‍त द.सा.द.शे.9%  व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या खालील कोष्‍टकता नमूद सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
व्‍याज देय तारीख
1.
416/10
सेव्‍हींग खाते 579/5/156
1917/-
19.12.2007
2.
417/10
सेव्‍हींग खाते 710/6/266
5630/-
22.10.2007
3.
420/10
सेव्‍हींग खाते 6/107
13728/-
31.03.2009

 
(6)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना प्रत्‍येक तक्रारीकरिता मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT