नि.16 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 10/2010 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.04/05/2010 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.25/10/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.विठ्ठल सखाराम सनगरे तर्फे मुखत्यार कु.गीता सोनू सुवारे रा.नाचणे, गुरुमळी, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटीक कार्पोरेशन लि., (formerly known as Kalpataru Agro India Ltd.) करीता अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक, श्री.जयकृष्ण सिंह राणा, रजि.ऑफिस- औरंगाबाद, आग्रा रोड, मथुरा (उत्तर प्रदेश) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.नार्वेकर सामनेवाले : गैरहजर. -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी आज रोजी तक्रारदार तर्फे मुखत्यार यांनी विधिज्ञासह हजर होवून प्रस्तुतचे प्रकरण बोर्डावर घेवून नि.15 वर पुरशीस दाखल केली. ब) सदर नि.15 वरील पुरशीसमधील मजकूर खालीलप्रमाणेः- “प्रस्तुत केसमध्ये अर्जदार व सामनेवाला यांचेत तडजोड झालेली असून त्यानूसार सामनेवाली यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.10,000/- मात्र अदा केली आहे. तक्रारदार यांचे सामनेवाले यांचेकडून कोणतेही येणे बाकी नाही. सदर रक्कम तक्रारदार यांना मान्य आहे. तरी सदर कारणामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत अर्ज पुढे चालवावयाचा नसल्याने सदर तक्रार अर्ज निकाली करण्यात यावा अशी मे.मंचास विनंती आहे.” क) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदारतर्फे मुखत्यार विधिज्ञासह उपस्थित. पूरशिस सादर. मुखत्यारपत्राची सत्यप्रत नि.4/1 दाखल. पूरशिसमधील मजकूर मान्य व कबूल करतात. सदर पूरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत वसूली प्रकरण निकाली करणेत येते.’’ सदर नि.15 वरील पुरशिस व त्यावर करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदरचा वसूली अर्ज निकाली करणेत येतो. रत्नागिरी दिनांक : 25/10/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |