जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नंदुरबार.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य – सौ.एन.एन.देसाई.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 21/2012
तक्रार दाखल दिनांक – 21/06/2012
तक्रार निकाली दिनांक – 23/08/2012
श्री.लक्ष्मण हिरालाल कदम. ----- तक्रारदार
उ.वय. 58 वर्षे, धंदा- शेती.
रा.सौभाग्य मंगल कार्यालयाजवळ,
शहादा,ता.शहादा,जि.नंदुरबार.
विरुध्द
(1) श्री ईश्वरभाई संभूभाई पाटील. ----- विरुध्दपक्ष
प्रोप्रा.जलाराम ऑटो,दोंडाईचा रोड,शहादा.
ता.शहादा,जि.नंदुरबार.
(2) श्रीनाथजी ऑटोमोबाईल खरगोन (मध्यप्रदेश)
ता.खरगोन,जि.खरगोन (मध्यप्रदेश)
कोरम
(मा.अध्यक्ष– श्री.डी.डी.मडके.)
(मा.सदस्या– सौ.एन.एन.देसाई.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.वाय.जे.वळवी.)
(विरुध्दपक्ष नं.1 तर्फे – वकील श्री.जे.पी.कुवर.)
(विरुध्दपक्ष नं.2 – गैरहजर)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
(1) सदस्या,सौ.एन.एन.देसाई – विरुध्दपक्षाने मोटारसायकल संदर्भात सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांनी दि.23-08-2012 रोजी अर्ज देऊन प्रकरण बोर्डवर घेण्याची विनंती केली. तसेच प्रकरणातील विरुध्दपक्ष व त्यांचेत आपसात तडजोड झाली असल्यामुळे, तक्रारदार व विरुध्दपक्ष यांना सदरहु तक्रार अर्जाचे काम चालविणे नाही. तक्रारदार व विरुध्दपक्ष यांचेदरम्यान कोणताही वाद व तक्रार राहिलेली नाही अशी संयुक्त पुरसीस तक्रारदार आणि विरुध्दपक्ष यांनी नि.नं.9 व 10 वर दाखल केली आहे.
(3) तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी संयुक्तिक रित्या दाखल केलेली पुरसीस पाहता, त्यांचेत तडजोड झाली असून तक्रारदारांच्या तक्रारीस कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे नि.नं.9 व 10 वरील पुरसीस मंजूर करण्यात आली आहे.
(4) उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
नंदुरबार.
दिनांक – 23-08-2012.
(सौ.एन.एन.देसाई.) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नंदुरबार.