Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/16/318

Shri Umesh Munishwar Dhodre - Complainant(s)

Versus

Shri Hemant Sikandar Zam & Others 3 - Opp.Party(s)

Shr Abhayi Kullarwar , S N Pandhare

28 Sep 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/16/318
 
1. Shri Umesh Munishwar Dhodre
R/O Naukarkar Layout Hanumannagar Tukum chandrapur Tah Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Hemant Sikandar Zam & Others 3
R/o 10 Paryavaran Nagaar Wardha Road somalwada Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Mukesh Zam ,Zam Builders & Developers Pvt Ltd.
R/o 10 Paryavaran nagar Wardha road somalwada Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shir Rakesh Shrma Zam Builders and Developers Pvt. Ltd.through Director Shri Hemant Zam
R/o 10 Paryavaran nagar Wardha nagar Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Sep 2017
Final Order / Judgement

                        ::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या )

(पारीत दिनांक28 सप्‍टेंबर, 2017)

 

01.   तक्रारकर्त्‍याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष बिल्‍डर विरुध्‍द करारा प्रमाणे सदनीकेचे विक्रीपत्र व ताबा न दिल्‍याचे कारणावरुन दाखल केली आहे.

 

02.   तक्रारकर्त्‍याचे संक्षीप्‍त कथन खालील प्रमाणे-

      विरुध्‍दपक्षाचा बिल्‍डर व डेव्‍हलपरचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष फर्मचे प्रस्‍तावित मौजा वागधरा, तालुका जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं-108 व 109, पटवारी हलका क्रं-46, तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील “JASMINE” 1-BHK, KANHAIYA CITY PHASE II या आवास योजने मधील रो-हाऊस क्रं-292, प्‍लॉट एरिया-647 चौरसफुट, सुपर बिल्‍टअप एरिया-390 चौरसफूट एकूण रुपये-7,00,000/- एवढया किमती मध्‍ये खरेदी करण्‍याचा करार विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे कार्यकारी संचालक श्री हेमंत झाम याचे सोबत दिनांक-11 ऑक्‍टोंबर, 2010 रोजी केला. (सदर नमुद प्रस्‍तावित बांधकाम योजनेतील रो-हाऊस क्रं-292 चा यापुढे निकालपत्रात उल्‍लेख करारातील रो-हाऊस असा करण्‍यात येईल) तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला सदनीका विक्री करारा पोटी इसारा दाखल  दिनांक-10/10/2010 पर्यंत रुपये-1,40,000/- एवढी रक्‍कम दिली व पावत्‍या प्राप्‍त केल्‍यात.

   तक्रारकर्त्‍याने  पुढे असे नमुद केले की, करारातील रो-हाऊसची  किम्‍मत ही बांधकामाचे प्रगती नुसार देण्‍याचे ठरले होते. विरुध्‍दपक्षाने करारा मध्‍ये तो केंव्‍हा रो-हाऊसचे बांधकाम पूर्ण करुन देईल या बद्दलचा उल्‍लेख करण्‍याचे टाळले. विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे त्‍याला दिनांक-14.08.2012 रोजी पत्र पाठवून त्‍या मध्‍ये फेज-2 चे बांधकाम हे एप्रिल-2014 पर्यंत पूर्ण करुन देण्‍यात येईल असे नमुद करण्‍यात आले. त्‍याने करारातील रो-हाऊसच्‍या एकूण किम्‍मती काही आंशिक रकमा अदा केल्‍या नंतर विक्रीपत्र नोंदवून मिळण्‍यासाठी सातत्‍याने पाठपुरावा केला. बांधकाम मंजूरी नसताना विरुध्‍दपक्षाने करारातील रो-हाऊसपोटी तक्रारकर्त्‍या कडून आंशिक रक्‍कम स्विकारुन एकप्रकारे त्‍याची फसवणूकच केलेली आहे, तक्रारकर्त्‍याची रक्‍कम विनाकारण विरुध्‍दपक्षाकडे गुंतून पडली. तक्रारकर्त्‍या सोबत दिनांक-11.10.2010 रोजी करार करुन व आज जवळपास 06 वर्षाचा कालावधी उलटूनही प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर कोणतेही बांधकाम सुरु केलेले नाही, अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला. आज त्‍या परिसरात फ्लॅटची किंमत अंदाजे रुपये-15,00,000/- झालेली असून त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थिक नुकसान झालेले आहे,  म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील मागण्‍या केल्‍यात-

       

(1)   विरुध्‍दपक्षाने करार दिनांक-11/10/2010 प्रमाणे करारातील रो-हाऊस क्रं-292 चे संपूर्ण बांधकाम आदेशाचे दिनांका पासून 06 महिन्‍याचे आत  करुन त्‍याचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍या कडून उर्वरीत रक्‍कम स्विकारुन त्‍याचे नावे नोंदवून देऊन प्रत्‍यक्ष्‍य ताबा देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

(2)   परंतु करारा प्रमाणे रो-हाऊसचे विक्रीपत्र नोंदवून देणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने करारातील रो-हाऊसपोटी विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केलेली आंशिक रक्‍कम  रुपये-1,40,000/- सदनीका आरक्षीत  दिनांका-12/09/2010 पासून वार्षिक 18% व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

 

(3)   तक्रारकर्त्‍याच्‍या नावे रो-हाऊसचे विक्रीपत्र करुन न मिळाल्‍यास दरम्‍यानचे काळात घरांच्‍या किंमती मध्‍ये प्रचंड वाढ झालेली असल्‍याने आर्थिक नुकसानीपोटी रुपये-10,00,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावेत.

 

(4)  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व  मानसिक त्रासा बद्दल रुपये-3,00,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-25000/- विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 4) यांचे नावे उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस अतिरिक्‍त ग्राहक मंच, नागपूर तर्फे पाठविण्‍यात आली, सदर रजिस्‍टर नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं- 4) यांना प्राप्‍त झाल्‍याच्‍या पोच अभिलेखावर दाखल आहेत तर विरुध्‍दपक्ष क्रं-2)  व क्रं-3) यांच्‍या रजिस्‍टर नोटीसेस “Refused” या पोस्‍टाचे शे-यासह परत आलेल्‍या आहेत. अतिरिक्‍त ग्राहक मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही/नोटीसची सुचना प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 4) तर्फे कोणीही ग्राहक  मंचा समक्ष हजर झाला नाहीत वा त्‍यांनी आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 4) यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश अतिरिक्‍त ग्राहक मंचाने दिनांक-09/12/2016 रोजी पारीत केला.

 

04.   तक्रारकर्त्‍याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या प्रती  दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने सदनीका विक्रीचा करारनामा आणि विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे त्‍याला दिलेले पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

  

05.  तक्रारकर्त्‍या तर्फे अधिवक्‍ता पंधरे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

06.   तक्रारकर्त्‍याची सत्‍यापना वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्‍ध विक्री कराराची प्रत इत्‍यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

 

                         ::निष्‍कर्ष::

 

07.   तक्रारकर्त्‍याने  (विरुध्‍दपक्ष म्‍हणजे मे.झाम बिल्‍डर्स आणि डेव्‍हलपर्स प्रा.लि. नागपूर व्‍दारा कार्यकारी संचालक- हेमंत झाम असे समजण्‍यात यावे)  विरुध्‍दपक्ष फर्मचे प्रस्‍तावित मौजा वागधरा, तालुका जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं-108 व 109, पटवारी हलका क्रं-46, तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील “JASMINE” 1-BHK, KANHAIYA CITY PHASE II या आवास योजने मधील रो-हाऊस क्रं-292, प्‍लॉट एरिया-647 चौरसफुट, सुपर बिल्‍टअप एरिया-390 चौरसफूट एकूण रुपये-7,00,000/- एवढया किमती मध्‍ये खरेदी करण्‍याचा करार विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे कार्यकारी संचालक श्री हेमंत झाम याचे सोबत दिनांक-11 ऑक्‍टोंबर, 2010 रोजी केला. (सदर नमुद प्रस्‍तावित बांधकाम योजनेतील रो-हाऊस क्रं-292 चा यापुढे निकालपत्रात उल्‍लेख करारातील रो-हाऊस असा करण्‍यात येईल) तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला सदनीका विक्री करारा पोटी इसारा दाखल  दिनांक-10/10/2010 पर्यंत रुपये-1,40,000/- एवढी रक्‍कम दिली व पावत्‍या प्राप्‍त केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने सदर कराराची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केली आहे, करारा प्रमाणे काही रक्‍कम नोंदणीचे वेळी आणि नंतरच्‍या रकमा या बांधकाम प्रगती नुसार प्लिंथ लेव्‍हल, स्‍लॅब लेव्‍हल, प्‍लॉस्‍टरींग वर्क आणि ताब्‍याचे वेळी  टप्‍प्‍या-टप्‍याने देण्‍याचे ठरले.

 

 

08.   दिनांक-11/10/2010 चे रो-हाऊस विक्री करारामध्‍ये असेही नमुद करण्‍यात आले की,मालमत्‍ते वरील सर्व कर, महसूल उपकर भरण्‍याची जबाबदारी ही खरेदीदाराची राहिल तसेच मालमत्‍तेचे नोंदणीकृत विक्रीपत्रा संबधाने नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्‍क भरण्‍याची जबाबदारी ही खरेदीदार याची राहिल. तसेच एम.एस.ई.बी. चॉर्जेस, मेन्‍टनन्‍स शुल्‍क, डेव्‍हलपमेंट चॉर्जेस, पाणी शुल्‍क,  सर्व्‍हीस टॅक्‍स आणि इतर कायदेशीर शुल्‍क देण्‍याची जबाबदारी ही खरेदीदार याची राहिल. सदर विक्री करारा मध्‍ये विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे कार्यकारी संचालक हेमंत झाम याने त्‍याला तक्रारकर्त्‍या कडून दिनांक-10/10/2010 पर्यंत रो-हाऊसपोटी आंशिक रक्‍कम रुपये-1,40,000/- प्राप्‍त झाल्‍याची बाब कबुल केलेली असल्‍याने तेवढी आंशिक रक्‍कम तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष फर्म मध्‍ये जमा केल्‍याची बाब सिध्‍द होते.

 

 

09.   तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याला विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे दिनांक-14/08/2012 रोजीचे पत्र प्राप्‍त झाले होते, त्‍यामध्‍ये करारातील नमुद मालमत्‍तेचे संपूर्ण बांधकाम हे एप्रिल-2014 पर्यंत पूर्ण करण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले होते, सदर पत्राची प्रत पुराव्‍या दाखल अभिलेखावर दाखल करण्‍यात आलेली आहे, त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याचे कथनाला पुष्‍टी मिळते.

 

 

10.  तक्रारकर्त्‍याचा असाही आरोप आहे की, बांधकाम मंजूरी नसताना विरुध्‍दपक्षाने करारातील रो-हाऊसपोटी तक्रारकर्त्‍या कडून आंशिक रक्‍कम स्विकारुन एकप्रकारे त्‍याची फसवणूकच केलेली आहे, तक्रारकर्त्‍याची रक्‍कम विनाकारण विरुध्‍दपक्षाकडे गुंतून पडली. तक्रारकर्त्‍या सोबत दिनांक-11.10.2010 रोजी करार करुन व आज जवळपास 06 वर्षाचा कालावधी उलटूनही प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर कोणतेही बांधकाम सुरु केलेले नाही, अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला.

 

 

11.   तक्रारकर्त्‍याची तक्रार सत्‍यापनावर दाखल आहे तसेच त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुराव्‍यार्थ नमुद केल्‍या प्रमाणे दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. विरुध्‍दपक्षांना ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही ते मंचा समक्ष हजर झाले नाहीत वा त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने तक्रारीत केलेले त्‍यांचे विरुध्‍दचे आरोप खोडून काढलेले नाहीत. विरुध्‍दपक्षाने प्रस्‍तावित सदनीकेचे जागे बाबत महाराष्‍ट्र शासनाकडून मंजूरी आदेश विहित मुदतीत प्राप्‍त करण्‍यासाठी कोणताही प्रयत्‍न न करुन तक्रारकर्त्‍याला प्रस्‍तावित सदनीकेपोटी ताटकळत ठेवणे, त्‍याने  जमा केलेली रक्‍कम परत करण्‍याचे सौजन्‍य न दाखविणे, हा सर्व प्रकार विरुध्‍दपक्षा तर्फे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब यामध्‍ये मोडतो. विरुध्‍दपक्षाचे अनुचित व्‍यापारी प्रथेमुळे तसेच दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

12.    सर्वसामान्‍य व्‍यवहारा मध्‍ये कोणताही ग्राहक हा नियोजित बांधकाम प्रकल्‍पा मध्‍ये पुढील कोणतेही बांधकाम सुरु नसताना पुढील हप्‍त्‍यांच्‍या रकमा या बिल्‍डरला देणार नाही आणि या प्रकरणात सुध्‍दा विरुध्‍दपक्षाला बांधकामाची मंजूरी मिळाली नसल्‍याची बाब विरुध्‍दपक्षानेच आपल्‍या दिनांक-14/08/2012 रोजीचे पत्रात मान्‍य केलेली आहे.

 

 

13.   तक्रारकर्त्‍या तर्फे आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी First AppealNo.-FA/14/7-“Sau.Uma Tularam Bhaisare आणि First Appeal No.-FA/14/10-“Shri Naraya Bhauji Bhasarkar-Versus-Shri Pratik Sagar Dambhare” Decided on-10/02/2017  या अपिलीय प्रकरणां मध्‍ये दिलेल्‍या निवाडयावर ठेवली. आम्‍ही या निवाडयाचे काळजीपूर्वक वाचन केले, त्‍यामध्‍ये जर विरुध्‍दपक्षाला संबधित खरेदीदार यांना भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास त्‍यांनी भूखंडापोटी जेवढी रक्‍कम विरुध्‍दपक्षाला अदा केलेली आहे, तेवढीच अदा केलेली रक्‍कम दरम्‍यानचे काळात भूखंडाच्‍या किंमतीं मध्‍ये वाढ झाल्‍यामुळे नुकसान भरपाई म्‍हणून  तक्रार दाखल दिनांका पासून ते प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो वार्षिक-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्षाने संबधित खरेदीदार यांना देण्‍याचे आदरणीय राज्‍य ग्राहक आयोगाने आदेशित केलेले आहे.

     आदरणीय राज्‍य ग्राहक आयोगा समोरील  अपिलीय प्रकरणां मध्‍ये संबधित तक्रारदारांनी करारा प्रमाणे संपूर्ण भूखंडांची किम्‍मत विरुध्‍दपक्षाला अदा केलेली आहे परंतु आमचे समोरील प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला रो-हाऊसची आंशिक रक्‍कम म्‍हणजे रो-हाऊसची किम्‍मत रुपये-7,00,000/- पैकी रुपये-1,40,000/- एवढीच रक्‍कम अदा केलेली असल्‍याने सदर न्‍यायनिवाडया प्रमाणे दरम्‍यानचे काळात मालमत्‍तेच्‍या किम्‍मतीत झालेल्‍या दरवाढीमुळे नुकसान भरपाई मिळण्‍याचा लाभ तक्रारकर्त्‍यास मिळू शकणार नाही.

 

 

14.    या ठिकाणी आणखी एका बाबीचा उल्‍लेख करणे अत्‍यंत जरुरीचे आहे की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष म्‍हणून क्रं-1) हेमंत सिकंदर झाम, क्रं-2) मुकेश झाम, क्रं-3) राकेश शर्मा आणि क्रं-4) म्‍हणून झाम बिल्‍डर्स एवं डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड मार्फत कार्यकारी संचालक श्री हेमंत सिकंदर झाम यांना तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं-2) मुकेश झाम आणि क्रं-3) राकेश शर्मा हे सुध्‍दा कंपनीचे संचालक आहेत परंतु वि.प.क्रं-2) व क्रं -3) हे कंपनीचे संचालक असल्‍या बाबत कोणताही दस्‍तऐवजी पुरावा अभिलेखावर आमचे समोर दाखल करण्‍यात आलेला नाही.  रो-हाऊस विक्री करारा वरुन असे दिसून येते की, झाम बिल्‍डर्स एवं डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे हेमंत झाम याने तक्रारकर्त्‍याशी विक्री करार केल्‍याचे दिसून येते. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-2) व क्रं-3) हे अतिरिक्‍त ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झालेले नाहीत व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे सुध्‍दा दिलेले नाही.  तक्रारीत विरुध्‍दपक्ष क्रं-1) हेमंत झाम याला वैयक्तिक क्षमतेत आणि विरुध्‍दपक्ष क्रं-4) म्‍हणून फर्म तर्फे कार्यकारी संचालक म्‍हणून हेमंत झाम याला प्रतिपक्ष बनविलेले आहे, वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष क्रं-1) व क्रं-4) हे दोन्‍ही एकच व्‍यक्‍ती आहे. अशापरिस्थितीत केवळ अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन ही तक्रार विरुध्‍दपक्ष झाम बिल्‍डर्स एवं डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे कार्यकारी संचालक श्री हेमंत सिकंदर झाम याचे विरुध्‍द अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे, असे अतिरिक्‍त ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

15.  उपरोक्‍त नमुद परिस्थितीत विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे हेमंत झाम याने  करारातील रो-हाऊस क्रं-292 चे संपूर्ण बांधकाम करारातील व ब्राऊचर मधील नमुद सोयी व सुविधांसह पूर्ण करुन त्‍याचे नोंदणीकृत विक्रीपत्र उर्वरीत रक्‍कम रुपये-5,60,000/- तक्रारकर्त्‍या कडून स्विकारुन त्‍याचे नावे नोंदवून देऊन प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर मोजमाप करुन ताबापत्र द्दावे. करारा प्रमाणे नमुद मेन्‍टनन्‍स, विद्दुत मीटर, वॉटर टॅक्‍स, सर्व्‍हीस टॅक्‍स, व्‍हॅट इत्‍यादी देय शुल्‍काच्‍या रकमा तसेच नोंदणी फी व मुद्रांकशुल्‍काचा खर्च तक्रारकर्त्‍याने सहन करावा परंतु काही कायदेशीर तांत्रिक अडचणीस्‍तव विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे कार्यकारी संचालक हेमंत सिकंदर झाम याला करारातील रो-हाऊसचे विक्रीपत्र तक्रारकत्‍यास नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास करारात नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास अदा केलेली आंशिक एकूण रक्‍कम रुपये-1,40,000/- शेवटच्‍या रकमेचा हप्‍ता अदा केल्‍याचा दिनांक-10/10/2010 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत करावी. तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित करणे न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.

 

16तक्रार मुदतीत दाखल आहे  या संदर्भात हे  ग्राहक मंच पुढील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवीत आहे-

 

  1. Special Leave Petition No.-CC/8481/2012, Decided on-09/05/2012 (S.C.) “Meerut Development Authority -Versus-Mukeshkumar  Gupta”

 

  1. “Haryana Urban Development Authority-Versus- Tej Refigeration”- IV (2012) CPJ-12 (N.C.)

 

  1. “Raju Tank-Versus-Bindraben Bharat kumar

          Mavani-2014 (2) CPR 32 (N.C.)

 

   

  1. NEW GENERATION REAL ESTATE LTD.-

VERSUS- RAMESH CHANDRA  KHURANA”      -I (2015) CPJ 567  (NC)

                    LIMITATION-Until or unless sale deed is

                                            executed the cause of action

                                            continues.

 

           (5)  “HARPREET SINGH KOHLI & ANR.-VERSUS-

                     NELU EXTATE & MOVERS PVT.LTD.”

                    -I (2015)    CPJ 573 (NC)

                   LIMITATION-  Continuous cause of action till

                                                possession is given and sale deed

                       is executed.

 

       (6)   “Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti

                Kumar & Ors.” - 2005(2) CPR-1 (NC).

 

 

       उपरोक्‍त मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयां मध्‍ये असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्‍जा संबधित ग्राहकास देण्‍यास किंवा त्‍याने जमा केलेली रक्‍कम परत करण्‍यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात  असेही  नमुद  केले  आहे की,  जर  भूखंडाचा  विकास  करण्‍यास विकासक/बांधकाम व्‍यवसायिक काही प्रयत्‍न करीत नसेल किंवा त्‍याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्‍ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्‍यामुळे असा आक्षेप जर विरुध्‍दपक्ष घेत असेल तर त्‍या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्‍याची गरज नसते.

 

 

17.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

               ::आदेश::

 

1)    तक्रारकर्ता श्री उमेश मुनिश्‍वर धोडरे यांची, विरुध्‍दपक्ष झाम बिल्‍डर्स एवं डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड,नागपूर तर्फे कार्यकारी संचालक हेमंत सिकंदर झाम याचे विरुध्‍दची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2)  विरुध्‍दपक्षास आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने उभय पक्षांमध्‍ये  झालेल्‍या दिनांक-10 ऑक्‍टोंबर, 2010  रोजीचे करारा प्रमाणे रो-हाऊस क्रं-292 चे ब्राऊचर व करारामध्‍ये नमुद सर्व सोई व सुविधांसह संपूर्ण बांधकाम करावे. नोंदणीकृत विक्रीपत्र रो हाऊसची एकूण किम्‍मत                 रुपये-7,00,000/- पैकी तक्रारकर्त्‍याला उर्वरीत  देणे असलेली रक्‍कम      रुपये-5,60,000/- (अक्षरी रुपये  पाच लक्ष साठ हजार फक्‍त)  त्‍याचे कडून स्विकारुन तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देऊन प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर मोजमाप करुन ताबापत्र द्दावे. करारा प्रमाणे नमुद मेन्‍टनन्‍स, विद्दुत मीटर, वॉटर टॅक्‍स, सर्व्‍हीस टॅक्‍स, व्‍हॅट इत्‍यादी देय शुल्‍काच्‍या रकमा तसेच नोंदणी फी व मुद्रांकशुल्‍काचा खर्च तक्रारकर्त्‍याने सहन करावा.

 

3)  परंतु उपरोक्‍त नमुद करारातील रो-हाऊसचे विक्रीपत्र काही                कायदेशीर  तांत्रिक  कारणास्‍तव  तक्रारकर्त्‍याचे  नावे  नोंदवून  देणे                  

 

      विरुध्‍दपक्षास  शक्‍य  नसल्‍यास करारात नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास रो-हाऊसपोटी अदा केलेली आंशिक एकूण रक्‍कम रुपये-1,40,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष चाळीस हजार फक्‍त) शेवटच्‍या रकमेचा हप्‍ता अदा केल्‍याचा दिनांक-10/10/2010 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्षाने परत करावी.

 

4)   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल  रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून  रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास द्दावेत.

 

5)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष फर्म झाम बिल्‍डर्स एवं डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड तर्फे कार्यकारी संचालक हेमंत सिकंदर झाम याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

6)    अभिलेखावरील दाखल दस्‍तऐवजी  पुराव्‍यां वरुन प्राप्‍त परिस्थितीत विरुध्‍दपक्ष क्रं-2) मुकेश झाम आणि विरुध्‍दपक्ष क्रं-3) राकेश शर्मा यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश पारीत करण्‍यात येत नाहीत.

 

7)    निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन     देण्‍यात  याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.