नि.135 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसूली अर्ज क्रमांक : 16/2008 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.29/08/2008 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.15/10/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या मौजे उक्षी बौध्दजन उत्कर्ष मंडळ, मुंबई. नोंदणी नं.महाराष्ट्र राज्य, मुंबई 1720/जी.बी.बी.एस.डी.करीता श्री.हिराजी भिकाजी जाधव,रा.मु.पो.उक्षी, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्री.हनुमंत गोविंद कदम रा.मु.पो.गोविळ, ता.लांजा , जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.रेडीज सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.साळवी -: नि का ल प त्र :- अ) तक्रारदार संस्थेतर्फे अध्यक्ष शरद जाधव यांनी विधिज्ञांसह हजर होवून नि.133 वर प्रकरण काढून टाकण्यात/निकाली करण्यात यावे अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी सदर कामी नि.134 वर सदर अध्यक्ष यांना तक्रार मागे घेणेबाबत अधिकार दिले असलेबाबतच्या ठरावाची नक्कल दाखल केलेली आहे. ब) सदर अर्जातील मजकूर खालीलप्रमाणेः- ‘‘प्रस्तूत प्रकरणी अर्जदार व सामनेवाला यांचेत तडजोड झाली असून प्रस्तूत प्रकरण यापुढे चालविणेत अर्जदाराला कोणतेही स्वारस्य उरलेले नाही. तरी प्रस्तूत प्रकरण काढून टाकण्यात/निकाली करण्यात यावे हि विनंती.’’ येणेप्रमाणे अर्ज आहे. क) सदर अर्जाच्या अनुषंगाने प्रस्तुतचा वसूली अर्ज निकाली करणेत येतो. रत्नागिरी दिनांक : 15/10/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |