नि. 29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 164/2010 नोंदणी तारीख – 14/7/2010 निकाल तारीख – 15/10/2010 निकाल कालावधी – 91 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सौ सुनिता नरेंद्र पाटील रा.संगममाहुली, उमीचा चेंबर पाठीमागे, सातारा रा. प्रसन्न रेसिडेन्सी, सी.टी.एस.नं.85 ते 90 फलॅट नं.7, शनिमारुती मंदिराजवळ, रामाचा गोट, सातारा ------ अर्जदार (अभियोक्ता श्री बी.जे.पाटील) विरुध्द 1. श्री हणमंत विठोबा यादव रा.संगममाहुली, सत्यमनगर, (वेदभवन मंगल कार्यालयासमोर) ता.जि.सातारा ----- जाबदार क्र.1 (अभियोक्ता श्री व्ही.बी.जाधव) 2. श्री नारायण परशुराम शिंदे रा.संगममाहुली ता.जि.सातारा ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता श्री ए.एस.साळुंखे) न्यायनिर्णय 1. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे वडिलोपार्जित मालकी हक्काची जमीन विकसीत करुन त्याचे प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचे अधिकार जाबदार क्र.2 यांना दिलेले होते. जाबदार क्र.2 यांनी अर्जदार यांना सदरचे मिळकतीतील प्लॉट देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार साठेखतही लिहून दिलेले आहे. प्लॉटची किंमत रु.1,10,000/- पैकी अर्जदार यांनी जाबदार यांना वेळोवेळी रु.90,000/- दिलेले आहेत. उर्वरीत रक्कम रु.20,000/- प्लॉटचे खरेदीखताचेवेळी देण्याचे ठरलेले होते. परंतु जाबदार हे खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सबब उर्वरीत रक्कम स्वीकारुन खरेदीपत्र करुन देणेचा आदेश व्हावा, तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी नि.12 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून कोणतीही सेवा वा वस्तू खरेदी केलेली नाही, सबब अर्जदार हे ग्राहक होत नाहीत. अर्जदारने नमूद केलेली मिळकत कोणत्या गावी आहे या स्पष्ट उल्लेख अर्जात नाही. जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 यांना कोणतेही मुखत्यारपत्र लिहून दिलेले नाही. अर्जदार व जाबदार क्र.2 यांचेमधील व्यवहाराची जाबदार क्र.1 यांना काहीही माहिती नाही. अर्जदार यांची तक्रार मुदतीत नाही. अर्जदार यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी नि.16 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार सदरचे दाव्याचे कामकाज पाहण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाही. तक्रारअर्ज मुदतीत नाही. जाबदार क्र.2 यांनी कोणतीही रक्कम अर्जदारकडून स्वीकारलेली नाही. साठेखतासंबंधीत केलेले कथन खोटे आहे. अर्जदारने प्लॉटमध्ये गुंतवणूक करुन तो पुन्हा विक्री करणेसाठी साठेखत करुन घेतलेले आहे सबब तो ग्राहक होत नाही. बिनशेती परवाना अद्याप जाबदार यांना मिळालेला नाही. अर्जदारचे पतीने प्रथम 2003 मध्ये जाबदार क्र.2 कडून साठेखत करुन घेतले होते तदनंतर अर्जदारचे नावे दुसरे साठेखत दि.24/2/2006 रोजी करुन घेतलेले होते. जाबदार यांनी अर्जदारचे पतीस रु.75,000/- दिलेले आहेत तसेच रु.15,000/- देवूनही त्याची पावती त्यांनी दिलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री पाटील यांचा युक्तिवाद ऐकला. जाबदार क्र.2 तर्फे अभियोक्ता श्री साळुंखे व जाबदार क्र.1 तर्फे अभियोक्ता श्री व्ही.बी.जाधव यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. अर्जदारची तक्रार पाहता जाबदार क्र.1 यांच्या जमीनीचे एन.ए.करुन प्लॉट पाडून अधिकारपत्रानुसार त्यांची विक्री जाबदार क्र.2 करणार होते. त्याप्रमाणे अर्जदारकडून रक्कम घेवून जाबदार यांनी अर्जदार यास साठेखत करुन दिले परंतु खरेदीपत्र तसेच प्लॉट दिला नाही. 6. निर्विवादीतपणे जाबदार क्र.1 यांनी नि. 12 कडे कैफियत दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.1 यांनी अर्जदारने जाबदार क्र.1 बरोबर कोणताही व्यवहार तसेच साठेखत केलेले नाही सबब अर्जदार जाबदार क्र.1 चे ग्राहक नाहीत असे कथन केले आहे. निर्विवादीतपणे दाखल कागदपत्रे पाहता अर्जदारने जाबदार क्र.1 बरोबर कोणताही व्यवहार केला नाही हे स्पष्ट आहे. सबब अर्जदार जाबदार क्र.1 चे ग्राहक नाहीत हे स्पष्ट आहे. 7. जाबदार क्र.2 यांनी नि.16 कडे कैफियत दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. निर्विवादीतपणे जाबदार क्र.2 यांनी कैफियतीमध्ये अनेक मुद्यांसोबत अर्ज मुदतीत नाही तसेच अर्जदार जाबदारचे ग्राहक नाहीत असेही मुद्दे उपस्थित केले आहेत. निर्विवादीतपणे खरेदीपत्र होत नाही तोपर्यंत तक्रार मुदतीत आहे तसेच अर्जदार व जाबदार क्र.2 यांचेमध्ये झालेला व्यवहार पाहता अर्जदार जाबदार क्र.2 यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट आहे. जाबदार क्र.2 यांनी अर्जदारची तक्रार नाकारली आहे. परंतु अर्जदारला प्लॉट नं.1 चे साठेखत करुन दिले होते हे मान्य करतात. तसेच अद्याप जमीन एन.ए. झाली नाही असे कथन करतात. तसेच अर्जदारला रकमेची गरज असल्याने दिलेली रक्कम वेगवेगळया तारखांना अर्जदारचे पतींना परत दिली आहे असे कथन करतात. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार क्र.2 यांनी नि.25 सोबत हाताने मजकूर लिहिलेल्या पावत्या दाखल केल्या असून त्याचे अवलोकन करता दि.8/8/2004 रोजी रक्कम रु.5,000/- व दि.27/7/2007 रोजी रु.30,000/- (तीस हजार) मिळाले असा मजकूर लिहून तिकीट लावून सही असलेली पावती आहे व कडेला सदानंद मुरलीधर नारकर व शांताराम भगवान साळुंखे देगाव यांच्या सहया आहेत. अशाच प्रकारच्या दि.14/9/2009, दि.25/12/10 व दि.8/6/2008 रोजीच्या तिकीटावरती सही असलेल्या पावत्या दाखल असून त्यावरतीही कडेला सदानंद मुरलीधर नारकर व शांताराम भगवान साळुंखे यांच्या सहया आहेत. निर्विवादीतपणे अर्जदार यांचे वकीलांनी युक्तिवादामध्ये अर्जदार किंवा अर्जदारचे पतीला कोणतीही रक्कम परत मिळाली नाही असा युक्तिवाद केला तसेच नि.27 कडे अर्जदारचे पती नरेंद्र आनंदराव पाटील यांचे शपथपत्र दाखल केले असून त्यामध्ये त्यांनी पावतीवरील सही माझी नाही, मला कोणतीही रक्कम मिळाली नाही असे कथन केले आहे. जाबदार क्र.2 यांनी नि.28 कडे पावत्यांवरील साक्षीदार सदानंद मुरलीधर नारकर यांचे शपथपत्र दाखल केले असून त्याचे अवलोकन करता अर्जदर यांचे पतीने माझे समक्ष रकमा स्वीकारल्या आहेत, साक्षीदार म्हणून माझी सही आहे तसेच दि.8/8/2008 व दि.3/11/08 व दि.14/9/09 या पावत्यांवरती दुसरे साक्षीदार शांताराम साळुंखे तसेच दि.25/1/10 व दि.8/6/08 चे पावत्यांवरती सुध्दा माझी व दुसरा साक्षीदार अक्षय निकम यांच्या सहया आहेत असा मजकूर आहे. तसेच तक्रारअर्ज क्र.165/10 मध्ये अक्षय निकम यांचेही शपथपत्र दाखल आहे. निर्विवादीतपणे सदर शपथपत्राबाबत युक्तिवादामध्ये काहीही ऊहापोह केलेला नाही 8. अर्जदारने साठेखत झालेबाबतची अनेक साक्षीदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत. निर्विवादीतपणे जाबदार क्र.2 साठेखत झाले हे नाकारतच नाही. परंतु पावतीवरील सहया या अर्जदारचे पतीच्या नाहीत, अर्जदारला रक्कम मिळाली नाही, जाबदारने खोटी कागदपत्रे तयार केली आहेत असे अर्जदारने रिजॉईंडरमध्ये कथन केले आहे. सबब अर्जदारचे असे कथन असेल तर त्यांनी जाबदारविरुध्द योग्य त्या न्यायालयात दाद मागावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. अर्जदारचा जाबदारविरुध्द योग्य त्या न्यायालयात दाद मागणेचा अधिकार शाबूत ठेवून अर्जदारची तक्रार निकाली काढणेत येत आहे. 9. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज निकाली काढणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 15/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |