( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक :07 डिसेंबर 2010) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे एजन्ट श्री विकास पिल्लेवान यांचे कडुन गैरअर्जदार यांच्या मौजा पाचगाव, तह.उमरेड, जि. नागपूर येथील भुखंड क्रमांक 121, एकुण क्षेत्रफळ 2000 स्के.फुट ख.नं.246, प.ह.न.10 या लेआऊट मधील भुखंड खरेदी करण्याचा गैरअर्जदार यांचेशी सौदा केला. त्यापोटी तक्रारदाराने टोकन रक्कम रुपये 11,000/- व दुसरा हप्ता 13/04/2009 रोजी रोख रुपये 1,09,000/- गैरअर्जदारास अदा केले. तसेच श्री ओमप्रकाश किसनजी लांजेवार यांना एजन्ट म्हणुन नियुक्त करण्यासाठी श्री विकास पिल्लेवान यांना रुपये 2,000/- दिले. परंतु काही दिवसांनतर गैरअर्जदार यांनी सदर भुखंड दुस-या व्यक्तीस विकल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने त्यांना दिलेले पैसे परत करावे म्हणुन विनंती केली असता, गैरअर्जदार यांनी कंपनीच्या नियमाप्रमाणे सदर रक्कमेतुन 20टक्के दराने कपात करुन उर्वरित रक्कम परत मिळेल असे सांगीतले किंवा त्याबदल्यात दुसरा भुखंड घ्यावा असे सुचविले होते. तक्रारदाराने सदर व्यवहारात त्यांची चुक नसल्यामुळे संपुर्ण रक्कमेची मागणी केली. तक्रारदाराने पोलीस स्टेशन, कुही. तह.उमरेड येथे गैरअर्जदारा विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांनतर गैरअर्जदाराने तक्रारदार यांना संपुर्ण दस्तऐवज घेऊन या व तुमचे पैसे परत घेऊन जा असे सुचविले. त्याप्रमाणे तक्रारदार संपुर्ण दस्तऐवज घेऊन गैरअर्जदार यांचे कार्यालयात गेले असता, व गैरअर्जदारास रक्केमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने कंपनीच्या नियमाप्रमाणे धनादेश मिळेल असे सांगतीले व कंपनी नियमाप्रमाणे दिनांक 17.7.2009 रुपये 1,09,000/- व दिनांक 3.10.2009 रुपये 11,000/- चा धनादेश दिला. वास्तविक तक्रारदाराने रोख स्वरुपात रक्कम मिळावी अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे तक्रारदाराने उर्वरित रक्कम मिळण्याबाबत विचारण केली असता प्रथम अकाऊन्ट क्लिअर करा व तक्रार मागे घ्या त्यांनतर श्री ओमप्रकाश लांजेवार यांना सहीसाठी माझेकडे पाठवा मी बाकी रक्कम त्यांच्या सुपूर्द करतो. असे गैरअर्जदाराने सांगीतले. त्यानंतर वारंवार मागणी करुनही गैरअर्जदार यांनी तक्रारदाराची उर्वरित रक्कम दिली नाही म्हणुन तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करुन गैरअर्जदार कंपनीने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन 6 महिन्यांकरिता वापरलेले रुपये 1,20,000/- वर द.सा.द.शे.18 टक्के व्याजाने रुपये 9,000/- परत करावे. रक्कम रोख घेऊन तक्रारदारास धनादेशाद्वारे रक्कम परत केल्याने तक्रारदारास विनाकारण 150/- रुपये कमिशन लागले ते परत करावे. एजन्टचे नियुक्तिकरिता घेतलेले रुपये 2,000/- परत करावे. तसेच मानसिक व इतर त्रासाचे रुपये 15,000/- मिळावे अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 9 कागदपत्रे दाखल केली. त्यात राशन कार्डची प्रत, मतदान ओळखपत्र, पैसे भरल्याच्या पावत्यांची प्रत, करारनाम्याची प्रत, गैरअर्जदारास पाठविलेल्या पत्राची व पोचपावतीची प्रत, पोलीस स्टेशन मध्ये दखल दिल्याची प्रत, गैरअर्जदाराने दिलेल्या धनादेशाची प्रत, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल करुन आपला बचाव केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश 11.11.2010 रोजी एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. -: कारणमिमांसा :- तक्रारदाराने दाखल केलेले दस्तऐवज व त्यांचे म्हणणे यांचे अवलोकन केले असता या मंचाचे असे लक्षात येते की निर्वीवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेशी यांचा मौजा पाचगाव,तह.उमरेड,जि.नागपूर येथील भुखंड क्रमांक 121, एकुण क्षेत्रफळ 2000 स्के.फुट ख.नं.246, प.ह.न.10 या लेआऊट मधील भुखंड एकुण रक्कम रुपये 3,00,000/- मधे खरेदी करण्याचा करार केला. परंतु त्याबाबत तक्रारदाराने 26.3.2009 रोजी 11,000/- व दिनांक 13.4.2009 रोजी 1,09,000/- गैरअर्जदार यांना अदा केले. तक्रारदाराने दाखल केलेल्या त्यांचे शपथपत्र तसेच दस्तावेज क्रं. वरुन असे दिसुन येते की , गैरअर्जदाराने तक्रारदारास करारानुसार (कागदपत्र क्रं. ) भुखंड आवंटीत केला होता व तोच भुखंड दुस-या व्यक्तीस विकला त्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदारास दिलेली संपुर्ण रक्कम परत करावी म्हणुन गैरअर्जदाराकडे मागणी केलेली होती. व त्यानंतर तक्रारदाराने पोलीस स्टेशन कुही, उमरेड येथे तक्रार दाखल केली होती. कागदपत्र क्रं. वरील दाखल धनादेशावरुन असे निर्देशनास येते की, गैरअर्जदार यांनी दिनांक 26.3.2009 रोजी 11,000/- व दिनांक 13.4.2009 रोजी 1,09,000/- तक्रारदाराने अदा केलेले होते. तक्रारदाराचे मते त्यांचे एजन्ट नियुक्त करण्याकरिता रुपये 2,000/- श्री विकास पिल्ले यांना अदा केले होते. परंतु तक्रारदाराने हे म्हणणे पुराव्या अभावी या मंचास मान्य करता येणार नाही. तक्रारदाराचे मते सदर रक्कम गैरअर्जदाराने धनादेशाद्वारे परत केल्यामुळे तक्रारदारास विनाकारण रुपये 150/- कमिशनचा भुर्दंड सहन करावा लागला. परंतु कंपनीच्या नियमाप्रमाणे गैरअर्जदाराने धनादेशाद्वारे तक्रारदाराची रक्कम परत केलेली आहे यात काही गैर आहे असे या मंचास वाटत नाही. परंतु गैरअर्जदाराने तक्रारदाराचा भुखंड दुस-या व्यक्तीस विकला. तसेच काही कालावधीकरिता तक्रारदाराची रक्कम गैरअर्जदाराकडे जमा होती. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले व या नुकसानीस गैरअर्जदार जबाबदार आहे. असे या मंचाचे मत आहे. .सबब आदेश. -//-//- आदेश -//-//- 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर 2. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराने 26.3.2009 रोजी 11,000/- व दिनांक 13.4.2009 रोजी 1,09,000/- या रक्कमांवर, रक्कम दिल्याच्या सदर तारखेपासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो 12टक्के दराने द.सा.द.शे.सरळ व्याज द्यावे. 3. गैरअर्जदाराने तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी 2,000/-(रुपये दोन हजार केवळ) व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 1,000/-(रुपये एक हजार केवळ) असे एकुण रुपये 3,000/-(रुपये तीन हजार केवळ) एवढी रक्कम द्यावी. 4. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. ( जयश्री यंगल ) (जयश्री येंडे ) ( विजयसिंह ना. राणे ) सदस्या सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |