Maharashtra

Bhandara

CC/11/22

Smt Sunita Wd/o Rameshwar Bhivagade - Complainant(s)

Versus

Shri Gopal Satyanarayan Vyas - Opp.Party(s)

S M Bomidwar

27 Jul 2011

ORDER


ACKNOWLEDGEMENTDISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BHANDARA
CONSUMER CASE NO. 11 of 22
1. Smt Sunita Wd/o Rameshwar BhivagadeR/O Kushari Tah Mohad BhandaraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Shri Gopal Satyanarayan VyasOcc- Doctor Laksh Hospital Takiya Ward BhandaraBhandaraMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 27 Jul 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री. एन. व्ही. बन्सोड

 1.    तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत विरूध्‍द पक्ष डॉ. गोपाल सत्‍यनारायण व्‍यास, लक्ष हॉस्‍पीटल यांच्‍याविरूध्‍द तक्रार दाखल करून, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा विरूध्‍द पक्षाच्‍या निष्‍काळजीपणामुळे झालेला असल्‍यामुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाकरिता तसेच झालेल्‍या आर्थिक नुकसानीकरिता नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,00,000/-, तक्रारीचा खर्च रू. 5,000/- आणि नोटीस खर्च रू. 2,000/- विरूध्‍द पक्षाकडून मिळावे अशी मंचास मागणी केली आहे. 

तक्रारकर्तीचे म्‍हणणे थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.         विरूध्‍द पक्ष हे व्‍यवसायाने डॉक्‍टर असून तकिया वॉर्ड, भंडारा येथे लक्ष हॉस्‍पीटल या नावाने मल्‍टी स्‍पेशालिटी हॉस्पिटल चालवितात. विरूध्‍द पक्ष हे M.B.B.S., Diploma in Orthopedic असून ते हाडासंबंधीचे तज्ञ आहेत. सदर हॉस्पिटलमध्‍ये अपघात, हाडांचे उपचार, अस्‍थीसंबंधी शस्‍त्रक्रिया, प्रसुती व स्‍त्रीरोग, फिजिओथेरपी यासारख्‍या विकारासंबंधी वैद्यकीय सल्‍ला व उपचार करण्‍याचा व्‍यवसाय करतात तसेच सल्‍ला देण्‍याकरिता आकारणी करतात. 

3.    मृतक रामेश्‍वर भिवगडे यांना भारत सरकारच्‍या राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजना या उपक्रमाअंतर्गत स्‍मार्टकार्ड धारक म्‍हणून ओळखपत्र देण्‍यात आलेले होते. सदर विमा योजनेअंतर्गत स्‍मार्ट धारकांस निवडक दवाखान्‍यामध्‍ये मोफत वैद्यकीय सल्‍ला व उपचार देण्‍यात येतो.    

4.    भारत सरकारचे उपक्रमानुसार राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेअंतर्गत स्‍मार्ट कार्ड धारकास मोफत सल्‍ला व उपचार विरूध्‍द पक्ष यांच्‍या दवाखान्‍यात करण्‍यात येतात यासंबधीची जाहिरात गावोगावी बॅनर लावून करण्‍यात आली. तसेच भंडारा येथील मुस्‍लीम लायब्ररी चौकात 10/span>10 चा बॅनर लावला तसेच दवाखान्‍याचे मुख्‍य प्रवेशद्वारावर आणि दवाखान्‍यामध्‍ये जागोजागी जाहिरातीचे बॅनर, पॉम्‍प्‍लेटस् लावण्‍यात आलेले आहेत. तक्रारकर्तीचे मृतक पती रामेश्‍वर भिवगडे हे स्‍मार्ट कार्ड धारक असल्‍यामुळे सदर योजनेचे लाभार्थी आहेत.

5.    मृतक रामेश्‍वर भिवगडे हे स्‍मार्ट कार्ड धारक असल्‍यामुळे त्‍यांना विरूध्‍द पक्ष यांनी प्रसिध्‍द केलेल्‍या जाहिरातीनुसार दिनांक 22/09/2010 रोजी विरूध्‍द पक्ष यांच्‍या दवाखान्‍यामध्‍ये "हर्निया" या रोगाच्‍या वैद्यकीय उपचारार्थ दाखल करण्‍यात आले होते. विरूध्‍द पक्ष यांच्‍या सल्‍ल्‍याप्रमाणे दिनांक 24/09/2010 रोजी रामेश्‍वर भिवगडे यांच्‍यावर रोगाचे उपचारार्थ शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. विरूध्‍द पक्ष यांच्‍या दवाखान्‍यात भरती करण्‍यापूर्वी रामेश्‍वर भिवगडे यांना हर्निया या रोगाशिवाय इतर कोणताही आजार नव्‍हता. रामेश्‍वर भिवगडे यांनी विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडून वैद्यकीय सेवा घेतलेली आहे व शासनाच्‍या योजनेअंतर्गत लाभधारक असून मृतकाची पत्‍नी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (डी) (2) अंतर्गत सेवेची लाभार्थी म्‍हणून विरूध्‍द पक्ष यांची ग्राहक होते. दिनांक 24/09/2010 ला रामेश्‍वर भिवगडे यांच्‍यावर विरूध्‍द पक्ष यांच्‍या दवाखान्‍यात शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर शस्‍त्रक्रिया झालेल्‍या जागेवर अति‍शय त्रास होत होता व त्‍याबाबत तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांना अवगत करून दिले. त्‍यावर विरूध्‍द पक्ष यांनी शस्‍त्रक्रिया झालेल्‍या जागेवर त्रास होणारच अशी उडवाउडवीची उत्‍तरे देऊन रामेश्‍वर भिवगडे यांच्‍याकडे दुर्लक्ष करून उपचारामध्‍ये हयगय व निष्‍काळजीपणा केला. घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीसोबत तिचे मोठे भाऊ श्री. राजेश गडीराम चकोले उपस्थित होते.  

6.    दिनांक 25/09/2010 पासून तक्रारकर्तीच्‍या पतीला लघवी योग्‍य रित्‍या होत नव्‍हती तसेच खोकला सुरू झाला होता. त्‍याबाबत विरूध्‍द पक्ष यांना अवगत करून देण्‍यात आले. परंतु विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या बोलण्‍याक‍डे वेळीच लक्ष न देता टाळाटाळ केली. सदर तारखेस सकाळी 10.00 वाजता जेवणाचा डबा घेऊन तक्रारकर्ती दवाखान्‍यात आली असता तिचे पती अतिशय जोरजोराने खोकलत असल्‍याचे तिच्‍या निदर्शनास आले. त्‍याबाबत तिने विरूध्‍द पक्ष यांना पुन्‍हा अवगत करून खोकल्‍याचे औषध देण्‍याची त्‍यांच्‍याकडे मागणी केली असता सदर औषध दवाखान्‍यामध्‍ये उपलब्‍ध नाही असे विरूध्‍द पक्ष यांनी तिला सांगितले. त्‍याचप्रमाणे लघवीचे त्रासाबाबत विरूध्‍द पक्ष यांना सांगितले असता, "तुम्‍ही अधिक शहाणपणा सांगू नका, प्रकृती सुधारण्‍यास 24 तासापेक्षा जास्‍त वेळ लागतो" असे सांगून रूग्‍णास अधिकाधिक पाणी पाजण्‍याचा सल्‍ला दिला. तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार पतीस अधिकाधिक पाणी दिले. तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे की, विरूध्‍द पक्ष यांच्‍या दवाखान्‍यातील कर्मचा-यांनी देखील तिच्‍या पतीच्‍या उपचाराकडे योग्‍य व उचित लक्ष दिले नाही व दुर्लक्ष केले. दिनांक 25/09/2010 नंतर दिनांक 26, 27, 28 तारखेपर्यंत तक्रारकर्तीच्‍या पतीस केवळ सलाईन व पाणी यावरच ठेवण्‍यात आले होते. दिनांक 28/09/2010 रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीस सायंकाळपासून उलट्या होण्‍यास सुरूवात झाली. त्‍यामुळे रात्री तक्रारकर्तीच्‍या बहिणीने फोनद्वारे तक्रारकर्तीस तिच्‍या पतीची प्रकृती गंभीर असल्‍याबद्दल कळविले म्‍हणून तक्रारकर्ती रात्रीच्‍या वेळेस दवाखान्‍यात गेली. त्‍यावेळी दवाखान्‍यात विरूध्‍द पक्ष यांच्‍यासोबत इतर डॉक्‍टर तक्रारकर्तीच्‍या पतीचा रक्‍तदाब तपासत होते व लघवी करविण्‍याचा प्रयत्‍न करीत होते. परंतु लघवी होत नव्‍हती.

7.    सदर घटनेनंतर तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती हाताबाहेर गेल्‍यानंतर त्‍यांना नागपूरला हलविण्‍याचा सल्‍ला विरूध्‍द पक्ष यांनी दिला व तसे पत्र विरूध्‍द पक्ष यांनी मुख्‍य वैद्यकीय अधिकारी, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांच्‍या नांवे तक्रारकर्तीस दिले. सदर पत्राप्रमाणे तक्रारकर्तीच्‍या पतीस दिनांक 29/09/2010 रोजी नागपूर येथे हलविण्‍यात आले. परंतु तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती अतिशय गंभीर व हाताबाहेरची झाल्‍यामुळे उपचारादरम्‍यान दिनांक 30/09/2010 रोजी दुपारी 12.20 वाजता त्‍यांचा मृत्‍यु झाला.

8.    तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांना वेळोवेळी पतीच्‍या प्रकृतीविषयी अवगत करून दिले असता त्‍यांनी त्‍याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली. विरूध्‍द पक्ष हे हाडाचे तज्ञ आहेत. त्‍यामुळे हर्नियासारख्‍या रोगावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा परवाना तसेच विशेष व पुरेसे ज्ञान व अनुभव विरूध्‍द पक्ष यांना नाही. म्‍हणून सदर बाबत उचित दवाखान्‍यात वैद्यकीय उपचार घेण्‍याचा सल्‍ला विरूध्‍द पक्ष यांनी देणे आवश्‍यक होते. तसेच शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर रूग्‍णाची वेळोवेळी तपासणी करून उचित उपचार करणे व रोग्‍याची काळजी घेणे त्‍याचप्रमाणे रूग्‍णाच्‍या नातेवाईकांची उपचारासंबंधातील समस्‍या ऐकून त्‍याचे उचित निराकरण करणे, योग्‍य व वेळेवर सल्‍ला देणे हे विरूध्‍द पक्ष यांचे कर्तव्‍य व जबाबदारी होती. परंतु विरूध्‍द पक्ष हे त्‍यांची जबाबदारी पार पाडण्‍यात संपूर्णतः अपयशी ठरले आहेत. विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे उचित उपकरणे व औषधे नाहीत. वेळीच योग्‍य उपचार व सल्‍ला न दिल्‍यामुळे तसेच उपचाराकडे दुर्लक्ष व टाळाटाळ केल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीस प्राणास मुकावे लागले. विरूध्‍द पक्ष यांच्‍या उपचारातील त्रुटी दवाखान्‍यातील इतर रोग्‍यांनी अनुभवलेल्‍या असून तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या उपचारामध्‍ये झालेले दुर्लक्ष पाहिलेले आहे. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेत गंभीर स्‍वरूपाची तसेच पैशाने भरून न निघणारी त्रुटी झालेली आहे.

9.    तक्रारकर्तीचे पती शेतमजूर असून कुशल ट्रॅक्‍टर चालक होते तसेच कुटुंबातील एकमेव कमावते व्‍यक्‍ती असून त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नावर तक्रारकर्ती व तिची शिक्षण घेणारी दोन मुले अवलंबून होती. मुलाचे शिक्षण, संगोपन, मुलीचे लग्‍न, सांभाळ तसेच भविष्‍यासंबंधी यक्षप्रश्‍न तक्रारकर्तीसमोर असून तक्रारकर्तीस उत्‍पन्‍नाचे साधन उरलेले नाही. तसेच तक्रारकर्ती व तिच्‍या मुलांना तक्रारकर्तीचे पती व वडील यांच्‍या प्रेमास कायमचे मुकावे लागले असून तक्रारकर्तीस व कुटुंबियांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला व भविष्‍यात सुध्‍दा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. त्‍याकरिता विरूध्‍द पक्ष यांचा निष्‍काळजीपणा, ग्राहक सेवेतील त्रुटी, हलगर्जीपणा, वेळीच उपचार व सल्‍ला न देणे, विरूध्‍द पक्ष यांना उचित ज्ञान व अनुभव नसतांना उपचार करणे या सर्व बाबी कारणीभूत आहेत म्‍हणून विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडून नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,00,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहे. तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांना पत्र पाठवून नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु त्‍यास विरूध्‍द पक्ष यांनी उत्‍तर दिले नाही किंवा नुकसानभरपाई देखील दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 13/01/2011 ला विरूध्‍द पक्ष यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु त्‍यास सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांनी दाद दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने मंचासमक्ष तक्रार दाखल केलेली आहे.

10.   तक्रारकर्तीने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठ्यर्थ अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 11 ते 25 प्रमाणे दस्‍तऐवज दाखल केले असून त्‍यात राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेचे स्‍मार्ट कार्ड, भंडारा जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयाचे श्री.टिकाराम निखाडे यांच्‍या डिसचार्ज कार्डची प्रत (डॉ.गोपाल व्‍यास यांच्‍या शैक्षणिक अर्हतेबाबत), सी.एम.ओ., शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय नागपूर यांना दिलेल्‍या रेफरल लेटरची प्रत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय यांचा मृत्‍युसंबंधी दाखला, नोटीसच्‍या प्रती व पोचपावत्‍या यांचा समावेश आहे. 

11.   मंचाने तक्रार दाखल करून विरूध्‍द पक्ष यांना नोटीस बजावली. मंचाची नोटीस विरूध्‍द पक्ष यांना प्राप्‍त झाली असून त्‍यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल केले. विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

12.   विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या तक्रारीच्‍या वर नमूद केलेल्‍या परिच्‍छेद क्रमांक 1 ते 4 मधील मजकूर मान्‍य केला असून तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 5 च्‍या उत्‍तरात तक्रारकर्तीचे पती स्‍मार्ट कार्ड धारक होते हे मान्‍य केले. परंतु विरूध्‍द पक्ष यांच्‍या सल्‍ल्‍यावरून दिनांक 24/09/2010 ला तक्रारकर्तीच्‍या पतीवर रोगाचे उपचारार्थ शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती हे नाकारले. 

13.   विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 6 , 7 व 8 नाकारला व विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीवर शस्‍त्रक्रिया केली नसल्‍यामुळे त्‍याबाबत उत्‍तर देऊ शकत नाही असे नमूद केले तसेच तक्रारीचा परिच्‍छेद क्रमांक 9, 10 व 11 नाकारला. तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 12 च्‍या उत्‍तरात तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांना नुकसानभरपाई बाबत पत्र पाठविले हे नाकारले व दिनांक 13/01/2011 ची वकिलामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाली मात्र ती नोटीस फक्‍त विरूध्‍द पक्ष यांना फसविण्‍याकरिता आणि त्रास देण्‍याकरिता पाठविण्‍यात आलेली असून ती खोटी व बनावट असल्‍यामुळे त्‍यावर उत्‍तर देण्‍याची आवश्‍यकता भासली नाही असे नमूद केले.   तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 13 व 14 मधील मजकूर हा रेकॉर्डचा भाग असल्‍यामुळे त्‍यावर उत्‍तर देण्‍याची आवश्‍यकता नाही असे म्‍हटले. तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 15 ला दिलेल्‍या उत्‍तरात विरूध्‍द पक्ष यांनी म्‍हटले की, तक्रारकर्तीने अर्जासोबत दाखल केलेले दस्‍तऐवज हे पूर्णपणे नाकबूल असून अमान्‍य आहेत. 

14.   विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या विशेष कथनात म्‍हटले की, राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेअंतर्गत विरूध्‍द पक्ष यांचे लक्ष हॉस्पिटल ची इतर हॉस्पिटलसोबत नोंद करण्‍यात आलेली आहे. म्‍हणून कार्डधारक, रूग्‍ण कोणत्‍याही दवाखान्‍यात भरती होऊन उपचार करू शकतात व त्‍याकरिता शासन पैसे देते. त्‍यामुळे अर्जदार हा ग्राहक नाही. विरूध्‍द पक्ष यांनी म्‍हटले की, लक्ष हॉस्पिटल मध्‍ये वेगवेगळ्या उपचाराकरिता वेगवेगळे तज्ञ डॉक्‍टर येऊन आपली सेवा बजावत असतात. कारण या हॉस्पिटलमध्‍ये सर्व प्रकारच्‍या सुविधा असल्‍यामुळे कार्डधारकांना एकाच छत्राखाली विविध रोगांच्‍या सेवा उपलब्‍ध होतात. 

15.   विरूध्‍द पक्ष हे हाड तज्ञ व गंभीर अपघाताची शस्‍त्रक्रिया यांचे तज्ञ आहेत. त्‍यामुळे इतर शस्‍त्रक्रिया विरूध्‍द पक्ष स्‍वतः कधीच करीत नाहीत. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीची शस्‍त्रक्रिया विरूध्‍द पक्ष यांनी करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तक्रारकर्तीच्‍या पतीस (कार्डधारक) उपचार व शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी भरती करण्‍यात आले होती. प्रत्‍येक आजारासाठी स्‍वतंत्र डॉक्‍टरची योजना व नियुक्‍ती आहे. 

16.   तक्रारकर्तीच्‍या पतीने स्‍वेच्‍छेने या दवाखान्‍यात स्‍वतःला विमा योजनेअंतर्गत भरती करून घेतले. भरती केल्‍यापासून त्‍याचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम होते. परंतु अर्जदाराच्‍या इच्‍छेप्रमाणे तक्रारकर्तीच्‍या पतीस नागपूर येथे उपचाराकरिता न्‍यावयाचे आहे व मेडिकल कॉलेज, नागपूर येथे त्‍यास दाखवायचे आहे असे म्‍हणून मेडिकल हॉस्पिटल, नागपूर येथे तक्रारकर्तीच्‍या पतीस भरती करण्‍यासाठी पत्र द्यावे असे म्‍हटले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्तीने हॉस्पिटलमधून संबंधित डॉक्‍टरांचे पत्र स्‍वतःच्‍या इच्‍छेनुसार मागून घेतले व तक्रारकर्ती आपल्‍या पतीस घेऊन नागपूर येथे गेली. 

17.   विरूध्‍द पक्ष यांनी म्‍हटले की, नागपूर येथे नेण्‍याआधी तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती उत्‍तम होती. तथापि तिच्‍या स्‍वतःच्‍या हलगर्जीपणामुळे व शस्‍त्रक्रियेनंतर केलेल्‍या प्रवासामुळे तसेच पुढे कोणते उपचार झाले याबाबत विरूध्‍द पक्ष यांना माहिती नाही. तसेच विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीवर शस्‍त्रक्रिया केली नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष हे कोणतीही नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही व दाखल तक्रार खोटी असल्‍यामुळे खारीज करण्‍याची मागणी केली आहे. 

18.   तक्रारकर्तीने तिचे मोठे भाऊ श्री. राजेश गडीराम चकोले यांचे शपथपत्र दाखल केले व त्‍यात तक्रारकर्तीप्रमाणेच घडलेला वृत्‍तांत नमूद केलेला आहे.        

19.   मंचाने तक्रारकर्तीचे विद्वान वकील अॅड. बोमिडवार तसेच विरूध्‍द पक्ष यांच्‍या विद्वान वकील सौ. महांकाळ यांचा विस्‍तृत युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दोन्‍ही पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले.  त्‍यावरून मंचाची निरीक्षणे व निष्‍कर्ष खालीलप्रमाणे आहेत
 
निरीक्षणे व निष्‍कर्ष

20.   तक्रारकर्तीनुसार तिचे पती राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेअंतर्गत स्‍मार्ट कार्ड धारक असल्‍यामुळे शासनाच्‍या योजनेचे लाभधारक होते. म्‍हणून ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1)(डी)(2) अन्‍वये तक्रारकर्ती ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेची लाभार्थी म्‍हणून ग्राहक होते. विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या विशेष कथनामध्‍ये म्‍हटले की, स्‍मार्ट कार्ड धारक योजना ही शासनाची आहे व शासन त्‍याचे पैसे देते आणि तक्रारकर्ती ही ग्राहक नाही. विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठ्यर्थ माननीय राज्‍य आयोग, राजस्‍थान, जयपूर यांचे हनुमानप्रसाद दरबान वि. डॉ. सी. एस. शर्मा हे निकालपत्र दाखल केले व म्‍हटले की, तक्रारकर्तीने पतीच्‍या उपचाराकरिता मोफत सेवा प्राप्‍त केल्‍यामुळे तक्रारकर्ती ही ग्राहक ठरत नाही.  
तक्रारकर्तीने अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 117 व 118 वर दाखल केलेल्‍या राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेच्‍या दस्‍तऐवजावरून स्‍मार्ट कार्ड धारकास न्‍यू इंडिया अॅश्‍योरन्‍स कंपनी मार्फत मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्‍याबाबत संलग्‍न करण्‍यात आले आहे. तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठ्यर्थ माननीय राष्‍ट्रीय आयोग यांच्‍या “Jagdish kumar Bajpai V/s Union of India – 2006 (1) CPR 157 (NC) या निकालपत्राच्‍या परिच्‍छेद क्रमांक 11 मधील “Indian Medical Association V/s V. P. Shantha & Others, (1995) 6 SCC 651 या निकालपत्राकडे लक्ष आकर्षित केले. त्‍यामध्‍ये खालील बाब निष्‍कर्षित करण्‍यात आलेली आहे.
      That where a person has taken an insurance policy for medicare whereunder all charges, consultation, diagnosis and medical treatment are borne by the Insurance Company. In such a case the person receiving treatment is a beneficiary of services and the payment for such services would be made by the Insurance Company to the medical practitioner. The rendering such service by the medical practitioner cannot be said to be free of charge, similarly, whereas part of conditions of service the employer bears the expense of medical treatment of the employee and his family members dependent upon him.
 
            तक्रारकर्तीचे पती राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेचे कार्ड धारक असल्‍यामुळे तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) (2) अन्‍वये लाभार्थी असून विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेची ग्राहक ठरते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल निकालपत्र पूर्णतः तथ्‍यहीन ठरते म्‍हणून मंचाने नाकारले.  विरूध्‍द पक्षाने विशेष कथनात नमूद केले की, स्‍मार्ट कार्ड धारक योजना शासनाची त्‍यासाठी शासन पैसे देते. जेव्‍हा की, विमा कंपनीशी Tie up असल्‍यामुळे विमा कंपनी विरूध्‍द पक्षास आरोग्‍य सेवेसाठी पैसे देतात. त्‍यावरून विरूध्‍द पक्ष यांचे कथन खोटे व खोडसाळ स्‍वरूपाचे असून त्‍यांनी मंचाची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला असून त्‍याबाबत विरूध्‍द पक्ष यांचे अज्ञान व गलथानपणा सिध्‍द होतो.       

21.   तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केले की, विरूध्‍द पक्ष हे हाडाच्‍या विकाराचे तज्ञ आहेत. त्‍यामुळे हर्निया सारख्‍या रोगावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा परवाना तसेच विशेष व पुरेसे ज्ञान वा अनुभव त्‍यांना नाही. विरूध्‍द पक्ष यांचे रूग्‍णालय लक्ष हॉस्पिटल हे नोंदणीकृत सुध्‍दा नाही. विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचे म्‍हणणे नाकारून तक्रारकर्तीच्‍या पतीवर विरूध्‍द पक्ष यांनी शस्‍त्रक्रिया केली नसल्‍यामुळे ते उत्‍तर देऊ शकत नाही एवढेच एकमेव कथन केले. तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी The Bombay Nursing Home Registration Act 1949 च्‍या कलम 3, 4 व 5 कडे मंचाचे लक्ष आकर्षित केले. 
 3.             Provision to carry on nursing home without registration 
                   No person shall carry on a nursing home unless he has been duly registered in respect of such nursing home and the registration in respect thereof has not been cancelled under section 7:
          
4.               Application for registration 
            (1)        Every person intending to carry on a nursing home shall make every year an application for registration or the renewal of registration to the local supervising authority:Provided that in the case of a nursing home [which is in existence in any area at the date of the coming into force of section 3 in that area] an application for registration shall be made within three months from such date.
 
(2)        Every application for registration or the renewal of registration shall be made on such date and in such form and shall be accompanied by such fee, as may be prescribed.

5.         Registration. 
(1)        Subject to the provisions of this Act and the rules, the local supervising authority shall, on receipt of an application for registration, register the applicant in respect of the nursing home named in the application and issue to him a certificate of registration in the prescribed form

Provided that the local supervising authority may refuse to register the applicant if it is satisfied-

(a)        that he, or any person employed by him at the nursing home, is not a fit person, whether by reason of age or otherwise, to carry on or to be employed at a nursing home of such a description as the nursing home named in the application; or

¹[(b)     that the nursing home is not under the management of a person who is holding a degree in medical sciences and who is resident in the home, or that there is not a prescribed proportion of qualified nurses employed in the nursing home to the number of patients in it; or]

(c)        that in the case of a maternity home it has not got on its staff a qualified midwife; or

³[(2)     A certificate or registration issued under this section shall, subject to the provisions of section 7, be in force and shall be valid until the 31st day of March of the third year next following the date on which such certificate is issued or renewed, as the case may be.]

(3)        The certificate of registration issued in respect of a nursing home shall be kept affixed in a conspicuous place in the nursing home.

6.         Penalty for non-registration.
 
            Whoever contravenes the provisions of Section 3, shall, on conviction, be punished with imprisonment which may extend to six months or with fine which may extend to ten thousand rupees or with both.                                        

       तक्रारकर्तीने युक्तिवादादरम्‍यान आक्षेप घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांच्‍या वकील महोदया ह्या त्‍यावर मंचाचे समाधान होईल असे उत्‍तर देऊ शकल्‍या नाहीत. मंचाने तक्रारकर्तीच्‍या तक्रारीतील सर्व दाखल दस्‍तऐवजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता विरूध्‍द पक्ष यांचे लक्ष हॉस्पिटल हे The Bombay Nursing Home Registration Act 1949  अन्‍वये नोंदणीकृत असल्‍याबद्दलचा पुरावा मंचासमोर नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी सदर हॉस्पिटल चालवितांना कायद्याची पूर्णतः अवहेलना केलेली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या आरोपास पुष्‍टी मिळते.

22.   तक्रारकर्तीने म्‍हटल्‍याप्रमाणेचे विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरात हे मान्‍य केले की, ते हाड विकाराचे तज्ञ आहेत. तक्रारकर्तीचा आरोप आहे की, विरूध्‍द पक्ष हे हाड विकाराचे तज्ञ असल्‍यामुळे हर्निया सारख्‍या रोगावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा परवाना तसेच त्‍यांना विशेष व पुरेसे ज्ञान व अनुभव नाही तसेच विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीला उचित दवाखान्‍यात उपचार घेण्‍याचा सल्‍ला देणे आवश्‍यक होते.  तक्रारकर्तीने The Indian Medical Council (Professional Conduct, Etiquette and Ethics) Regulations, 2002 चे Code of Medical Ethicsकडे मंचाचे लक्ष आकर्षित केले. त्‍यामधील

1.4Display of registration numbers:

 
1.4.1    Every physician shall display the registration number accorded to him by the State Medical Council / Medical Council of India in his clinic and in all his prescriptions, certificates, money receipts given to his patients
 
1.4.2    Physicians shall display as suffix to their names only recognized medical degrees or such certificates/diplomas and memberships/honours which confer professional knowledge or recognizes any exemplary qualification/achievements. 

तक्रारकर्तीचा स्‍पष्‍ट आरोप असतांना सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांच्‍या वैद्यकीय व्‍यवसायासंबंधी State Medical Council / Medical Council of India यांच्‍या नोंदणीबाबतचा उल्‍लेख विरूध्‍द पक्ष यांच्‍या कोणत्‍याही दस्‍तऐवजावर आढळलेला नाही. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे राज्‍य वैद्यकीय परिषद/भारतीय वैद्यक परिषदेचे नोंदणी पत्रक आहे किंवा नाही ही बाब संदिग्‍ध स्‍वरूपाची असून Code of Medical Ethics नुसार विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे तसे रजिस्‍ट्रेशन नसणे व त्‍या रजिस्‍ट्रेशनचा तसेच त्‍यांनी अधिग्रहित केलेल्‍या पदवीचा विरूध्‍द पक्ष यांच्‍या दस्‍तऐवजावर उल्‍लेख नसणे ही बाब शिस्‍तभंगाचे कार्यवाहीस पात्र आहे या तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यास हे मंच सहमत आहे.
 
23.     विरूध्‍द पक्ष यांच्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 14 वरील दस्‍तऐवजावरून हे स्‍पष्‍ट होते की, लक्ष हॉस्पिटल हे मल्‍टी स्‍पेशालिटी हॉस्पिटल असून त्‍यावरील नोंदीनुसार सर्व गंभीर अपघात, हाडांचे उपचार, लहान मुलांच्‍या अस्‍थीसंबंधी शस्‍त्रक्रिया, प्‍लॅस्टिक सर्जरी, फेशियल ट्रॉमा उपचार, जनरल सर्जरी, प्रसुतीगृह व स्‍त्री रोग, आयसीयु, बालरोग, एक्‍स-रे, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी, आयुर्वेदिक चिकित्‍सा, स्‍लीमिंग सेंटर, हर्बल ब्‍युटी सेंटर इत्‍यादी उपचार होत असल्‍याबद्दल नोंद दिसते. विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या विशेष कथनात परिच्‍छेद क्रमांक 17 मध्‍ये शपथपत्रावर म्‍हटले की, लक्ष हॉस्पिटल मध्‍ये वेगवेगळ्या उपचाराकरिता वेगवेगळे तज्ञ डॉक्‍टर येऊन आपली सेवा पुरवित असतात. कारण या हॉस्पिटलमध्‍ये सर्व प्रकारच्‍या सुविधा उपलब्‍ध असल्‍यामुळे कार्ड धारकांना एका छत्राखाली विविध रोगांच्‍या सेवा उपलब्‍ध होतात. दस्‍तऐवज क्रमांक 14 तसेच विशेष कथनाच्‍या परिच्‍छेद क्रमांक 17 मध्‍ये विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या लक्ष हॉस्पिटल मध्‍ये येणारे वेगवेगळे तज्ञ डॉक्‍टर तसेच त्‍यांची क्‍वालिफिकेशन व महाराष्‍ट्र वैद्यक परिषदेकडील रजिस्‍ट्रेशन बाबत उल्‍लेख आढळत नाही व ते नमूद करण्‍याची विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या उत्‍तरात तसदी सुध्‍दा घेतली नाही.   तक्रारकर्तीने The Indian Medical Council (Professional Conduct, Etiquette and Ethics) Regulations, 2002 चे Chapter – 7 - Misconduct कडे मंचाचे लक्ष आकर्षित केले.
 
7.         Misconduct :
 
            The following acts of commission or omission on the part of a physician shall constitute professional misconduct rendering him/her liable for disciplinary action.

 
7.1       Violation of the Regulations: If he/she commits any violation of these Regulations.

 
7.2       If he/she does not maintain the medical records of his/her indoor patients for a period of three years as per regulation 1.3 and refuses to provide the same within 72 hours when the patient or his/her authorized representative makes a request for it as per the regulation 1.3.2.

 
7.3       If he/she does not display the registration number accorded to him/her by the State Medical Council or the Medical Council of India in his clinic, prescriptions and certificates etc. issued by him or violates the provisions of regulation 1.4.2.

सदरहू कलम 7 नुसार विरूध्‍द पक्ष यांची कृती ही Misconduct या सदरात मोडते असे दिसते. तसेच कलम 7.13 नुसार सुध्‍दा मोठ्या बोर्डाचा वापर करणे ही बाब सुध्‍दा Misconduct या सदरात मोडते. तसेच कलम 7.20 नुसार A physician shall not claim to be specialist unless he has a special qualification in that branch  यामुळे सुध्‍दा आणि विरूध्‍द पक्ष यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये येणारे डॉक्‍टर तज्ञ असल्‍याबाबत कोणताही दस्‍तऐवज मंचासमोर विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेला नाही. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍या लक्ष हॉस्पिटल मध्‍ये वेगवेगळ्या उपचाराकरिता वेगवेगळे तज्ञ डॉक्‍टर सेवा बजावत असतात हे म्‍हणणे पूर्णतः तथ्‍यहीन ठरते. व सदर बाबीची Judicial Note  घेणे मंचास संयुक्तिक वाटते.  


24.   तक्रारकर्तीने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 4 मध्‍ये नमूद केले की, विरूध्‍द पक्ष यांचेद्वारा राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजना व त्‍यांचे लक्ष हॉस्पिटल बाबतची जाहिरात गावोगावी बॅनर लावून करण्‍यात आली तसेच 10/span>10 चे बॅनर भंडारा शहरात लावले व विरूध्‍द पक्ष यांच्‍या दवाखान्‍याचे मुख्‍य प्रवेश द्वारावर देखील जाहिरातीचे बॅनर व पॉम्‍प्‍लेटस् लावण्‍यात आलेले आहे. ही बाब विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या उत्‍तरात स्‍पष्‍टपणे मान्‍य केली आहे. तक्रारकर्तीने सदर बाबतीत The Indian Medical Council (Professional Conduct, Etiquette and Ethics) Regulations, 2002 चे Chapter – 6 – Unethical Acts कडे मंचाचे लक्ष आकर्षित केले.

 
6.       Unethical Acts.
 
                  A physician shall not aid or abet or commit any of the following acts which shall be construed as unethical

 
            6.1       Advertising:

 
 6.1.1 Soliciting of patients directly or indirectly, by a physician, by a group of physicians or by institutions or organizations is unethical. A physician shall not make use of him/her (or his/her name) as subject of any form or manner of advertising or publicity through any mode either alone or in conjunction with others which is of such a character as to invite attention to him or to his professional position, skill, qualification, achievements, attainments, specialities, appointments, associations, affiliations or honours and/or of such character as would ordinarily result in his self aggrandizement. A physician shall not give to any person, whether for compensation or otherwise, any approval, recommendation, endorsement, certificate, report or statement with respect of any drug, medicine, nostrum remedy, surgical, or therapeutic article, apparatus or appliance or any commercial product or article with respect of any property, quality or use thereof or any test, demonstration or trial thereof, for use in connection with his name, signature, or photograph in any form or manner of advertising through any mode not shall he boast of cases, operations, cures or remedies or permit the publication of report thereof through any mode. A medical practitioner is however permitted to make a formal announcement in press regarding the following:
 
1.         On starting practice. 
2.         On change of type of practice.
              3.         On changing address. 
4.         On temporary absence from duty.
5.         On resumption of another practice
6.         On succeeding to another practice
7.         Public declaration of charges.

 
6.1.2    Printing of self photograph, or any such material of publicity in the letter head or on sign board of the consulting room or any such clinical establishment shall be regarded as acts of self advertisement and unethical conduct on the part of the physician. However, printing of sketches, diagrams, picture of human system shall not be treated as unethical.  
 
त्‍यावरून हे स्‍पष्‍ट होते की, पॉम्‍प्‍लेटस् वाटणे, मोठ्या बोर्डद्वारे जाहिरात करणे व त्‍याद्वारे रूग्‍णांना आकर्षित करण्‍याचा प्रयत्‍न करणे ही बाब रेग्‍युलेशन 2002 नुसार Unethical Act अंतर्गत येते असे दिसते. परंतु सदर बाबतीत महाराष्‍ट्र वैद्यक परिषद कार्यवाही करण्‍यास सक्षम असल्‍यामुळे सदर बाबतीत मंच विरूध्‍द पक्षाच्‍या Unethical Act ची Judicial Note घेत आहे.
 
25.   वर नमूद मोठमोठ्या बॅनरद्वारे तसेच गावोगावी पॉम्‍प्‍लेटस् द्वारे व बॅनर्स लावून, पब्लिसिटी करून ग्रामीण क्षेत्रातील अशिक्षित ग्राहकांना/दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना स्‍वतःच्‍या हॉस्पिटलबाबत बतावणी करून ग्राहकांना बळी पाडणे ही बाब ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (आर) अंतर्गत अनुचित व्‍यापारी पध्‍दतीमध्‍ये मोडते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 
 
26.   वरील नियमावलीच्‍या 7.18 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद आहेः-
 
      7.18     In the case of running of a nursing home by a physician and employing assistants to help him/her, the ultimate responsibility rests on the physician.

 
            विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 5 ला दिलेल्‍या उत्‍तरात दिनांक 24/09/2010 रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीवर उपचारार्थ शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती हे मान्‍य केले आहे. विरूध्‍द पक्ष यांनी विशेष कथनाच्‍या परिच्‍छेद क्रमांक 18 मध्‍ये नमूद केले आहे की, विरूध्‍द पक्ष हे हाडाचे तज्ञ व गंभीर अपघाताच्‍या शस्‍त्रक्रियेचे तज्ञ आहेत त्‍यामुळे इतर शस्‍त्रक्रिया विरूध्‍द पक्ष स्‍वतः कधीच करीत नाहीत. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. संपूर्ण दस्‍तांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता तक्रारकर्तीच्‍या पतीची हर्निया या आजाराची शस्‍त्रक्रिया कुणी केली ही बाब नमूद करण्‍याचे विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरात टाळलेले आहे. परंतु तथाकथित ऑपरेशन नोट्स दाखल केलेल्‍या आहेत तसेच केस पेपरवर डॉ. पातुरकर यांनी वेळोवेळी घेतलेल्‍या नोंदी दिसून येतात. तथापि, शस्‍त्रक्रिया करणा-या डॉक्‍टरांचे नाव, शैक्षणिक अर्हता, रजिस्‍ट्रेशन नंबर बाबत माहिती नमूद न करण्‍यामागे त्‍यांचा हेतू इतर डॉक्‍टरवर जबाबदारी सरकवण्‍याचा असू शकतो असे मंचास वाटते.  तसेच विरूध्‍द पक्ष / डॉ. पातुरकर हर्निया/पुढील उपचार करण्‍यास विहित अर्हताधारक/प्रशिक्षित/तज्ञ/ सक्षम आहेत हे सिध्‍द करण्‍यास विरूध्‍द पक्ष वस्‍तुनिष्‍ठ पुराव्‍याअभावी पूर्णपणे अपयशी ठरले असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष स्‍वतःच्‍या जबाबदारीतून मुक्‍त होऊ शकत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.      

 
27.   विरूध्‍द पक्ष यांच्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 79 वरील Consent for procedure/Surgery/Anesthesia या दस्‍तऐवजामध्‍ये प्रोसिजर व ऑपरेशन हे सर्वस्‍वी डॉ. गोपाल व्‍यास/ डॅा. पातुरकर यांच्‍या Supervision व निर्देशानुसार होईल असे स्‍पष्‍टपणे नमूद आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांच्‍यावर केलेले आरोप तसेच डॉ. पातुरकर यांची अर्हता, नोंदणी इत्‍यादीबाबतचे शपथपत्र किंवा त्‍यांचे शपथपत्रावरील उत्‍तर मंचासमोर नसल्‍यामुळे तक्रारकर्तीने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 8 मध्‍ये केलेल्‍या आरोपात मंचास तथ्‍य वाटते. ज्‍याअर्थी विरूध्‍द पक्ष हे हाडाचे तज्ञ आहेत, त्‍याअर्थी हर्निया सारख्‍या रोगावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा परवाना, विशेष व पुरेसे ज्ञान तसेच अनुभव विरूध्‍द पक्षास नाही या तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते व ऑपरेशन करणा-या तज्ञ डॉक्‍टरचे नाव युक्तिवादादरम्‍यान सांगण्‍याचे विरूध्‍द पक्षाच्‍या वकिलांनी टाळले.  
 
28.   विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या विशेष कथनात अनुक्रमे परिच्‍छेद क्रमांक 19 व 20 मध्‍ये खालील बाबी नमूद केलेल्‍या आहेतः
 
      (19) अर्जदाराच्‍या पतीने स्‍वइच्‍छेने या दवाखान्‍यात स्‍वतः ला विमा योजना अंतर्गत भरती करून घेतले, भरती केल्‍यापासून त्‍याचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम होते. परंतु अर्जदाराच्‍या इच्‍छेप्रमाणे तिला आपल्‍या पतीस नागपूर येथे उपचाराकरिता न्‍यावयाचे आहे व मेडिकल कॉलेज, नागपूर येथे त्‍यास दाखवायचे आहे. असे म्‍हणून मेडिकल हॉस्पिटल, नागपूर येथे अर्जदाराच्‍या पतीस भरती करण्‍यासाठी पत्र द्यावे. त्‍याप्रमाणे अर्जदाराने हॉस्पिटल मधून संबधित डॉक्‍टरचे पत्र स्‍वतःच्‍या इच्‍छेप्रमाणे मागून घेतले व अर्जदार आपले पतीस घेऊन नागपूर येथे गेली.
 
      (20) नागपूरला नेण्‍याआधी अर्जदाराच्‍या पतीची प्रकृती उत्‍तम होती पण तिच्‍या स्‍वतःच्‍या हलगर्जीपणामुळे व शस्‍त्रक्रियेनंतर केलेल्‍या प्रवासामुळे तसेच पुढे कोणता उपचार झाला याबद्दल या गैरअर्जदारास माहिती नाही. तसेच या गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या पतीवर शस्‍त्रक्रिया केली नसल्‍यामुळे गैरअर्जदार हा कोणत्‍याही प्रकारे नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही. त्‍यामुळे अर्जदाराने केलेली रू. 1,00,000/- ची मागणी ही बिनबुडाची व तथ्‍यहीन आहे. कारण गैरअर्जदाराकडून तसेच दवाखान्‍यात कोणत्‍याही प्रकारे त्रुटी नव्‍हती व नाही. केवळ पैसे उकळण्‍यासाठी खोटी कार्यवाही केली आहे. तरी विनंती आहे की, अर्जदाराची तक्रार खोटी व बनावट असल्‍यामुळे खर्चासहित खारीज करण्‍यात यावी. कारण जाणूनबुजून दवाखान्‍याचे नांव बदनाम करण्‍यासाठी ही कार्यवाही केल्‍याचे दिसून येते. सदर वाद हा दिवाणी स्‍वरूपाचा असल्‍यामुळे अर्जदाराचा सदर अर्ज खारीज करण्‍यात यावा. 
 
      विरूध्‍द पक्ष यांच्‍या वकिलांनी स्‍वतःच्‍या सहीने बिना शपथपत्र दिनांक 02/05/2011 ला लेखी बयानात दुरूस्‍तीचा अर्ज दाखल केला. त्‍यावर तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी आपले म्‍हणणे मांडले व म्‍हटले की, दुरूस्‍ती अर्जात हलफनामा करण्‍यात आलेला नाही. त्‍याचप्रमाणे प्रस्‍तावित दुरूस्‍तीमुळे लेखी बयानातील आशय बदलून न्‍याय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. करिता सदर अर्जास तीव्र विरोध केला व खारीज करण्‍याची मागणी केली. त्‍यावर मंचाने खालीलप्रमाणे आदेश पारित केला.
 
      "आम्‍ही दोन्‍ही सदस्‍यांनी विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेला दुरूस्‍तीचा अर्ज तसेच लेखी बयानाची पडताळणी केली असता असे निदर्शनास येते की, विरूध्‍द पक्ष यांनी सदर दुरूस्‍तीद्वारे लेखी बयानातील परिच्‍छेद संपूर्ण दुरूस्‍त करण्‍याची विनंती केलेली आहे. विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे आहे की, लेखी बयान दाखल केला त्‍यावेळी विरूध्‍द पक्ष यांच्‍याजवळ असलेली रूग्‍णाशी संबंधित सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आली होती. सदर अर्जामध्‍ये नमूद केलेले कारण हे अविश्‍वसनीय व असंयुक्तिक वाटते. तसेच प्रस्‍तावित दुरूस्‍तीमुळे लेखी बयानातील आशय पूर्णपणे बदलतो. त्‍यामुळे नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार सदरचा अर्ज मंजूर करणे म्‍हणजेच तक्रारकर्तीवर अन्‍यायकारक ठरेल. करिता सदर अर्ज नामंजूर करण्‍यात येतो."
 
29.   लेखी बयानात दुरूस्‍ती (पृष्‍ठ क्र. 29) या अर्जात विरूध्‍द पक्ष यांनी परिच्‍छेद क्रमांक 2 मध्‍ये नमूद केले आहे की, "लेखी बयान दाखल करतेवेळेस विरूध्‍द पक्ष यांच्‍याजवळ असलेली रूग्‍णाशी संबंधित सर्व कागदपत्रे कंपनीकडे पाठविण्‍यात आली होती कारण मार्च महिन्‍याच्‍या अखेरीस विमा कंपनीद्वारे ऑडिट केल्‍या जाते. लेखी बयान सादर करण्‍याची मुदत संपत आल्‍यामुळे कागदपत्र न हाताळता लेखी बयान तयार करून सादर करण्‍यात आला होता. त्‍यामुळे लेखी बयानात काही गोष्‍टींचा उल्‍लेख चुकीने करण्‍यात आला तसेच काही गोष्‍टींचा उल्‍लेख करण्‍यात आला नाही" असे नमूद केलेसदर तक्रार दिनांक 09/02/2011 ला दाखल झाल्‍यानंतर हजेरी/उत्‍तरासाठी पाठविलेली मंचाची नोटीस विरूध्‍द पक्षास प्राप्‍त होऊन दिनांक 22/03/2011 ला गैरहजर. नंतर दिनांक 31/03/2011 ही तारीख ठेवण्‍यात आली. दिनांक 31/03/2011 ला विरूध्‍द पक्ष यांचा तारीख मिळण्‍याचा अर्ज मंजूर करून सदर प्रकरण मंचाने दिनांक 11/04/2011 ला उत्‍तरासाठी ठेवले. विरूध्‍द पक्ष यांच्‍या दिनांक 31/03/2011 चे विनंती अर्जात, "गैरअर्जदाराकडून आवश्‍यक कागदपत्र न मिळाल्‍यामुळे उत्‍तर तयार होऊ शकले नाही" त्‍यामुळे तथा‍कथित कागदपत्रे व विमा कंपनीद्वारे ऑडीट ही बाब काल्‍पनिक व अविश्‍वसनीय ठरते.   मात्र विरूध्‍द पक्ष यांनी कोणत्‍या विमा कंपनीकडे कागदपत्र पाठविले होते तसेच विमा कंपनीद्वारे करण्‍यात आलेले ऑडिट याबाबत कोणतेही कथन/दस्‍तऐवज मंचासमोर नाही. तसेच तसे शपथपत्र सुध्‍दा मंचासमोर नसल्‍यामुळे रूग्‍णाशी संबंधित सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आली होती व विमा कंपनीद्वारे ऑडिट केल्‍या जाते हे विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे पूर्णतः तथ्‍यहीन व खोडसाळ स्‍वरूपाचे वाटते. विरूध्‍द पक्ष यांनी लेखी बयान दुरूस्‍ती अर्जाच्‍या परिच्‍छेद क्रमांक 3 मध्‍ये स्‍पष्‍टपणे मान्‍य केले आहे की, लेखी बयान हे कागदपत्र न हाताळता सादर करण्‍यात आले होते. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांचे अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 31 ते 34 वरील प्रतिज्ञापत्रावरील उत्‍तर निष्‍प्रभ तसेच अविश्‍वसनीय ठरते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे विरूध्‍द पक्षाने दाखल केलेली केस शीट, पॅथॉलॉजी रिपोर्ट व इतर दस्‍तऐवज बनावटी आहेत या बाबीची Judicial Note  घेणे मंचास संयुक्तिक वाटते.
 
      उत्‍तराच्‍या परिच्‍छेद क्रमांक 19 मध्‍ये - अर्जदाराच्‍या पतीने स्‍वइच्‍छेने या दवाखान्‍यात स्‍वतः ला विमा योजना अंतर्गत भरती करून घेतले, भरती केल्‍यापासून त्‍याचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम होते. परंतु अर्जदाराच्‍या इच्‍छेप्रमाणे तिला आपल्‍या पतीस नागपूर येथे उपचाराकरिता न्‍यावयाचे आहे व मेडिकल कॉलेज, नागपूर येथे त्‍यास दाखवायचे आहे. असे म्‍हणून मेडिकल हॉस्पिटल, नागपूर येथे अर्जदाराच्‍या पतीस भरती करण्‍यासाठी पत्र द्यावे. त्‍याप्रमाणे अर्जदाराने हॉस्पिटल मधून संबधित डॉक्‍टरचे पत्र स्‍वतःच्‍या इच्‍छेप्रमाणे मागून घेतले व अर्जदार आपले पतीस घेऊन नागपूर येथे गेली.
 
      दुरूस्‍ती अर्जातील वरील रकान्‍याच्‍या दुरूस्‍तीसंबंधी कथन (4) लेखी बयानातील उतारा क्रमांक 19 मधील काही भाग वगळून त्‍याऐवजी काही गोष्‍टींचा उल्‍लेख खालीलप्रमाणे करावयाचा आहे. 
उतारा क्र. 19 ः- "अर्जदाराच्‍या पतीने........................स्‍वास्‍थ्‍य उत्‍तर होते, यानंतर" परंतु अर्जदाराच्‍या इच्‍छेप्रमाणे......घेऊन नागपूर येथे गेली" हा भाग वगळून त्‍याऐवजी खालील दुरूस्‍ती करावयाची आहे.
 
      "गैरअर्जदाराच्‍या दवाखान्‍यात शस्‍त्रक्रिया करणा-या डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याप्रमाणे अर्जदाराच्‍या पतीस नागपूर येथे वरिष्‍ठ हॉस्पिटल मध्‍ये पुढील उपचारासाठी दाखल करणे आवश्‍यक आहे त्‍याप्रमाणे संबंधित डॉक्‍टरांनी दिनांक 28/9/10 रोजी रात्री 8.00 वाजता वरिष्‍ठ सेंटर नागपूरला रूग्‍णाला ताबडतोब नेण्‍याबद्दल अर्जदाराला सल्‍ला दिला."
 
उत्‍तराच्‍या परिच्‍छेद क्रमांक 20 मध्‍ये –‘नागपूरला नेण्‍याआधी अर्जदाराच्‍या पतीची प्रकृती उत्‍तम होती पण तिच्‍या स्‍वतःच्‍या हलगर्जीपणामुळे व शस्‍त्रक्रियेनंतर केलेल्‍या प्रवासामुळे तसेच पुढे कोणता उपचार झाला याबद्दल या गैरअर्जदारास माहिती नाही. असे नमूद आहे.
 
दुरूस्‍ती अर्जातील परिच्‍छेद क्रमांक 5 व 6 मध्‍ये (5)   "नागपूरला दिनांक 28/09/10 रोजी नेण्‍याचा सल्‍ला देऊन देखील अर्जदाराने नकार दिला व त्‍यामुळे रूग्‍णाला पुन्‍हा रात्रभर आवश्‍यक असलेल्‍या वरिष्‍ठ दवाखान्‍यात उपचार त्‍यास मिळू शकले नाही व त्‍याला रात्रभर ठेवून सकाळी नेले.
 
(6)   सदरहू बाबींचा बोध हा रूग्‍णाचे कागदपत्रांचा अभ्‍यास केल्‍यानंतर निदर्शनास आला. तसेच दिनांक 24/9/10 ला किमान 7 ते 8 शस्‍त्रक्रिया झाल्‍या. गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या पतीवर शस्‍त्रक्रिया केली नव्‍हती. त्‍यामुळे गैरअर्जदाराला अर्जदाराच्‍या पतीच्‍या शस्‍त्रक्रियेबाबत हवी तेवढी माहीती नव्‍हती. 
 
30.   वरील परिच्‍छेद क्रमांक 19 मधील विरूध्‍द पक्ष यांचे कथन हे पूर्णतः विरोधाभासी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. वरील परिच्‍छेद क्रमांक 19 मध्‍ये विरूध्‍द पक्ष यांनी नमूद केले आहे की, डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याप्रमाणे तक्रारकर्तीच्‍या पतीस नागपूर येथे वरिष्‍ठ हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करणे आवश्‍यक होते. विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या उत्‍तरात व दुरूस्‍ती अर्जात सुध्‍दा कोणत्‍या डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार वरिष्‍ठ हॉस्पिटल, नागपूर येथे उपचाराकरिता नेण्‍याचा सल्‍ला दिला हे हेतूपुरस्‍सर टाळलेले आहे. विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या तथाकथित केस पेपर वरील नोंदीनुसार दिनांक 28/09/2010 ला सकाळी 10.00 वाजता विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीस तपासल्‍याची नोंद दिसते व सुरू असलेलाच उपचार सुरू ठेवण्‍याबाबत नोंद दिसते. त्‍यानंतर दिनांक 28/09/2010 ला तब्‍बल 10 तासानंतर संध्‍याकाळी 8.00 वाजता डॉ. पातुरकर यांनी तपासल्‍याच्‍या नोंदी दिसतात. त्‍यामध्‍ये डॉ. पातुरकर यांनी CBC, BSR, BUN, Sr. Creatinine, Physician opinion Stat

Adv. Ref. Higher Center 
For further management.
 
Rx 
Head low, Nasal O2, TPR Hrly, Inj. Dopamin 400mg in 5% Dextrose 6-8 drops/min. 
IV RL 2, DNS 2, Inj. Pipzo 4.5gm IV stat & BD, Inj. Livoflox 500mg. IV BD, Inj. Metrozyl 100cc TDS, Inj. Effcorline 100mg IV stat & TDS, Inj. Rantac 2 cc TDS.

अशी नोंद केल्‍याबाबत आढळते. तसेच उपचार सुरू ठेवण्‍याबाबत नोंदी आढळतात. तसेच Higher Center ला पुढील उपचाराकरिता पाठविण्‍याची नोंद आढळते.  परंतु ऑपरेशन पश्‍चात कुठल्‍या कारणास्‍तव Higher Centre मध्‍ये रेफर करणे किंवा स्‍थलांतरित करणे आवश्‍यक आहे तसेच स्‍थलांतरित न केल्‍यास होणारे दुष्‍परिणाम, विरूध्‍द पक्षाच्‍या मल्‍टी स्‍पेशालिटी हॉस्पिटलमध्‍ये उपचार कां होऊ शकत नाही हे नमूद केलेले नाही.  मात्र डॉ. पातुरकर हे त्‍या विषयाचे तज्ञ डॉक्‍टर आहेत काय? त्‍यांचे क्‍वालिफिकेशन, त्‍यांचे रजिस्‍ट्रेशन मंचासमोर नसल्‍यामुळे तसेच त्‍यांचे शपथपत्र देखील मंचासमोर नसल्‍यामुळे त्‍या नोंदी व त्‍याबाबत बयान दुरूस्‍ती अर्जातील विरूध्‍द पक्ष यांचे कथन मंचास पूर्णतः तथ्‍यहीन वाटते. 
 
31.   तक्रारकर्तीने तक्रारीसोबत उपलब्‍ध वस्‍तुनिष्‍ठ दस्‍तऐवज दाखल केले. तसेच विरूध्‍द पक्ष यांनी शपथपत्रावरील उत्‍तरात व बिना शपथपत्रावरील बयान दुरूस्‍ती अर्जात वेगवेगळे कथन केलेले आहे, जे की विरोधाभासी दिसते. विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांची अर्हता, नोंदणी तसेच त्‍यांच्‍या रूग्‍णालयात येणारे किंवा सेवा देणारे तज्ञ डॉक्‍टर, त्‍यांची अर्हता, नोंदणी मंचासमोर दाखल केली नाही. तसेच विरूध्‍द पक्ष यांनी बयान दुरूस्‍ती अर्जात त्‍यांच्‍या रेकॉर्डबाबत पूर्णतः अविश्‍वसनीय स्‍वरूपाचे केलेले बयान मंचाने नाकारले. वरील सर्व बाबींमुळे संपूर्ण तक्रारीतील प्रकरणाचा शोध घेण्‍यासाठी व कसून तपासणी करण्‍याकरिता मंचाने माननीय राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र, मुंबई यांच्‍या खालील निकालपत्रास आधारभूत मानले आहे.
      MSDCR, MUMBAI 2003 (3) CPR 246 Vijay Madhao Kher V/s. Dilip Sitaram Raut.
 
            If the disputes is brought before the consumer for a is amenable to its jurisdiction, then it is obligatory upon for a to probe the same by themselves and resolve it.
 
32.   विरूध्‍द पक्ष यांच्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 67 वरील Department of Medicine  या दस्‍तऐवजामध्‍ये E.C.G. दिनांक 23/09/2010 संध्‍याकाळी 4.30 p.m. ही नोंद असून त्‍यासोबत ई.सी.जी. ची झेरॉक्‍स प्रत दाखल केली आहे. परंतु सदर ई.सी.जी. Dept. of Medicine च्‍या कोणत्‍या वैद्यकीय तज्ञाने केले व त्‍यासंबंधीचा निष्‍कर्ष व सल्‍ला त्‍यावर नमूद नाही. त्‍यामुळे सदर दस्‍तऐवज पूर्णतः अविश्‍वसनीय स्‍वरूपाचा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरूध्‍द पक्ष यांनी पृष्‍ठ क्रमांक 69 व 70 वर दाखल केलेल्‍या तथा‍कथित O.T. Register वर 6 रूग्‍णांची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍याचे दिसते. विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या बयान दुरूस्‍तीच्‍या अर्जात अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 41 वर परिच्‍छेद क्रमांक 6 मध्‍ये नमूद केले आहे की, दिनांक 24/09/2010 ला किमान 7 ते 8 शस्‍त्रक्रिया झाल्‍या. ज्‍याअर्थी O.T. Register च्‍या नोंदीनुसार 6 शस्‍त्रक्रिया दिसतात व परिच्‍छेद क्रमांक 6 मध्‍ये 7 ते 8 शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍याबाबत विरूध्‍द पक्षाने म्‍हटले आहे. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍या O.T. Register चा दस्‍तऐवज हा मंचास अविश्‍वसनीय वाटतो. तसेच सदर दस्‍तऐवजावर ऑपरेशन करणा-या डॉक्‍टरांच्‍या सह्या नसल्‍यामुळे व हॉस्पिटलचे नाव नसल्‍यामुळे सदर तथाकथित O.T. Registerची पाने मंचास अविश्‍वसनीय वाटतात तसेच एकाच दिवशी एकाच ऑपरेशन थिएटरमध्‍ये 6 किंवा 7 ते 8 शस्‍त्रक्रिया पार पाडल्‍याच्‍या कथनामुळे O.T. च्‍या निर्जंतुकीकरणाच्‍या स्थितीबाबत व वापरल्‍या जाणा-या अवजारांच्‍या निर्जंतुकीकरणाबाबतची बाब पूर्णतः संशयास्‍पद वाटते. मृतकाला विरूध्‍द पक्षाच्‍या हॉस्पिटलमध्‍ये दाखल केल्‍यापासून त्‍याची प्रकृती उत्‍तम होती हे तक्रारकर्ती व विरूध्‍द पक्षाचे म्‍हणणे आहे. मृतक हा दिनांक 22/09/2010 पासून 29/09/2010 पर्यंत विरूध्‍द पक्षाच्‍या हॉस्पिटलबाहेर गेलेला नसल्‍यामुळे ऑपरेशन नंतर ऑपरेशन थिएटर तसेच ऑपरेशनकरिता वापरल्‍या गेलेली अवजारे योग्‍यप्रकारे निर्जंतुक करण्‍यात न आल्‍यामुळे मृतकास ऑपरेशन पश्‍चात जंतू संसर्ग झाला व त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती खालावत गेली असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम होते ह्याबाबत दोन्‍ही पक्षाचा वाद नाही तसेच विरूध्‍द पक्षाने पृष्‍ठ क्रमांक 73 वर दाखल केलेल्‍या पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या पतीस कुठल्‍याही प्रकारचा जंतुसंसर्ग झालेला नव्‍हता हे सिध्‍द होते.   
 
33.   विरूध्‍द पक्ष यांनी अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 73, 74, 75 व 76 वर तथाकथित पॅथॉलॉजी रिपोर्ट मंचासमोर दाखल केलेला आहे. त्‍या सर्व दस्‍तऐवजांवर Referred by Dr. Gopal Vyas म्‍हणून नोंद आढळते. पृष्‍ठ क्रमांक 76 वरील पॅथॉलॉजी रिपोर्टवर पॅथॉलॉजीसंबंधी कोणत्‍याही तज्ञाची सही नाही. अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 73 ते 75 वरील पॅथॉलॉजी रिपोर्ट व त्‍यावरील सह्या यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता तसेच विरूध्‍द पक्ष यांच्‍या केस पेपरवरील त्‍यांच्‍या सह्यांचे अवलोकन केले असता हे स्‍पष्‍ट होते की, वरील पॅथॉलॉजी रिपोर्ट हे स्‍वतः विरूध्‍द पक्ष डॉ. गोपाल व्‍यास यांनी स्‍वतःच प्रमाणित केलेले आहेत जे मंचाला संशयास्‍पद वाटते. जेव्‍हा की, विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे आहे की, वेगवेगळ्या प्रकारच्‍या (त्‍यामध्‍ये पॅथॉलॉजी, ई.सी.जी.) तज्ञाची सेवा घेण्‍यात येते हे विरूध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे पूर्णतः अविश्‍वसनीय स्‍वरूपाचे असून विरूध्‍द पक्ष यांनी पूर्ण विचारांती सदर दस्‍तऐवज बनावटी तयार केलेले आहेत असे मंचाचे मत आहे.
 
34.   विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या तथाकथित केस पेपरचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता दिनांक 22/09/2010 रोजी विरूध्‍द पक्ष यांनी स्‍वतः Pathological Investigation करण्‍याबाबत आदेश दिलेला दिसतो. तसेच डॉ. पातुरकर यांनी Surgery with Fitness चा सल्‍ला दिल्‍याचे दिसते. Surgery with Fitness चा सल्‍ला हा रूग्‍ण शस्‍त्रक्रियेस Fit आहे किंवा नाही याबाबत बधिरीकरण तज्ञ देतात. परंतु त्‍यासंबंधीचा तसा दस्‍तऐवज मंचासमोर नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीचा पती नियोजित शस्‍त्रक्रियेस फिट होता किंवा नाही हे संदिग्‍ध आहे. 
 
35.   विरूध्‍द पक्ष यांच्‍या पृष्‍ठ क्रमांक 49 ते 71 वरील केस पेपरमध्‍ये खालील बाबी नमूद आहेतः-
22/09/2010      -                       TPR/BP
 
            26/09/2010      -                       TPR 4 hr.
 
            27/09/2010      -                       TPR 4 hr
 
            28/09/2010      -                       TPR 4 hr.
 
            28/09/2010      -                       TPR 1 hr.
 
            28/09/2010      -                       BP/Pulse/Urine output/SPO2 1 hr.
 
            28/09/2010      -           9.15 p.m.         -           contd. O2 inhalation
 
            28/09/2010      -           11.30 p.m.       -           contd. O2 TPR/BP
 
            29/09/2010      -                       NBM/TPR/BP 1 hr.

 
              विरूध्‍द पक्ष यांच्‍या तथाकथित तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या केस पेपरमध्‍ये Temp., Pulse, Respiration. BP इत्‍यादी बाबतच्‍या नोंदी ठेवण्‍याबाबत तसेच रूग्‍णास ऑक्‍सीजन देण्‍याबाबत स्‍पष्‍ट आदेश असतांना वरील आदेशानुसार उपचार नोंदी करण्‍यात आल्‍याबाबत TPR/BP/Oxygen च्‍या नोंदी असलेला तक्‍ता विरूध्‍द पक्ष यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात केस पेपर, TPR, BP, Oxygen इत्‍यादीचे नर्सिंग स्‍टाफने तयार केलेले चार्ट व इतर संबंधित दस्‍तऐवजांचा रेकॉर्ड असल्‍याबाबत काहीही भाष्‍य केलेले नाही. त्‍यामुळे मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, तथाकथित केस पेपरवरील तपासणी करणा-या डॉक्‍टरांनी वेळोवेळी केलेल्‍या नोंदीची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे स्‍पष्‍ट होत नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांचा सदर दस्‍तऐवज पूर्णतः अविश्‍वसनीय वाटतो. 
 
36.   विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या रूग्‍णाच्‍या तथाकथित केस पेपरवर उपचारासंबंधी खालील नोंदी आढळतात.
 
22/09/2010                   Rx
     
                                   Tab. Aceclo + Para
                                              
                                   I_______________I
 
                                  Tab. Rantac
                                  I_______________I  


 
23/09/2010                  Dr. Gopal Vyas                      

 
Rx

                                                Tab. Aceclo + Para
                                                I_______________I
                            

                                                Tab. Rantac 

                                                I_______________I

                                                Ing. Dicloran Stat

 

25/09/2010                  S/B Dr. Paturkar                    
(8.00 a.m.)                  
 
Rx      
 
IV RL 2, DNS-1, Oral fluids, soft diet, TPR 4 Hrly.
 
                                                          Inj. Duotax 1gm IV BD, Inj. Genta 80mg IV BD, Inj. Diclo 3cc
 
                                                          IM TDS, Inj. Rantac 2cc TDS, Inform SOS.

 
25/09/2010                  S/B Dr. Vyas              
 (10.00 a.m. & 9.00 p.m.)                    
 
Rx       
 
Continue Same Treatment


 
26/09/2010                  S/B Dr. Paturkar                    
(7.00 a.m.)                  
 
Rx      
 
F.D. TPR 4 Hrly. Inj. Duotax 1gm IV BD, Inj. Genta 80mg BD,
 
                                                          Inj. Rantac 2cc TDS, Inj. Diclo 3cc TDS, Inform SOS,

 
26/09/2010                  S/B Dr. Vyas  
(10.00 a.m.)                
 
Rx      
 
Ing. Dicloran 8 Hrly 
Ing. Duotax 1500XBD
Ing. G/M 80mg X BD
Tab. Aceclo + Para BD
Tab. Rantac BD
Tab. Chymolec TDS


 
27/09/2010                  S/B Dr. Paturkar
 (8.00 am.)                   
 
Rx      
 
F.D. TPR 4 Hrly. Inj. Duotax 1gm IV BD, Inj. Genta 80mg BD,
 
                                                          Inj. Rantac 2cc TDS, Inj. Diclo 3cc TDS,
 
                                                          Tab. Aceclo Para TDS, Tab. Rantac BD,
 
Tab. Chymoral Forte TDS


 
27/09/2010                  S/B Dr. Vyas
(11.00 am.)                 
 
Rx      
 
Continue same treatment

 
27/09/2010                  S/B Dr. Paturkar                    
(8.00 p.m.)                  
 
Rx      
 
Tab. PCM 1 Stat
 
Continue Inj. Duotax, Inform SOS


 
27/09/2010                  S/B Dr. Vyas
(10.00 p.m.)                
 
Rx      
 
Continue same treatmen

 
28/09/2010                  S/B Dr. Paturkar                                
(8.30 a.m.)                              
 
Rx
 
F.D. TPR 4 Hrly. Inj. Duotax 1gm IV BD, Inj. Genta 80mg BD,
 
                                                          Inj. Rantac 2cc TDS, Inj. Diclo 3cc TDS,
 
                                                         Tab. Aceclo Para TDS, Tab. Rantac BD,
 
Tab. Chymoral Forte TDS, Inform SOS


 
28/09/2010                  S/B Dr. Vyas
(10.00 a.m.)                
 
Rx      
 
Continue same treatment


 
28/09/2010                  S/B Dr. Paturkar
(8.00 p.m.)                  
 
Rx      
 
Head low, Nasal O2, TPR 1 Hrly, Inj. Dopamin 400mg in 5% Dextrose 6-8 drops/min. IV RL 2, DNS 2, Inj. Pipzo 4.5gm IV Stat & BD, Inj. Livoflox 500mg. IV BD, Inj. Metrozyl 100 cc TDS, Inj. Effcorline 100mg IV stat & TDS, Inj. Rantac 2cc TDS.

 
28/09/2010                  S/B Dr. Vyas
(8.15 p.m.)                  
                                    GC not satisfactory
                                    Afebrile
                                    Refer to GMC/Nagpur

 
Rx      
 
Prognosis. Explained to relatives

 
28/09/2010                  S/B Dr. Paturkar
(8.30 a.m.)                  
 
Rx      
 
Continue same treatment

 
28/09/2010                  S/B Dr. Manoj Jhawar (Physician)     
(9.00 p.m.)                  
 
Rx      
 
IV fluids 2 RL, till morning, Syp. Citralka 5 ml TDS, Inj. Pipzo 4.5gm IV Stat & BD, Inj. Livoflox 500mg IV BD, Inj. Metrozyl 100cc TDS, Inj. Effcorline 100mg IV Stat & TDS, Inj. Rantac 2cc TDS, Tab. Cetzin BD, Inj. Dopamin 400mg in 5% Dextrose 6-8 drops/min. Watch for BP, Pulse, Urine out put, SPO 2 1 Hrly.

 
28/09/2010                  S/B Dr. Vyas              
(9.15 p.m.)                  
 
Rx      
 
Contd O2 inhalation. Rest Continue same.      


 
28/09/2010                  S/B Dr. Paturkar        
(10.00 & 10.30 p.m.)              
 
RS-(L) Basal crepts, CVS Tachycardia, Rest same findings.            

 
28/09/2010                  S/B Dr. Vyas              
(11.30 p.m.)                
 
Rx      
 
Contd O2 TPR/BP


 
29/09/2010                  S/B Dr. Paturkar        
(12.00 a.m.)               
                                           Rest same findings                                             
 
                                                                  
 
29/09/2010                  S/B Dr. Vyas
(1.00 a.m. & 2.00 a.m.)                      
 
Rx      
 
Contd. Dopamine drip. Rest Continue same.

 
29/09/2010                  S/B Dr. Vyas              
(5.00 a.m.)                  
 
Rx      
 
Ing. Effcorlin 200ml Stat
 
Ing. Deriphyline Stat


 
29/09/2010                  S/B Dr. Paturkar
(6.00 a.m.)                  
 
Rx      
 
Nasal O2 Head low, IV Dopamine drip 400mg in 5% Dextrose 8 drops/min. IV RL 3, DNS 2, Inj. Pipzo 4.5gm IV BD, Inj. Metrozyl 100 cc TDS, Inj. Livoflox 500mg. IV BD, Inj. Diclo 3cc TDS, Inj. Effcorline 100mg IV TDS, Inform SOS.
 
विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या केस पेपरवरून वरील Antibiotics औषधे, वेदनाशामक गोळ्या, इंजेक्‍शन, आयव्‍ही ड्रॉप द्वारे रूग्‍णास औषधोपचार करण्‍याबाबत नोंदी दिसतात. परंतु डॉक्‍टरांनी वेळोवेळी दिलेल्‍या प्रिस्क्रिप्‍शन्‍स नुसार/डॉक्‍टरांच्‍या नोंदीनुसार विरूध्‍द पक्ष यांच्‍या नर्सिंग स्‍टाफने औषधोपचार किंवा सूचनेचे पालन केले किंवा नाही याबाबत treatment chart/Register (नर्सिंग स्‍टाफचे) मध्‍ये वेळोवेळी केलेल्‍या नोंदी व त्‍याबाबतचे दस्‍तऐवज मंचासमोर नसल्‍यामुळे रूग्‍णास औषधोपचार करण्‍यात आला किंवा नाही ही संपूर्ण बाब संदिग्‍ध स्‍वरूपाची ठरते.
 
      वरील विवेचनावरून तसेच विरूध्‍द पक्ष यांच्‍या लेखी बयान दुरूस्‍ती अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे संपूर्ण दस्‍तऐवज हे पूर्णतः संदिग्‍ध स्‍वरूपाचे असून मंचास अविश्‍वसनीय वाटतात.
 
37.   मंचाने, तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या  The Indian Medical Council (Professional Conduct, Etiquette and Ethics) Regulations, 2002 च्‍या कलम 1.3 चे अवलोकन केले असता विरूध्‍द पक्ष यांनी संपूर्ण रेकॉर्ड हा 3 वर्षेपर्यंत जपून ठेवणे बंधनकारक आहे. परंतु विरूध्‍द पक्ष यांनी चुकीची कारणमिमांसा करून व विमा कंपनीचे ऑडिटची बाब पुढे करून उत्‍तरासोबत वस्‍तुनिष्‍ठ दस्‍तऐवज मंचासमोर दिनांक 11/04/2011 ला दाखल न करता दिनांक 02/05/2011 ला बयान दुरूस्‍ती विनंती अर्जासोबत सदर दस्‍तऐवज दाखल केले आहेत.  यावरून दस्‍तऐवज बनावटी वाटतात व विरूध्‍द पक्ष यांच्‍या कामकाजातील गलथानपणाची Judicial Note घेणे मंचास संयुक्तिक वाटते. 
 
38.   विरूध्‍द पक्ष यांनी लेखी बयान दुरूस्‍ती अर्जाच्‍या परिच्‍छेद क्रमांक 6 मध्‍ये नमूद केले आहे की, विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीवर शस्‍त्रक्रिया केली नव्‍हती, त्‍यामुळे विरूध्‍द पक्षाला तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या शस्‍त्रक्रियेबाबत हवी तेवढी माहिती नव्‍हती. परंतु विरूध्‍द पक्ष यांचे हे म्‍हणणे विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या केस पेपरचे अवलोकन केले असता पूर्णतः खोडसाळ स्‍वरूपाचे व चुकीचे कथन आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व विरूध्‍द पक्ष त्‍यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये झालेल्‍या ऑपरेशन पश्‍चात रूग्‍णास झालेल्‍या जंतुसंसर्गाची बाब व प्रकरण हाताळण्‍यातील गलथानपणाची जबाबदारी टाळू शकत नाही असे मंचाचे मत आहे.
 
39.   मंचाने, अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 79 वर विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या Consent for procedure/Surgery/Anesthesia या दस्‍तऐवजाचे सुक्ष्‍म अवलोकन केले. सदर कन्‍सेन्‍ट फॉर्म हा छापील असून इंग्रजीमध्‍ये आहे व त्‍यावर रूग्‍णाच्‍या सहीच्‍या ठिकाणी तक्रारकर्तीने मराठीमध्‍ये सही केल्‍याचे दिसते. त्‍यातील पहिलाच रकाना हा पूर्णपणे रिकामा आहे. सदर कन्‍सेन्‍ट फॉर्मवर डॉ. गोपाल व्‍यास/डॉ. पातुरकर यांच्‍या नावाचा उल्‍लेख दिसतो. विरूध्‍द पक्ष यांनी अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 19 वर नमूद केले की, भरती केल्‍यापासून त्‍याचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम होते. तक्रारकर्तीच्‍या पतीचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीची सही न घेता तक्रारकर्तीची सही घेणे पूर्णतः गैरकायदेशीर व असंयुक्तिक आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सदर कन्‍सेन्‍ट फॉर्म हा इंग्रजीमध्‍ये असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीस व तक्रारकर्तीस उपचार/शस्‍त्रक्रिया, त्‍याचे चांगले वाईट परिणाम व शल्‍यक्रियेची आवश्‍यकता याबाबत मार्गदर्शन करणे आवश्‍यक होते. परंतु विरूध्‍द पक्ष यांनी मात्र तसे केल्‍याचे दिसत नाही. माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या 2008 CTJ 226 (Supreme Court) (CP) - Samira Kohli versus Dr. Prabha Manchanda and another NCDRC 2007 CTJ 1041 (CP) – Smt. Saroj Chandhok V/s. Sir Gangaram Hospital या निकालपत्रांमध्‍ये Inform consent ची बाब खालीलप्रमाणे प्रमाणित केलेली आहे
 
Before performing a surgery, properly inform written consent is must. Deviation in adverse situation may be acceptable but not in the case of planned surgery.
 
 तसेच  NCDRC 2009 CTJ 606 – Dr. A. K. Mittal V/s. Rajkumar या निकालपत्रात A doctor has to seek and secure consent of the patient before commencing his treatment. The consent so obtained should be real and valid concerning nature of treatment so that he knows what he is consenting to याप्रमाणे प्रमाणित करण्‍यात आलेले आहे.
 
      वरील निकालपत्रावरून हे स्‍पष्‍ट होते की, विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या शस्‍त्रक्रियेकरिता घेतलेली तक्रारकर्तीची (अशिक्षित व इंग्रजीचे ज्ञान नसलेली) तथाकथित संमती ही कायद्याच्‍या कक्षेत पूर्णतः गैरकायदेशीर असून ग्राहक सेवेतील गंभीर स्‍वरूपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
विशेषत्‍वाने निदर्शनास येते की, विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांच्‍या ताब्‍यातील तथाकथित केस पेपर व उपचार पध्‍दती ही वैद्यकीय क्षेत्रातील त्‍यासंबंधी तज्ञ डॉक्‍टरांच्‍या मते योग्‍य आहे किंवा नाही याबाबत विरूध्‍द पक्ष यांनी काहीही कथन केलेले नाही. विरूध्‍द पक्ष यांनी म्‍हटले की, त्‍यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचे हर्निया चे ऑपरेशन न केल्‍यामुळे त्‍यांना संपूर्ण बाबींची माहिती नाही व उत्‍तर देणे टाळले.    विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या केस पेपर शीटचे अवलोकन केले असता विरूध्‍द पक्ष यांनी वेळोवेळी केलेल्‍या नोंदी व त्‍यावरील इतर तथाकथित तज्ञ डॉक्‍टरांच्‍या नोंदी स्‍पष्‍टपणे दिसत असतांनाही विरूध्‍द पक्ष यांनी म्‍हटले की, ऑपरेशन न केल्‍यामुळे त्‍यांना त्‍याबाबत पुरेपुर माहिती नाही. विरूध्‍द पक्ष यांचे हे म्‍हणणे पूर्णतः चुकीचे व खोडसाळ स्‍वरूपाचे आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
40.  सदर प्रकरणी मंचाने माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय व माननीय राज्‍य आयोग यांच्‍या खालील निकालपत्रास आधारभूत मानलेले आहे.
 
Supreme Court of India – 2004 CTJ 1009 (SC) (CP) - Smt. Savita Garg V/s. Director, National Health Institute.
 
            “Once an allegation is made that patient was admitted in a particular hospital & evidence is produced to satisfy that he died because of lack of proper care and negligence , then burden lies on the hospital to justify that there was no negligence on the part of the treating doctor or hospital”. 
 
Kerala S.C.D.R.C. – 2010 (3) CPR 192 – Coin Par & Ors. V/s. Cosmopolitan Hospital (P) Ltd.Non production of case sheet of the patient before the Consumer Disputes Redressal Forum by the concerned hospital is deficiency in service
 
      NCDRC-2009 CTJ 616 – PGI. Chandigarh V/s. Smt. Bimla Devi Once a claim petition alleging medical negligence is filed and the claims has successfully discharged the initial burden that the hospital was negligent and that as a result of such negligence the patient died, then in that case the burden shifted to the hospital to show that there is no negligence involved on its part
 
            NCDRC 2009 CTJ 409 (CP) – Sai Hospital V/s. Smt. Godavaribai Hernia operation being the basic cause of future complications, the petitioners could not escape from responsibility. Not even a whisper in the discharge slip that the patient took discharge against medical advice. Medical negligence and deficiency in service of appellant proved.
 
            SC-2009 CTJ 712 (SC) CP – Nizam Institute of Medical Science V/s. Prasant S. DhamankaIn a case involving medical negligence, once the burden has been discharged by the complainant by making out a case of negligence on the part of the hospital or the doctors concerned, the onus then shifts on to the hospital or to the doctors to satisfy the court that there was no lack of care or deficiency.
 
            वरील निकालपत्रात प्रमाणित केल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी लेखी बयानासोबत मृतकाची केस शीट दाखल न करणे तसेच तथाकथित केस शीट मधील नोंदीनुसार वेळोवेळी Temperature, Pulse, Respiration, Blood Pressure, Oxygen इत्‍यादी वेळोवेळी घेण्‍यात आल्‍याबाबत ट्रीटमेंट रजिस्‍टर/ट्रीटमेंट पेपर (नर्सिंग स्‍टाफने maintain  केलेले) मंचासमोर दाखल न करणे ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील गंभीर स्‍वरूपाची त्रुटी असून विरूध्‍द पक्ष यांनी औषधोपचारासंबंधी वस्‍तुनिष्‍ठ दस्‍तऐवज मंचापासून दडवून ठेवलेले आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  तसेच विरूध्‍द पक्षाच्‍या सेवेत ऑपरेशन पश्‍चात केलेले उपचार इत्‍यादीबाबत निष्‍काळजीपणा व ग्राहक सेवेतील त्रुटी नाही हे सिध्‍द करण्‍यास विरूध्‍द पक्ष पूर्णतः अपयशी ठरले असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सदर तक्रारीत तक्रारकर्तीतर्फे तज्ञ डॉक्‍टरांच्‍या अहवालाची आवश्‍यकता नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरूध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या वैद्यकीय सेवेत निष्‍काळजीपणा नाही हे सिध्‍द करणारा वैद्यकीय तज्ञाचा अहवाल सुध्‍दा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्‍यामुळे विरूध्‍द पक्षास तक्रारकर्तीचे आक्षेप, म्‍हणणे मान्‍य आहेत असे मंचाचे मत आहे. त्‍याबाबत युक्तिवादादरम्‍यान मंचाने विरूध्‍द पक्ष यांच्‍या वकिलांना विचारणा केली असता विरूध्‍द पक्षाचे वकील त्‍यास उत्‍तर देऊ शकले नाहीत हे विशेषत्‍वाने नमूद करावेसे वाटते.
 
41.   तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष व त्‍यांच्‍या हॉस्पिटलवर आणि हॉस्पिटलमधील नर्सिंग स्‍टाफच्‍या निष्‍काळजीपणाबाबत स्‍पष्‍ट आरोप केलेले असतांना सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांनी म्‍हटले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचे ऑपरेशन त्‍यांनी न केल्‍यामुळे त्‍याबाबत पुरेपूर माहिती नाही व त्‍याबाबत विरूध्‍द पक्ष यांनी कोणतेही वस्‍तुनिष्‍ठ विधान मंचासमोर केलेले नाही. तसेच तक्रारकर्तीच्‍या तक्रारीच्‍या समर्थनार्थ मृतकासोबत हॉस्पिटलमध्‍ये उपस्थित असलेले व वस्‍तुस्थितीशी अवगत असलेले श्री. राजेश गडीराम चकोले यांचा साक्ष हलफनामा मंचासमोर अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 36-37 वर आहे. तक्रारकर्तीने व श्री. राजेश गडीराम चकोले यांनी शपथपत्रावर दाखल केलेले कथन विरूध्‍द पक्ष यांनी वस्‍तुनिष्‍ठ पुराव्‍याद्वारे खोडून काढलेले नाहीत. मंचाने माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍या Divisonal Manager, United India Insurance Company V/s. Sameerchand Choudhary – 2005 CPJ 964 (CP) – “An admission of consumer is the best evidence than Opposite Party can rely upon and though not conclusive, is decisive of matter unless successfully withdrawn or proved erroneous”.    तक्रारकर्तीने तक्रारीत केलेले कथन मंचास पूर्णतः विश्‍वसनीय वाटते. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीतील कथन विरूध्‍द पक्ष यांनी वस्‍तुनिष्‍ठ पुराव्‍याद्वारे व शपथपत्र तसेच तज्ञाचे शपथपत्र, उपचार करणा-या नर्सचे शपथपत्र याद्वारे नाकारलेले नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांना तक्रारकर्तीने आरोपित केलेली वस्‍तुस्थिती मान्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
42.   तक्रारकर्तीने तिच्‍या पतीची शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर शस्‍त्रक्रिया झालेल्‍या जागेवर तिच्‍या पतीस अतिशय त्रास होत होता याबाबत विरूध्‍द पक्ष यांना अवगत केल्‍यानंतर शस्‍त्रक्रिया झालेल्‍या जागेवर त्रास होणारच अशी उडवाउडवीची उत्‍तरे देणे तसेच दिनांक 24/09/2010 पासून तिच्‍या पतीस लघवी योग्‍य रित्‍या होत नव्‍हती, खोकला देखील सुरू झालेला होता याबाबतही विरूध्‍द पक्ष यांना अवगत करून सुध्‍दा रूग्‍णाकडे लक्ष देण्‍यास टाळाटाळ करणे, तक्रारकर्तीने खोकल्‍याच्‍या औषधाची मागणी केली असता खोकल्‍याचे औषध रूग्‍णालयात उपलब्‍ध नसल्‍याचे सांगणे, पतीच्‍या लघवीच्‍या त्रासाबाबत सांगण्‍यात आले असता, तुम्‍ही अधिक शहाणपणा सांगू नका असे म्‍हणणे तसेच दवाखान्‍यातील कर्मचा-यांनी देखील तिच्‍या पतीच्‍या उपचाराकडे योग्‍य व उचित लक्ष न देणे, दिनांक 26, 27 व 28 नंतर सलार्इन व्‍यतिरिक्‍त कोणतेही इलाज न करणे, दिनांक 28/09/2010 चे सायंकाळपासून उलट्या होऊन प्रकृती गंभीर होत असल्‍याबाबत दिसत असतांना तसेच डॉक्‍टर तक्रारकर्तीच्‍या पतीचा रक्‍तदाब तपासत असतांना लघवी करण्‍याचा प्रयत्‍न करीत होते, परंतु लघवी होत नव्‍हती यावरून हे स्‍पष्‍ट होते की, विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीद्वारे वेळोवेळी पुरविण्‍यात आलेल्‍या माहितीवरून व तिच्‍या पतीच्‍या बिघडत असलेल्‍या तब्‍येतीबाबत व प्रकृती गंभीर होत असल्‍याबाबत कळवून सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांनी तसेच त्‍यांच्‍यासोबत काम करणारे तथाकथित तज्ञ डॉक्‍टर यांनी त्‍याबाबतची नोंद न घेणे यावरून विरूध्‍द पक्ष यांची कार्यपध्‍दती पूर्णतः संशयास्‍पद व अविश्‍वसनीय आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
43.   दिनांक 28/09/2010 ला सकाळी 10.00 वाजता विरूध्‍द पक्ष्‍ा यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीची तपासणी केल्‍यानंतर त्‍याच दिवशी रात्री 8.00 वाजेपर्यंत डॉ. पातुरकर यांनी तपासणी करेपर्यंत तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती कशी खालावत गेली हे दिनांक 28/09/2010 ला रात्री 8.00 वाजता डॉ. पातुरकर यांनी केलेल्‍या खालील नोंदीवरून स्‍पष्‍ट दिसते.
 
      C/O Fever with chills, vomiting 2-3, Loose Motion, Cough 
    Urine not pass
 
O/E GC Not satisfactory, febrile, Gen. Erythema +
 
Pulse 88/min R-22/min
 
BP-78mm of hg systolic
 
RS – Crepts + Left Base
 
P/A – Soft, No distension, Bowel sound +, CVS-Tachycardia, HS-Normal
 
SPO2 – 95%
 
O/E – Edema+, Epidermal necrotic area 1X1cm
 
              U/o – On Foley’s Catheterisation 125 cc
 
            Adv.
 
            CBC, BSR, BUN, Sr. Creatinine, Physician opinion Stat
 
Adv. Ref. Higher Center
 
For further management.

 
                     Rx
 
Head low, Nasal O2, TPR 1 Hrly, Inj. Dopamin 400mg in 5% Dextrose 6-8 drops/min.
 
IV RL 2, DNS 2, Inj. Pipzo 4.5gm IV Stat & BD, Inj. Livoflox 500mg. IV BD, Inj. Metrozyl 100cc TDS, Inj. Effcorline 100mg IV Stat & TDS, Inj. Rantac 2cc TDS.
 
उपरोक्‍त बाबीवरून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीच्‍या पतीस थंडी वाजून ताप येत होता, उलट्या होत होत्‍या, पातळ संडास होत होती, खोकला येत होता, लघवी होत नव्‍हती. तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या पल्‍स व रेस्पिरेशन मध्‍ये सुध्‍दा फरक झालेला होता. ब्‍लड प्रेशर संबंधी स्थिती अतिशय वाईट होती तसेच ऑपरेशन केलेल्‍या जागेवर वरच्‍या भागास सुजन असून Epidermal necrotic area 1X1cm तसेच कॅथेटरद्वारे 125 सीसी लघवी काढली इत्‍यादी बाबी स्‍पष्‍ट नमूद आहेत. त्‍यावरून व त्‍यानंतरच्‍या नोंदीवरून तक्रारकर्तीच्‍या कथनास पूर्णतः पुष्‍टी मिळते व विरूध्‍द पक्ष यांचे कथन मंचास पूर्णतः अविश्‍वसनीय वाटते. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या ऑपरेशन नंतर पोस्‍ट ऑपरेटिव्‍ह केअरमध्‍ये तसेच त्‍यांच्‍या कर्मचारी वर्गाद्वारे व औषधोपचारामध्‍ये केलेल्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या प्रकृतीने गंभीर स्‍वरूप धारण केले असे स्‍पष्‍ट दिसते व हा विरूध्‍द पक्ष यांचा निष्‍काळजीपणा तसेच त्‍यांची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
44.   दिनांक 28/09/2010 ला विरूध्‍द पक्ष यांनी सायंकाळी 8.15 वाजता Prognosis explain to relative असे नमूद केले आहे. परंतु विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीस व तिच्‍या नातेवाईकास पतीच्‍या आजाराबाबत व गंभीर स्थितीबाबत काय सांगितले हे केस पेपरवर तसेच उत्‍तरात नमूद केले नाही. त्‍यामुळे विरूध्‍द पक्षाने केलेली सदर नोंद मंचाने नाकारली.
 
45.   विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या तथाकथित केस शीट वरून दिनांक 28/09/2010 ला सायंकाळी 8.00 वाजता ऑपरेशन झाल्‍याच्‍या 5 दिवसानंतर डॉ. पातुरकर यांच्‍या नोंदी मध्‍ये Adv.  Ref. Higher CenterFor further management असे नमूद केले असून त्‍याखाली औषधोपचार सूचविलेला आहे. त्‍याप्रमाणेच विरूध्‍द पक्ष यांनी दिनांक 28/09/2010 ला सायंकाळी 8.15 वाजता Refer to GMC, Nagpur and needs urgent referral to higher center, Nagpur तसेच दिनांक 28/09/2010 ला सायंकाळी 8.00 वाजता डॉ. पातुरकर यांनी Physician opinion Stat असे नमूद करून सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांनी 1 तासाच्‍या विलंबाने दिनांक 28/09/2010 ला सायंकाळी 9.00 वाजता डॉ. मनोज झंवर, फिजिशियन यांचे मत घेतलेले दिसते. त्‍यामध्‍ये Ref. To Higher Center बाबत नोंद नाही.  त्‍याच दिवशी रात्री 9.15 वाजता विरूध्‍द पक्ष यांनी नोंद घेतली की, Adv. Refer to GMC/Nagpur. At present, patient’s wife is not willing to take to Nagpur. She is insisting to continue treatment here only. रात्री 11.30 वाजता विरूध्‍द पक्ष यांनी Refer to Higher Center.  Patient’s relative wife & brother in law, wants to take to Nagpur in the morning, दिनांक 29/09/2010 ला पहाटे 2.00 वाजता Wants to go to Nagpur in the morning, दिनांक 29/09/2010 ला सकाळी 7.00 वाजता Relatives now willing to take the patient to GMC/Nagpur. So patient referred to GMC/Nagpur on 29/09/2010 at 7.00 a.m. याप्रमाणे नोंदी घेतल्‍याचे दिसून येते. परंतु या सर्व नोंदी विरूध्‍द पक्षाचे कथनासोबत मंचास एकमेकांच्‍या विरोधाभासी वाटतात.  
 
      विरूध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 82 व 81 वरील दिनांक 26/09/2010 व 28/09/2010 च्‍या दस्‍तऐवजावर Discharge Details Insurance Company Slip असे नमूद आहे. त्‍यावरून हे स्पष्‍ट होते की, विरूध्‍द पक्षाने दिनांक 26/09/2010 पासूनच ऑपरेशन पश्‍चात रूग्‍णाच्‍या ढासळलेल्‍या प्रकृतीबाबत अवगत असल्‍यामुळे रूग्‍णास त्‍यांचे रूग्‍णालयातून डिसचार्ज करण्‍याचा प्रयत्‍न केला होता त्‍यामुळे सुध्‍दा विरूध्‍द पक्षाने केलेल्‍या नोंदी व तक्रारकर्तीवर घेतलेले आक्षेप विरोधाभासी ठरतात. करिता विरूध्‍द पक्षाची कृती येनकेनप्रकारे बनावट स्‍वरूपाची आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  
 
46.   तक्रारकर्तीने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्रमांक 8 मध्‍ये नमूद केले की, तिच्‍या पतीची प्रकृती हाताबाहेर झाल्‍यानंतर त्‍यांना नागपूरला हलविण्‍याचा विरूध्‍द पक्ष यांनी सल्‍ला दिला व तसेच पत्र विरूध्‍द पक्ष यांनी मुख्‍य वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय, नागपूर यांच्‍या नावे तक्रारकर्तीस दिले. यावरून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीने वेळोवेळी तिच्‍या पतीची प्रकृती गंभीर होत असल्‍याबद्दल विरूध्‍द पक्ष यांना अवगत करून सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यास दाद दिली नाही व योग्‍य औषधोपचार न केल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या प्रकृतीने गंभीर स्‍वरूप धारण केले व त्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीस नागपूर येथे उपचाराकरिता नेण्‍याचा सल्‍ला दिला. विरूध्‍द पक्ष यांची सदर कृती ही निष्‍काळजीपणाची व त्‍यांच्‍या ग्राहक सेवेतील गंभीर स्‍वरूपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
47.   विरूध्‍द पक्ष यांच्‍या तथाकथित केस शीट चे अवलोकन केले असता त्‍यात तक्रारकर्तीचे पती थंडी वाजून तापाने फणफणत होते, त्‍यांना उलट्या होत होत्‍या, लुज मोशन होत होते, खोकला येत होता, लघवी थांबलेली होती, तक्रारकर्तीच्‍या पतीस ऑक्‍सीजन देण्‍यात येत होते, ब्‍लड प्रेशर खाली पडत चाललेले होते, ऑपरेशनच्‍या जागेवर सुजन आली होती अशा नोंदी आढळून येतात. विरूध्‍द पक्ष यांनी अशा परिस्थितीत त्‍यांना नागपूर येथे गंभीर अवस्‍थेत घेऊन जाण्‍याबाबत तक्रारकर्तीला सल्‍ला देणे पूर्णतः गैरकायदेशीर असून उलटपक्षी विरूध्‍द पक्ष यांनी स्‍वतःच सर्व सोयीनी (ऑक्‍सीजन, औषधे, डॉक्‍टर) उपलब्‍ध अॅम्‍बुलन्‍स मध्‍ये घेऊन जाऊन त्‍यांना नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालयात भरती करणे संयुक्तिक असतांनाही तक्रारकर्तीच्‍या पतीस कोणत्‍याही औषधोपचाराविना (सलाईन, ऑक्‍सीजन इत्‍यादी) 65 कि.मी. अंतरावरील रूग्‍णालयात स्‍थलांतरित करणे धोक्‍याचे असतांनाही तसे करण्‍याचा सल्‍ला देणे यावरून विरूध्‍द पक्ष यांच्‍या कार्यपध्‍दतीत व वागणूकीत गंभीर स्‍वरूपाचा निष्‍काळजीपणा व त्रुटी झालेली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
48.   मंचाने माननीय राज्‍य आयोगांच्‍या खालील निकालपत्रास आधारभूत मानले आहे.
 
SCDRC WB – 2008 (4) CPR 220 – Dr. Vishapati Banerjee V/s. Smt. Mayura Chaterjee
 
Injudicious decision in transferring a patient who was in a very critical condition to a far of hospital knowing it fully that it could be almost impossible for the patient to understand the rigours and strain of the journey of 100 k.m. would constitute negligence and deficiency in service.
 
वरील विवेचनावरून तसेच वर नमूद केलेल्‍या साई हॉस्पिटलच्‍या केस मध्‍ये प्रमाणित केल्‍यानुसार हे स्‍पष्‍ट झाले की, विरूध्‍द पक्ष यांच्‍या सतत म्‍हणण्‍यानुसार तक्रारकर्तीने गंभीर अवस्‍थेत तिच्‍या पतीस 65 कि.मी. दूर अंतरावरील नागपूर येथील शासकीय रूग्‍णालयात नेले व उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यु झाला. विरूध्‍द पक्ष यांचे हे म्‍हणणे नाही की, तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांच्‍या वैद्यकीय सल्‍ल्‍याविरूध्‍द रूग्‍णाला नागपूर येथे स्‍थलांतरित केले. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेत गंभीर स्‍वरूपाची त्रुटी आहे हे स्‍पष्‍ट होते. 

 
49.   विरूध्‍द पक्ष यांनी उत्‍तराच्‍या परिच्‍छेद क्रमांक 20 मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती नागपूरला नेण्‍याआधी उत्‍तम होती. परंतु तिच्‍या स्‍वतःच्‍या हलगर्जीपणामुळे व शस्‍त्रक्रियेनंतर केलेल्‍या प्रवासामुळे तसेच पुढे कोणते उपचार झाले याबाबत माहिती नसल्‍यामुळे व विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीवर शस्‍त्रक्रिया केलेली नसल्‍यामुळे नुकसानभरपाई देण्‍यास ते जबाबदार नाही. तथापि विरूध्‍द पक्ष यांचे हे म्‍हणणे पूर्णतः तथ्‍यहीन असून खोडसाळ स्‍वरूपाचे आहे म्‍हणून मंचाने ते नाकारले. कारण विरूध्‍द पक्ष यांनी C.M.O., G.M.C. Nagpur यांना उद्देशून लिहिलेल्‍या पत्रावरून हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीच्‍या पतीची अवस्‍था ही Hypotension ची होती तसेच त्‍याच पत्रात तक्रारकर्तीच्‍या पतीस Epidermal necrotic area 1X1cm व इतर गंभीर स्‍वरूपाच्‍या बाबींच्‍या नोंदी आहेत. विरूध्‍द पक्ष यांनी दाखल केलेल्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 81 व 82 वरील दस्‍तावरून हे स्‍पष्‍ट होते की, विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीस गंभीर अवस्‍थेत दिनांक 29/09/2010 ला स्‍वतःच्‍या हॉस्पिटलमधून डिसचार्ज दिला. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांची संपूर्ण कृती ही निष्‍काळजीपणाची असून गंभीर स्‍वरूपाचा गुन्‍हा त्‍यांनी केलेला आहे असे मंचाचे मत आहे.

 
50.   दिनांक 29/09/2010 ला रात्री 1.00 वाजतापासून तक्रारकर्तीच्‍या पतीस डिसचार्ज करेपर्यंत तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या प्रकृतीच्‍या संदर्भात वस्‍तुनिष्‍ठ नोंदीची संयुक्तिक नोंद आढळत नाही. त्‍यामुळे सुध्‍दा विरूध्‍द पक्ष यांच्‍या उत्‍तराच्‍या परिच्‍छेद क्रमांक 20 मधील म्‍हणणे पूर्णतः खोडसाळ स्‍वरूपाचे व वस्‍तुस्थितीस कलाटणी देणा-या स्‍वरूपाचे असल्‍यामुळे मंचाने ते नाकारले.
 
51.   दिनांक 28/09/2010 रोजीच्‍या विरूध्‍द पक्ष यांच्‍या तथाकथित नोंदीप्रमाणे तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृती गंभीर स्‍वरूपाने खालावलेली होती तसेच त्‍यात O/E – Edema+, Epidermal necrotic area 1X1cm ही नोंद आहे. त्‍यासोबतच तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 14 वरील Reference Letter मध्‍ये Hypotension तसेचअनुक्रमे पृष्‍ठ 15 वरील नागपूर वैद्यकीय महाविद्यालय व रूग्‍णालय यांच्‍या मृत्‍यु प्रमाणपत्रानुसार diagnosis म्‍हणून “An outside O.P./C/O – Rt inguinal hernia with necrotizing fasciitis with septicemia with CRA with PCR अशी नोंद आहे.
 
      Taber’s Cyclopedic Medical Dictionary  व तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या वैद्यकीय पुस्‍तकानुसार वरील संवेदनशील बाबींच्‍या परिभाषा नमूद आहेत.  

Hypotension – decrease of systolic and diastolic blood pressure below normal. Occurs in shock, in hemorrhages, infections, fevers, cancer, anemia, neurasthenia, Addison’s disease; in debilitating or wasting diseases; and approaching death.

Septicemia - Presence of pathogenic bacteria in the blood. If allowed to progress, the organisms may multiply and cause an overwhelming infection and death. Symptoms and signs usually include chills and fever, petechiae, purpuric pustules and abscesses. Shock may be present.

Necrosis :-      Death of areas of tissue or bone surrounded by healthy parts; death is mass as distinguished from necrobiosis, which is a gradual degeneration. The dead part in bone is called a sequestrum; in soft tissue it is called a slough or sphacelus. Term is usually applied to bone destruction or small areas of tissue, while gangrene is generally applied to destruction of specific parts or larger areas.
 
            n. anemic – Necrosis caused by disturbed circulation in a part. 
            n. aseptic – Necrosis occurring without infection.  

Necrotic :-      Rel. to death of a portion of tissue.
Necrotizing :- Causing necrosis.

Septicemia -    (also refer to sepsis, puerperal)
Tissue perfusion, altered (specify) may be related to changes in arterial/venous blood flow
 
(selective vasoconstriction, presence of microemboli) and hypovolemia, possibly evidenced by changes in skin temperature/color, changes in blood pressure and pulse pressure, changes in sensorium, and decreased urinary output.
 
Fluid volume deficit, high risk for which may be related to presence of hypermetabolic state, vascular shifts to interstitial space and reduced intake.
 
Cardiac output, decreased, high risk for which may be related to decreased preload (venous return and circulating volume), altered afterload (increased systemic vascular resistance), negative inotropic effects of hypoxia, complement activation, and lysosomal hydrolase.
 
Tachycardia –
 
A form of sick sinus syndrome. A group of a arrhythmias produced by a defect in the sinus node impulse generation or conduction. Arrhythmias associated may include supra-ventricular tachycardia, atrial fibrillation, atrial flutter that alternates with sinus arrest, and sinus bradycardia.  
 
52.   विरूध्‍द पक्ष यांच्‍या तथाकथित केस पेपरवरील नोंदीनुसार मृतकाच्‍या झालेल्‍या हर्नियाच्‍या ऑपरेशनच्‍या ठिकाणी 1X1cm भागात Necrotic म्‍हणजेच be death of, cells, tissues or organs असा स्‍पष्‍ट अर्थ नमूद आहे हे स्‍पष्‍ट होते.   तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यानुसार ऑपरेशनच्‍या दिवसापासून तिच्‍या पतीस ऑपरेशनच्‍या जागी गंभीर स्‍वरूपाचे दुखणे होते हे स्‍पष्‍ट होते. मंचाने इंटरनेटद्वारे प्राप्‍त केलेल्‍या What is necrotizing fasciitis and How common is necrotizing fasciitis याबाबतची वस्‍तुस्थिती खालीलप्रमाणे स्‍पष्‍ट केलेली आहेः-
 
What is necrotizing fasciitis?
 
Necrotizing fasciitis is a serious condition in which muscle and fat tissue are broken down as a consequence of infection.   Necrotizing fasciitis is a complication of severe group A streptococcal infection (GAS) (Streptococci Pyogenes). Additional complications can occur from necrotizing fasciitis such as shock and organ failure.
 
How common is necrotizing fasciitis? 
Persons of all ages may be infected although most disease occurs in adults. Necrotizing fasciitis often begins at the site of a break in the skin (e.g., a surgical or non surgical wound). In children, rare cases occur as complications of chickenpox.
 
मृतक हा दिनांक 22/09/2010 ते 29/09/2010 पर्यंत विरूध्‍द पक्ष यांच्‍या हॉस्पिटलच्‍या बाहेर गेला नाही. त्‍यावरून सुध्‍दा हे स्‍पष्‍ट होते की, मृतकाच्‍या हर्नियाच्‍या झालेल्‍या ऑपरेशनच्‍या ठिकाणी विरूध्‍द पक्ष यांच्‍या ऑपरेशन थिएटरमध्‍ये व त्‍यानंतर दिनांक 24/09/2010 ते 29/09/2010 पर्यंत झालेल्‍या इन्‍फेक्‍शनमुळेच तक्रारकर्तीच्‍या पतीस ऑपरेशनच्‍या ठिकाणी  Necrotizing fasciitisचा आजार झाला व त्‍या गंभीर स्‍वरूपाच्‍या इन्‍फेक्‍शन मुळेच तक्रारकर्तीच्‍या पतीस Septicemia, Cardio Respiratory arrest Peripheral circulating failure होऊन तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला हे पूर्णतः सिध्‍द झाले. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी केलेल्‍या शस्‍त्रक्रियेदरम्‍यान ऑपरेशन थिएटरची आंतरिक स्थिती व वापर झालेली उपकरणे योग्‍य प्रकारे sterile न करणे, एका ठिकाणी एकाच ऑपरेशन थिएटरमध्‍ये त्‍याच अवजारांचा वापर करून 6 किंवा 7 ते 8 ऑपरेशन करणे व त्‍यानंतर हॉस्पिटलमधील Unhygienic condition इत्‍यादी मुळेच तक्रारकर्तीच्‍या पतीस वरील गंभीर स्‍वरूपाचे आजार होऊन त्‍यांचा मृत्‍यु झाला असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व ती विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील गंभीर स्‍वरूपाची त्रुटी असून त्‍यांचा निष्‍काळजीपणा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
53.   वरील विवेचनावरून तसेच विरूध्‍द पक्ष यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार रूग्‍णास भरती करते वेळी तक्रारकर्तीच्‍या पतीचे स्‍वास्‍थ्‍य उत्‍तम होते व विरूध्‍द पक्ष यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये हर्नियाच्‍या ऑपरेशनकरिता भरती केल्‍यानंतरच गंभीर जंतूचा (Bacteria) तक्रारकर्तीच्‍या पतीला संसर्ग झाला व त्‍यातच Necrotizing fasciitis, Septicemia सारखा गंभीर आजार होऊन तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाल्‍यामुळे तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीस योग्‍य व आवश्‍यक वेळी योग्‍य सेवा देण्‍यात विरूध्‍द पक्ष हे पूर्णतः अपयशी ठरले आहेत. त्‍याकरिता मंचाने माननीय राष्‍ट्रीय आयोग व राज्‍य आयोगांच्‍या खालील निकालपत्रांना आधारभूत मानले आहे आणि सदर तक्रारीस Doctrine of Res-Ipsa-Loquitor चे तत्‍व लागू होते असे मंचाचे मत आहे.  
 
1.         NCDRC – 2004 CTJ 553 (CP) – Regi Mathew V/s. Radha Krishan -   Wherein by applying doctrine of Res-Ipsa-Loquitor i.e. things speaks for themselves, they held that doctor is responsible for negligent treatment given to the patient and directed to pay compensation. It is further held that once the circumstances showed that there is prima facie negligence, it is for the respondent i.e. operating surgeon to rebut the charges providing proper expert opinion.

 
2.         NCDRC - 2002 (2) CPR 138 – Janak Kantimathi Nathan V/s. Murlidhar Eknath MasaneWhen the patient suffering EPILEPSY was admitted in hospital and within two days he died. Then principal of res-ipsa-loquitorcould be invoked.

 
3.         Kerala State Consumer Disputes Redressal Commission – 2004 CTJ 688 - Dr. G. Gangadharan V/s. K. A. Abdul Salam -   When direct evidence is not available to substantiate the plea of negligence against the doctor for reasons beyond the control of the complainant, the doctrine of res-ipsa-loquitor comes into play.

 
54.   विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठ्यर्थ त्‍यांची संपूर्ण कृती वैद्यक शास्‍त्रास कशी अभिप्रेत होती हे सिध्‍द करण्‍यासाठी वैद्यकीय दस्‍तऐवज/वैद्यकीय अहवाल मंचासमोर दाखल केलेला नाही. आजच्‍या वैज्ञानिक व वैद्यकीय युगात हर्निया, हायड्रोसील इत्‍यादी ऑपरेशन्‍स अतिसामान्‍य स्‍वरूपाचे असून दैनंदिनरित्‍या होत असतांना त्‍यात विरूध्‍द पक्ष यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे व हॉस्पिटलच्‍या प्रशासकीय गलथानपणामुळे राष्‍ट्रीय स्‍वास्‍थ्‍य विमा योजनेच्‍या’’ स्‍मार्ट कार्ड धारकाचा मृत्‍यु होणे ही बाब फार दुःखद असून वैद्यकीय सेवेला कलंकित करणारी तसेच ग्रामीण व गरीब रूग्‍णांना धक्‍का देणारी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  
वरील विवेचनानुसार व माननीय राष्‍ट्रीय आयोग यांच्‍या निकालपत्रानुसार Doctrine of Res-Ipsa-Loquitor चे महत्‍व माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍या 2010-CTJ 868 (SC)(CP)– V. Krishnarao V/s. Nikhil Super Speciality Hospital या निकालपत्राच्‍या परिच्‍छेद क्रमांक 43 ते 48 वर नमूद केले आहे. हे तत्‍व सदर तक्रारीस लागू होते. माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाने वरील निकालपत्रातच खालील निर्देश दिलेले आहेतः-
 
Experts opinion is needed to be obtained only in appropriate cases of medical negligence and the matter may be left to the discretion of the Consumer Forums especially when the retired Judges of the Supreme Court and High Courts are appointed to head the National Commission and the State Commission.
 
            There cannot be a mechanical or strait jacket approach that each and every case of alleged medical negligence must be referred to experts for evidence.
 
            Time has come to reconsider the parameters set down in Bolam test as a guide to decide cases on medical negligence and specially in view of Article 21 of the Constitution of India which encompasses within its guarantee, a right to medical treatment and medical care.

 
II (2000) CPJ 384 – Madhya Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Bhopal – Smt. Bhanupal V/s. Dr. Prakash Padode & Ors
 
            Onus of Proof – Evidence Act, 1872 – Section 114 – Complaint of medical negligence – Complainant is not in a position to exactly state the factual aspects of whatever took place inside – Duty casted upon opposite party to prove no negligence took place inside the operation theatre.
 
            Naturally, when all such medical or surgical procedure was carried out inside the operation theatre when nobody on behalf of the patient was present, the patient’s relatives were unable to see any kind of medical/surgical procedure or what exactly happened inside the operation theatre. Therefore, the opposite parties and the staff attending inside only had special knowledge of what happened inside the operation theatre and the complainant is not in a position to exactly state the factual aspects of whatever took place inside are all necessity of evidence in order to prove the medical negligence occurring on the hands of the opposite parties. Therefore, it was a duty cast upon the opposite parties to prove the fact that no sort of negligence took place inside the operational theatre. Thus, the onus of proof shifting upon the opposite parties to substantiate the fact that there was no negligence on their part.   
 
2005 (2) CPR 95 (NC) – National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi – Mrs. Sheela Hirba Naik Gaunekar V/s. Apollo Hospitals Ltd., Chennai & Anr.
 
Medical Negligence – Deficiency in post-operative care – Death of patient.
 
In the treatment of a patient coming in for a surgical procedure, the post-operative care is as important as the care that has to be attached to the surgical procedure itself.  
 
      वरील विवेचनावरून हे स्‍पष्‍ट झाले की, विरूध्‍द पक्ष हे त्‍यांनी दिलेल्‍या वैद्यकीय सेवेत निष्‍काळजीपणा व ग्राहक सेवेत त्रुटी न झाल्‍याचे सिध्‍द करण्‍यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
55.   सदर तक्रार निकाली काढते वेळेस मंचाच्‍या असे लक्षात आले की, विरूध्‍द पक्ष यांनी आपली स्‍वतःची तसेच हॉस्पिटलची जबाबदारी पूर्णतः नाकारलेली आहे. वर परिच्‍छेद क्रमांक 26 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे 7.18 नुसार व हॉस्पिटलचे कर्मचारी, स्‍वतः Unqualified for surgery करिता व इतर डॉक्‍टरकरिता सदरहू हॉस्पिटल वैयक्तिकरित्‍या व Vicariously जबाबदार असून विरूध्‍द पक्ष हे त्‍या जबाबदारीतून मुक्‍त होऊ शकत नाही. त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष हे त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या निष्‍काळजीपणाकरिता व त्‍यांच्‍या हॉस्पिटलचा स्‍टाफ इतर निष्‍काळजीपणाकरिता जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
56.   तक्रारकर्तीने म्‍हटले की, तिचे पती हे शेतमजूर असून कुशल ट्रॅक्‍टर चालक होते.  परंतु त्‍याबाबतचा दस्‍त मंचासमोर नाही.  तिचे पती कुटुंबातील एकमेव कमावते व्‍यक्‍ती असून त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नावर तक्रारकर्ती व त्‍यांची शिक्षण घेणारी दोन मुले अवलंबून होती. तसेच मुलांचे शिक्षण, संगोपन, मुलीचे लग्‍न व त्‍यांच्‍या भविष्‍यासंबंधी तक्रारकर्तीस पतीच्‍या मृत्‍युनंतर उत्‍पन्‍नाचे साधन उरलेले नाही. तक्रारकर्ती व तिची मुले यांना पती व वडील यांच्‍या प्रेमास कायमचे मुकावे लागलेले आहे. तक्रारकर्ती व तिच्‍या कुटुंबियास पतीच्‍या उपचारा दरम्‍यान पासून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागलेला असून भविष्‍यात सुध्‍दा त्रास सहन करावा लागणार आहे. म्‍हणून तक्रारकर्तीने नुकसानभरपाईपोटी विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडून रू. 10,00,000/- मिळावे अशी मागणी केली, जी विरूध्‍द पक्ष यांनी नाकारली. तक्रारकर्तीने आपल्‍या या कथनाच्‍या पुष्‍ठ्यर्थ खालील निकालपत्रे दाखल केली आहेत.
 
II (2005) CPJ 35 (NC) – NCDRC, New Delhi – Pravat Kumar Mukherjee V/s. Ruby General Hospital & Ors.
 
            Compensation of Rs. 10 lakhs awarded for mental pain and agony.
 
            Injury would include mental agony and torture. In Lucknow Development Authority (supra) the Court observed that the word compensation used in Section 14 is very wide connotation and has not been defined under the Act and held (para 14), “in legal sense it may constitute actual loss or expected loss and may extend to physical, mental or even emotional suffering insult or injury or loss”. Further, in Spring Meadows Hospital and Another V. Harjol Ahluwalia and Another, III (1998) SLT 684=I (1998) CPJ 1 (SC)=(1998) 4 SCC 39, the Apex Court considered the similar contention and observed that the compensation is to be awarded in favour of the parents of the minor child for their acute mental agony and the life-long care and attention which the parents would have to bestow on the minor child. 
 
            It is also an established law that under the Act National Consumer Forum has jurisdiction to award compensation depending upon established facts and the circumstances of the case. While dealing with such contention in Charan Singh V. Healing Touch Hospital & Others, VI (2000) SLT 867=IV (2000) CPJ 1 (SC)=(2000) 7 SCC 668, the Court observed that the Consumer Forums are required to make an attempt to serve the ends of justice so that compensation is awarded in an established case which not only serve the purpose of recompensing the individual, but which also at the same time aims to bring about the qualitative change in the attitude of service provider. The Court pertinently observed
 
            “It is not merely the alleged harm or mental pain, agony or physical discomfort, loss of salary and emoluments, etc. suffered by the appellant which is in issue – it is also the quality of conduct committed by the respondents upon which attention is required to be founded in a case of proven negligence.” 
 
            Keeping the aforesaid principles in mind, it would be just and reasonable to award compensation of Rs. 10 lakhs for mental pain and agony. This may serve the purpose of bringing about a qualitative change in the attitude of the hospitals of providing service to the human beings as human beings. Human touch is necessary; that is their code of conduct; that is their duty and that is what is required to be implemented.
 
SC-2009 CTJ 712 (SC) CP – Nizam Institute of Medical Science V/s. Prasant S. Dhamanka.
 
उपरोक्‍त निकालपत्रामध्‍ये प्रमाणित केल्‍यानुसार तसेच माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खालील निकालपत्रात प्रमाणित केल्‍यानुसार वेगवेगळ्या मथळ्याखाली किंवा एकत्रितरित्‍या वस्‍तुस्थिती व वास्‍तविकतेनुसार नुकसानभरपाई देता येते असे निर्धारित करण्‍यात आलेले आहे.
 
2004 – CTJ 605 SC (CP) – Gaziabad Development Authority V/s. Balbir Singh
 
2006 – CTJ 4 (SC) CP – Bihar State Housing Board V/s. Arun BakshyAward of compensation by a Judicial Forums must be under separate heads and must vary from case to case depending on the facts of each case.
 
तसेच माननीय राष्‍ट्रीय आयोग यांनी NCDRC – 2007 (1) CPJ 31 – Karuna Hospital V/s. Kochurani Jose & Orsया प्रकरणात उत्‍पन्‍नाची नुकसानभरपाई निर्धारित करण्‍याची पध्‍दत प्रमाणित केलेली आहे.        
 
57.   तक्रारकर्तीचे पती शेतमजूर तसेच कुशल ट्रॅक्‍टर चालक होते ही बाब विरूध्‍द पक्ष यांनी निव्‍वळ अमान्‍य केली आहे. परंतु त्‍याबाबत विरूध्‍द पक्ष यांनी कोणताही वस्‍तुनिष्‍ठ पुरावा/म्‍हणणे मंचासमोर सादर केले नाही. सद्यःस्थितीत तक्रारकर्तीच्‍या पतीचे उत्‍पन्‍न दररोज रू. 200/- ते 250/- असे गृहित धरले तसेच Minimum Wages Act नुसार व मृत्‍युसमयी तक्रारकर्तीच्‍या पतीचे वय 40 वर्षे गृहित धरले तर तो आणखी निश्चितच पुढील 20 वर्षे सक्षमतेने कार्यशील राहून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करू शकला असता. त्‍यामुळे रू. 200 /span> महिन्‍याचे 20 दिवस दरमहा /span> 240 महिने (12 /span> 20 वर्षे) = रू. 9,60,000/- होतात. त्‍यापैकी तक्रारकर्तीच्‍या पतीचा स्‍वतःचा 20% खर्च कमी करून म्‍हणजेच (रू. 9,60,000 रू. 1,92,000 (20% स्‍वतःचा खर्च) = उर्वरित रक्‍कम रू. 7,68,000/- एवढे उत्‍पन्‍न तक्रारकर्तीच्‍या कुटुंबियास 20 वर्षापर्यंत उदरनिर्वाहासाठी उपलब्‍ध झाले असते. तसेच 20 वर्षाच्‍या कालावधीत त्‍याचे उत्‍पन्‍न निश्चितच दीड-दोन पटीने वाढले असते असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीस विरूध्‍द पक्ष यांच्‍या रूग्‍णालयात भरती केल्‍यानंतर, करण्‍यात आलेले ऑपरेशन, त्‍यांचा मृत्‍यु यामुळे तक्रारकर्तीस, मुलांना मानसिक व शारीरिक आघात सहन करावा लागला व त्‍यानंतर भविष्‍यात सुध्‍दा सतत mental pain agony सहन करावी लागणार आहे. माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी त्‍यांच्‍या निकालपत्रात वेळोवेळी खालीलप्रमाणे नमूद केलेले आहेः- 
“Human life in India is of no value. Millions of dolllors are given by every Court in other Countries if medical negligence is established. Here a few rupees is considered a reasonable recompense.
 
वरील निकालपत्रात राष्‍ट्रीय आयोगाने व सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी ज्‍याप्रकारे व ज्‍याप्रमाणात नुकसानभरपाई बहाल केली तसेच सदर तक्रारीतील वस्‍तुस्थिती व विरूध्‍द पक्षाचा गंभीर स्‍वरूपाचा निष्‍काळजीपणा व ग्राहक सेवेतील त्रुटी याचा विचार करता दोन्‍ही बाबी गृहित धरून तक्रारकर्तीस एकत्रितरित्‍या रू. 7,50,000/- इतकी नुकसानभरपाई देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरूध्‍द पक्ष यांचा वैद्यकीय सेवेतील निष्‍काळजीपणा व ग्राहक सेवेतील त्रुटीमुळे विरूध्‍द पक्ष हे ती रक्‍कम तक्रारकर्तीला देण्‍यास बाध्‍य आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
      करिता खालील आदेश.                       
 
आदेश

 
      तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
 
1.    विरूध्‍द पक्षास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या कुटुंबियाच्‍या उदरनिर्वाहाकरिता तिच्‍या पतीच्‍या उत्‍पन्‍नापोटी झालेले नुकसान तसेच mental painagony करिता एकत्रित रक्‍कम रू. 7,50,000/- द्यावेत.
 
2.    विरूध्‍द पक्षास आदेश देण्‍यात येतो की, प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून त्‍यांनी तक्रारकर्तीला रू. 2,000/- द्यावे.
 
3.    विरूध्‍द पक्षास आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावी. अन्‍यथा त्‍यानंतर आदेश क्रमांक 1 च्‍या रकमेवर विरूध्‍द पक्ष यांना द.सा.द.शे. 6% दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्तीच्‍या हाती पडेपर्यंत द्यावे लागेल.      

 


HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBERHONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENTHONABLE MRS. Geeta R Badwaik, Member