निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
सदरची तक्रार तक्रारदाराने सेवेत कसुर केल्याबददल वकील श्री.गोपाळ कन्नडकर (गैरअर्जदार) यांचें विरुध्द केली आहे. या तक्रारी अंतर्गत गैरअर्जदारांचे हस्ताक्षर नमुना हस्ताक्षर तज्ञ श्री.आठल्ये यांचेकडे नागपुर येथे निष्णात मत (expert-opinion) घेण्याकरता अर्जदारांच्या विनंती अर्जावरुन पाठवण्यात आला होता. त्यांनी दि.03.02.2012 रोजी पत्र पाठवून रु.7,950/- एवढया फि ची मागणी केली हेोती. अर्जदारांच्या वकिलांच्या निदर्शनास ते पत्र आणण्यात आले परंतु त्यानंतर दि.13.03.2012, 09.04.2012, 03.05.2012, 11.06.2012, 12.07.2012 एवढया तारखांना संधी देऊनही अर्जदार व त्यांचे वकील मंचासमोर गैरहजर राहिले व त्यांनी हस्ताक्षर तज्ञांची “फि” भरली नाही म्हणून दि.13.08.2012 रोजी “फि” न भरल्यामुळे प्रकरण युक्तीवादासाठी ठेवण्यात आले.
त्यानंतर दि.13.08.2012 पासून दि.06.06.2013 पर्यत सलग अकरा तारखांना संधी देऊनही अर्जदार मा.मंचासमोर गैरहजर राहिले व त्यांनी युक्तीवाद केला नाही.
सबब, सदची तक्रार अर्जदार सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणास्तव (Dismiss in default) निकाली करण्यात येत आहे.
आदेश
1. सदरची तक्रार अर्जदाराच्या गैरहजेरीमुळे (Dismiss in default) निकाली
करण्यात येत आहे.
2. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड