जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ४२/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०१/०३/२०११
तक्रार निकाली दिनांक – १७/०२/२०१४
१) वैशाली विजय वेढणे,
उ.व. – सज्ञान, कामधंदा – खाजगी व्यवसाय,
राहणार – आर – ७२, शिवलिक नगर,
राणीपुर, हरिद्वार, उत्तराखंड.
२) सविता उदय अमृतकर
उ.व. – सज्ञान, कामधंदा – काही नाही,
राहणार – मु.पो. निजामपुर,
ता.साक्री, जि.धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१. श्री. गोकूळदास अमिचंददास गुजराथी ग्रा.बि.शे.
सहकारी पतसंस्था मर्यादित, निजामपूर, ता.साक्री, जि.धुळे
पत्ताः– मु.पो. निजामपूर,
ता.साक्री, जि. धुळे
(नोटीसीची बजवणी म. व्यवस्थापक सो. यांचेवर करावी)
२. श्री. गजानन गिरीशचंद्र शहा (मॅनेजर)
३. श्री. संजय गोकूळदास शहा (चेअरमन)
४. डॉ.हेमंत हरी पाटील (व्हाईस चेअरमन)
५. कमलेश बिहारीलाल शहा (संचालक)
६. भुपेश वसंतलाल शहा (संचालक)
७. प्रदिप इश्वरलाल शहा (संचालक)
८. मनोज नारायण विसपुते (संचालक)
९. धर्मराज काशिनाथ चिंचोळ (संचालक)
१०. सौ. पुनम पंकज शहा (संचालिका)
११. सौ. मिना हेमंत पाटील (संचालिका)
१२. श्री. नरेश गोपालदास कटारिया (संचालक)
१३. श्री. शिवप्रसाद भास्कर थोरात (संचालक)
१४. श्री. सितादास देवचंद अहिरे (संचालक)
१५. श्री. सुनिल भटू भावसार (संचालक)
१६. श्री. सुधाकर सिताराम भावसार (संचालक)
१७. श्री.प्रकाश संताजी पाटील (संचालक) ............ जाबदेणार
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एम.बी. साळुंके)
(जाबदेणार तर्फे – अॅड.श्री.एम.जी. देवळे / अॅड.श्री.एम.आर. भामरे)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्यः – श्री.एस.एस.जोशी)
१. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार ‘श्री. गोकूळदास अमिचंददास गुजराथी ग्रा.बि.शे. सहकारी पतसंस्था मर्यादित’ या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे.
अ.क्र. |
पावती क्रमांक |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
ठेव देय दिनांक |
व्याजदर |
मुदतअंती मिळणारी रक्कम |
१. |
८०३१ |
०५/०८/०८ |
८६,४५०/- |
०५/०९/०९ |
१०% |
९५८१५/- |
३. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून मुदत ठेव पावतीमधील रक्कम रूपये ९५,८१५/- व त्यावर देय तारखेपासून व्याज, तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी व आर्थिेक नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये ५०,०००/- व अर्जाचा खर्च रूपये १०,०००/- जाबदेणार यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मुदत ठेव पावतीची छायांकित प्रत दाखल केलेली आहे.
५. जाबदेणार यांनी दि.०१/१२/२०११ रोजीच्या आपल्या लेखी खुलाश्यात असे म्हटले आहे की, तक्रारदार नं.२ यांचे पती श्री. उदय आबा अमृतकर हे सामनेवाला पतसंस्थेचे सभासद आहे. श्री. उदय आबा अमृतकर यांनी त्यांचे नातेवाईक श्री.प्रविण गोकूळ वाणी यांनी घेतलेल्या कर्जास शिफारस केल्याने व जामिनदार म्हणुन कर्ज फेडीबाबत हमी म्हणून तक्रारदार नं.१ हया उदय अमृतकर यांच्या बहिण व तक्रारदार नं.२ हया उदय अमृतकर यांच्या पत्नी आहेत. कर्जदार प्रविण गोकूळ वाणी यांनी कर्जफेड न केल्यास सदरील ठेवी या कर्जखात्यात वर्ग करून घेण्यास हरकत नाही व सदरील ठेवी मुदती अंती नूतनिकरण करून घेत जावे व कर्ज फेड ही मुदत ठेव रक्कमेतून पूर्ण न झाल्यास कर्जाची व्याजासह परतफेड करण्याची जाबाबदारी श्री.उदय अमृतकर यांची राहील असे हमीपत्र त्यांनी पतसंस्थेस दिलेले आहे. कर्जदार श्री.प्रविण गोकूळ वाणी यांनी कर्जाची परतफेड न केल्याने कर्ज फेड करण्याची जबाबदारी श्री.उदय अमृतकर यांची आहे.
६. जाबदेणार यांनी दि.१६/०५/२०१३ रोजी एक मंचात विनंती अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, कर्जदार प्रविण गोकूळ वाणी यांनी त्यांच्याकडील कर्जाची दि.०३/०५/२०१३ रोजी सामोपचार योजनेंतर्गत एकरकमी परतफेड केली आहे. त्यामुळे पतसंस्था तक्रारदार यांना त्यांच्या मुदतठेव पावतीची घेणे रक्कम अधिक त्यावर दिनांक ०५/०५/२०१३ पावेतो पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम रूपये १,३१,४५७/- देण्यास तयार आहे. या रकमेचा दि. नंदुरबार मर्चटस् को.ऑफ बॅंक लि. नंदुरबार शाखा निजामपूर या बॅंकेचा धनादेश क्रमांक ६४७३३४ आज रोजी देत आहे. तो धनादेश तक्रारदार यांनी स्विकारावा आणि सदरची तक्रार निकाली काढण्यात यावी.
७. श्री. उदय अमृतकर व तक्रारदार नं.२ यांनी दि.२५/०५/२०१३ रोजीच्या निजामपुर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या भरणा पावती, सम्मती पत्रामध्ये असे लिहून दिले आहे की, मुदत ठेव पावती क्र.८०३१ व ८०३० मधील संपूर्ण व्याजासह दि. नंदुरबार मर्चंट बॅंक शाख निजामपुर या बॅंकेचा धनादेश क्र.६४७३४३ (दोन्ही पावत्यांची एकत्रीत) रक्कम रूपये २,६२,९१४/- मिळाला, सबब भरणा पावला व त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. तसेच ग्राहक मंच धुळे येथे दाखल केलेल्या तक्रारी काढून घेण्यात येतील.
८. वरील उभयपक्षांच्या खुलाश्यावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे रक्कम अदा केली आहे असे मंचास वाटते. तसेच तक्रारदार यांनी तक्रारअर्जसुरूठेवण्यासाठी कोणताहीपाठपुरावा (Steps)केलेलानाही. सबब सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात यावा, असे मंचाचे मत बनले आहे. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आ दे श
(अ) तक्रारदारांचीतक्रारनिकालीकाढण्यात येतआहे.
(ब) तक्रारअर्जाचेखर्चाबाबतकोणताहीआदेशनाही.
धुळे.
दि.१७/०२/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.