-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-15 सप्टेंबर, 2017)
01. तक्रारदार हे नात्यात असून यातील तक्रारकर्ता क्रं-1) हे, तक्रारकर्ती क्रं-2) चे वडील आहेत तर तक्रारकर्ती क्रं-3) ही, तक्रारकर्ता क्रं-1) आणि क्रं-4) ची आई आहे. तसेच तक्रारकर्ता क्रं 4 व 5 अनुक्रमे नात्याने पती व पत्नी आहेत. तक्रारदारानीं ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड या पतसंस्थे मध्ये त्यांनी मुदती ठेवी मध्ये गुंतविलेल्या रक्कमा अंतिम परिपक्वता तिथी पासून व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून, विरुध्दपक्ष क्रं-1) हे सदर पतसंस्थेचे अध्यक्ष असून, विरुध्दपक्ष क्रं-2) हे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत तर विरुध्दपक्ष क्रं-3) हे पतसंस्थेचे सचिव आहेत आणि विरुध्दपक्ष क्रं-4) हे पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्थे मध्ये काही रक्कमा मुदतीठेवी मध्ये जमा केलेल्या आहेत.
तक्रारदारांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी पतसंस्थे मध्ये मुदती ठेवीं मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. त्यांनी विरुध्दपक्षानां कायदेशीर नोटीस पाठवूनही प्रतिसाद मिळाला नाही.
तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, मुदतठेवी अंतर्गत अंतिम परिपक्वता तिथीस देय रक्कमा त्यावरील व्याजासह मिळण्यासाठी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मागणी करुनही देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं त्यांना देय मुदतीठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून शेवटी त्यांनी विरुध्दपक्ष संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, तक्रारदारानीं विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा अंतिम परिपक्वता तिथी-13/06/2015 रोजी प्रत्येकी देय रक्कम रुपये-77,178/- अंतिम परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो व्याज यासह येणारी रक्कम प्रत्येकी रुपये-1,00,356/- प्रमाणे एकूण रुपये-5,01,780/- परत करावेत तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल प्रत्येकी रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/-विरुध्दपक्षानां देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापक यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष संस्थेचे सभासद आहेत आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. ते तक्रारदारांची मुदतीठेवी मधील रक्कम देण्यास तयार आहेत परंतु काही कर्ज प्रकरणांमध्ये रकमेची वसुली होणे बाकी आहे, कर्ज रकमेची वसुली संबधाने प्रक्रिया सुरु आहे, सक्षम यंत्रणे कडून काही कर्ज प्रकरणां मध्ये अवॉर्ड सुध्दा पास झालेला आहे. कर्ज रकमेची वसुली झाल्या नंतर ते मुदतीठेवीची रक्कम संस्थेच्या नियमा नुसार परत करण्यास तयार आहेत , त्यांना या संबधीची त्यांनी कल्पना दिलेली आहे, सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती केली.
04. तक्रारदारांची सत्यापनावरील तक्रार, तसेच मुदतीठेव पावत्यांच्या प्रती, कायदेशीर नोटीस व नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती, पोचच्या प्रती, प्रतीउत्तर, तसेच विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर उभय पक्षांचा लेखी युक्तीवाद आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारदारानीं विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदत ठेवी मध्ये रक्कम गुंतविल्या संबधाने पुराव्या दाखल मुदती ठेव पावतींच्या प्रती दाखल केल्यात त्यानुसार मुदती ठेवींचा तपशिल परिशिष्ट-अ प्रमाणे खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 487 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Shri Suryakant Natthuji Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
2 | 489 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Ku. Kiran Suryakant Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
3 | 493 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Smt. Yashodabai Natthuji Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
4 | 494 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Shri Ishwar Natthuji Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
5 | 495 | 13/12/2014 | 74,000/- | 13/03/2015 | 9.50% | 75,758/- |
| | After Maturity date this F.D. was again renewed by Complainant Smt. Sunita Ishwar Raghute & description of second renewal is given below | | |
| | 13/03/2015 | | 13/06/2015 | 7.50% | 77,178/- |
06. सदर मुदत ठेव पावत्यांच्या प्रती या विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेले असून पावत्यांवर विरुध्दपक्ष सहकारी पत संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. तसेच परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांचे नावे रक्कम गुंतवणूक केल्याची बाब सुध्दा पुराव्या दाखल मुदती ठेव पावतींच्या प्रतीं वरुन सिध्द होते. मुदतीठेवींच्या पावत्या या तक्रारदारांनी स्वतः दाखल केलेल्या असून त्यानुसार प्रथम गुंतवणूक कालावधीतील व्याज दर हा 9.50 टक्के आणि पुर्नगुतंवणूक कालावधीतील व्याज दर हा 7.50 टक्के एवढा असल्याचे त्यावरुन दिसून येते. तक्रारदार हे मुदती ठेवींवर नमुद केलेल्या व्याजदराने अंतिम परिपक्वता तिथी पर्यंत नमुद केलेल्या रकमा व प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो आदेशित व्याज यासह रकमा परत मिळण्यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे मत आहे. त्यांची मुदतठेवी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी दिनांक-16/11/2015 रोजीची कायदेशीर नोटीस दिनांक-17/11/2015 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविल्या बाबत पुराव्या दाखल नोटीस प्रत, रजिस्टर पोस्टाच्या पावत्या तसेच पोच सादर केलेल्या आहेत. यावरुन असे सिध्द होते की, तक्रारदारानीं मागणी करुनही त्यांच्या मुदत ठेवींच्या रकमा देय लाभ व व्याजासह विरुध्दपक्ष पतसंस्थेनी परत केलेल्या नाहीत, त्यामुळे विरुध्दपक्षांचा बचाव की ते तक्रारदारांना मुदती ठेवीच्या रकमा परत करण्यास तयार होते व आहेत यात कोणतेही तथ्य ग्राहक मंचास दिसून येत नाही.अशाप्रकारे विरुध्दपक्ष पतसंस्थेने मुदतीठेवीच्या अंतिम परिपक्वता दिनांकास देय रकमा तक्रारदारानां परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सुध्दा सिध्द होते. तक्रारदारानां त्यांनी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेल्या देय रकमा वेळेवर न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येते. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार हे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतठेवीच्या अंतिम परिपक्वता तिथीस देय असलेल्या रकमा अंतिम परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याज यासह विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-2500/- प्रमाणे एकूण रुपये-12,500/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
08. या ठिकाणी आणखी एका महत्वाच्या बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे की, यातील तक्रारदारानीं विरुध्दपक्ष क्रं-4) म्हणून पतसंस्थेच्या व्यवस्थापकानां तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्यवस्थापक हे पद संस्थेचे पदाधिकारी या मध्ये मोडत नसून ते पगारी कर्मचा-याचे पद असल्याने त्याची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी येत नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-4) ला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
09. विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे दाखल युक्तीवादा मध्ये असाही आक्षेप घेण्यात आला की, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष संस्थेचे सभासद आहेत आणि सहकारी संस्था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्याचे अधिकार हे सहकारी न्यायालयासच आहेत त्यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. या आक्षेपा संदर्भात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्यानीं विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या मुदती ठेवी मध्ये रकमा गुंतविलेल्या असल्याने ते विरुध्दपक्ष पतसंस्थेचे “ग्राहक” होतात आणि विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेनी त्यांना देय असलेल्या रकमा परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे ग्राहक न्यायमंचाला प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते अशा आशयाचे अनेक निकालपत्र मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले असल्याने विरुध्दपक्षाचे सदर आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारदार अनुक्रमे क्रं-1) श्री सुर्यकांत नत्थुजी रघुते, तक्रारकर्ती क्रं-2) कु.किरण सुर्यकांत रघुते, तक्रारकर्ती क्रं-3) श्रीमती यशोदाबाई नत्थुजी रघुते, तक्रारकर्ता क्रं-4) ईश्वर नत्थुजी रघुते आणि तक्रारकर्ती क्रं-5) सौ.सुनिता ईश्वर रघुते यांची तक्रार, विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष, विरुध्दपक्ष क्रं-2) उपाध्यक्ष आणि विरुध्दपक्ष क्रं-3) सचिव यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(4) व्यवस्थापक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड हे पद पगारी कर्मचा-याचे पद असून ते पदाधिकारी मध्ये मोडत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-4) याला या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारदारानीं त्यांचे नावे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमा मुदतठेवीच्या अंतिम परिपक्वता तिथीस देय असलेल्या रकमा, अंतिम परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याज यासह येणा-या रक्कमा प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत त्या-त्या तक्रारदारानां परत कराव्यात.
(04) तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-2500/- प्रमाणे एकूण रुपये-12,500/-(अक्षरी एकूण रुपये बारा हजार पाचशे फक्त) तसेच तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) तक्रारकर्त्याला द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.