// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक :256/2014
दाखल दिनांक : 28/11/2014
निर्णय दिनांक : 21/02/2015
श्री मंगेश गणेशराव मोहोड
वय 44 वर्षे, धंदा नोकरी
रा. मंगलमुर्ती अपार्टमेंट, फ्लॅट नं. 1
पहिला माळा, गुणवंत लॉनचे बाजुला
एमआयडीसी बायपास रोड, अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- श्री गिरीश सुरेशकुमार घुंडीयाल
रा. व्दारकानाथ कॉलनी,
एमआयडीसी बायपास रोड, अमरावती
- श्री सुनिल हरीभाऊ भोयर
रा. मुढोळकर पेठ, हॉटेल वंदु इंटरनॅशनल चे
- , राजापेठ, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. भेरडे
विरुध्दपक्ष 2 तर्फे : एकतर्फा आदेश
विरुध्दपक्ष 1 ला : नोटीस नाही
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 21/02/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
2. तक्रारदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मंगलमुर्ती अपार्टमेंट मधील सदनिका नं. 1 पहिला माळा वरील तक्रारदार यांना दि. २३.१.२०१२ रोजी विकला. नंतर सदर सदनिका दि. १८.३.२०१३ रोजी तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विकत घेतला. पुढे सन २०१३ रोजीच्या पावसाळयामध्ये तक्रारदाराच्या असे लक्षात आले की, सदर सदनिकेच्या पश्चिमे कडील भिंतीला पावसामुळे ओलावा येऊन क्रॅक झालेली आहे. त्यामुळे त्या भितीचा रंग खराब होऊन त्यावर पांढरे व काळे चट्टे उमटले.
3. सदर सदनिकेचा नादुरुस्त व खराब झालेल्या भागाचे दुरुस्ती करणे हे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांची संयुक्तीक
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2014
..3..
जबाबदारी असल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही म्हणून तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना दि. ३०.८.२०१४ रोजी वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु विरुध्दपक्षाकडून त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून तक्रारदाराने सिव्हील इंजिनिअरचा, सदर खराब कामाबाबत लेखी अभिप्राय घेऊन वि. मंचात सदर तक्रार दाखल केली.
4. विरुध्दपक्ष क्र. 1 हे सदर सदनिकेचे बांधकाम व्यावसायीक असुन त्यांनी सदर सदनिकेचे बांधकामाच्या नियमाप्रमाणे अपार्टमेंट अॅक्ट नुसार बांधकाम न करता त्यात बरेच दोष होते व अमरावती महानगर पालिकेच्या नियमांचे पण नकाशाप्रमाणे बांधकाम न करता उल्लंघन केले. विरुध्दपक्ष क्र. 2 ला हे सर्व माहिती असुनही, त्यांनी हया बाबी तक्रारदाराकडून लपवुन ठेवल्या त्यामुळे तक्रारदाराला विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 च्या सेवेतील त्रुटीमुळे मानसिक व शारिरीक त्रास होऊन आर्थिक नुकसानपण झाले. म्हणून सदर अर्ज वि. मंचात दाखल करुन विनंती केली की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे सदर
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2014
..4..
सदनिकेचे दोषपूर्ण बांधकाम दुरुस्त करुन पाणी झिरपणे, आतील भिंतीवरील खराब झालेल्या रंगाचा दोष काढुन देऊन आर्थिक नुकसान भरपाई रु. ५०,०००/-, नोटीस खर्च, सिव्हील इंजिनिअरचा अभिप्राय खर्च व तक्रार खर्च इत्यादी असे एकूण रु. ७८,०००/-, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून देण्यात यावे. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 7 दाखल केले आहेत.
5. वि. मंचाने निशाणी 1 खाली दि. २८.११.२०१४ रोजी आदेश पारीत करुन विरुध्दपक्ष क्र. 1 कडून तक्रारदाराने सदर सदनिका खरेदी न केल्यामुळे, तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे ग्राहक होत नाहीत, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 ला नोटीस पाठविण्यात आली नाही.
6. विरुध्दपक्ष क्र. 2 यांना पाठविलेली नोटीस “Not claim” म्हणून परत आली, म्हणून सदर प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात आले.
7. सदर प्रकरणामध्ये विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे कोणीही हजर न झाल्यामुळे, हयात मुद्दे काढण्यात आले नाहीत.
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2014
..5..
8. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त 2/1 हा करारनामा विरुध्दपक्ष क्र. 1 व विरुध्दपक्ष क्र. 2 मध्ये झाला असल्याकारणाने तक्रारदाराचा हयात काहीही संबंध येत नाही, म्हणून सदर दस्तावेज विचारात घेता येत नाही. दस्त 2/2 चा विचार करता ते तक्रारदार व विरुध्दपक्ष क्र. 2 मध्ये सदर सदनिकेचा दि. १८.३.२०१३ रोजी खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे दिसुन येते.
9. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. भेरडे यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात कथन केले की, त्यांच्या सदनिकेमध्ये पावसाचे पाणी झीरपणे दिसु लागल्या नंतर व तसे विरुध्दपक्ष क्र. 2 ला कळविल्यानंतर त्यांचे कडून काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच सिव्हील इंजिनिअर यांच्या लेखी अभिप्राया प्रमाणे सदर सदनिकेमध्ये बरेच दोष दिसुन आले.
10. सदर सिव्हील इंजिनिअरचा लेखी अभिप्राय व सादर केलेले नि 2/6 प्रमाणे फोटोग्राफ वरुन सदर सदनिकेमध्ये बांधकाम दोष असल्याचे दिसुन येतात. वास्तविक पाहता
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2014
..6..
तक्रारदाराने सदर सदनिकेचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यापुर्वी जर सिव्हील इंजिनिअर श्री.एम.के. तोलीवाल यांचा बांधकामा विषयी अभिप्राय घेतला असता तर त्या बांधकामातील असलेले दोष खरेदी करण्यापुर्वीच लक्षात आले असते. तसेच निशाणी 2/2 मधील पेज 4 वरील 4/97 चे अवलोकन केले असता त्यात स्पष्टपणे नमुद केले आहे की, “That the purchase before taking possession of the flat F 1 hereby sold had thoroughly inspected the said Flat, sold to him as well as building to which F1 situated. Also purchaser is fully satisfied about the quality of construction, workmanship, built up area etc & there is no further leakage seepage or breaking of any thing affixed in Flat F1 & it has been constructed as per specification & sanction plan.”
11. वरील दस्त सब रजिस्टार ऑफीस मध्ये दि. १८.३.२०१३ रोजी नोंदणी झाले असुन त्यावर दोन्ही पक्षकारांच्या साक्षीदाराच्या सहया आहेत. अशा प्रकारे वरील दस्ताला कायदेशीर आधार प्राप्त झाल्यामुळे वि. मंच, त्या पलीकडे जाऊन निर्णय देऊ शकत नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक : 256/2014
..7..
12. वरील सर्व विवेचनावरुन तक्रारदाराचा अर्ज विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द पण रद्द होण्यास पात्र आहे. कारण त्यांनी सेवेत त्रुटी केल्याचे दिसत नाही हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असुन सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 21/02/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष