तक्रार क्र. 274/2015.
तक्रार दाखल दि.18-11-2015.
तक्रार निकाली दि.25-04-2016.
सौ. मंदाकिनी पोपट शेडगे,
रा. अक्षता रेसिडेन्सी, जी-83,
जाधववाडी, फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,
फलटण, तर्फे चेअरमन
श्री. साहेबराव सखाराम जाधव
रा.कसबा पेठ, फलटण,ता.फलटण,जि.सातारा.
2. नंबर 1 तर्फे व्हाईस चेअरमन,
श्री. अर्जूनराव महादेव नाळे,
रा.पिंगीचा मळा, फलटण,ता.फलटण,जि.सातारा
3. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. शरद धोंडीबा भोगळे,
रा.मु.पो.अलगुडवाडी, बारामती रोड,
ता.फलटण,जि.सातारा,
4. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. अरुणराव मारुतराव जाधव,
रा.बुधवार पेठ, फलटण,
ता.फलटण,जि.सातारा.
5. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. सदाशिव धोंडीबा शिंदे,
रा.मु.पो.नवा मळा,
ता.फलटण,जि.सातारा.
6. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. देवदास गंगाराम बनकर,
रा.मु.पो.दालवाडी,
ता.फलटण,जि.सातारा
7. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. प्रभाकर दादासो शिंदे,
रा.मु.पो. नवामळा,
ता.फलटण,जि.सातारा,
8. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. जालींदर विष्णू जाधव,
रा.मु.पो. गिरवी,
ता.फलटण,जि.सातारा
9. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. सोपान किसन नाळे,
रा.फरांदवाडी,ता.फलटण,जि.सातारा.
10. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. दादासो भवाना घनवट,
रा.मु.माळवाडी, पो.कुरवली,
ता.फलटण,जि.सातारा.
(नि.23 वरील दि.23/12//15 चे आदेशाने वगळले)
11. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. संभाजी साहेबराव लांभाते,
रा.मु.पो.उपळवे,
ता.फलटण,जि.सातारा,
12. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. दिलीप महादेव वरपे,
रा.मु.पो.कापशी,
ता.फलटण,जि.सातारा,
13. नंबर 1 तर्फे संचालिका,
सौ. सुनिता पोपटराव नाळे,
रा.संत बापूदास नगर, फलटण,
ता.फलटण,जि.सातारा,
14. नंबर 1 तर्फे संचालक,
श्री. साहेबराव भिकोबा ननावरे,
रा.(कावळबन), मु.पो.वाठार (निं),
ता.फलटण,जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.पी.जगदाळे.
जाबदार क्र.3,4,6,8,10,11,12 व 14 – एकतर्फा.
जाबदार क्र.1,2,5,7,9,13 – नो-से.
जाबदार क्र.10- नि.23 कडील आदेशाने वगळले.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे जाधववाडी, फलटण,जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. जाबदार ही सहकार सोसायटी कायदा, 1960 प्रमाणे स्थापन झालेली सहकारी पतसंस्था असून तिचे मुख्य कार्यालय फलटण या ठिकाणी कार्यरत आहे. जाबदार पतसंस्थेचा सभासदांकडून ठेवी स्विकारणे, त्यावर कराराप्रमाणे व्याज देणे, त्याचप्रमाणे सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कर्ज मागणी अर्जाचा विचार करुन कर्जाचा व्याजाने पुरवठा करणे हा व्यवसाय होता व आहे. जाबदार क्र. 1 हे संस्थेचे चेअरमन असून जाबदार क्र. 2 हे संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत व जाबदार क्र. 3 ते 13 हे संस्थेचे संचालक मंडळ आहे. जाबदार क्र.14 हे संस्थेचे व्यवस्थापक आहेत. तजाबदार संस्था ही नावलौकीकास आलेली फलटण शहरातील संस्था असल्याने तक्रारदाराने भविष्यात आपल्या अडचणी सोडविणेकरीता जाबदार पतसंस्थेच्या वडूज शाखेमध्ये त्यांचे स्वतःचे नावावर दामदुप्पट ठेव व बचत खात्यामध्ये खालीलप्रमाणे रक्कम गुंतविली होती व आहे.
अ.क्र | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1. | 007155 | 25,000/- | 11/02/08 | 11/05/14 | 50,000/- |
2. | 007155 | 25,000/- | 11/02/08 | 11/05/14 | 50,000/- |
3 | बचत खाते क्र. 7/198 | | | 13/03/15 पर्यंत | 40,400/- |
अशी तक्रारदाराने गुंतविलेली मिळून एकूण रक्कम रु.1,40,400/- इतकी जाबदार पतसंस्था तक्रारदारांना देय आहे. तक्रारदार यांना कौटुंबिक गरज पूर्ण करणेकरिता पैशांची अत्यंत नितांत गरज असल्यामुळे सदरच्या रकमेची गरज असल्याने तक्रारदारांनी जाबदार संस्थेत वारंवार चकरा मारुन ठेवपावतींची व बचत खात्यावरील रकमांची मागणी केली असता जाबदारांनी टाळाटाळ केली व उडवाउडवीची उत्तरे दिली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्कम अदा केलेली नाही. वास्तविक ठेवपावतीची मुदतीनंतर व बचत खात्यातील रक्कम होणा-या व्याजासह मागणी केल्यास ती एकरकमी जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे. परंतू तक्रारदाराने प्रस्तुत दामदुप्पट ठेवींची मुदत संपलेनंतर व बचतखात्यातील रक्कम व्याजासह जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. जाबदार यांचेकडून सदर दामदुप्पट ठेवी व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह वैयक्तीक व संयुक्तिकरित्या वसूल होऊन मिळावी व मानसिक व शारिरीकत्रास व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या दामदुप्पट ठेवपावतींची एकूण रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) मुदत संपलेतारखेपासून रक्कम प्रत्यक्ष वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह रक्कम तसेच बचत ठेव खातेवरील रक्कम रु.40,400/- (रुपये चाळीस हजार चारशे मात्र) द.सा.द.शे. 18 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह वसूल होवून मिळावी व मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रक्कम रु.50,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे तक्रार अर्जाचे पृष्ठयर्थ अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 व नि. 5/2 कडे दामदुप्पट ठेव पावती क्र. 007155 व 007157 मुळ ठेवपावत्या, नि. 5/3 कडे तक्रारदार यांचे मुळ बचत खाते पुस्तक क्र. 7/198, नि. 5/4 कडे जाबदार यांना पाठविलेल्या परत आलेल्या नोटीसा व पोहोचपावत्या नोटीसा, नि. 5/5 कडे जाबदारांनी तक्रारदाराने जाबदारांना वकीलांमार्फत पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत, नि. 26 कडे तक्रारदारांचे पुराव्याचे अँफीडेव्हीट, नि. 27 कडे लेखी युक्तीवाद इत्यादी कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 14 यांना मंचाने काढलेली नोटीस लागू झालेनंतर जाबदार क्र.1,2,5,7,9, व 13 यांनी दि.23/12/2015 रोजी नि. 25 कडे अँड. जाधव यांचे वकीलपत्र घालून हजर झालेले आहेत. परंतु त्यांनी मंचात हजर होवूनही म्हणणे दाखल केलेले नसल्याने त्यांचेविरुध्द दि.24/3/2016 रोजी ‘नो-से’ आदेश पारीत करणेत आलेला आहे. तसेच जाबदार क्र. 3,4,6,8,10,11,12,14 यांना मंचात नोटीस प्राप्त होवूनही त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत जाबदारांविरुध्द दि.15/1/2016 रोजी ‘एकतर्फा’ आदेश पारीत करणेत आलेले आहेत. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 14 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब प्रस्तुतचे प्रकरण जाबदार क्र. 1 ते 14 यांचेविरुध्द एकतर्फा चालविणेत आले.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद याचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत कामी प्रस्तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खालील नमूद
केलेप्रमाणे.
विवेचन
मुद्दा क्र.1 व 2-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-
प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे एकूण रक्कम रु.1,40,400/- (रुपये एक लाख चाळीस हजार चारशे मात्र) गुंतविले होते व आहेत.
अ.क्र | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवलेची तारीख | मुदत संपलेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1. | 007155 | 25,000/- | 11/02/08 | 11/05/14 | 50,000/- |
2. | 007155 | 25,000/- | 11/02/08 | 11/05/14 | 50,000/- |
3 | बचत खाते क्र. 7/198 | | | 13/03/15 पर्यंत | 40,400/- |
प्रस्तुत दामदुप्पट ठेव पावती क्र. 007155 व 007157 व बचत खाते पुस्तक क्र.7/198 ची मुळ प्रत याकामी तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/3 कडे दाखल केली आहे. म्हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व होते हे स्पष्ट होते. प्रस्तुत दामदुप्पट ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने जाबदार यांचेकडे रकमेची व्याजासह वारंवार तोंडी मागणी केली असता व वकीलांमार्फत रक्कम मागणीची नोटीस (नि. 5/5) देवूनही जाबदाराने रक्कम देणेस टाळाटाळ केली व रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही हे तक्रारदाराचे कथन योग्य व विश्वासार्ह वाटते. कारण प्रस्तुत कामी जाबदार क्र.1,2,5,7,9, व 13 यांनी मंचाची नोटीस मिळालेनंतर मंचात हजर होवूनही त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही तसेच जाबदार क्र. 3,4,6,8,10,11,12,14 यांना मंचाची नोटीस मिळूनही मंचात हजर राहीले नाहीत व म्हणणेही दिले नाही म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. जाबदार क्र.1 ते 14 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले व त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही अथवा खोडून काढलेले नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या दामदुप्पट ठेवपावतींची व बचत ठेव खात्यावरील व्याजासह रक्कम मुदतीनंतर तक्रारदाराने जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही जाबदारांनी तक्रारदारांना अदा केलेली नाही हे स्पष्ट सिध्द होत आहे. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
जाबदार यांनी तक्रारदार यांना दामदुप्पट ठेवपावतीची मुदत संपले नंतरची दामदुप्पट रक्कम मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह अदा करणे तसेच बचत खातेमधील जमा असलेली रक्कम दि.13/3/2015 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह अदा करणे बंधनकारक असूनही जाबदाराने प्रस्तुत ठेवीची रक्कम तक्रारदारास अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदार क्र. 10 हे मयत असलेने त्यांना नि.23 कडील आदेशाने वगळणेत आलेले आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 9 व 11 ते 13 यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र. 14 यांना संस्थेकरीता संयुक्तिकपणे तक्रारदाराला वरीलप्रमाणे दामदुप्पट ठेवी व बचत खातेवरील रकमा अदा करणेसाठी Co-operative corporate veil नुसार जबाबदार धरणेत येते. जाबदार क्र. 14 हे संस्थेचे कर्मचारी/नोकर असल्याने त्यांना रक्कम देणेसाठी वैयक्तिक जबादार धरता येणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब प्रस्तुत कामी आम्ही मा. उच्च न्यायालय,मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्द स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
7. सबब आम्ही प्रस्तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 ते 9 व 11 ते 13 यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र.14 यांना संस्थेकरीता संयुक्तिकपणे दामदुप्पट ठेवपावती क्र. 007155 व 007157 प्रत्येकी रक्कम रु.25,000/-(रुपये पंचवीस हजार मात्र) ची प्रत्येकी दामदुप्पट रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह तसेच बचत ठेव खाते क्र.7/196 मधील दि.13/3/15 अखेर जमा असलेली रक्कम रु. 40.400/- (रुपये चाळीस हजार चारशे मात्र) दि.13/3/15 पासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह तक्रारदारास अदा करणेस जबाबदार धरणेत येते.
3. जाबदार क्र. 1 ते 9 व 11 ते 13 यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र.14 यांना संस्थेकरीता संयुक्तिकपणे दामदुप्पट ठेवपावती क्र. 007155 व 007157 प्रत्येकी रक्कम रु.25,000/-(रुपये पंचवीस हजार मात्र) ची प्रत्येकी दामदुप्पट रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह तक्रारदारास अदा करावेत.
4. जाबदार क्र.1 ते 9 व 11 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र.14 यांनी संस्थेकरीता संयुक्तिकपणे बचत ठेव खाते क्र.7/196 मधील दि.13/3/15 अखेर जमा असलेली रक्कम रु. 40.400/- (रुपये चाळीस हजार चारशे मात्र) दि.13/3/15 पासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणा-या व्याजासह तक्रारदारास अदा करावी.
5. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) जाबदार क्र.1 ते 9 व 11 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र. 14 यांनी संस्थेकरीता संयुक्तिकपणे तक्रारदारांना अदा करावेत
6. जाबदार क्र.1 ते 9 व 11 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र.14 यांनी संस्थेकरीता संयुक्तिकपणे तक्रारदारांना अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
7. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार क्र.1 ते 9 व 11 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे व जाबदार क्र.14 यांनी संस्थेकरीता संयुक्तिकपणे आदेश प्राप्त झाले तारखेपासून 45 दिवसात करावे.
8. आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि25-04-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.