::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.) (पारीत दिनांक-05 एप्रिल, 2014 ) 01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली तक्रार दाखल केली असून बयानपत्रा नुसार वि.प.कडे नोंदणी केलेल्या भूखंडाची विक्री करुन देण्यास विरुध्दपक्ष असमर्थ ठरल्याने तक्रारकर्त्याने भूखंडापोटी
विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळावी व इतर अनुषंगीक मागण्या केल्यात. 02. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन खालील प्रमाणे- विरुध्दपक्ष श्री गणेशा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, नागपूर ही शेत जमीनीचे अकृषक जमीनीमध्ये रुपांतरण करुन व तिचे ले आऊट पाडून निवासी भूखंडाची विक्री करणारी फर्म असून अजय वसंतराव निनावे हे तिचे प्रोपायटर आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास मौजे मुरादपूर, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील नियोजित गणेश कॉलिनी, पटवारी हलका क्रमांक-14, खसरा क्रमांक-18 ते 22 मधील भूखंड विक्री संबधाने बयानापत्र करुन दिले. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार विरुध्दपक्षाकडे खालील नमुद “परिशिष्ट-अ” प्रमाणे भूखंडाची बयानापत्राव्दारे नोंदणी करुन वेळोवळी भूखंडापोटी विरुध्दपक्षास रक्कम अदा केली. “परिशिष्ट-अ” तक्रार क्रं व तक्रादाराचे नाव | बयानापत्राचा दिनांक | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंड क्रमांक व भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंडाची एकूण किंमत | बयाना पत्राचे वेळी नगदी दिलेली रक्कम | परतफेडीसाठी पाडून दिलेल्या मासिक किस्तीचा तपशिल | त.क.चे तक्रारी नुसार नोंदणीकृत भूखंडापोटी विरुध्दपक्षास आज पावेतो अदा केलेली एकूण रक्कम | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | सी.सी-13- 38 श्री अशोक नारायणराव रेंघे | 03.04.2008 | मौजे मुरादपूर, तह.उमरेड, जिल्हा नागपूर प.ह.नं. 14, खसरा क्रं 18 ते 22 मधील भूखंड क्रं-67 क्षेत्रफळ-1630.73 चौरसफूट आणि भूखंड क्रं-58, क्षेत्रफळ 1630.73 चौरसफूट | प्रत्येक भूखंडाची किंमत प्रतीचौरस फूट रु-45/- प्रमाणे एकूण रु-73,382.85/- प्रमाणे दोन भूखंडाची किंमत रुपये- | प्रती भूखंड रुपये-10,000/- प्रमाणे एकूण रु.20,000/- | प्रतीमाह मासिक किस्तीमध्ये | वेळोवेळी अदा केलेल्या रकमेचा शेवटचा पावती दि.27.06.2009 पर्यंतची बयानापत्राचे वेळी दिलेल्या रक्कमेसह रु-48,000/- व रु.12,000/- पावती दिली नाही. अशाप्रकारे एकूण रु-60,000/- दिलेत. | | | | | | | | |
तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाने “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या नुसार दोन्ही भूखंडाचे बयानापत्र करुन दिले व विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडून भूखंडापोटी वेळोवेळी रक्कमा स्विकारल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचे ग्राहक ठरतो. तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यास असे कळले की, विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक मंचा मध्ये भूखंड विक्री फसवणूकी संबधाने निकाल पारीत झालेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने सत्य वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत डाकेने विरुध्दपक्षास दि.12.05.2011 रोजीची नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षास प्राप्त होऊनही त्यास विरुध्दपक्षाने उत्तर दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विरुध्दपक्ष व त्यांचे भागीदार यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे वृत्त अधिवक्ता श्री विवेक के.कोलते यांनी दैनिक लोकमत व नवभारतमध्ये दि.12.08.2010 रोजी प्रकाशित केले. त्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडाची मासिक किस्त भरणे बंद केले व भूखंडापोटी विरुध्दपक्षास अदा केलेली रक्कम परत मिळण्यास विनंती केली. परंतु विरुध्दपक्षाने त्यांचे कार्यालयातून गुंडागर्दी करीत तक्रारकर्त्यास व इतर भूखंड धारकानां हुसकावून लावले व त्यानंतरही विरुध्दपक्षाने भूखंडाचे विक्रीपत्र लावून देतो असे वेळोवेळी आश्वासित केले परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे व त्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द न्यायमंचा समक्ष तक्रार दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात- (1) तक्रारकर्त्याने भूखंडाचे बयानापत्रापोटी विरुध्दपक्षास वेळोवेळी अदा केलेली संपूर्ण रक्कम द.सा.द.शे.15% दराने व्याजासह परत करण्यास विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. (2) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा व आर्थिक नुकसानी बद्दल प्रत्येकी रुपये-45,000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे. (3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- तसेच नोटीस खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे. (3) 03. विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार मुदतबाहय असल्यामुळे खारीज करण्यात यावी. विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, तक्रारदार श्री अशोक रेंघे यांनी भूखंडापोटी त्यांना वेळोवेळी फक्त रुपये-48,000/- एवढीच रक्कम अदा केली. तक्रारदार श्री अशोक रेंघे यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी भूखंडापोटी विरुध्दपक्षास रुपये-12,000/- दिलेत, ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही ही बाब स्पष्टपणे नाकबुल केली. त्यामुळे तक्रारदार श्री अशोक रेंघे यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी एकूण रुपये-60,000/- दिलेत हे तक्रारदार श्री अशोक रेंघे यांचे विधान स्पष्टपणे नाकबुल केले. विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, तक्रारदार श्री अशोक रेंघे यांनी दि.20.04.2012 रोजी दोन साक्षीदारा समक्ष त्यांनी नोंदणी केलेला भूखंड क्रं 58 व 67 रद्द केल्या बाबत हमीपत्र लिहून दिले आहे व त्यामध्ये तक्रारदार श्री अशोक रेंघे यांनी भूखंडाची पूर्ण रक्कम परत मिळाल्याचे कबुल करुन आता विरुध्दपक्षावर कुठलीही थकबाकी नाही असे मान्य केले आहे. भूखंड करार रद्द केल्या बाबत विरुध्दपक्षाने तक्रारदार श्री अशोक रेंघे यांना दि.20.03.2012 रोजी कॅनरा बँक, नागपूर येथील धनादेश क्रं 805528 अन्वये रक्कम रुपये-10,000/- परत केली. तसेच दि.10.04.2012 रोजी रुपये-14,000/- नगदी स्वरुपात व त्याच दिवशी म्हणजे दि.10.04.2012 रोजी धनादेश क्रं-805529 अन्वये रुपये-10,000/- परत केले. तसेच दि.25.04.2012 रोजी धनादेश क्रं-843233 अन्वये रुपये-10,000/- परत केले. तसेच दि.11.07.2012 रोजी धनादेश क्रं 983260 अन्वये रुपये-3600/- एवढी रक्कम परत केली अशाप्रकारे तक्रारदार श्री अशोक रेंघे यांना विरुध्दपक्षाने एकूण रुपये-47,600/- एवढी रक्कम परत केली. 04. विरुध्दपक्षाचे या उत्तरावर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखाशिवाय प्रतीउत्तर मंचा समक्ष सादर केले व त्यात विरुध्दपक्षाचे हे म्हणणे मनघडत असून वि.प.ने आपल्या बचावासाठी दिलेले आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्षाने सादर केलेले दस्तऐवज हे बोगस आहेत. परंतु तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे या म्हणण्याचे विरोधात सक्षम पुरावा मंचा समक्ष सादर केलेला नाही. तक्रारकर्त्याचे मागणी नुसार त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी तेवढी रक्कम जमा केल्याचा पुरावा प्रकरणांमध्ये सादर केलेला नाही. 05-अ. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर केली. सोबत भूखंडाचे बयानापत्राची प्रत, विरुध्दपक्षाचे भूखंडाचे मासिक किस्तीची रक्कम स्विकारल्या बद्दल नोंदीचे दस्तऐवज, विरुध्दपक्षाने निर्गमित केलेल्या पावत्या, तक्रारकर्त्याने वि.प.यांना दिलेली नोटीस, नोटीसची पोच, वृत्तपत्रीय कात्रण अशा दस्तऐवजांच्या प्रती सादर केल्यात.
05-ब. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर सादर केले. तसेच प्रभारी सहायक संचालक, नगर रचना, नागपूर यांचा तहसिलदार उमरेड यांना दिलेला अभिप्राय, विरुध्दपक्षाचा कॅनरा बँक, सेंट्रल एव्हेन्यु शाखा नागपूर येथील खाते उतारा प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद सादर केला. 06. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री तांबुलकर यांचा तर विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री ढोबळे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 07. तक्रारकर्त्याची तक्रार , विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर, उभय पक्षानीं तक्रारी मध्ये दाखल केलेले दस्तऐवज यांचे अवलोकन मंचा तर्फे करण्यात आले. तक्रारकर्त्याचे तक्रारीस नुसार त्याने विरुध्दपक्षास भूखंडापोटी दिलेली रक्कम व्याजासह परत मिळण्याची मागणी केली आहे. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, काही रक्कमेची पावती त्यास विरुध्दपक्षाने दिली नाही. याउलट विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यांना तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केल्या नुसार भूखंडापोटी रक्कम प्राप्त झालेली नाही व विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास भूखंडापोटी पूर्ण रक्कम परत केलेली आहे. त्यामुळे तक्रारीमधील उपलब्ध पावत्यांच्या प्रती, विरुध्दपक्षाचा बँकेचा खाते उतारा यावरुन नेमकी किती रक्कम तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिलेली आहे व विरुध्दपक्षाने तक्रारदारास भूखंडाची नेमकी किती रक्कम परत केलेली आहे हे पाहणे मंचाचे दृष्टीने आवश्यक आहे, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे- 08 तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे म्हणण्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्षास भूखंडाची शेवटची पावती दि.27.06.2009 पर्यंत भूखंडापोटी वेळोवेळी बयानापत्रासह रु-48,000/- दिलेत व रु.12,000/- दिल्या बाबत वि.प.ने ने पावती दिली नाही अशाप्रकारे एकूण रु-60,000/- दिलेत व सदर एकूण रक्कम रुपये-60,000/- व्याजासह परत मिळण्याची मागणी तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी तक्रारीचे विनंती कलमात केली आहे. 09. तर विरुध्दपक्ष यांचे म्हणण्या नुसार तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी भूखंडापोटी त्यांना वेळोवेळी फक्त रुपये-48,000/- एवढीच रक्कम अदा केली. तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी भूखंडापोटी विरुध्दपक्षास रुपये-12,000/- दिलेत, ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही ही बाब स्पष्टपणे नाकबुल केली. त्यामुळे तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी एकूण रुपये-60,000/- दिलेत हे तक्रारकर्त्याचे विधान स्पष्टपणे नाकबुल केले. विरुध्दपक्षाने पुढे असे नमुद केले की, तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी दि.20.04.2012 रोजी दोन साक्षीदारा समक्ष त्यांनी नोंदणी केलेला भूखंड क्रं 67 रद्द केल्या बाबत हमीपत्र लिहून दिले आहे व त्यामध्ये तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी भूखंडाची पूर्ण रक्कम परत मिळाल्याचे कबुल करुन आता विरुध्दपक्षावर कुठलीही थकबाकी नाही असे मान्य केले आहे. भूखंड करार रद्द केल्या बाबत विरुध्दपक्षाने तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना दि.20.03.2012 रोजी कॅनरा बँक, नागपूर येथील धनादेश क्रं 805528 अन्वये रक्कम रुपये-10,000/- परत केली. तसेच दि.10.04.2012 रोजी रुपये-14,000/- नगदी स्वरुपात व त्याच दिवशी म्हणजे दि.10.04.2012 रोजी धनादेश क्रं-805529 अन्वये रुपये-10,000/- तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना परत केले. तसेच दि.25.04.2012 रोजी धनादेश क्रं-843233 अन्वये रुपये-10,000/- तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना परत केले. तसेच दि.11.07.2012 रोजी धनादेश क्रं 983260 अन्वये रुपये-3600/- एवढी रक्कम परत केली अशाप्रकारे एकूण रुपये-47,600/- एवढी रक्कम तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना परत केली. 10. मंचा तर्फे प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे प्रतीं वरुन विरुध्दपक्षाने प्रस्तुत तक्रारीमध्ये सादर केलेले तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी वि.प.ला लिहून दिलेले दि.20.04.2012 रोजीचे मूळ हमीपत्राचे अवलोकन करण्यात आले, त्यावरील तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांची स्वाक्षरी आणि तक्रार अर्जावरील तक्रारकर्त्याची स्वाक्षरी यामध्ये थोडाफार फरक दिसून येतो. सदर हमीपत्रामध्ये विरुध्दपक्षा कडून भूखंडापोटी एकूण रुपये-48,000/- तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना मिळाल्याची बाब पूर्णपणे तक्रारकर्त्याने मान्य केल्याचे नमुद आहे. विरुध्दपक्षाने सादर केलेले हमीपत्र सिध्द करण्यासाठी व्यापक प्रमाणावर साक्षीपुरावा मंचा समक्ष होणे गरजेचे
आहे परंतु मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात ही बाब शक्य नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने दि.20.04.2012 रोजीचा सादर केलेला हमीपत्र लेख मंच ग्राहय धरीत नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाचे बँकेच्या खाते उता-यावरुन विरुध्दपक्षाने तक्रारदारास भूखंडापोटी परत केलेल्या रकमां मंचा तर्फे ग्राहय धरण्यात येतात, ज्यामुळे कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही. तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे तक्रारी नुसार त्याने विरुध्दपक्षास रुपये-12,000/- दिले होते परंतु त्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे विधान योग्य त्या सक्षम पुराव्या अभावाने मंच ग्राहय धरु शकत नाही. प्रकरणातील उपलब्ध पावत्यांच्या प्रती वरुन तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी विरुध्दपक्षास बयानापत्राचे वेळी आणि भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-48,000/- दिल्याची बाब पूर्णपणे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी एकूण रुपये-48,000/- दिल्याची बाब मंचा तर्फे ग्राहय धरण्यात येते. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्याने तक्रारदारास भूखंडाची स्विकारलेली रक्कम परत केली. आपले या म्हणण्याचे पुष्टयर्थ विरुध्दपक्षाने त्याचे कॅनरा बँक नागपूर येथील खाते क्रं-2078201016974 कस्टमर आय.डी.32745176 कालावधी दि.10.03.2012 ते 27.08.2012 खाते उतारा प्रत दाखल केली, ज्यामध्ये दि.26.03.2012 रोजी तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे नावा समोर धनादेश क्रं 805528 अन्वये रुपये-10,000/- ची उचल झाल्याचे दिसून येते. तसेच दि.12.04.2012 रोजी तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे नावा समोर धनादेश क्रं 805529 अन्वये रक्कम रुपये-10,000/- ची उचल झाल्याचे दिसून येते. दि.26.04.2012 रोजी तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे नावा समोर धनादेश क्रं 000000843233 अन्वये रुपये-10,000/- ची उचल झाल्याचे दिसून येते. तसेच दि.14.07.2012 रोजी तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांचे नावा समोर धनादेश क्रं-983260 अन्वये रुपये-3600/- ची उचल झाल्याचे दिसून येते. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना धनादेशाव्दारे एकूण रक्कम रुपये-33,600/- एवढी रक्कम परत केल्याची बाब दस्तऐवजी पुराव्या वरुन सिध्द होते. या व्यतिरिक्त विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा नुसार त्यांनी तक्रारदारास रुपये-14,000/- नगदी स्वरुपात दिले होते, हे विरुध्दपक्षाचे विधान मंच ग्राहय धरीत नाही. कारण मंचा समक्ष विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेले दिनांक-20.04.2012 च्या हमीपत्र लेखावर रुपये-14,000/- ची मांडणी लेखना नंतर अतिरिक्त लिखाणाची दिसून येते व त्या बाजूला
तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांची अतिरिक्त लेखना संबधी संक्षीप्त स्वाक्षरी दिसून येत नाही. अशाप्रकारे तक्रारदारास विरुध्दपक्षाने भूखंडापोटी एकूण रुपये-33,600/- परत केल्याचे विरुध्दपक्षाचे म्हणणे उपलब्ध सक्षम पुराव्या व्दारे मंच ग्राहय धरते. अशाप्रकारे तक्रारदार श्री अशोक नारायण रेंघे यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी एकूण रुपये-48,000/- दिलेले आहेत, त्यापैकी विरुध्दपक्षाने धनादेशाव्दारे तक्रारदार यांना रुपये-33,600/- परत केल्याची बाब पूर्णतः सिध्द झालेली आहे त्यामुळे तक्रारकर्ता उर्वरीत (रुपये-48000/- वजा रुपये-33,600/- बरोबर रुपये-14,400/-) भूखंडाची रक्कम रुपये-14,400/- व्याजासह विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारकर्ता शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 11. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 1) “विरुध्दपक्षास” निर्देशित करण्यात येते की, त्याने तक्रारदार श्री अशोक नारायणराव रेंघे यांना भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये-14,400/- (अक्षरी रुपये चौदा हजार चारशे फक्त) दि.27.06.2009 पासून ते रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारांच्या हातात पडे पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास परत करावी. 2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रु.-2000/-(अक्षरी रु. दोन हजार फक्त) तसेच तक्रारखर्च म्हणून रु.-5000/- (अक्षरी रु.पाच हजार फक्त) द्दावेत. 3) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. 4) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |