::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.) (पारीत दिनांक-05 एप्रिल, 2014 ) 01. ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खालील उपरोक्त नमुद तक्रारीं मधील तक्रारदार हे जरी वेगवेगळे असले तरी यामधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडा फार भाग वगळता, ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारावर या तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदेशीर तरतुदी हया सुध्दा सारख्याच असल्यामुळे, आम्ही, उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत. 02. उपरोक्त नमुद तक्रारींमधील सर्व तक्रारदारांनी त्यांनी बयानपत्रा नुसार वि.प.कडे नोंदणी केलेल्या भूखंडाची विक्री करुन देण्यास विरुध्दपक्ष असमर्थ ठरल्याने तक्रारदारांनी भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळावी व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रारी दाखल केलेल्या आहेत. 03. सर्व तक्रारदारांचे थोडक्यात कथन खालील प्रमाणे- (सर्व तक्रारदारांचे कथन तक्रारीमधील तपशिलाचा थोडाफार भाग वगळता एकसारखे असल्यामुळे आम्ही तक्रारदारांच्या तक्रारीतील मजकूर एकत्रितरित्या नमुद करीत आहोत) विरुध्दपक्ष श्री गणेशा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, नागपूर ही शेत जमीनीचे अकृषक जमीनीमध्ये रुपांतरण करुन व
तिचे ले आऊट पाडून निवासी भूखंडाची विक्री करणारी फर्म असून अजय वसंतराव निनावे हे तिचे प्रोपायटर आहे. विरुध्दपक्षाने तक्रार क्रं-13/36 व 13/37 मधील तक्रारदारानां मौजे मुरादपूर, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील नियोजित गणेश कॉलिनी, पटवारी हलका क्रमांक-14, खसरा क्रमांक-18 ते 22 मधील भूखंड विक्री संबधाने बयानापत्र करुन दिले. तर तक्रार क्रं-13/39 मधील तक्रारदारास मौजा जांभळापाणी, खसरा क्रं 71, पटवारी हलका नं.24, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर मधील भूखंड विक्री संबधाने बयानापत्र करुन दिले. उपरोक्त नमुद तक्रारदारांचे तक्रारी नुसार विरुध्दपक्षाकडे खालील नमुद “परिशिष्ट-अ” प्रमाणे त्यांचे-त्यांचे भूखंडाची बयानापत्राव्दारे नोंदणी करुन वेळोवळी भूखंडापोटी विरुध्दपक्षास रक्कम अदा केली. “परिशिष्ट-अ” तक्रार क्रं व तक्रादाराचे नाव | बयानापत्राचा दिनांक | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंड क्रमांक व भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंडाची एकूण किंमत | बयाना पत्राचे वेळी नगदी दिलेली रक्कम | परतफेडीसाठी पाडून दिलेल्या मासिक किस्तीचा तपशिल | त.क.चे तक्रारी नुसार नोंदणीकृत भूखंडापोटी विरुध्दपक्षास आज पावेतो अदा केलेली एकूण रक्कम | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | सी.सी-13/36- श्री गजानन मारोतराव ढोके | 20.05.2008 | मौजे मुरादपूर, तह.उमरेड, जिल्हा नागपूर प.ह.नं. 14, खसरा क्रं 18 ते 22 मधील भूखंड क्रं-130 क्षेत्रफळ-1646.88 | प्रतीचौरस फूट रु-40/- प्रमाणे एकूण रु-65,875/- | रु.5000/- | रु.1829/- प्रतीमाह प्रमाणे एकूण-36 मासिक किस्तीमध्ये | वेळोवेळी अदा केलेल्या रकमेचा शेवटचा पावती दि.27.06.2009 पर्यंतची रक्कम रु-26,000/- व रु.14,000/- पावती दिली नाही अशाप्रकारे एकूण रु-40,000/- दिलेत. | | | | | | | |
“परिशिष्ट-अ” तक्रार क्रं व तक्रादाराचे नाव | बयानापत्राचा दिनांक | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंड क्रमांक व भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंडाची एकूण किंमत | बयाना पत्राचे वेळी नगदी दिलेली रक्कम | परतफेडीसाठी पाडून दिलेल्या मासिक किस्तीचा तपशिल | त.क.चे तक्रारी नुसार नोंदणीकृत भूखंडापोटी विरुध्दपक्षास आज पावेतो अदा केलेली एकूण रक्कम | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | सी.सी-13/37- भूखंड खरेदी करणार श्री पंजाबराव तुळशीरामजी पाटील तर्फे श्रीमती निर्मलाबाई पंजाबराव पाटील. | 21.05.2008 | मौजे मुरादपूर, तह.उमरेड, जिल्हा नागपूर प.ह.नं. 14, खसरा क्रं 18 ते 22 मधील भूखंड क्रं-149 क्षेत्रफळ-1773.46 | प्रतीचौरस फूट रु-40/- प्रमाणे एकूण रु-70,938.4/- | रु.5000/- | रु.1831/- प्रतीमाह प्रमाणे | वेळोवेळी अदा केलेल्या रकमेचा शेवटचा पावती दि.09.08.2009 पर्यंतची रक्कम रुपये-15,000/- व रु.9000/- पावती दिली नाही अशाप्रकारे एकूण रु-24,000/- दिलेत. तसेच पुढे तक्रारकर्तीने तक्रारीत बयानापत्रासह एकूण रुपये-34,000/- दिल्याचे नमुद करुन मागणी कलमा मध्ये एकूण रुपये-34,000/- ची व्याजासह मागणी विरुध्दपक्षा कडून केलेली आहे. |
“परिशिष्ट-अ” तक्रार क्रं व तक्रादाराचे नाव | बयानापत्राचा दिनांक | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंड क्रमांक व भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये | बयानापत्रा नुसार नोंदणीकृत भूखंडाची एकूण किंमत | बयाना पत्राचे वेळी नगदी दिलेली रक्कम | परतफेडीसाठी पाडून दिलेल्या मासिक किस्तीचा तपशिल | त.क.चे तक्रारी नुसार नोंदणीकृत भूखंडापोटी विरुध्दपक्षास आज पावेतो अदा केलेली एकूण रक्कम | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | सी.सी-13/39- श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर | 20.05.2008 | मौजे जांभळापाणी, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर प.ह..क्रं 24, खसरा क्रं 71 भूखंड क्रं-49 क्षेत्रफळ-1452.60 | प्रतीचौरस फूट रु-50/- प्रमाणे एकूण रु-72,630/- | रु.20,000/- | प्रतीमाह मासिक किस्तीमध्ये | बयानाचे वेळी तसेच वेळोवेळी अदा केलेल्या रकमेचा शेवटचा पावती दि.04.12.2009 पर्यंतची रक्कम रु-32,000/- व रु.10,000/- पावती दिली नाही अशाप्रकारे एकूण रु-42,000/- दिलेत. | | | | | | | |
उपरोक्त नमुद सर्व तक्रारदारानां, विरुध्दपक्षाने “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या नुसार भूखंडाचे बयानापत्र करुन दिले व विरुध्दपक्षाने तक्रारदारां कडून भूखंडापोटी वेळोवेळी रक्कमा स्विकारल्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक ठरतात. तक्रारदारांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांना असे कळले की, विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक मंचा मध्ये भूखंड विक्री फसवणूकी संबधाने निकाल पारीत झालेले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी सत्य वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत डाकेने विरुध्दपक्षास दि.12.05.2011 रोजीची नोटीस पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षास प्राप्त होऊनही त्यास विरुध्दपक्षाने उत्तर दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विरुध्दपक्ष व त्यांचे भागीदार यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे वृत्त अधिवक्ता श्री विवेक के.कोलते यांनी दैनिक लोकमत व नवभारतमध्ये दि.12.08.2010 रोजी प्रकाशित केले. त्यावरुन तक्रारदार यांनी विरुध्दपक्षाकडे भूखंडाची मासिक किस्त भरणे
बंद केले व भूखंडापोटी विरुध्दपक्षास अदा केलेली रक्कम परत मिळण्यास विनंती केली. परंतु विरुध्दपक्षाने त्यांचे कार्यालयातून गुंडागर्दी करीत तक्रारकर्ता व इतर भूखंड धारकानां हुसकावून लावले व त्यानंतरही विरुध्दपक्षाने भूखंडाचे विक्रीपत्र लावून देतो असे वेळोवेळी आश्वासित केले परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारदारानां दोषपूर्ण सेवा दिलेली आहे व त्यामुळे सर्व तक्रादारांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून उपरोक्त नमुद तक्रारदारानीं विरुध्दपक्षा विरुध्द न्यायमंचा समक्ष स्वतंत्र तक्रारी दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात- (1) उपरोक्त नमुद तक्रारदारानीं भूखंडाचे बयानापत्रापोटी विरुध्दपक्षास वेळोवेळी अदा केलेली संपूर्ण रक्कम द.सा.द.शे.15% दराने व्याजासह परत करण्यास विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. (2) तक्रारदारानां झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा व आर्थिक नुकसानी बद्दल प्रत्येकी रुपये-45,000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे. (3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-10,000/- तसेच नोटीस खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-5000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे. (3) 03. विरुध्दपक्षाने आपले प्रतिज्ञालेखावरील तक्रारीनिहाय स्वतंत्र उत्तर (विरुध्दपक्षाचे सर्व तक्रारींमधील लेखी उत्तर त्यातील तपशिलाचा थोडाफार भाग वगळता एकसारखे असल्यामुळे आम्ही विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरातील मजकूर एकत्रितरित्या नमुद करीत आहोत) मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार प्रस्तुत तक्रारी या ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी नुसार मुदतबाहय असल्यामुळे खारीज करण्यात याव्यात. विरुध्दपक्षाने प्रकरण निहाय लेखी उत्तर सादर केले. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरामध्ये प्रकरणनिहाय तक्रारदार यांचे कडून त्यांना भूखंडापोटी प्राप्त झालेल्या रक्कमा व त्यांनी तक्रारदार यांना परत केलेल्या रकमांचा तपशिल दिलेला आहे, त्याचे विवरण पुढील प्रमाणे- विरुध्दपक्ष यांचे लेखी उत्तरा नुसार ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.13/36 तक्रारदार गजानन मारोतराव ढोके यांचे प्रकरणात तक्रारदार श्री गजानन ढोके यांनी त्यांना वेळोवेळी भूखंडापोटी फक्त रुपये-26,000/- दिलेत. वि.प.यांनी
भूखंड करारनामा रद्द केल्या बाबत तक्रारदार श्री गजानन ढोके यांना कॅनरा बँक, नागपूर धनादेश क्रं-876233, दि.28.08.2009 रक्कम रुपये-20,000/- अदा केली, सदर धनादेश वटलेला असून त्याची रक्कम तक्रारकर्त्यास प्राप्त झालेली असल्याने आता फक्त विरुध्दपक्षास तक्रारदार श्री गजानन ढोके यांना रुपये-6000/- देणे बाकी आहेत. ********************************************** विरुध्दपक्ष यांचे लेखी उत्तरा नुसार ग्राहक तक्रार क्रं-सी.सी-13/37- श्री पंजाबराव तुळशीरामजी पाटील तर्फे श्रीमती निर्मलाबाई पंजाबराव पाटील यांचे प्रकरणात त्यांना तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे कडून भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-15,000/- एवढी रक्कम मिळालेली आहे. तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार त्यांनी विरुध्दपक्षास रुपये-9000/- दिलेत, ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे म्हणणे अमान्य केले. तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई तुळशीरामजी पाटील यांचे प्रकरणात विरुध्दपक्षाकडे बयानापत्रासह व मासिककिस्तीसह वेळोवेळी एकूण रुपये-34,000/- चा भरणा केल्याची बाब विरुध्दपक्षाने पूर्णपणे अमान्य केली. ********************************************** विरुध्दपक्ष यांचे लेखी उत्तरा नुसार ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.13/38 तक्रारदार रविंद्र गुणवंतराव सुरकर यांचे प्रकरणात तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी करारनाम्याची रक्कम रुपये-20,000/- त्यांना दिलेली नाही. तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी भूखंडापोटी त्यांना वेळोवेळी आज पावेतो एकूण रुपये-12,000/- दिल्याची बाब मान्य केली. तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे रुपये-10,000/- दिले ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारकर्त्याचे विधान पूर्णपणे अमान्य केले. ********************************************** 04. विरुध्दपक्षाचे या उत्तरावर उपरोक्त नमुद तक्रारदारांनी प्रतिज्ञालेखाशिवाय प्रतीउत्तर मंचा समक्ष सादर केले व त्यात विरुध्दपक्षाचे हे म्हणणे मनघडत असून वि.प.ने आपल्या बचावासाठी दिलेले आहे. त्याच प्रमाणे विरुध्दपक्षाने सादर केलेले दस्तऐवज हे बोगस आहेत. परंतु तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे या म्हणण्याचे विरोधात सक्षम पुरावा मंचा समक्ष सादर केलेला नाही. तक्रारदार यांचे मागणी नुसार त्यांनी विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी तेवढी रक्कम जमा केल्याचा पुरावा प्रकरणांमध्ये सादर केलेला नाही. 05-अ. तक्रारदारांनी आप-आपल्या तक्रारी स्वतंत्रपणे प्रतिज्ञालेखांवर सादर केल्यात. सोबत भूखंडाचे बयानापत्राची प्रत, विरुध्दपक्षाचे भूखंडाचे मासिक किस्तीची रक्कम स्विकारल्या बद्दल नोंदीचे दस्तऐवज, विरुध्दपक्षाने निर्गमित केलेल्या पावत्या, तक्रारदार यांनी वि.प.यांना दिलेली नोटीस, नोटीसची पोच, वृत्तपत्रीय कात्रण अशा दस्तऐवजांच्या प्रती सादर केल्यात.
05-ब. विरुध्दपक्षाने तक्रारनिहाय आपले लेखी उत्तर स्वतंत्ररित्या प्रतिज्ञालेखावर सादर केलेत. तसेच प्रभारी सहायक संचालक, नगर रचना, नागपूर यांचा तहसिलदार उमरेड यांना दिलेला अभिप्राय, विरुध्दपक्षाचा कॅनरा बँक, सेंट्रल एव्हेन्यु शाखा नागपूर येथील खाते उतारा प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद सादर केला. 06. उपरोक्त नमुद तक्रारींमध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री तांबुलकर यांचा तर विरुध्दपक्षा तर्फे वकीलस श्री ढोबळे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 07. तक्रारदार यांच्या विरुध्दपक्षा विरुध्दच्या स्वतंत्र तक्रारी, विरुध्दपक्षाचे तक्रार निहाय लेखी उत्तर, उभय पक्षानीं तक्रारीं मध्ये दाखल केलेले दस्तऐवज यांचे अवलोकन मंचा तर्फे करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे- तक्रारदार यांचे तक्रारीस नुसार त्यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी दिलेली रक्कम व्याजासह परत मिळण्याची मागणी केली आहे. तक्रारदार यांचे असेही म्हणणे आहे की, काही रक्कमेची पावती त्यांना विरुध्दपक्षाने दिली नाही. याउलट विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यांना तक्रारदार यांचे तक्रारी नुसार भूखंडापोटी रक्कम प्राप्त झालेली नाही व विरुध्दपक्षाने काही तक्रारदार यांना रक्कम परत केलेली आहे. त्यामुळे तक्रारीमधील उपलब्ध पावत्यांच्या प्रती, विरुध्दपक्षाचा बँकेचा खाते उतारा यावरुन नेमकी किती रक्कम तक्रारदारांनी विरुध्दपक्षास दिलेली आहे व विरुध्दपक्षाने कोणत्या
तक्रारदारास भूखंडाची किती रक्कम परत केलेली आहे हे पाहणे मंचाचे दृष्टीने आवश्यक आहे, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे- “परिशिष्ट-ब” प्रमाणे न्यायमंचाचा निष्कर्ष ज्यामध्ये तक्रारनिहाय तक्रारदार विरुध्दपक्षा कडून भूखंडाचे जमा केलेली रक्कम परत मिळण्यास पात्र आहेत. “परिशिष्ट-ब” 07(अ) ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.13/36 तक्रारदार गजानन मारोतराव ढोके यांचे प्रकरणातील मंचाचा निष्कर्ष - तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्षास दि.27.06.2009 पर्यंत भूखंडापोटी वेळोवेळी रु-26,000/- दिलेत व रु.14,000/- दिल्या बाबत वि.प.ने ने पावती दिली नाही अशाप्रकारे एकूण रु-40,000/- दिलेत. तर विरुध्दपक्ष यांचे म्हणण्या नुसार तक्रारकर्त्याने त्यांना फक्त रुपये-26,000/- दिलेत. वि.प.यांनी भूखंड करारनामा रद्द केल्या बाबत तक्रारकर्त्यास कॅनरा बँक, नागपूर धनादेश क्रं-876233, दि.28.08.2009 रक्कम रुपये-20,000/- अदा केली, सदर धनादेश वटलेला असून त्याची रक्कम तक्रारकर्त्यास प्राप्त झालेली असल्याने आता फक्त विरुध्दपक्षास तक्रारकर्त्यास रुपये-6000/- देणे बाकी आहेत. विरुध्दपक्षाने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ कॅनरा बँक, नागपूर सेंट्रल एव्हेन्य, 2078 या बँकेमध्ये वि.प.चे खाते कस्टमर आय.डी.32745176 खाते उतारा प्रत दि.01.06.2009 ते 30.12.2012 अभिलेखावर दाखल केली. सदर खाते उता-यामध्ये दि.04.08.2009 रोजी तक्रारककर्ता श्री गजानन ढोके यांचे नावा समक्ष धनादेश क्रमांक 00876233 अन्वये उचल केलेली रक्कम रुपये-20,000/- दर्शविलेली आहे. सदर उता-यावर कॅनरा बॅंकेच्या खाते उता-यावर कॉम्प्युटर आऊटपुट असल्यामुळे अधिका-याचे सहीची आवश्यकता नसल्याचे नमुद आहे. मंचाचे मते तक्रारदार श्री गजानन ढोके यांचे म्हणण्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्षास दि.27.06.2009 पर्यंत भूखंडापोटी वेळोवेळी रु-26,000/- दिलेत व रु.14,000/- दिल्या बाबत वि.प.ने ने पावती दिली नाही. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरामध्ये त्यांना तक्रारकर्त्या कडून वेळोवेळी भूखंडापोटी रुपये-26,000/- मिळाल्याची बाब मान्य केली आहे. मंचा समक्ष दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्त्याने बयानापत्राचे वेळी रुपये-5000/-
आणि भूखंडाचे मासिक किस्ती प्रमाणे वेळोवेळी रुपये-21,000/- असे एकूण रुपये-26,000/- विरुध्दपक्षास दिल्याची बाब मंचा तर्फे ग्राहय धरण्यात येते. तक्रारकर्त्याचे हे विधान की, त्याने विरुध्दपक्षास रुपये-14,000/- दिले, ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे म्हणणे योग्य त्या सक्षम पुराव्या अभावी मंच ग्राहय धरु शकत नाही. त्यामुळे तक्रारदार श्री गजानन ढोके यांनी विरुध्दपक्षास बयानापत्राचे वेळी रुपये-5000/- आणि भूखंडाचे वेळोवेळी मासिक किस्ती पोटी रुपये-21,000/- असे मिळून एकूण रुपये-26,000/- एवढी रक्कम दिल्याची बाब मंच ग्राहय धरते. मंचाचे मते विरुध्दपक्षाने मंचा समक्ष राष्ट्रीयकृत बँकेचा बोगस खाते उतारा सादर करण्याचे कोणतेही प्रयोजन नाही तसेच सदर कॅनरा बँकेचा खाते उतारा हा खोटा असल्याची बाब तक्रारदार श्री गजानन ढोके यांनी कोणत्याही पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही त्यामुळे मंच विरुध्दपक्षाचा हा युक्तीवाद की त्याने तक्रारदार श्री गजानन ढोके यांना भूखंडाचे परतफेडीपोटी धनादेश क्रमांक 00876233 अन्वये रुपये-20,000/- एवढी रक्कम परत केली हे विधान ग्राहय धरते. त्यामुळे तक्रारदार श्री गजानन ढोके यांना विरुध्दपक्षा कडून आता भूखंडापोटी फक्त रुपये-6000/- घेणे बाकी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. ********************************************** “परिशिष्ट-ब” 07(ब)ग्राहक तक्रार क्रं-सी.सी-13/37- श्री पंजाबराव तुळशीरामजी पाटील तर्फे श्रीमती निर्मलाबाई पंजाबराव पाटील यांचे प्रकरणातील मंचाचा निष्कर्ष- तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी भूखंडापोटी वेळोवेळी विरुध्दपक्षास पावती दि.09.08.2009 पर्यंत रक्कम रुपये-15,000/- दिलेत व रु.9000/- ची पावती विरुध्दपक्षाने त्यांना दिली नाही अशाप्रकारे त्यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी वेळोवेळी मिळून एकूण रु-24,000/- दिलेत. तसेच तक्रारकर्तीने भूखंडाचे बयानापत्रासह विरुध्दपक्षास भूखंडापोटी एकूण रुपये-34,000/- रक्कम दिल्याचे व रुपये-34,000/- व्याजासह परत मिळण्याची मागणी तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांनी तक्रारीचे विनंती कलमात केली आहे. विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरामध्ये त्यांना तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे कडून भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रुपये-15,000/- एवढी रक्कम मिळालेली आहे. तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार त्यांनी
विरुध्दपक्षास रुपये-9000/- दिलेत, ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारकर्तीचे म्हणणे अमान्य केले. तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी बयानापत्रासह व मासिक किस्तीसह वेळोवेळी एकूण रुपये-34,000/- चा भरणा केल्याची बाब विरुध्दपक्षाने पूर्णपणे अमान्य केली. मंचाचे मते प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती वरुन तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी करारनाम्याचे वेळी रुपये-5000/- आणि वेळोवेळी मासिक किस्तीव्दारे एकूण रुपये-10,000/-असे एकूण रुपये-15,000/- दिल्याची बाब प्रकरणातील उपलब्ध पावत्यांच्या प्रतीवरुन सिध्द होते. तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे असे म्हणणे आहे की, या व्यतिरिक्त तिने विरुध्दपक्षास रुपये-9000/- दिलेत ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे विधान योग्य त्या सक्षम पुराव्या अभावी मंच ग्राहय धरीत नाही. तसेच तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांचे असेही म्हणणे आहे की, तिने बयानाचे वेळी रुपये-10,000/- दिलेत परंतु उपलब्ध पावत्यांच्या प्रतीवरुन तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील यांनी भूखंडापोटी बयानापत्रासह वेळोवेळी विरुध्दपक्षास रुपये-15,000/- दिल्याची बाब पूर्णपणे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ती श्रीमती निर्मलाबाई पाटील हया विरुध्दपक्षा कडून भूखंडापोटी एकूण रुपये-15,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. ********************************************** “परिशिष्ट-ब” 07(क) ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.13/39 तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांचे प्रकरणातील मंचाचा निष्कर्ष - तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांचे म्हणण्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्षास दि.19.11.2008 रोजी बयानापत्राचे वेळी रुपये-20,000/- नगदी दिलेत व त्यानंतर भूखंडाची शेवटची पावती दि.04.12.2009 पर्यंत वेळोवेळी रु-12,000/- दिलेत व रु.10,000/- दिल्या बाबत वि.प.ने ने पावती दिली नाही अशाप्रकारे बयानापत्राचे वेळी रुपये-20,000/- अधिक रुपये-22,000/- असे मिळून एकूण रु-42,000/- दिलेत व सदर एकूण रक्कम रुपये-42,000/- व्याजासह परत मिळण्याची मागणी तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी तक्रारीचे विनंती कलमात केली आहे. विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा नुसार तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी करारनाम्याची रक्कम रुपये-20,000/- त्यांना दिलेली नाही. तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी भूखंडापोटी त्यांना वेळोवेळी आज पावेतो एकूण रुपये-12,000/- दिल्याची बाब मान्य केली. तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी रुपये-10,000/- दिले ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांचे विधान पूर्णपणे अमान्य केले. मंचाचे मते दि.19.11.2008 रोजीचे बयानापत्रात तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांचे कडून भूखंडापोटी नगदी रुपये-20,000/- मिळाल्याची बाब विरुध्दपक्षाने नमुद केली आहे त्यामुळे त.क.ने बयानाचे वेळी रुपये-20,000/- दिल्याची बाब मंच ग्राहय धरते. या शिवाय तक्रारकर्ता श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी भूखंडापोटी विरुध्दपक्षास वेळोवेळी रुपये-12,000/- दिल्याची बाब सुध्दा विरुध्दपक्षास मान्य आहे व सदरची बाब विरुध्दपक्षाचे भूखंडा पोटी रक्कम मिळाल्या बाबतच्या नोंद पुस्तकावरुन सुध्दा सिध्द होते त्यामुळे तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी विरुध्दपक्षास भूखंडाचे करारनाम्याचे वेळी रुपये-20,000/- आणि भूखंडाचे मासिक किस्तीपोटी वेळावेळी रुपये-12,000/- दिल्याची बाब मंच ग्राहय धरते. अशाप्रकारे तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी एकूण रुपये-32,000/- दिल्याची बाब मंच ग्राहय धरते. तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी विरुध्दपक्षास भूखंडापोटी रुपये-10,000/- दिलेत ज्याची पावती विरुध्दपक्षाने दिली नाही हे तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकार यांचे विधान योग्य त्या पुराव्या अभावी मंच ग्राहय धरीत नाही. म्हणून तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर हे विरुध्दपक्षा कडून भूखंडा पोटी रुपये-32,000/- परत मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. 08. विरुध्दपक्षाने बयानापत्र करुन देऊन तसेच आंशिक रक्कम स्विकारुन विहित मुदतीत भूखंड विक्री योग्य केले नाही तसेच विरुध्दपक्षाचे संस्थेत भागीदारी वाद निर्माण झाल्यामुळे तक्रारदारांनी भूखंडाच्या पुढील किस्ती देणे थांबविले. तक्रारदारांनी विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी जमा केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी विरुध्दपक्षास नोटीस देऊनही
योग्य तो प्रतिसाद दिला नाही वा तक्रारदारांच्या जमा रक्कमा परत केल्या नाहीतस त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारदारानां दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे परिशिष्ट-ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे त्या-त्या तक्रारदारांची भूखंडाची रक्कम भूखंडाची शेवटची मासिक किस्त जमा केल्या पासून ते पूर्ण रक्कम हातात पडे पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे ग्राहक तक्रार क्रमांक- सी.सी.13/36, सी.सी.13/37 आणि सी.सी.13/39 मधील तक्रारदारानां झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-2000/- आणि तक्रारखर्च म्हणून प्रत्येकी रुपये-5000/- प्रमाणे नुकसान भरपाई देणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. 09. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: उपरोक्त नमुद ग्राहक तक्रार क्रमांक- सी.सी.-13/36, सी.सी.13/37आणि सी.सी.13/39 मधील तक्रारदारांच्या तक्रारी विरुध्दपक्षा विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येतात. 1) “विरुध्दपक्ष” यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी “परिशिष्ट-ब” मध्ये दर्शविल्या प्रमाणे ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.13/36 मधील तक्रारदार गजानन मारोतराव ढोके यांनी वि.प.कडे भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-6000/- दि.27.06.2009 पासून तसेच ग्राहक तक्रार क्रं-सी.सी-13/37 मधील तक्रारदार श्री पंजाबराव तुळशीरामजी पाटील तर्फे श्रीमती निर्मलाबाई पंजाबराव पाटील यांनी वि.प.कडे भूखंडा पोटी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-15,000/- दि.09.08.2009 पासून तसेच ग्राहक तक्रार क्रं-सी.सी.13/39 मधील तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांनी वि.प.कडे भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम 32,000/- दि.04.12.2009 पासून ते रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारांच्या हातात पडे पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याजासह त्या त्या तक्रारदारास विरुध्दपक्षाने परत करावी. 2) विरुध्दपक्षाने, ग्राहक तक्रार क्रं- सी.सी.-13/36 मधील तक्रारदार श्री गजानन मारोतराव ढोके तसेच सी.सी.13/37 मधील तक्रारदार श्री पंजाबराव तुळशीरामजी पाटील तर्फे श्रीमती निर्मलाबाई पंजाबराव पाटील आणि सी.सी.13/39 मधील तक्रारदार श्री रविंद्र गुणवंतराव सुरकर यांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रु.-2000/-(अक्षरी प्रत्येकी रु. दोन हजार फक्त) तसेच तक्रारखर्च म्हणून प्रत्येकी रु.-5000/- (अक्षरी प्रत्येकी रु.पाच हजार फक्त) द्दावेत. 3) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. 4) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |