Maharashtra

Kolhapur

CC/10/524

Sadu Isawara Dope - Complainant(s)

Versus

Shri Ganesh Gramin Bigar Sheti Sah Pat Sansth. - Opp.Party(s)

R.R.Wayangankar.

16 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/524
1. Sadu Isawara DopeHanbarwadi.Tal-Kagal.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Ganesh Gramin Bigar Sheti Sah Pat Sansth.kapashi ( Shenapati. ) Tal-Kalgal.Kolhapur2. Bhalchandra Damodar PatilJainyal.Tal-kagal.Kolhapur3. Shivaji Shankar Naik.Kapashi.Tal-Kagal.Kolhapur, 4. Sachin Shripad Joshi.Kapashi.Tal-Kagal.Kolhapur, 5. Raoso Baswant Naikwade.Kapashi.Tal-Kagal.Kolhapur, 6. Rajendra Narayan Mali.Kapashi.Tal-Kagal.Kolhapur, 7. Sou.Ashwini Rajeandra Mali.Kapashi.Tal-Kagal.Kolhapur, 8. Shripati Baburao Kumbhar Kapashi.Tal-Kagal.Kolhapur, 9. Dilip Parsu KambaleKapashi.Tal-Kagal.Kolhapur, 10. Gauslal Khatalvali Desai.Nandyal.Tal-Kagal.Kolhapru11. Sou.Anjana Niuruti Narvekar.Vadgaon. Tal-Kagal.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R.R.Wayangankar., Advocate for Complainant

Dated : 16 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.12/11/2010) ( श्री एम.डी.देशमुख,अध्‍यक्ष)

1)         प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.10 व 11 यांना नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही. तसेच सामनेवाला क्र. 1 ते 9 यांना नोटीस लागू होऊन ते सदर कामी आपल्‍या वकीलांमार्फत हजर झाले. परंतु त्‍यांना संधी देऊनही त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी युक्‍तीवाद केला.
                          
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार क्र. 2 हे तक्रारदार क्र.1 यांचे पुतण्‍या असून ते एकत्र कुटूंबात रहात आहेत. सामनेवाला क्र.1 ही सहकार संस्‍था असून सामनेवाला क्र.2 व 3 हे अनुक्रमे चेअरमन व व्‍हा.चेअरमन आहेत. तर सामनेवाला क्र. 4 ते 11 हे संचालक आहेत.
 
(3)        यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे दामदुप्‍पट स्‍वरुपात रक्‍कमा ठेवल्‍या होत्‍या.
 

अ.क्र.
ठेवपावती
क्र.
ठेव ठेवलेचा
 दिनांक
मुदत संपलेचा दिनांक
ठेव रक्‍कम
मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम
01
286
19/03/04
20/06/09
4,100/-
8,200/-
02
289
29/03/04
30/06/09
4,000/-
8,000/-
03
309
19/10/04
20/04/10
1,000/-
2,000/-
04
310
19/10/04
20/04/10
3,000/-
6,000/-

 
(4)        तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सदर ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासहीत परत करणे आवश्‍यक होते. परंतु तक्रारदार सामनेवाला संस्‍थेमध्‍ये गेले असता संबंधीत इसमांनी ठेव रक्‍कम परत देणेस टाळाटाळ केली व रक्‍कम देणेस असमर्थता दर्शविली. तक्रारदार यांना पैशाची अत्‍यंत निकड असल्‍याने तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे ठेव रक्‍कमेची मागणी केली पंरतु आज देतो उदया देतो संस्‍थेची कर्ज रक्‍कम वसुल होताच देतो अशी चुकीची व दिशाभूल करणारी कारणे सांगून सामनेवाला यांनी जाणूनबुजून तक्रारदाराची रक्‍कम देणेस टाळाटाळ केली. तक्रारदाराने वेळोवेळी तोंडी व लेखी स्‍वरुपात ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी सदर रक्‍कम दिली नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत न करता आर्थिक, मानसिक व शारिरीक नुकसान केले आहे. यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्‍या ठेव पावत्‍यांवरील रक्‍कम व्‍याजासहित परत करण्‍यास वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत. सबब, तक्रारदारांनी ठेव पावत्‍यांवरील रक्‍कम व त्‍यावर होणारे व्‍याज तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेकरिता या मंचासमोर सदरील तक्रार अर्ज दाखल केला आहे.
 
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍यांच्‍यास सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.10 व  11 यांना नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही. तसेच सामनेवाला क्र.1 ते 9 हे आपल्‍या वकीलांमार्फत हजर झाले परंतु त्‍यांना संधी देऊनही त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच सदर सामनेवाला यांनी सदर प्रकरणी आपले म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांचा तक्रार अर्ज मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब सर्व सामनेवाला यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांच्‍या ठेव पावतीवरील दामदुप्‍पट रक्‍कमा व्‍याजासह परत करण्‍याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(7)        तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा साकल्‍याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे दामदुप्‍पट व मुदत बंद ठेव स्‍वरुपात रक्‍कम ठेवल्‍याचे निदर्शनास येते. तथापि, सदर ठेव पावत्‍यांवरील रक्‍कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कम परत न केल्‍याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. 
 
(8)        तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टी प्रित्‍यर्थ दाखल केलेल्‍या दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.286, 289, 309 व 310 चे अवलोकन केले असता सदर दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असलेने सदर ठेव पावतीवरील प्रत्‍येकी दामदुप्‍पट रक्‍कम रु.8,200/-, 8,000/-, 2,000/-, 6,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर दामदुप्‍पट रक्‍कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्‍कम सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास अदा करावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
(01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
                    
(02) सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास खालीलप्रमाणे दामदुप्‍पट रक्‍कम अदा करावी व सदर रक्‍कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज अदा करावे.
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
मुदत संपलेचा दिनांक
मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम
01
286
20/06/09
8,200/-
02
289
30/06/09
8,000/-
03
309
20/04/10
2,000/-
04
310
20/04/10
6,000/-
                                                                                                                                                                                                                                                                                                                            
(03) सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) दयावेत.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER