संयुक्त निकालपत्र :-(दि.20.10.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.313 व 314/2010 या दोन्ही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच दोन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.3 ते 7 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र.3 ते 7 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंदव दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख/मुदत | मुदतपूर्ण रक्कम/व्याजदर | 1. | 313/10 | 000047 | 50000/- | 15.09.2008 | 91 दिवस | 11% | 2. | --”-- | 079 | 50000/- | 29.04.2002 | 91 दिवस | 15% | 3. | 314/10 | 486 | 10000/- | 17.02.2004 | 19.05.2004 | 11% | 4. | --”-- | 321 | 10000/- | 27.05.2002 | 07.08.2006 | 20000/- |
(4) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदारानी सदर रक्कमा त्यांना अडीअडचणीच्या वेळी उपयोगी याव्यात या एकमेब उद्देशाने ठेवलेल्या होत्या व आहेत. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.3 ते 7 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला ही सहकारी संस्था असल्याने सदरची तक्रार सहकार कायद्याअंतर्गत सहकार न्यायालयात दाखल होणे आवश्यक आहे. श्री.रावसो कृष्णाजी गोरडे, श्री.मारुती ज्ञानू खिरुगडे, श्री.बाळासो शिवराम कासोटे, श्री.पांडुरंग ज्ञानू तोडकर, श्री.भिकाजी तुकाराम मेथे, श्री.बाळासाहेब शिवाजी कुंभार, श्री.शामराव सखाराम गायधडक, सौ.कांचनमाला दिलीपसिंह रणनवरे या संस्थेच्या संचालक आहेत. परंतु ते तक्रारदारांचे जवळचे नातेवाईक तसेच मित्र असल्याने त्यांना पक्षकार केलेले नाही. तसेच, तक्रारदारांच्या ठेवींची मुदत सन 2002 मध्ये संपलेली असल्याने तक्रार मुदतीत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (7) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 6 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.7 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींची रक्कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्याने कारण घडत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे. (9) तक्रार क्र.314/10 मधील तक्रारदारांनी सामनेवला पतसंस्थेकडे ठेव पावती क्र.321 ने दामदुप्पट ठेव ठेवलेलचे दिसून येते तिची मुदतही संपलेली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर दामदुप्पट ठेव पावतीवरील मुदतपूर्ण रक्कम मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रार क्र.313/10 व 314/10 मधील तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या उर्वरित ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.7 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 313/10 | 000047 | 50000/- | 2. | --”-- | 079 | 50000/- | 3. | 314/10 | 486 | 10000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.7 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रार क्र.314/10 मधील तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.321 वरील दामदुप्पट रक्कम रुपये 20,000/- (रुपये वीज हजार फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.28.08.2006 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. (4) सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.7 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना प्रत्येक तक्रारीकरिता मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |