Shri Bhavarlal Vardichnd Jain filed a consumer case on 04 Jun 2011 against Shri Gajanan Balkrishan Sontakke in the Additional DCF, Thane Consumer Court. The case no is CC/11/83 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
1.प्रस्तुतची तक्रार अँडमि शन स्टेजला आहे, त्यासंदर्भात तक्रारदारांचे वकीलांचे युक्तीवाद ऐकण्यात आले.तक्रारीचे स्वरुप पहाता तक्रार ही एकूण 10 लोकांनी दाखल केली आहे.ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीचया कलम 12 क नुसार जर एकापेक्षा अनेक तक्रारदाराना तक्रार दाखल करावयाची असेल तसेच त्यांचा यासंबंधी एकच इंटरेस्ट असेल तर ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 12 क नुसार तक्रार दाखल करतेवेळी मंचाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.तक्रारदारांच्या वकीलांना याबाबत विचारले असता त्यांनी असे सांगितले की, तक्रारदारांना तक्रार दाखल करता येईल.वास्तविक अशा प्रकारे तक्रार दाखल करुन यावयाची असल्यास कलम 12 क प्रमाणे मंचाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, ती संबधित तक्रारदारांनी घेतलेली नाही, त्यामुळे ही तक्रार अँडमिशन स्टेजलाच नामंजूर करुन निकाली करण्यात येत आहे.