Maharashtra

Kolhapur

CC/10/194

Amol Krishna Chavan - Complainant(s)

Versus

Shri Gahninath Nagari Sah Pat Sanstha - Opp.Party(s)

K.V.Patil

27 Sep 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/194
1. Amol Krishna ChavanPlot no 100 Nehrungar co opp Housing society.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Gahninath Nagari Sah Pat Sanstha Kagal Tal-Kagal Kolhapur2. Chairman.Vijay Ganpati Sangar.Subhash Chowk.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 3. Sambhaji Hari Korane.Jaysing Park.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 4. Uday Pandurang Katakar,Jaysing Park.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 5. Balaso Krishna Bodhale.D.R.Mane Collage.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 6. Ravindra Krishnath Sangar.Sangar Galli.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 7. Prakash Annaso Gadekar.Sangar Society.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 8. Ashok Vithal KesarakarNear Sangar Society.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 9. Gulabsab Miyalal Mulla.Near Sangar Society.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 10. Nitin Maruti Patil.C/o,Shri Gahininath Nagari Sah Pat Sanstha.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 11. Sou.Ranjana Dilip SangarSangar Society.Kagal.Kolhapur12. Sou.Kumudini Vishnu Mohite.Matan Market Kagal.Kolhapur13. Dilip Tukaram Sangar.Sangar Society.Kagal.Kolhapur14. Sou.Rajeshwari Rajendra Chougule.C/o,Shri Gahininath Nagari Sah Pat Sanstha.Kagal.Tal-Kagal.Kolhapur, 15. Shri Gahininath Nagari Sah Pat Sanstha.Through Administator. D.G.Kurne.Kagal.Tal-Kagal.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :K.V.Patil, Advocate for Complainant

Dated : 27 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.27.09.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला.  सामनेवाला क्र.3 ते 13 यांनी म्‍हणणे दाखल केले.  उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही.  सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.  सामनेवाले गैरहजर आहेत.

(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,

           यातील सामनेवाला ही महाराष्‍ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्‍था आहे.  सामनेवाला क्र.2 ते 12 हे सामनेवाला संस्‍थेचे संचालक आहेत.  सामनेवाला क्र.13 व 14 हे अनुक्रमे सचिव व शाखाधिकारी असून सदर संस्‍थेवर सामनेवाला क्र.15 यांची प्रशासक म्‍हणून नियुक्‍ती करणेत आलेली आहे.  यातील तक्रारदारांनी स्‍वत:च्‍या व त्‍यांच्‍या आईच नांवे सामनेवाला पतसंस्‍थेकडे प्रत्‍येकी रक्‍कम रुपये 25,000/- च्‍या दामदुप्‍पट ठेवी ठेवलेल्‍या होत्‍या.  त्‍यांची दि.08.11.2007 रोजी मुदत संपलेनंतर मागणी केली असता सामनेवाला संस्‍थेची आर्थिक अडचण असलेचे सांगून रक्‍कम देणेचे टाळले.  त्‍या दरम्‍यान तक्रारदारांच्‍या नांवे सेव्‍हींग्‍ज खाते क्र.1710 काढून सदर खात्‍यावर दि.26.11.2007 रोजी तक्रारदार यांची देय असणारी रक्‍कम रुपये 50,000/- व  दि.30.11.2007 रोजी तक्रारदारांच्‍या आई, प्रमिला कृष्‍णा चव्‍हाण यांना देय असणारी रक्‍कम रुपये 50,000/- तक्रारदारांचे खातेवर वर्ग केल्‍याचे दाखवून सेव्‍हींग खात्‍याचे पासबुक तक्रारदारांना दिले.  त्‍यानंतरही तक्रारदारांनी वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेवीची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली.  अगदी जिकीरीने दि.02.12.2008 रुपये 2,000/- व दि.07.08.2009 रोजी रुपये 20,000/- दिले.  परंतु, यानंतरही वेळोवेळी मागणी करुनही तक्रारदारांना सामनेवाला संस्‍थेने पैसे देणेचे टाळले.  त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.29.12.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली.  तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदारांनी सेव्‍हींग खाते क्र.1710 वरील रक्‍कम रुपये 78,000/- दि.30.11.2007 रोजीपासून द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह वसूल होवून मिळणेकरिता, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

    

(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.

(5)        सामनेवाला क्र.3 ते 13 यांनी त्‍यांच्‍या एकत्रित म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत.  ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, दि.11.08.2009 रोजी अवसायक यांची नेमणुक केलेली आहे.  संस्‍थेचे संपूर्ण् कामकाम अवसायक पहात असलेने वसुलीस व ठेव परत करणेस प्रस्‍तुत सामनेवाला असमर्थ आहेत.  तक्रारदारांना यापूर्वी ब-याच रक्‍कमा दिलेल्‍या आहेत.  तक्रारदारांचे सांगण्‍यावरुनच त्‍यांची रक्‍कम सेव्हिंग खातेवर वर्ग केलेली आहे.  सामनेवाला संस्‍थेवर अवसायक यांची नेमणुक झाली असल्‍याने प्रस्‍तुत सामनेवाला यांना प्रस्‍तुत तक्रारीतून वगळणेत यावे अशी विनंती केली आहे.

(6)        सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत.  ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला हे दि.24.01.2002 रोजीपर्यन्‍त संचालक होते.  दि.24.01.2002 रोजी त्‍यांचा राजीनामा मंजूर केलेला आहे.  त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला यांची दि.25.01.2002 रोजीपासून पुढील संपूर्ण कामकाजाची जबाबदारी नाही.  तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत दि.08.11.2002 रोजी ठेव ठेवलेचे नमूद केले आहे.  त्‍यावेळी प्रस्‍तुत सामनेवाला हे संस्‍थेत कोणत्‍याही पदावर नव्‍हते. त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला यांना प्रस्‍तुत कामातून वगळणेत यावी अशी विनंती केली आहे.

(7)        सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत सामनेवाला संस्‍थेने दिलेला दाखला दाखल केलेला आहे.

(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे.  सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही.  सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे.  ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे.  सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात त्‍यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असल्‍याने व तो मंजूर झाला असल्‍याने तक्रारदारांची रक्‍कम देणेबाबत त्‍यांची जबाबदारी येत नसल्‍याचे कथन केले आहे व त्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ सामनेवाला संस्‍थेने दिलेला दाखला दाखल केलेला आहे.  सदर दाखल्‍याचे अवलोकन केले असता सदर दाखल्‍यामध्‍ये सामनेवाला क्र.2 यांचा राजीनामा संस्‍थेच्‍या कोणत्‍या सभेत, कोणत्‍या ठरावान्‍वये स्विकारणेत आला याबाबत उल्‍लेख नाही.  तसेच, त्‍यांना त्‍यांच्‍या जबाबदारीतून मुक्‍त करणेत आले याबाबत कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही.  तसेच, सामनेवाला क्र.3 ते 13 यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.   सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा  सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 12 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.13 व 14 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने तसेच, सामनेवाला क्र.15 हे शासकिय अधिकारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी  आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

(9)        तसेच, तक्रारदारांनी स्‍वत:च्‍या व त्‍यांच्‍या आईच्‍या नांवे सामनेवाला पतसंस्‍थेकडे प्रत्‍येकी रुपये 25,000/- दामदुप्‍प्‍ट ठेवीच्‍या स्‍वरुपात ठेवलेले होते, त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या होत्‍या.  सदर मुदतपूर्ण रक्‍कम 50,000/- दि.26.11.2007 व रुपये 50,000/- दि.30.11.2007 रोजी तक्रारदारांच्‍या सेव्‍हींग्‍ज खाते क्र.1710 वर वर्ग केल्‍याच्‍या दिसून येते.  तदनंतर सदर रक्‍कमेतील दि.02.12.2008 रोजी रुपये 2,000/- व दि.07.08.2009 रोजी रुपये 20,000/- तक्रारदारांना अदा झालेचे दिसून येतात.    सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र.1710 वर दि.07.08.2009 रोजी रुपये 78,000/- शिल्‍लक असल्‍याचे दिसून येते. सदरची रक्‍कम ही सेव्‍हींग खात्‍यावर तक्रारदारांनी ठेवलेली नसून सामनेवाला यांनी प्रत्‍यक्षात दामदुप्‍पट ठेव पावतीची वर्ग केलेली मुदत पूर्ण रक्‍कम आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ची सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले.  त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

आदेश

(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.

(2)   सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.13 ते 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.1710 वरील रक्‍कम रुपये 78,000/- (रुपये अष्‍टयाहत्‍तर हजार फक्‍त) द्यावी.  सदर रक्‍कमेवर दि.08.08.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.

(3)   सामनेवाला क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.13 ते 15 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER