::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :-08.07.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1.अर्जदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, गैरअर्जदाराने त्याचे मालकीची खास मौजा कोसारा, नवीन चंद्रपुर, ता- जिल्हा चंद्रपुर. भुमापन क्रं 95 परार्वतीत करून त्यावर शोभा नगर नावाने योजना बांधुन त्यामधे सदनिका तसेच स्वतंत्र बंगले बांधण्याची योजना आणली आहे. अर्जदाराने दिनांक 09/10/2012 रोजी गैरअर्जदाराकडे शोभा नगर मधे इमारत क्रं 2 मधे दुस-या मजल्या वरील सदनिका क्रं. एस-3 रूपये 11,00,000/- चे मोबदल्या घेण्याचे मान्य केले. तेव्हा अर्जदाराने गैरअर्जदारास 20,000/- रूपये बुकींग म्हणुन मोबदल्याचे भागापोटी गैरअर्जदारास दिले. अर्जदाराने दिनांक 16/01/2013 पावेतो 2,00,000/- रूपये मोबदल्याचे भागापोटी गैरअर्जदाराला दिले असुन सुध्दा गैरअर्जदाराने योजनेतील इमारतीचे बांधकाम सुरू केले नाही. म्हणुन अर्जदाराने शेवटी दिनांक 10/01/2015 रोजी वकीला मार्फत, बांधकाम करून ताबा देण्याविषयी गैरअर्जदाराला नोटीस पाठविले. सदर नोटीस गैरअर्जदाराने घेण्यास नकार दिला व दिनांक 24/01/2015 रोजी अर्जदाराला खोटया आशयाचा नोटीस पाठवुन उर्वरीत पैशांची मागणी केली. अर्जदाराने दिनांक 11/01/2015 रोजी परत नोटीस पाठविले. अर्जदाराने गैरअर्जदाराला पाठविलेले नोटीस घेण्यास नकारला. गैरअर्जदाराने अर्जदारास प्रती अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली असल्याने सदर तक्रार अर्जदाराने मंचा समक्ष दाखल केली आहे.
2.अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन उरर्वरीत मोबदला रक्कम स्विकारून घ्यावा व सदनिकेच्या विक्रीवर ताबा अर्जदाराला दयावे ते शक्य नसल्याने अर्जदाराला अर्जदाराची मुद्दल जमा रक्कम नुकसान भरपाई सह अर्जदाराला दयावे तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी, व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडुन अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावे.
3.अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराला पाठविलेला नोटीस गैरअर्जदाराने घेण्यास नकारला सबब दिनांक 10/03/2016 रोजी गैरअर्जदाराविरूध्द प्रकरण एकतर्फा चालवण्याचा आदेश नि.क्रं 1 वर करण्यात आला.
4.अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ?
अंतीम आदेश काय ? अंतीम आदेश प्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5.अर्जदाराने दिनांक 09/10/2012 रोजी गैरअर्जदाराकडे शोभा नगर मधे इमारत क्रं 2 मधे दुस-या मजल्या वरील सदनिका क्रं. एस-3 रूपये 11,00,000/- चे मोबदल्यात घेण्याचे मान्य केले. तेव्हा अर्जदाराने गैरअर्जदारास 20,000/- रूपये बुकींग म्हणुन मोबदल्याचे भागापोटी गैरअर्जदारास दिले. अर्जदाराने दिनांक 16/01/2013 पावेतो 2,00,000/- रूपये मोबदल्याचे भागापोटी गैरअर्जदाराला दिले. ही बाब अर्जदाराने नि.क्रं 4 वर दाखल दस्त क्रं अ-2, अ-3, अ-4 व अ-5 वरून सिध्द होते. सबब अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. म्हणुन मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6.अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे सदनिके खरेदी करण्याकरिता मोबदला दिला होता व गैरअर्जदाराने अर्जदाराला विकलेल्या सदनिकाचे बांधकाम केले नाही ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्रं 4 वर दस्त क्रं अ-7, अ-10, नोटीसावरून सिध्द होते. गैरअर्जदाराला सदर प्रकरणात पाठविलेले नोटीस घेण्यास नकारले व ब-याच संधी देऊन सुध्दा त्याच्या बचाव पक्ष प्रकरणात सादर केला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन सदनिका करिता घेतलेली रक्कम अर्जदाराला परत केली नाही व सदनिकेचा बांधकाम ही केले नाही असे अर्जदाराने नि.क्रं 4 वर दाखल दस्तावेजां वरून सिध्द होत आहे. सबब गैरअर्जदाराने अर्जदाराला न्युनतम सेवा दिली आहे. अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द झाले आहे. म्हणुन मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7.मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1.अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदाराने अर्जदाराकडुन सदनिकेकरिता घेतलेली रक्कम रूपये 2,00,000/- दिनांक 16/01/2013 पासुन 8 टक्के द.शा.द.शे. व्याजासह, आदेशाची प्रत मिळल्यापासुन 45 दिवसाच्या आत अर्जदाराला दयावे.
3. अर्जदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन 5000/- रूपये व तक्रारीचा खर्च रूपये 2500/- रूपये गैरअर्जदाराला आदेशाची प्रत मिळण्यापासुन 45 दिवसाच्या आत गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावे.
4.आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 08/07/2016