सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्रमांक 68/2010
श्री अरविंद गोपाळ नाईक
रा.होडावडा (देऊळवाडी), ता.वेंगुर्ला,
जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री धीरज परमार,
मॅनेजर मे.फ्युच्युरिस्टीक बजाज
फ्युच्युरिस्टीक बजाज डिलर्स प्रा.लि.
कुडाळ, एन.एच.17, एम.के.जी. रोड,
सांगीर्डेवाडी, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
2) सिध्दार्थ ट्रेडर्स कुडाळ
प्रथमेश कॉम्ल्पेक्स समोर हॉटेल रुचिरा,
कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
आदेश नि.1 वर
(दि.22/11/2010)
1) तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडून खरेदी केलेले बजाज कंपनीचे वाहन सदोष असल्यामुळे व तिचे टायर्समध्ये दोष असल्यामुळे नवीन वाहन मिळावे, यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे.
2) सदरची तक्रार मंचाचे रजिस्ट्री विभागाने तक्रार नोंद रजिस्टरमध्ये नोंद करुन दि.18/11/2010 ला Admission hearing साठी मंचासमोर ठेवली होती; परंतु तक्रारदार त्या दिवशी मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आज सदरचे प्रकरण Admission hearing साठी ठेवण्यात आले आहे.
3) आज तक्रारदार मंचासमोर हजर असून सदर तक्रारकामी तक्रारदाराने बजाज कंपनीला आवश्यक पार्टी म्हणून जोडले नाही. तसेच टायर निर्माण करणा-या कंपनीला देखील पार्टी केले नाही. त्यामुळे सदरची तक्रार मागे घेण्यासाठीचा अर्ज तक्रारदाराने आज मंचासमोर नि.3 वर दाखल केला आहे.
4) या अर्जात नमूद केल्यानुसार त्यांना नव्याने तक्रार दाखल करावयाची असून आवश्यक पार्टी जोडावयाची आहे. त्यामुळे तक्रारदाराचे विनंतीवरुन आम्ही तक्रारदारास नवीन तक्रार दाखल करण्याच्या मुभेसह सदरची तक्रार मागे घेण्याची परवानगी देत असून त्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराने नि.3 वर केलेल्या विनंती अर्जानुसार तक्रारदाराची तक्रार Withdraw करण्याची परवानगी देण्यात येते.
2) तक्रारदाराने मंचासमोर नव्याने तक्रार दाखल करण्याची मूभा देण्यात येते.
3) तक्रारदारास नि.2 सोबत जोडलेली सर्व कागदपत्रे परत देण्यात यावीत.
4) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 22/11/2010
सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग