( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या )
आदेश
( पारित दिनांक : 3 मे, 2011 )
प्रस्तुत तक्रारीतील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तक्रारकर्तीचे गैरअर्जदार यांचे दवाखान्यात दिनांक 9.3.2001 रोजी बाळंतपण होऊन तिने बाळाला जन्म दिला.सदरचे बाळंतपण शस्त्रक्रियेद्वारे झाले होते. बाळंतपण हे शस्त्रक्रीयेने झाले असल्याने व तक्रारकर्तीहिला दुसरे अपत्य असल्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसंबंधी विचारले असता तक्रारकर्तीचे संमतीनंतर तक्रारकर्तीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया त्याच दिवशी केली. त्यासाठी तक्रारकर्तीला संपुर्ण खर्च रुपये 27,000/- आला. त्यानंतर सर्व व्यवस्थित सुरु होते. जुन-2009 मधे तक्रारकर्तीस मासिक पाळी आली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने माहेर मॅटनिटी व नर्सिंग होम, धरमपेठ, नागपूर येथे तपासणी केली असता संबंधीत डॉ मराठे यांना तक्रारकर्ती गरोदर असल्याची शंका आल्यामुळे तक्रारकर्तीला काकडे पॅथॉलॉली लॅब येथे तपासणीकरिता पाठविले होते. काकडे पॅर्थालॉजी लॅबचे अहवालात तक्रारकर्ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने ताबडतोब गैरअर्जदार यांचे दवाखान्यात धाव घेतली. गैरअर्जदार डॉ. गंधे यांनी तक्रारकर्तीची तपासणी केली मात्र गरोदर असल्याचे नाकारले व घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे सांगीतले. परंतु दिनांक 6.7.2005 रोजी तक्रारकर्तीचे पोटात दुखत असल्यामुळे ती गैरअर्जदार यांचे दवाखान्यात उपचाराकरिता गेली असता. गैरअर्जदार डॉक्टरांनी तिला भरती न करता 2-3 पेन किलर चे इंजेक्शन व औषध दिले परंतु भरती करुन घेतले नाही. तक्रारकर्तीस त्रास कमी न झाल्याने तक्रारकर्तीचे पतीने तिला नागपूर सहकारी रुग्णालय, नागपूर येथे भरती केले. तपासणी नंतर असे आढळुन तक्रारकर्ती गरोदर असुन 2 महिन्याचे बाळ पोटातच दगावले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी तक्रारकर्तीवर शस्त्रक्रियाकरुन तक्रारकर्तीचा जीव वाचविला. सदर शस्त्रक्रियेकरिता तक्रारकर्तीस एकुण 43,000/- रुपये खर्च आला. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी तकारकर्तीस सेवेतील कमतरता दिल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन तीद्वारे तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई दाखल गैरअर्जदार यांचे कडुन रुपये 10,74,000/- मिळावे. सदर रक्कमेवर 18टक्के दराने व्याज देण्यात यावे.
सदर प्रकरण दाखल झाल्यानंतर तक्रारकर्तीने विमा कंपनीस गैरअर्जदार म्हणुन तक्रारीमध्ये समाविष्ट करण्याबाबत अर्ज सादर केला. सदर अर्जावर दिनांक 12/1/2010 रोजी आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रं.2 हे विमा कंपनी असुन गैरअर्जदार क्रं. 1 हे गैरअर्जदार क्रं. 2 कडे विमाकृत आहे. कोणताही वैद्यकीय निष्काळजीपणा गैरअर्जदार क्रं.1 कडुन घडल्यास गैरअर्जदार क्रं.2 जबाबदार राहतील. त्यामुळै गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे जबाबदार आहे.
तक्रारकर्तीने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात डिस्चार्ज कार्ड,हॉस्पीटल कार्ड, सोनोग्राफी रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.2 यांनी तक्रारकर्तीचे आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपले जबाबदात हे मान्य केले आहे की तक्रारकर्तीची काकडे यांचे पॅथॉलाजी लॅबोरटीमध्ये तपासणी झाली होती व त्यात तक्रारकर्ती गर्भवती असल्याचे आढळुन आले. त्यांनी दिनांक 24/6/2005 ला तक्रारकर्ती गैरअर्जदार क्रं. 1 चे दवाखान्यात तपासणी करिता आली होती. गर्भधारणेचे कोणतेही संकेत सोनोग्राफी मध्ये दिसुन आले नाही. गैरअर्जदारांचे मते तक्रारकर्तीने लघवीची गर्भधारणा चाचणी व सोनोग्राफी अहवाल परस्पर विरोधी असल्याने तक्रारकर्तीस बी.एच.सी.जी. ( Beta Human Chorinoic Gonadotrophin ) ची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराचे सल्ल्यानुसार कृती केली नाही. दिनांक 6/7/2005 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 भाग्यश्री गंधे यांचे पती डॉ.बिसने यांचे दवाखान्यात भरती असल्यामुळे त्यांचे दवाखान्यातील डॉ. सौ.तरल वर्मा यांनी तक्रारकर्तीला लता मंगेशकर दवाखान्यात जाण्यास सांगीतले. तक्रारकर्तीस 5 वर्षापर्यत कुठलाही त्रास नव्हता याचाच अर्थ टयुबेक्टॉमी व्यवस्थीत झाली होती. तक्रारकर्तीने आपले म्हणण्याचे पृष्टर्य्थ कोणतेही वैद्यकीय पुरावे सादर केले नाही. वैद्यकीय शास्त्रानुसार टयुबेक्टॉमी झालेल्या रुग्णाला टयुबल प्रेगनन्सी होणे ही बाब वैद्यकीय शास्त्राला माहीत आहे हे 15टक्के ते 50टक्के प्रकरणात होऊ शकते. अडीशनल डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, फॅमिली वेल्फेअर यांनी लिहीलेल्या पत्रामध्ये सुध्दा कार्यालयाने दिनांक 10/10/2005 रोजी उत्तर दिले की पोस्ट टयुबेक्टॉमी कॉम्प्लीकेशन नसल्यामुळे या रुग्णला नुकसान भरपाई मोबदला मिळु शकत नाही. वरील निष्कर्षासह गैरअर्जदार यांनी दवाखान्याच्या रुग्णालयाच्या कार्डवरुन गैरअर्जदाराला अक्टोपीक गर्भधारणेबद्दल संशय आला त्यावरुन गैरअर्जदार तपासणीच्यावेळी तत्पर होता असे दिसुन येते. त्यामुळे त्यांचे सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येते नाही.
गैरअर्जदार क्रं.2 यांचे कथनानुसार सदर तक्रार ही तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्रं. 1 यांचे मध्ये दिसुन येते. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी गैरअर्जदार क्रं.1 यांना विमा सरंक्षण दिले नसुन विमा पॉलीसी ही डॉ. भाग्यश्री गंधे यांची व्यक्तिगत विमा पॉलीसी आहे. डॉ.भाग्यश्री गंधे यांचे नावे दिलेले विमा संरक्षण गैरअर्जदार क्रं.1 धनवंत्री हॉस्पीटल द्वारे वापरल्या जाऊ शकत नाही. वास्तविक गैरर्जदार क्रं.1 यांनी कुठल्याही प्रकारे त्रुटीपुर्ण वैद्यकीय सेवा दिली नाही. वास्तविक तक्रारकर्तीने दिलेले वैद्यकीय सल्ल्यानुसार परिक्षण न केल्यामुळे त्याचे परिणाम तक्रारकर्तीला सहन करावे लागले. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रं. 1 यांनी सांगीतल्याप्रमाणे तक्रारकर्तीने त्यांच्या सल्याचे पालन केले नाही. त्यावेळेस डॉ.भाग्यश्री गंधे तपासणी करिता उपस्थित नव्हत्या त्यांचे पती हदयविकाराने आजारी असल्यामुळे दुस-या दवाखान्यात गेल्या होत्या. त्यावेळे दुस-या डॉक्टरांनी तक्रारकर्तीला तपासले. प्रस्तुत प्रकरणात कुठलाही वैद्यकीय निष्काळजीपणा दिसुन येत नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार क्रं.2 यांना हे सदर प्रकरणात जबाबदार ठरत नाही.
तक्रारकर्ती तर्फे वकील श्री महेश मेंढे व गैरअर्जदार क्रं.1 चे वकीनांनी लेखी युक्तिवाद दाखल केला.
-: का र ण मि मां सा :-
सदरचे प्रकरणातील दोन्ही पक्षाचे म्हणणे शपथपत्र, पुरावे यांचे अवलोकन करता हया प्रकरणात तक्रारकर्तीने गैरअर्जदार कं.1 यांचेकडुन वैद्यकीय सेवा घेतल्याची बाब ग्राहय धरण्यात येते. कागदपत्र क्रं.(15) डिस्चार्ज कार्डवरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्तीने दिनांक 9/3/2001 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 यांचे दवाखान्यात सिझेरियन शस्त्रक्रिया होऊन बाळंतपण झाले व तिला अपत्य झाले. त्यादिवशी तक्रारकर्तीचे संमतीवरुन गैरअर्जदार क्रं. 1 ने तक्रारकर्तीवर टयुबेक्टॉमी पध्दतीने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली. तक्रारकर्तीला जुन-2005 मध्ये मासिक पाळी आली म्हणुन लघवीची गर्भधारणा चाचणी केली असता ती गरोदर असल्याचे आढळुन आले व त्यानंतर तक्रारकर्तीवर नागपूर सहकारी रुग्णालय, नागपूर येथे शस्त्रक्रिया होऊन 2 महीन्याचा मृत गर्भ काढण्यात आला. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार एकदा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यावर गर्भवती राहणे ही गैरअर्जदार यांचा वैद्यकीय निष्काळीपणा आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट आफ पंजाब वि.शीवराम IV (2005) सीपीजे 14 (S.C.) व इतर वरिष्ठ न्यायालयाचे निकालातील आशयावरुन तसेच या प्रकरणातील वस्तुस्थिती बघता हे न्यायमंच या निष्कर्षाप्रत येते की, कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तक्रारकर्ती ही गर्भवती राहीली ही गर्भधारणा हा सेवेतील निष्काळजीपणा म्हणता येणार नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाचे मते शस्त्रक्रिया करतांना निष्काळजीपणा झाला असेल तरच तो वैद्यकीय निष्काळजीपणा होतो. या प्रकरणात कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यावर जवळपास 4 वर्षे नंतर तक्रारकर्ती गर्भवती राहीली. त्यामुळे सन 2001 मधे झालेली शस्त्रक्रिया व्यवस्थीत झाली नाही असे म्हणता येणार नाही. तसेच वैद्यकीय शास्त्रानुसार शस्त्रक्रियेनंतर सुध्दा गर्भधारणेची शक्यता नाकारता येणार नाही. हा सिध्दांत वरिष्ठ न्यायालयाने देखिल मान्य केलेला आहे. वरील बाबीचा विचार करता कुटुंब नियोंजन शस्त्रक्रियेनंतर गर्भधारणा होणे ही गैरअर्जदार क्रं. 1 यांचा वैद्यकीय निष्काळजीपणा होणार नाही.
तक्रारकर्तीने जुन-2005 मधे मासिक पाळी आली नाही म्हणुन तीने माहेर मॅटनिटी व नर्सिंग होम, धरमपेठ, नागपूर येथे दाखविले गर्भधारणेची शक्यता वाटल्यामुळे संबंधीत डॉक्टरने तक्रारकर्तीला काकडे पॅथॉलॉली लॅब कडे पाठविले. काकडे पॅथॉलॉली लॅबच्या लघवीची गर्भधारणा चाचणीकरुन गर्भवती असल्याचे दिसुन आले.(कागदपत्र क्रं.11) त्यानंतर तक्रारकर्ती गैरअर्जदार क्रं.1 कडे तपासणी करिता गेली असता. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी सोनोग्राफी केली त्यावरुन गर्भधारणा दिसली नाही असा अहवाल प्राप्त झाला. तक्रारकर्तीय गर्भधारणा नाही असे सांगुन घाबरण्याचे कारण नाही असे तक्रारकर्तीस सांगीतले होते. पुन्हा दिनांक 6/7/2005 रोजी तक्रारकर्तीचे पोटात दुखु लागल्यामुळे ती गैरअर्जदार क्रं.1 यांचे दवाखान्यात गेली. हे गैरअर्जदार क्रं.1 यांनी सुध्दा मान्य केले. हे कागदपत्र क्रं.37 वरील मेडीकल नोट्सवरुन दिसते. तक्रारकर्तीच्या मते गैरअर्जदार क्रं. 1 यांनी तक्रारकर्तीला दवाखान्यात भरती करुन न घेतल्यामुळे तक्रारकर्तीस नागपूर सहकारी रुग्णालय, नागपूर येथे भरती व्हावे लागले. तक्रारकर्तीचे हे म्हणणे खोडुन काढण्याकरिता गैरअर्जदार क्रं.1 ने कोणताही पुरावा सादर न केल्यामुळे हे न्यायमंच तक्रारकर्तीचे हे कथन ग्राहय धरते.
गैरअर्जदार क्रं. 1 यांचे मते त्यांनी दिनांक 27/7/2005 ला केलेल्या सोनोग्राफीमधे गर्भधारणेचे कुठलेही संकेत नव्हते. परंतु काकडे पॅथॉलॉली लॅब मध्ये केलेली लघवीची गर्भधारणा चाचणीमध्ये गर्भधारणेचे संकेत दिले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांचे मते या दोन्ही चाचण्यात विसंगती असल्यामुळे गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीला बी.एच.सी.जी. ( Beta Human Chorinoic Gonadotrophin ) ही चाचणी करण्यास सांगीतले व ती तक्रारकर्तीने केली नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या Examination card मध्ये सदरची चाचणी ( B.H.C.G.) करण्याचा सल्ला दिलेल्याची नोंद असली तरी कागदपत्र क्रं.37 वरील मेडीकल नोट्स बघता गैरअर्जदार क्रं.1 नी असा कुठलाही सल्ला दिल्याची नोंद नाही. वास्तविक गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस भरती करुन घेणे व तीचेवर योग्य उपचार करणे ही गैरअर्जदार क्रं.1 यांची नैतिकरित्या जबाबदारी होती. कारण रुग्णाला भरती करुन न घेणे हा सुध्दा वैद्यकीय निष्काळजीपणा आहे.
गैरअर्जदार क्रं.1 यांचे मते तक्रारकर्ती दिनांक 6/5/2005 रोजी गैरअर्जदार क्रं.1 यांच्या दवाखान्यात आली तेव्हा डॉ. भाग्यश्री या उपस्थित नव्हत्या कारण त्या आजारी असल्ेल्या पतीचे सेवेकरिता दुस-या दवाखान्यात होत्या हे (कागदपत्र क्रं.39) वरील प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. परंतु त्यावेळी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणाकरिता Vicarious Liability च्या तत्वानुसार धन्वनंतरी हॉस्पीटल सुध्दा जबाबदार राहील. त्यामुळे त्यावेळेसच्या संबंधीत डॉक्टरांनी तक्रारकर्तीला भरती न करुन ही सेवेतील कमतरता आहे व त्यासाठी गैरअर्जदार क्रं.1 हॉस्पीटल जबाबदार राहील.
गैरअर्जदार क्रं. 2 हे इंन्श्युरन्स कंपनी असुन कागदपत्र क्रं. वरुन असे दिसते की गैरअर्जदार क्र.1 चे प्रमोटर डॉ. भाग्यश्री गंधे यांनी व्यक्तिगतरित्या गैरअर्जदार क्रं.2 यांचेकडुन वैद्यकीय नुकसान भरपाईकरिता विमा काढलेला होता. त्यामुळे त्यांचेकडुन झालेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाबाबतच्या नुकसान भरपाईस गैरअर्जदार क्रं. 2 हे जबाबदार राहतील. परंतु मे. धन्वंतरी हॉस्पीटल ही वेगळी व्यवस्थापन (entity) आहे. त्यामुळे हॉस्पीटल कडुन झालेल्या नुकसानभरपाईकरिता गैरअर्जदार क्रं.2 जबाबदार राहणार नाही. हे गैरअर्जदार क्रं. 2 यांचे म्हणणे या न्यायमंचाला मान्य आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रं.2 यांचे सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नाही.
तक्रारकर्तीने बाळंतपणाचे शस्त्रक्रीयेकरिता झालेला खर्च व शस्त्रक्रियेचा खर्चाची मागणी या मंचाला केली आहे. परंतु कुटुंब नियोजंन्याच्या शस्त्रक्रियेनंतर
गर्भवती राहणे ही वैद्यकीय निष्काळजीपणा नसल्यामुळे ही तक्रारकर्तीची मागणी मान्य करता येणार नाही. परंतु गैरअर्जदार क्रं.1 हॉस्पीटलने तक्रारकर्तीला गर्भधारणा झाल्यानंतर तीला त्रास होत असतांना देखील दवाखान्यात दाखल करुन न घेणे व योग्य उपचार न करणे या वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत गैरअर्जदार क्रं. 1 धन्वंतरी रुग्णालय तक्रारकर्तीच्या नुकसान भरपाईस जबाबदार राहील. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1.
2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस नुकसान भरपाईपोटी रुपये 10,000/- द्यावे.
3. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रास व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
3.
4. गैरअर्जदार क्रं.2 विरुध्द कुठलाही आदेश नाही.
4.
5. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं.1यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
5.
( जयश्री येंडे) ( विजयसिंह ना. राणे )
सदस्या अध्यक्ष
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर