जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
फिर्याद क्र.320/2009
अनिल रा. मोकाशी ... अर्जदार
विरुध्द
दत्त नागरी सह.पत.मर्या. ... जाबदार
नि.1 खालील आदेश
अर्जदार स्वतःहून हजर. जाबदार क्र.4,1,7,9,15,3,5,10,11,12,13,14,18,16 यांना वॉरंटखाली पोलीसांनी हजर केले. जाबदारांनी अर्जदारास मंचासमोर त्यास येणे असलेली संपूर्ण रक्कम दिली. त्यावरुन अर्जदाराने नि.44 ला पुरशीस दाखल करुन त्यास संपूर्ण रक्कम मिळाल्याने प्रस्तुतची फिर्याद निकाली काढण्यास हरकत नाही असे लिहून दिले. अर्जदार व्यक्तिशः प्रस्तुत प्रकरण चालवित असल्याने त्याच्या ओळख शाबितीकरता त्याचे मतदान ओळखपत्र त्याने हजर केले. त्यावरुन सदरची पुरशीस मान्य करण्यात आली.
सबब, प्रस्तुतची फिर्याद अर्जदाराने काढून घेतल्याने खारीज करण्यात आली आणि सर्व जाबदारांस निर्दोष सोडून देण्यात आले. प्रकरण दफतर दाखल करावे.
दि.16/07/13.
ठिकाण – सांगली.
(व्ही.एन.शिंदे) (ए.व्ही.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष