निकालपत्र :- (दि.30.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 18 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी व सामनेवाला तर्फे त्यांच्या मॅनेजर यांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात व सेव्हींग्ज खात्यावर रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | व्याजदार | 1. | 11983 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 2. | 11984 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 3. | 11985 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 4. | 11986 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 5. | 11987 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 6. | 11988 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 7. | 11989 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 8. | 11990 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 9. | 3981 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 10. | 3982 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 11. | 3983 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 12. | 3984 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 13. | 3985 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 14. | 3986 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 15. | 3987 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 16. | 3988 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 17. | 3989 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 18. | 3990 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 19. | 5644 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 20. | 5645 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 21. | 5646 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 22. | 5647 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 23. | 5648 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 24. | 5649 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 25. | 5650 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 26. | 5651 | 25000/- | 29.06.2009 | 29.01.2010 | 9% | 27. | बचत खाते नं.5054 | 130649/- | -- | -- | -- |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्कमांची शैक्षणिक, घर खर्च भागविण्यासाठी आवश्यकता आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सेव्हिंग्ज खात्यांचे पासबुक व संचालकांची यादी मागणी अर्ज व सहाय्यक निबंधक, शिरोळ यांचे पत्र इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 ते 18 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांना त्यांच्या अस्सल पावत्या घेवून येवून त्या डिस्चार्ज करुन घेवून रककमा सेव्हिंग खातेस वर्ग करुन घ्या व सेव्हींग खात्यावरुन रक्कमा काढून घ्याव्यात असे सांगूनही तक्रारदार यांनी अस्सल ठेव पावत्या संस्थेकडे डिस्चार्ज करुन घेण्यासाठी आणल्या नाहीत. सामनेवाला यांनी सेवा देण्यामध्ये कधीही कसूर केलेला नाही. तसेच, कर्जदारांकडून वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. परंतु, कर्जदार रक्कमा भागविणेऐवजी ती बुडवण्यासाठी कोर्टांकडून मनाई आदेश घेतात व वसुली प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करतात. हॉटेल रजतचे डायरेक्टर, तनवाणी यांचेकडून 4 कोटीपेक्षा जास्त, कोल्हापूर महानगरपालिकेच सदस्य-सुनिल मोरी यांचेकडून रुपये 40 लाखांपेक्षा जास्त, तर श्री.भरत ज्ञानदेव पाटील यांचेकडून रुपये 16 लाखांपेक्षा जास्त कर्ज रक्कम येणे आहे. तक्रारदारांना एकाचवेळी सर्व रक्कमा देणेस अडचण असल्याने सामनेवाला यांना थोडा कालावधी द्यावा. सबब, तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात यावी अशी विनंती केली आहे. (6) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. (7) सामनेवाला क्र.18-बबन हरी घाटगे हे स्विकृत संचालक असलेचे तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. स्विकृत संचालकांचा दैनंदिन व्यवहाराशी प्रत्यक्ष कोणताही संबंध येत नाही. याचा विचार करता सदर स्विकृत संचालक, बबन हरी घाटगे यांची तक्रारदारांच्या ठेवी देण्यावी जबाबदारी येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 17 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.18 हे संस्थेचे स्विकृत संचालक असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तथापि, ठेव पावती क्र.3989 व 3990 ची तक्रारीत मागणी केली आहे, परंतु तक्रारदारांनी सदर पावत्यांच्या सत्यप्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे सदर दोन्ही पावत्यांच्या रक्कमा मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कमा ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 5054 वर दि.26.03.2010 रोजीअखेर रुपये 1,30,649/- (रुपये एक लाख तीस हजार सहाशे एकोणपन्नास फक्त) जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.18 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 11983 | 25000/- | 2. | 11984 | 25000/- | 3. | 11985 | 25000/- | 4. | 11986 | 25000/- | 5. | 11987 | 25000/- | 6. | 11988 | 25000/- | 7. | 11989 | 25000/- | 8. | 11990 | 25000/- | 9. | 3981 | 25000/- | 10. | 3982 | 25000/- | 11. | 3983 | 25000/- | 12. | 3984 | 25000/- | 13. | 3985 | 25000/- | 14. | 3986 | 25000/- | 15. | 3987 | 25000/- | 16. | 3988 | 25000/- | 17. | 5644 | 25000/- | 18. | 5645 | 25000/- | 19. | 5646 | 25000/- | 20. | 5647 | 25000/- | 21. | 5648 | 25000/- | 22. | 5649 | 25000/- | 23. | 5650 | 25000/- | 24. | 5651 | 25000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.18 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांच्या सेव्हिंग्ज खाते क्र.5054 वरील रक्कम रुपये रुपये 1,30,649/- (रुपये एक लाख तीस हजार सहाशे एकोणपन्नास फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.15.12.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. (4) सामनेवाला क्र.1 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.18 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |