द्वारा: मा. सदस्या: श्रीमती. एस. ए. बिचकर,
// नि का ल प त्र //
1) सदरची तक्रार तक्रारदारांने जाबदार यांचे विरुध्द जाबदार यांना सदनिकेपोटी दिलेली रक्कम रु. 2,74,000/- ( रु दोन लाख चौ-याहत्तर हजार) 9 % व्याजाने तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 40,000/- ( रु चाळीस हजार) व करारनाम्याचे स्टँम्पडयुटी आणि रजिस्ट़ेशन खर्चासाठी रककम रु. 25,000/- ( रु पंचवीस हजार), फिर्याद व नोटीस खर्च रक्कम रु. 6,000/- ( रु सहा हजार) फी रक्कम रु. 15,000/- ( रु पंधरा हजार) अशी एकुण रक्कम रु. 3,60,000/- ( रु तीन लाख साठ हजार) मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2) तक्रारदाराची तक्रारच थोडक्यात अशी की, तक्रारदार यांनी जाबदार यांचे ‘ पारुदत्त अपार्टमेंट ‘ इमारतीमधील बी विंग या दुस-या मजल्यावरील सदनिका क्रमांक 28 यांसी क्षेत्र अंदाजे 290 चौ. फुट ( 26.94 चौ. मि) बिल्ट अप टेरेससह बुक केलेली असून त्याची एकुण किंमत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये रु 3,91,500/- ठरलेली होती. त्यापैकी व तसा रजिस्ट्रर करारनामा तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये दिनांक 17/10/2008 रोजी झालेला असून दुययम निबंधक, हवेली क्रमांक 2 पुणे यांचे कार्यालयात त्याची नोंद 3931/2008 ने झालेली आहे.
ठरलेल्या किंमतीपैकी तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु. 2,74,000/- हे रोखीने व चेकने दिलेले आहेत. सदर करारनाम्या प्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा कराराच्या तारखे पासून एक वर्षाचे आत दयावयाचा असे ठरले होते.
3) तक्रारदार जाबदार यांचेकडे सदनिका बुक केली. त्यावेळेस अविवाहीत होते व त्यानंतर सहा महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले त्यामुळे जाबदार यांचेकडे सदनिकेचे ताबेबाबत राहीलेली रककम घेऊन ताबा मिळण्यासाठी वेळोवेळी मागणी केली. परंतु जाबदार यांनी टाळाटाळ केलेली आहे. तक्रारदार यांना विनाकारण रक्कम रु. 5,000/- भाडे देऊन भाडयाने रहावे लागत आहे. वरील परिस्थितीचा विचार करता जाबदार यांनी वर कलम तीन मध्ये नमुद केलेल्या करारनाम्याचा भंग केलेला आहे हे उघड आहे. त्यामुळे करारात नमुद केल्याप्रमाणे जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून सदनिकेपोटी घेतलेली रक्कम रु 2,74,000/-ही 9 % प्रमाणे व्याजासह परत करावी.
सदरचा करारनामा तक्रार यांनी जाबदार यांना दिनांक 16/11/2009 रोजी कायदेशीर नोटीस देऊन करारात ठरलेल्या अटी व शर्तींप्रमाणे रद्य केलेला आहे. सदरची नोटीस जाबदार यांना दिनंाक 20/11/2009 रोजी मिळालेली आहे. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांचे नोटिसीस उत्तरही दिले नाही व पैसेही परत केलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना सदरची तक्रार जाबदार यांचे विरुध्द दाखल करणे भाग पडत आहे.
4) तक्रारदाराने तक्रारी सोबत शपथपत्र, रजिस्ट्रर करारनामा, जाबदार यांना वकीला मार्फत पाठविलेली नोटीस, सदरची नोटीस जाबदार यांना मिळालेल्याची पोष्टाची पोहच पावती, तक्रारदार यांचे लग्नाची लग्नपत्रिका, तक्रारदार हे भाडयाने रहात असल्याबद्यल करारनामा, बँकेचा खाते उतारा इत्यादी झेरॉक्स कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5) मंचाने जाबदार यांना दिनांक 27/01/2010 रोजी नोटीस पाठविली असता जाबदार यांनी दिनांक 26/04/2010 रोजी त्यांचे म्हणणे व शपथपत्र मंचात दाखल केलेले आहे.
जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रार अर्जातील बरेच मुद्दे नाकारलेले आहेत.
6) जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारदार यांचे बरोबर तक्रारदार यांचे वकीलांनी तयार केलेल्या दिनांक 17/10/2008 रोजीच्या करारनाम्यावरे प-लॅट नं. 28 ज्यावर जाबदार यांना फसवून प-लॅट एरिया 363 चौ. फुट असताना 290 चौ फुट क्षेत्र दाखवून त्यावर मोबदला ही 290 चौ; फुटाप्रमाणे रक्कम रु 3,91,500/- दाखविलेली आहे. तसेच तक्रारदार यांचेकडून जाबदार यांना सदनिकेपोटी फक्त रक्कम रु. 2,10,000/- च मिळालेले आहे. तसेच करारनाम्यामध्ये रोख रु. 64,000/- दिलेले आहेत ते खोटे लिहीलेले आहे. जाबदार यांना तक्रारदार यांचेकडून रक्कम रु 1,80,000/- चेकने व दिनांक 27/01/2008 रोजी रक्कम रु. 30,000/- असे एकुण रु 2,10,000/- एवढेच मिळालेले आहेत.
7) तक्रारदार यांचा विवाह दिनांक 20/05/2009 रोजी झालेला होता तसेच त्यांना ते ज्या ठिकाणी काम करत होते तेथून त्यांना कामावरुन काढले होते. त्यामुळे त्यांनी जाबदार यांचेकडे जाऊन मला कामावरुन काढून टाकले तसेच माझा विवाह झाल्यामुळे मी सदनिकेची उर्वरित रक्कम भरु शकत नाही. त्यामुळे दिनांक 17/10/2008 रोजीचा करारनामा रद्य करावा व मी दिलेले रक्कम रु. 2,10,000/- परत दयावेत अशी जाबदार यांना विनंती केली. त्यावर जाबदार यांनी तक्रारदार यांना सदर प-लॅटला गि-हाईक घेऊन या व तुमचे रककम रु 2,10,000/- देवू व करानामा रद्य करु असे सांगीतले. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना उर्वरित रकमेची मागणी केलेली नाही.
जाबदार हे अपंग असून तसेच त्यांचे पतीचे दिनांक 10/02/2009 रोजी निधन झालेले असल्याने त्यांच्या इतर विधीमुळे त्यांनी तक्रारदार यांचे विरुध्द कसल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही.
जाबदार यांनी त्यांचे इमारतीमधील दिनांक 30/11/2009 रोजी संपूर्ण बांधकाम केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराने जाबदार यांना 363 चौ फुटाप्रमाणे रक्कम रु 4,90,050/- अधिक मिटर व सोसायटीचे मिळून रु 40,000/- असे मिळून रककम रु 5,30,250/- त्यामध्ये तक्रारदाराने जाबदार यांना रक्कम रु 2,10,000/- दिलेले आहेत ते वजा जावून रककम रु 3,20,250/- ही 24% व्याजाने (एक वर्षाचे व्याजावी कराराप्रमाणे मुदतीत रक्कम न दिल्याने) रक्कम रु 76,860/- असे एकूण रक्कम रु 3,97,210/- दयावेत व सदनिकेचा ताबा दयावा.
8) तक्रारदार यांनी जाबदार यांना दिनांक 17/10/2008 रोजीचे करारनाम्याप्रमाणे उर्वरित रक्कम सहा महिन्यामध्ये देणेमध्ये असमर्थता दाखविली त्यामुळे तक्रारदार यांनीच करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. त्यामुळे जाबदार यांनी रक्कम रु 2,10,000/- तक्रारदार यांना ही 9 % व्याजाने देण्याचा संबंधच येत नाही. तसेच करारनाम्याप्रमाणे जाबदार यांनी सदनिकेचे बांधकामही वेळेतच केलेले आहे.
जाबदार यांचे इमारतीमधील ज्या सदनिकाधारकांनी जाबदार यांना पूर्ण मोबदला दिलेला आहे त्या सदनिकाधारकांना जाबदार यांनी सदनिकेचा ताबा दिलेला आहे व ते सर्व तिथे रहात आहेत. त्यामुळे जाबदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कुठेही कमतरता केलेली नाही. तरी तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्य करणेत यावी.
9) मंचाने तक्रारदार यांची तक्रार व शपथपत्र तसेच तक्रारी सोबत दाखल केलेले सर्व कागदपत्रे त्या बरोबरचे जाबदारांचे म्हणणे व शपथपत्र, तक्रारदारांने दिनांक 13/05/2010 रोजी त्यांचे प्रतिम्हणणे दाखल केलेले आहे. या सर्वांचे मंचाने अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्ये -
मुद्दे उत्तरे
1) जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या :
सेवेमध्ये त्रृटी आहे काय ? : अंशत: आहे
2) आदेश : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा:
10) तक्रारदारा तर्फे विधिज्ञ श्री राऊत यांनी दिनांक 15/07/2010 रोजी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
मंचाने दिनांक 09/03/2011 रेाजी तक्रारदारा तर्फे विधिज्ञ श्री राऊत यांचा तसेच जाबदार यांनी स्वत: केलेला तोंडी युक्तिवाद ऐकला.
11) तक्रारदाराने जाबदार यांच्या ‘पारुदत्त अपार्टमेंट’ या इमारतीमधील बी विंग मधील दुस-या मजल्यावरील सदनिका नंबर 28 यांसी क्षेत्र 290 चौ फुट ( 26.94 चौ मि.) बिल्ट अप टेरेससह बुक केलेली आहे. सदनिकेची एकुण किंमत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये रक्कम रु 3,91,500/- ठरलेली असून त्यापैकी तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु 64,000/- करारनामा करते वेळी व राहीलेली रककम रु 2,10,000/- ही चेकने दिलेली आहे. अशी एकुण रक्कम रु 2,74,000/- तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेली आहे. त्या बाबतचा रजिस्ट्रर करारनामा जाबदार यांनी तक्रारदार यांना दिनांक 17/10/2008 रोजी करुन दिलेला आहे. सदरचा दुययम निबंधक यांचेकडे नोंदविलेला रजिस्ट्रर करारनामा अनु. क्र. नं. 3931/2008 हा तक्रारदाराने यादी सोबत निशाणी – 5/1 अन्वये दाखल केलेला आहे त्यावरुन सिध्द होते.
12) जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमुद केले आहे की, जाबदार यांना तक्रारदार यांचेकडून रक्कम रु 2,10,000/- एवढेच मिळालेले आहेत. करारनाम्यामध्ये तक्रारदाराने जाबदार यांना करारनामा करतेवेळी रककम रु 64,000/- रोख दिलेले आहेत हे जाबदार यांना मान्य नाही. परंतु त्या बाबत मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारदार व जाबदार यांचे मधील करारनामा हा रजिस्ट्रर असून तो अधिकृत व नोंदणिकृत आहे तसेच त्यावेळेस तक्रारदार व जाबदार यांच्या सहया दुययम निबंधक यांचेपुढे करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जाबदार यांना तक्रारदारा कडून रक्कम रु 64,000/- मिळालेले नाहीत हे म्हणणे अविश्वासनीय वाटते.
जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी त्यांना फसवूण सदनिकेचा एरिया 363 चौ फुट असताना 290 चौ फुट क्षेत्र दाखवून 290 चौ फुटाप्रमाणे रक्कम रु 3,91,500/- इतकी दाखविलेली आहे. परंतु रजिस्ट्रर करारनाम्याचे मंचाने वाचन केले असता त्यामध्ये सदनिकेचे क्षेत्र 290 चौ फुटच दिसून येते त्यामुळे जाबदार यांचे म्हणण्यामध्ये मंचास विश्वास ठेवता येणार नाही.
13) तक्रारदार यांचे लग्न झाल्यामुळे त्यांनी व त्यांना सदनिकेची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी जाबदार यांचेकडे अनेक वेळा जावून सदनिकेची उर्वरित रक्कम घेऊन ताबा देणे बाबत विनंती केली. कारण त्यांना रक्कम रु 5,000/- भाडे देऊन भाडयाचे घरात रहावे लागत होते. भाडयाने रहात असलेल्या करारनाम्याची प्रत तक्रारदाराने निशाणी – 5/5 अन्वये दाखल केलेली आहे त्यावरुन सिध्द होते. परंतु तरीही जाबदार यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा दिलेला नाही. म्हणून तक्रारदाराने जाबदार यांना दिनांक 16/11/2009 रोजी दिनांक 17/10/2008 रोजीचा करारनामा रद्य करणे बाबत व जाबदार यांचेकडे सदनिकेपोटी रककम रु 2,74,000/- 9 % व्याजाने मिळण्यासाठी नोटीस पाठविलेली आहे. सदरची नोटीस जाबदार यांना दिनांक 20/11/2009 रोजी मिळालेली आहे. तक्रारदाराने निशाणी – 5/2 यादी सोबत व 5/3 अन्वये दाखल केलेली आहे त्यावरुन सिध्द होते. सदर नोटीसीस जाबदार यांनी उत्तर दिलेले नाही. तसेच जाबदार यांनी त्यांच्या इमारतीमधील सदनिकेचे बांधकाम वेळेतच पूर्ण करुन इतर सदनिकाधारकांना सदनिकेचे ताबे दिलेले आहेत त्या बाबत कोणताही कागदोपत्री पुरावा त्यांचे म्हणण्याचे पुष्ठयर्थ जाबदार यांनी मंचात दाखल केलेला नाही. उलट तक्रारदार यांनी जाबदार यांचे इमारतीमधील सदनिकाधारकांना श्री राजेंद्र रावडे यांनी जाबदार यांचे बरोबर केलेला रद्य केलेला दिनांक 19/0122010 रोजीचा करारनामा निशाणी – 14/1 अन्वये दाखल केलेला आहे. त्याचे मंचाने वाचन केले असता जाबदार यांनी मंजूर प्लॅनप्रमाणे बांधकाम केलेले नाही हे दिसून येते.
वरील सर्व बाबींचा विचार करता मंचास असे स्पष्ट दिसून येते की, जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रृटी ठेवली आहे हे सिध्द होते. त्यामुळे जाबदार हे तक्रारदार यांना दिनांक 17/10/2008 चे रजिस्ट्रर करारनाम्या प्रमाणे व करारातील अटी व शर्तींनुसार त्यांनी तक्रारदार यांचेकडून सदनिकेपोटी घेतलेली रक्कम रु 2,74,000/- ही 9 % व्याजाने देणेस जबाबदार आहेत. या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. तसेच जाबदार हे तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु 5,000/- देणेसाठी जबाबदार आहेत.
वरील सर्व विवेंचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारित करित आहे.
// आ दे श //
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) जाबदार यांनी तक्रारदार यांना त्यांनी तक्रारदार यांचे
2)कडून सदनिकेपोटी घेतलेली रक्कम रु 2,74,000/-
( रु दोन लाख चौ-याहत्तर हजार फक्त ) ही 9 % व्याजाने
दिनांक 17210/2008 तारखे पासून ते रक्कम अदा करे पर्यन्त
दयावी.
3) जाबदार यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम
रु. 5,000/- ( रु पाच हजार फक्त ) दयावेत.
4) जाबदार यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रक्कम रु 2,000/-
( रु. दोन हजार फक्त ) दयावा.
5) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची
प्रत मिळाले पासून तिस दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार
त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदी अंतर्गत
प्रकरण दाखल करु शकतील.
6) निकालपत्राच्या प्रती दोन्ही बाजूना नि:शुल्क पठवाव्यात.