-ः अंतिम आदेश ः- 1. हे प्रकरण आजरोजी अँडमिशनसाठी ठेवण्यात आले होते. तक्रारीचे स्वरुप पहाता तक्रारदार व सामनेवाले दरम्यान ग्राहकाचे नाते निर्माण होते किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला, तसेच तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे किंवा नाही हा प्रश्न निर्माण झाला म्हणून संबंधित तक्रारदारातर्फे वकीलांना याबाबत युक्तीवाद करण्यास सांगितले असता त्यांनी मंचाकडे येऊन तक्रार बिल्डरविरुध्द आहे त्यामुळे मुदतीची बाधा येत नसल्याचे म्हटले आहे. तसेच बिल्डर व त्यांचेदरम्यान ग्राहकाचे नाते असल्याचे कथन केले आहे. 2. तकारीचे अवलोकन केले असता असे दिसते की, त्याने जी रिसीट दाखल केली आहे ती फक्त रक्कम रु.1,20,000/-ची आहे, ते सामनेवालेस दिले आहेत पण ते त्यानी कशापोटी दिले आहेत हे कळून येत नाही. 3. त्यांच्या कथनातसुध्दा फरक आहे. पावती रु.1,20,00/-ची आहे व ते रु.1,90,000/- दिल्याचे कथन करीत आहेत. रु.1,20,000/-ची पावती दि.15-7-04 ची आहे. नंतर त्याने सामनेवालेस अनेक रकमा दिल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे त्यानी एकूण रु.4,05,000/-ची रक्कम दिली आहे, पण केवळ मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे पावती घेतली नसल्याचे कथन केले आहे. सन 2004 पासून ते 2011 पर्यंत तकार दाखकरेपर्यंत 7 वर्षाचे काळात त्याने त्यांचेविरुध्द तक्रार का दाखल केली नाही? हे कळून येत नाही. केवळ बिल्डरवर लिगल ऑब्जेक्शन आहे म्हणून मुदतीचा मुद्दा येणार नाही हे कथन जरी खरे असले तरी मुळात त्यानेजी 15-7-04 ची पावती दिली आहे ती रु.1,20,000/-ची आहे. त्यात सुध्दा कोणत्या व्यवहारापोटी ते दिले हे कळून येत नाही. केवळ बिल्डरकडील पावती आहे म्हणजे त्याचा अर्थ ती पावती सदनिका खरेदी करण्यासाठीची आहे असा काढता येणार नाही. केवळ पावतीमुळे तो ग्राहक होत असल्याचे म्हणता येणार नाही. 4. त्यानंतर सुध्दा वेळोवेळी अनेक रकमा सामनेवालेंस दिल्या आहेत. त्याच्या पावत्या त्याने घेतलेल्या नाहीत. ही बा व्यवहार्य वाटत नाही. कोणतीही व्यवहारकुशल व्यक्ती अशा प्रकारे व्यवहार करणार नाही. जर त्याने पहिली रु.1,20,000/-ची पावती घेतली तर पुढील पावत्या का घेत्या नाहीत याबाबत त्याने दिलेले म्हणणे न पटणारे आहे. मंचाचे मते तक्रारदार केवळ आपल्याकडील पावतीचा गैरफायदा घेऊ इच्छित असल्याचे दिसून येत आहे. 5. तक्रारदार दुर्देवाने सामनेवाले व त्याचे दरम्यान ग्राहकाचे नाते प्रस्थापित करु शकला नाही. तसेच या तक्रारीस मुदतीचीही बाधा येत असल्याचे दिसून येते. या दोन्ही बाबीचा विचार करता ही तक्रार अँडमिशन स्टेजलाच नामंजूर करण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 6. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे- -ः आदेश ः- वर उल्लेख केलेल्या कारणास्तव तक्रारदाराची तक्रार दाखल करण्याच्या स्टेजलाच नामंजूर करुन निकाली करण्यात येत आहे. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदाराना पाठविण्यात यावी. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.15-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |