जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1377/2010.
तक्रार दाखल तारीखः- 08/11/2010
तक्रार निकाल तारीखः- 18/01/2013
श्रीमती.लता देविदास महाजन, ..........तक्रारदार.
उ व सज्ञान धंदा घरकाम.
रा.द्वारा – श्री.सुहास हुना बोरोले,
गट नं.102,प्लॉट नं.10,जीवरामनगर,
अशादिप बिल्डींग, जळगांव.
विरुध्द
प्रशासक साहेब, ......विरुध्दपक्ष.
श्री.चक्रधर मर्चंटस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि
विठठल मंदीर वार्ड, लहान मारोतीजवळ,भुसावळ जि.जळगांव.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन. सदस्य.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.के.एन.पाटील.
विरुध्दपक्ष एकतर्फा.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवलेली रक्कम मागणी करुन ही परत दिली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार श्री.चक्रधर मर्चंटस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
पावती क्र. | जमा रक्कम | ठेव तारीख | देय तारीख | देय रक्कम |
005611 | 50,000 | 13/04/06 | 12/10/06 | 52,952 |
6934 | 29,000 | 09/11/06 | 10/12/07 | 33,248 |
006935 | 25,000 | 09/11/06 | 10/12/07 | 28,662 |
006936 | 25,000 | 09/11/06 | 10/12/07 | 28,662 |
006937 | 25,000 | 09/11/06 | 10/12/07 | 28,662 |
007451 | 18,000 | 07/05/07 | 22/06/07 | 18,261 |
007452 | 18,000 | 07/0507 | 22/06/07 | 18,261 |
007453 | 18,000 | 07/05/07 | 22/06/07 | 18,261 |
007454 | 18,000 | 07/05/07 | 22/06/07 | 18,261 |
007455 | 18,000 | 07/05/07 | 22/06/07 | 18,261 |
007456 | 10,000 | 07/05/07 | 22/06/07 | 10,145 |
3. तक्रारदार यांनी बचत खात्यातील रक्कमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन मुदत ठेव पावतीतील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष यांना नोटीसची बजावणी झालेली आहे. परंतु ते मे.मंचात हजर नाहीत. त्यामुळे सदर प्रकरणांत एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी आमच्या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत
त्रुटी केली आहे काय? होय.
2 आदेश काय? खालीलप्रमाणे.
विवेचन
6. मुद्या क्र.1 – प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेमध्ये मुदतठेव खात्यात रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते व संस्थेने तक्रारदारास मागणी केल्यानंतर रक्कम देणे आवश्यक आहे. संस्थेने नियमित वसुली न केल्यामूळे संस्थेची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत राहीली नाही असे दिसुन येते. यावरुन तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 –– तक्रारदार यांनी त्यांच्या मुदतठेव खात्यामधील व्याजासह होणारी रक्कम प्रशासक,श्री.चक्रधर मर्चंटस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि, यांचेकडुन मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू प्रशासक हे शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष श्री.चक्रधर मर्चंटस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि, यांचेकडुन पतसंस्थेत जमा असलेली व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. पतसंस्थेच्या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.500/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
9. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरुध्द श्री.चक्रधर मर्चंटस को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि, यांनी तक्रारदार यांना वरील आदेश कलम 2 मध्ये नमुद केलेल्या मुदतठेव खात्यातील रक्कमेवर देय तारखेनंतर एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत तसेच दावा खर्चापोटी रु.1,000/- व मानसिक त्रासापोटी रु.500/- अदा करावेत.
(3) वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री..डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव