-- निकालपत्र --
(पारित दि. 28-07-2011)
द्वारा-श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा –
1 तक्रारकर्ता श्री. सुनिल मेघराज मुलचंदानी यांनी सदर ग्राहक तक्रार ही त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केलेल्या हिरो होण्डा पॅशन प्रो. गाडी संबंधी दाखल केली असून रुपये 63,050/- हे विरुध्द पक्ष यांच्याकडून व्याजासह मिळावे अशी मागणी केली आहे.
1
2 विरुध्द पक्ष क्रं. 3 त्यांच्या लेखी जबाबात म्हणात की, त्यांच्या सेवेत कोणतीही न्यूनता नसल्यामुळे सदर ग्राहक तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी दि. 23.06.2011 रोजी नि.क्रं. 11 ही पुरसीस देऊन विरुध्द पक्ष क्रं. 3 यांनी दिलेले लेखी उत्तर हे स्वतः करिता स्विकारलेले आहेत.
कारणे व निष्कर्ष
3 तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि. 1.2.2011 रोजी पॅशन प्रो. हे वाहन रु.51,050/- ला खरेदी केले.
4 तक्रारकर्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीपासूनच गाडीमध्ये सुरु न होण्याची समस्या होती व दि. 3.3.2011 रोजी वि.प.यांच्याकडे पहिली सर्व्हिसिंग करुन ही समस्या दूर न झाल्यामुळे दि. 23.04.2011 रोजी तक्रारकर्ता यांनी वि.प. यांना नोटीस दिले. मात्र वि.प.क्रं. 3 यांनी दि. 6.5.2011 रोजी नोटीसचे उत्तर देऊन गाडी दुरुस्त करण्यासाठी आणण्यास सांगितले असता तक्रारकर्ता यांनी गाडी वि.प.क्रं. 3 यांच्याकडे नेली नाही.
5 विरुध्द पक्ष यांच्याकडून दि. 3.5.2011 रोजी गाडीची दुसरी सर्व्हिसिंग करण्यात आली. तक्रारकर्ता यांच्यातर्फे त्यांच्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डर यांनी गाडीच्या सर्व्हिसिंगबद्दल पूर्ण समाधान असल्याचे मत व्यक्त करुन जॉब कार्डवर सही केली आहे.
6 तक्रारकर्ता यांनी दि. 3.3.2011 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 3 यांना मधुर कुरीयर सर्व्हीस मार्फत गाडीच्या समस्येबद्दल लेखी पत्र दिल्याचे म्हटले आहे. मात्र तक्रारकर्ता यांनी फक्त मधुर कुरीयर सर्व्हीसची रसीद रेकॉर्डवर दाखल केली आहे. परंतु लेखी तक्रारीची प्रत त्यांनी या प्रकरणात दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांनी वि.प.यांना असे पत्र दिले असल्याबद्दल साशकता निर्माण होते.
7 त.क. यांनी सदर वाहन हे दि. 1.2.2011 ला खरेदी केल्यानंतर दुस-या सर्व्हीसिंग म्हणजेच दि. 3.5.2011 पर्यंत एकूण 1879 कि.मी. चालले असल्यामुळे वाहन सुरु न होण्याची समस्या असल्याची बाब मान्य करता येत नाही. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांच्या सेवेत न्यूनता असल्याचे सिध्द करण्यास असमर्थ ठरले आहे.
7 असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.
(सौ.अलका उमेश पटेल) (श्रीमती प्रतिभा बाळकृष्ण पोटदुखे)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गोंदिया