Maharashtra

Nagpur

CC/200/2019

PRALHAD RAJARAMJI WANKHEDE - Complainant(s)

Versus

SHRI BHAYYAJI KHAIRKAR PRESIDENT LORD BUDDHA TELEVISION LTD THROUGH ITS PRESIDENT MANAGING DIRECTOR - Opp.Party(s)

ADV D. B. DHOBE

05 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/200/2019
( Date of Filing : 25 Mar 2019 )
 
1. PRALHAD RAJARAMJI WANKHEDE
PLOT NO 28 AND 29, JAI GURUDEO NAGAR, VINKAR COLONY, MANEWADA NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI BHAYYAJI KHAIRKAR PRESIDENT LORD BUDDHA TELEVISION LTD THROUGH ITS PRESIDENT MANAGING DIRECTOR
PRATHMESH VIHAR 3RD FLOOR, NEAR MARUTI SUZUKI SHOWROOM GREAT NAG ROAD, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI SACHIN MOON DIRECTOR
PRATHMESH VIHAR 3RD FLOOR, NEAR MARUTI SUZUKI SHOWROOM GREAT NAG ROAD, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
3. SHRI RAJU MOON DIRECTOR
PRATHMESH VIHAR 3RD FLOOR, NEAR MARUTI SUZUKI SHOWROOM GREAT NAG ROAD, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 05 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- मा. सुभाष रा. आजने, मा. सदस्‍य)

   

  1. तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-१९८६ चे कलम-१२ खाली विरुध्‍दपक्ष लॉर्ड बुध्‍दा टेलिव्‍हीजन प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे विरुध्‍द  गुंतवणूक केलेली रक्‍कम देय व्‍याजासह परत न केल्‍यामुळे दोषपूर्ण सेवे संबधाने ग्राहक मंचा समक्ष दाखल केली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे लॉर्ड बुद्धा टेलिव्‍हीजन लिमिटेड या कंपनीचे अध्‍यक्ष असुन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ हे कंपनीचे संचालक आहे. विरुध्‍द पक्ष हे प्रसारण केंद्र असुन  संपूर्ण भारतभर दुरदर्शचे प्रसारण करीत असतात. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी तक्रारकर्त्‍याशी दिनांक ११/२/२०१३ रोजी संपर्क साधला व त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रुपये १०००००/- कंपनीमध्‍ये मुदतीठेव मध्‍ये ठेवण्‍याबाबत सुचविले.  विरुध्‍द पक्ष कंपनीचे योजनेनुसार गुंतवणूक केलेल्‍या रकमेवर व्‍याज मिळणार होते. व  सदरची रक्‍कम ५ वर्षानंतर परत मिळणार होते.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष कंपनीला रुपये १०००००/- धनादेश क्रमांक २०९१२८ दिनांक ११/२/२०१३ अन्‍वये दिनांक ११/०२/२०१३ रोजी अदा केले. विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍याला त्‍याबाबतची पावती दिली. तक्रारकर्त्‍याने दिनांक ११/०२/२०१३ ते १०/०२/२०१८ या कालावधीकरीता रक्‍कम विरुध्‍द पक्ष कंपनीकडे गुंतवणूक केली होती. तक्रारकर्त्‍याने दिनांक ११/०२/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला व त्‍यांच्‍याकडे जमा असलेल्‍या रकमेची व्‍याजासह मागणी केली परंतु  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक १४/०२/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षाला पञ दिले व त्‍याव्‍दारे रकमेची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने रक्‍कम अदा न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत दिनांक १७/०९/२०१८ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीस प्राप्‍त होऊनही नोटीसची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना निर्देश द्यावे की, त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याची रक्‍कम रुपये १,००,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व त्‍या रकमेवर दिनांक ११/०२/२०१३ पासुन ९ टक्‍के  दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा  होईपर्यंत अदा करावी.
  2. तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये ५००००/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये २००००/-  विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  1. विरुध्‍दपक्ष क्रमांक १ ते ३ यांना मंचाचे मार्फत पाठविलेली रजि. नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचा समक्ष हजर झाले नाहीत. सबब दिनांक  १८/०७/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाद्वारे पारीत करण्‍यात आला.
  2.  तक्रारकर्त्‍याने मंचाचे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                         होय
  3. काय आदेश ?                                                                       अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रं. 1 ते 2 बाबत  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष कंपनी यांचेकडे रुपये १०००००/- धनादेश क्रमांक २०९१२८, दिनांक ११/०२/२०१३ अन्‍वये  गुंतविले होते. विरुध्‍द पक्ष कंपनी यांनी त्‍याबाबतची पावती तक्रारकर्त्‍याला अदा केली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २(१) दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये १०००००/- एवढी रक्‍कम गुंतवणुक केल्‍याची बाब सिद्ध होते. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे गुंतविलेली रक्‍कम परत मिळण्‍याकरीता विरुध्‍द पक्षाला दिनांक १४/०२/२०१८ रोजी पञ दिले व त्‍याव्‍दारे विरुध्‍द पक्षाकडे गुंतविलेल्‍या रकमेची व्‍याजासह मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या पञाची दखल घेतली नाही व रक्‍कमसुद्धा परत केली नाही ही विरुध्‍दपक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती दोषपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे. असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडुन गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पाञ आहे. सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

आदेश::

  1. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष लॉर्ड बुध्‍दा टेलिव्‍हीजन प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्ता यांनी गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये १,००,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व सदर रकमेवर दिनांक ११/०२/२०१३ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला  प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये २०,०००/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये १०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे.
  4. सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून ३० दिवसांचे आत करावे.
  5. उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत निःशुल्‍क उपलब्‍ध करुन द्यावी.
  6. तक्रारकर्ता यांना “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.