( आदेश पारित द्वारा- श्रीमती रोहीणी कुंडले, मा.अध्यक्षा )
आदेश
(पारीत दिनांक –14 डिसेंबर, 2012 )
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रृटी बाबत या मंचासमारे दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारदाराने सन 1993 मधे विरुध्द पक्षाकडून भुखंड क्रं.12,13,14,15 क्षेत्रफळ 1259.38 स्के.फुट प्रत्येकी, एकुण क्षेत्रफळ 5037/- स्के.फुट, नेरकर नगर नं.-3, ए, मौजा -कहकुही, खसरा नं.123, जिल्हा नागपूर, येथील प्लॉट् खरेदी करण्याचे ठरविले. त्याच्या चतुःसिमा पूर्वेस- रस्ता, पश्चिमेस दुसरी शेतजमिन, उत्तरेस-9 मीटरचा रस्ता, दक्षिणेस – रस्ता, भुखंडाची किंमत 14/5 प्रति चौरस फुट, व विकासाचा आकार 1 रु. प्रति चौ.फु. ठरला होता.
दिनांक 12/4/1994 ते 10/4/1997 या काळात तक्रारदाराने विरुध्द पक्षाला एकूण रुपये 53,000/- दिले. याबाबत पावत्या प्रकरणात दाखल आहे. उर्वरित रक्कम रुपये 17504/- विक्रीच्या वेळी देण्याचे ठरले होते म्हणुन तक्रारदाराने विक्री करुन देण्याची विरुध्द पक्षाला वारंवार विनंती केली. पण विरुध्द पक्षाने टाळाटाळ केली. शेवटी एप्रिल 2010 मध्ये विरुध्द पक्षाने उपरोक्त भुखंडाची विक्री करुन देण्यास स्पष्ट नकार दिला.
तक्रारदाराने दिंनाक 1/6/2010 रोजी विरुध्द पक्षाला भुखंड विक्री करुन द्यावी म्हणून वकीलामार्फत नोटीस दिली. विरुध्द पक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारदाराला नाईलाजाने मंचात तक्रार दाखल करुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे अथवा भुखंडापोटी स्विकारलेले रुपये 53,000/- दिनांक 4/8/1996 पासून 18 टक्के व्याजासह परत मिळावे. मानसिक त्रासापोटी व नुकसान भरपाई म्हणुन रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादी दाखल केली नाही. स्टॅम्पपेपरवरील करार, प्रस्तावीत नकाशा, रक्कम भरल्याच्या पावत्या, नोटीसची प्रत, इत्यादी दस्त दाखल आहेत.
सदर तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष हजर झाले व लेखी जवाब दाखल केला.
2. विरुध्द पक्षाचा प्राथमिक आक्षेप असा आहे की तक्रार अदखलपात्र, निरर्थक, निराधार आहे म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत तक्रारदाराला दंड करावा व तक्रार खारीज करावी. तक्रार 18 वर्षानंतर दाखल केल्याने कलम 24 अ अन्वये मुदतबाहय ठरते. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरत नाही. विरुध्द पक्ष व तक्रारदार यांच्यात कोणताही लेखी/तोडी व्यवहार झाला नाही. उभपक्षांमध्ये कोणताही करार झालेला नाही. पावत्या दिल्या नाहीत. रक्कम स्विकारली नाही.
विरुध्द पक्ष आपल्या जवाबात पुढे नमुद करतात की, तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्यांवर व्ही टी लांजेवारने त्यांच्या जवळील को-या पावत्यांचा दुरुपयोग केला त्या आहेत. तसेच परत परत त्याच पावत्या दाखल केल्या आहेत. तक्रारदाराची तक्रार खोटी व बनावट आहे म्हणुन खर्चासह खारीज करावी.
विरुध्द पक्षाने दाखल केलेला लेखी युक्तिवादात उपरोक्त सर्व मुद्दयांचे विवेचन तसेच उत्तरात नविन मुद्दे आढळतात.
विरुध्द पक्षाचे उत्तरास तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल करुन विरुध्द पक्षाचे उपरोक्त सर्व आरोप नाकबुल केले आहेत. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, भुखंड खरेदी संबंधाने झालेला करार व तक्रारदाराने भरलेल्या रक्कमांच्या पावत्या तक्रारदाराने दाखल केल्या आहेत. त्यावरुन व्यवहार/ करार झाल्याचे सिध्द होते. परंतु विरुध्द पक्षाला विक्री करुन द्यावयची नाही किंवा रक्कम ही परत करायची नाही म्हणुन विरुध्द पक्षाने बिनबुडाचे आरोप केले आहेत. तक्रारीस कारण विक्री करुन न दिल्याने सतत घडत आहे म्हणुन तक्रार मुदतीत आहे.
तक्रारदाराने दाखल केलेल्या लेखी युक्तिवादातही वरील मुद्दयांचे विवेचन आढळते.
उभयपक्षांचे वकील हजर. त्यांच्या युक्तिवाद ऐकला. तक्रारीत दाखल दस्तऐवज
तपासले त्यावरुन मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे
// नि री क्षणे व नि ष्क र्ष //
3. दिनांक 12/01/1994 रोजीच्या करारनाम्यावरुन व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये तक्रारीतील नमुद भुखंड खरेदी विक्रीचा व्यवहार / करार झाल्याचे स्पष्ट होते असा मंचाचा निष्कर्ष आहे.
तक्रारदाराने रक्कम भरल्याच्या एकुण 10 पावत्या तक्रारीत दाखल केल्या आहेत.
त्यांच्या तारखा व रक्कमा खालीलप्रमाणे
दिनांक रक्कम
12/1/94 5000/-
12/4/95 710/-
12/12/95 2000/-
23/7/95 8000/-
02/09/95 8000/-
8/11/95 3000/-
17/01/96 2000/-
09/03/96 2000/-
10/06/96 2000/-
04/08/96 5000/-
-----------
37710/-
एकुण 37,710/- भरलेले असतांना तक्रारदाराने तक्रारीत रुपये 53,000/- भरल्याचे नमुद केले आहे. त्याबाबत पुरावा दाखल केला नाही. तक्रारदाराने जास्त रक्कम भरली हे दर्शविण्यासाठी – त्याच त्याच पावत्या पून्हा-पून्हा (10 पावत्या) दाखल केल्या व मंचाची दिशाभूल करण्याची तक्रारदाराची ही कृती निश्चितच अयोग्य आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे.
तक्रारीस कारण दिनांक 12/01/1994 पासून सतत घडत आहे असे तक्रारदार म्हणतो परंतु दिनांक 1/06/2010 पर्यन्त 16 वर्षेपर्यन्त तक्रारदाराने लेखी स्वरुपात खरेदीखत करुन मिळण्यासाठी कोणताही पाठपूरावा केल्याचा दस्त प्रकरणात दाखल केला नाही. तक्रारदाराने शेवटचा हप्ता दिनांक 4/8/1996 रोजी रुपये 500/- भरल्याचे पावतीवरुन निष्पन्न होते. त्यानंतर तक्रारदाराने कोणतीही रक्कम भरल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही. दिनांक 4/08/1996 पासुन (शेवटचे पेमेंट ) तक्रारदाराने दोन वर्षाच्या आत तक्रार दाखल करायला पाहिले होते. तसेच तक्रारदाराने न केल्याने तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय (कलम 24 ए) ठरते असा मंचाचा निष्कर्ष आहे. दिनांक 1/06/2010 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्षाला नोटीस दिली. नोटीसच्या तारखेपासुन तक्रार मुदतीत असल्याचे दाखलविण्याचा तक्रारदाराने निष्फळ प्रयत्न केला आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे. त्यावरुन तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय म्हणुन खारीज करण्यायोग्य योग्य ठरते. विरुध्द पक्षाने मुदतीबाबत दाखल केलेला केस लॉ मंच ग्राहय मानते. तक्रारदाराने दाखल केलेला केस लॉ लागू होत नाही. म्हणुन तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय म्हणून खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाहीत.