नि. २९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या : श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.५९/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २८/१/२०१०
तक्रार दाखल तारीख : २/२/२०१०
निकाल तारीख : २७/९/२०११
-----------------------------------------------------------
श्री लक्ष्मण धोंडिबा हिरगुडे
रा.हिरगुडे मळा, सुभाषनगर रोड,
मिरज ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
जयसिंगपूर, शाखा मिरज, किल्ला भाग, मिरज
ता.मिरज जि.सांगली
२. श्री अजित आण्णासो देमापुरे,(चेअरमन)
रा.गट नं.९, जयसिंगपुर, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
३. श्री सिकंदर ईस्माईल गैबाण,(व्हा.चेअरमन)
रा.गट नं.९, जयसिंगपुर, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
४. श्री शरद श्रीपाल मगदूम,(संचालक)
रा.गट नं.६, जयसिंगपुर, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
५. श्री आण्णा बाबु परिट,(संचालक)
रा.नांदणी, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
६. श्री बापु आप्पा पुजारी,(संचालक)
रा.निमशिरगांव, ता.मिरज, जि. कोल्हापूर
७. श्री विद्याधर शामराव मिणचे,(संचालक)
रा.जयसिंगपुर, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
८. श्री अशोक भुपाल पाटील,(संचालक)
रा.आळते, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर
९. श्री महावीर बाळीशा सकाप्पा,(संचालक)
रा.दानोळी, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
१०. श्री पायगोंडा नरसगोंडा पाटील,(संचालक)
रा.निमशिरगांव ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
११. सौ राजमती महावीर मगदूम (महिला)
रा.निमशिरगांव ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
१२. सौ शांतीनाथ बापु चौगुले,(जनरल मॅनेजर)
रा.अब्दुल लाट, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
१३. सावकर दत्तू कांबळे,
रा.निमशिरगांव ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
१४. सुहास भाऊसो मुरगुंडे,
रा. जयसिंगपूर, ता.शिरोळ जि. कोल्हापूर ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री एम.एस.वजीर
जाबदार क्र.१ ते १४ – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपूर, शाखा मिरज, (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे मुदत बंद ठेवपावतीअन्वये रक्कम गुंतविलेली होती. सददचे ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमेची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण २ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते १४ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते ११ व १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. तसेच जाबदार क्र.१२ हे संस्थेचे कर्मचारी असलेमुळे त्यांनाही तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देणेस संयुक्तिक अगर वैयक्तिक जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
४. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांना त्यांचे मुदत बंद ठेवपावती क्र.ए ००४१०६ या ठेवीवर आजअखेर व्याज देणेत आलेले नाही असे तक्रारदार यांनी त्यांचे नि.२७ चे व्याजनिवेदनामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे या ठेवीतील गुंतविलेली मूळ रक्कम रु.४०,०००/- ठेव ठेवल्याचे तारखेपासून म्हणजे दि.३/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत बंद ठेव पावती क्र.ए००४१०६ मधील रक्कम रु.४०,०००/- व या रकमेवर दि. ३/८/२००६ पासून संपूर्ण ठेवीचे रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.९.५ टक्के दराने व्याज अदा करावे.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.११/११/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक : २७/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११