जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३२१/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०३/११/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २१/०७/२०१४
१) श्री.रितेश अशोक जैन, वय – १२ धंदा - शेती
२) श्री.जितेंद्र अशोक जैन, वय – २४ धंदा - शेती
३) श्री.पंकज अशोक जैन, वय – २६ धंदा – शेती
सर्व रा.वरखेडे, ता.जि.धुळे. . तक्रारदार
विरुध्द
१) श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
ग.नं.३ व ४ ची बोळ, काद्रीशॉपच्या मागिल बाजुस, धुळे.
(जाबदेणार नं.१ ची नोटीस, जाबदेणार नं.२ वर बजवावी)
२) व्यवस्थापक, श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
ग.नं.३ व ४ ची बोळ, काद्रीशॉपच्या मागिल बाजुस, धुळे.
३) श्री.बिपीन भैरुलाल खिवसरा, संचालक - चेअरमन
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
रा.महावीर ज्वेलर्स, सराफ बाजार, आग्रारोड, धुळे.
४) श्री.निलेश नंदलाल रूणवाल, संचालक
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे,
रा.जैन मेडिकल, सराफबजार, आग्रारोड, धुळे.
५) श्री.देवेंद्र गोपाळकृष्ण खंडेलवाल, संचालक
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
रा.राघव एजंसी, पुर्ती बिल्डिंग, आग्रारोड, धुळे.
६) श्री.संजय भगवानदास कानुगो, संचालक
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
रा.बालाजी अपार्टमेंट, महाविर हाऊसिंग सोसा.,
सोसायटी पेट्रोल पंपाजवळ,मालेगांव रोड,धुळे.
७) श्री.चेतन प्रकाशचंद मांडोरे, संचालक
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
रा.सरदार सोप, जैन मंदिराजवळ, ग.नं.२, धुळे
८) श्री.पंकज दिपक अग्रवाल, संचालक
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
रा.प्लॉट नं.२१, दिपतारा, अभयनगर, मालेगांवरोड, धुळे
९) सौ.रेखा अशोक ओसवाल, संचालक
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
रा.रौनक ट्रेडिंग कंपनी, ऊसगल्ली,धुळे
१०) म.अध्यक्ष साहेब, प्रशासक मंडळ/प्रशासक साहेब
श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे
ग.नं.३ व ४ ची बोळ, काद्रीशॉपच्या मागिल बाजुस, धुळे. . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.बी.जैन)
(सामनेवाला क्र.४ तर्फे – अॅड.श्री.एस.सी.जैन)
(सामनेवाला क्र.७ तर्फे – अॅड.श्री.ए.पी.बरडे)
(सामनेवाला क्र.१,२,३,५,६,८,९ व १० तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावतींमध्ये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘श्री.भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे’ या पतसंस्थेत मुदतठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
पावती क्रमांक | ठेवलेली रक्कम | व्याज दर | ठेविदाराचे नांव | ठेविची तारीख |
२४९४ | १४,०००/- | ११% | रितेश अशोक जैन | १६/१२/०५ |
२४९५ | १४,०००/- | ११% | जितेंद्र अशोक जैन | १६/१२/०५ |
२४९६ | १५,०००/- | ११% | पंकज अशोक जैन | १६/१२/०५ |
१७५८ | १२,०००/- | ११% | पंकज अशोक जैन | २३/०६/०९ |
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी देय रक्कम. तसेच शारिरिक, मानसिक, आर्थिेक नुकसानापोटी रक्कम रू.२०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मुदतठेव पावतींच्या छायांकीत प्रती नि.५/१ ते नि.५/४ वर दाखल केलेल्या आहे.
५. सामनेवाले क्र.४ यांनी मंचात हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, सदर तक्रार ग्राहक मंचात चालू शकत नाही. तक्रारदाराने रक्कम संस्थेत ठेवल्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. तसेच रिट याचिका क्र.५२२३/०९ मध्ये संचालक यांना वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही म्हणून तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
६. सामनेवाले क्र.७ यांनी मंचात हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, त्यांनी पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दि.०१/०४/२००८ रोजी दिलेला आहे व तो पतसंस्थेने स्विकारला आहे, त्यामुळे त्यांच्याविरूध्दची तक्रार फेटाळण्यात यावी. सदर तक्रार ग्राहक मंचात चालू शकत नाही. तक्रारदाराने रक्कम संस्थेत ठेवल्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. तसेच रिट याचिका क्र.५२२३/०९ मध्ये संचालक यांना वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही म्हणून तक्रार रद्द करावी अशी विनंती केली आहे.
७. सामनेवाले नं.१,२,३,५,६,८,९ व १० यांना नोटीस व पेपर नोटीस तर्फे बजावणी झालेली आहे. परंतु सामनेवाले हे सततगैरहजर असल्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्यात आला.
८. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकिलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
त्रुटी केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून देय रक्कम
व्याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
९. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी मुदतठेव पावतींच्या छायांकीत प्रती नि.५/१ ते नि.५/४ वर दाखल केलेल्या आहे. त्यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ब’ - प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदतठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘चेअरमन, संचालक, व्यवस्थापक व प्रशासक’ श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाले यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. सामनेवाले क्र.२ हे पतसंस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांचा प्रत्यक्षरित्या पतसंस्थेच्या व्यवहारात संबंध नसल्याने त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तसेच सामनेवाले क्र.१० हे शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना तक्रारदारांची रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्था श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे यांचेकडून मुदतठेव पावती क्र.२४९४,२४९५,२४९६ या पावतींमध्ये तक्रारदार यांनी पुढील तारखेस सदर पावत्या नुतणीकरण केलेल्या असून त्याप्रमाणे त्यांची देय तारीख २२/०२/२०१० अशी आहे. याप्रमाणे यामधील एकूण रक्कम रूपये ६७,०२७/- वर दिनांक २२/०२/२०१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज आणि मुदतठेव पावती क्र.१७५८ मधील रक्कम रूपये १२,८८२/- वर दिनांक २३/०२/२०१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला पतसंस्था श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत धुळे यांनी, तक्रारदार यांना सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांच्या आत खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
(अ) मुदतठेव पावती क्र.२४९४,२४९५,२४९६ मधील एकूण रक्कम रूपये ६७,०२७/- (सदुसष्ठ हजार सत्तावीस मात्र) वर दिनांक २२/०२/२०१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(ब) मुदतठेव पावती क्र.१७५८ मधील रक्कम रूपये १२,८८२/- वर दिनांक २३/०२/२०१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये २,०००/- (अक्षरी रूपये दोन मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रूपये १,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) द्यावे.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेच क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.