Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/17/159

Shri Vijay Krushnaji Daware - Complainant(s)

Versus

Shri Bandu Gopalrao Bondade, Prop. Bondade Developers and Builders - Opp.Party(s)

Adv. Nilesh Pund & Adv. D.T.Lodhi

15 May 2018

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/17/159
( Date of Filing : 18 Aug 2017 )
 
1. Shri Vijay Krushnaji Daware
R/o. Nildoh, MIDC Hingna, Dist. Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Bandu Gopalrao Bondade, Prop. Bondade Developers and Builders
Office- Shop No. 22, Panchwati Park, Tah. Hingna, Dist. Nagpur AND R/o. Kinhi Dhanoli, Tah. Hingna, Dist. Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 15 May 2018
Final Order / Judgement

                        ::निकालपत्र::

                                                             (पारीत व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्‍या.)

                                                                      (पारीत दिनांक 15 मे, 2018)                 

 

01.   उपरोक्‍त नमुद दोन्‍ही तक्रारदारांनी अतिरिक्‍त ग्राहक मंच, नागपूर  समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्‍या तक्रारी हया जरी स्‍वतंत्ररित्‍या वेगवेगळया दाखल केलेल्‍या असल्‍या, तरी नमुद तक्रारींमधील विरुध्‍दपक्ष हे एकच   आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता, ज्‍या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया दोन्‍ही तक्रारी निकाली निघणार आहेत, त्‍या कायदे विषयक तरतुदी सुध्‍दा नमुद तक्रारींमध्‍ये एक सारख्‍याच आहेत आणि म्‍हणून आम्‍ही नमुद दोन्‍ही  तक्रारीं  मध्‍ये एकत्रितरित्‍या निकाल पारीत करीत आहोत. नमुद तक्रारी या विरुध्‍दपक्ष बोंदाडे डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स, हिंगणा, तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर फर्म तर्फे प्रोप्रायटर बंडू बोंदाडे याचे विरुध्‍द असून नमुद तक्रारदारानीं प्रस्‍तावित मौजा रायपूर, तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-45, खसरा क्रं-87 ले आऊट मधील आरक्षीत केलेल्‍या भूखंडांचे विक्रीपत्र विरुध्‍दपक्षानीं नोंदवून दिले नाही या कारणास्‍तव दाखल केलेल्‍या आहेत.

 

02.   तक्रारदारांचे संक्षीप्‍त कथन खालील प्रमाणे-

      विरुध्‍दपक्ष बंडू बोंदाडे हा प्रोप्रायटर म्‍हणून बोंदाडे डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स, हिंगणा, नागपूर या फर्मचे नावाने भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करीत असून  त्‍याने त्‍याचे मालकीच्‍या मौजा रायपूर, तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-45, खसरा क्रं-87 या ले आऊट मधील भूखंड विक्रीची योजना सुरु केली. उपरोक्‍त नमुद दोन्‍ही क्रारदारांना घर बांधण्‍यासाठी भूखंडाची आवश्‍यकता होती, त्‍या नुसार त्‍यांनी विरुध्‍दपक्षाशी संपर्क साधला, विरुध्‍दपक्षाने त्‍यांना ले आऊटची माहिती दिली तसेच नकाशा दाखविला त्‍यावरुन त्‍यांनी विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित ले आऊट मधील भूखंड खरेदी करण्‍यासाठी आरक्षीत केलेत त्‍याचा तपशिल परिशिष्‍ट- अ मध्‍ये दर्शविल्‍या नुसार खालील प्रमाणे-

                                 परिशिष्‍ट-अ

अक्रं

ग्राहक तक्रार क्रमांक

तक्रारकर्त्‍याचे नाव

 भूखंड करारनामा / बयाना पत्र  केल्‍याचा  दिनांक

भूखंड क्रंमाक व खसरा क्रं

भूखंडाचे क्षेत्रफळ व भूखंडाचा दर प्रतीचौरसफूट

भूखंडाची एकूण किम्‍मत

दाखल पावत्‍यां वरुन भूखंडापोटी वेळोवेळी अदा केलेली एकूण रक्‍कम

शेवटची किस्‍त अदा केल्‍याचा दिनांक

1

2

3

4

5

6

7

8

9

01

CC/17/158

श्री संजय डोमाजी बडवाईक.

01/01/2013

130

ख.क्रं-87

831

Sq.Ft.

 

2,49,300/-

2,49,300/-

15/07/15

02

CC/17/159

श्री विजय कृष्‍णाजी डवरे.

01/01/2013

130

ख.क्रं-87

831

Sq.Ft.

 

 

2,49,300/-

2,21,000/-

17/06/15

 

    तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी उपरोक्‍त नमुद            परिशिष्‍ट अ मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्षा कडे भूखंड आरक्षीत करुन वेळोवेळी रक्‍कमा भरुन पावत्‍या प्राप्‍त केल्‍यात तसेच  विरुध्‍दपक्षाने भूखंडाचे बयानापत्र सुध्‍दा नोंदवून दिले.  त्‍यानंतर तक्रारदारानीं वेळोवेळी विरुध्‍दपक्षास  बयानापत्रा प्रमाणे उर्वरीत रक्‍कम स्विकारुन भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍याची विनंती केली असता विरुध्‍दपक्षाने योग्‍य प्रतिसाद दिला नाही. शेवटी तक्रारदारानीं विरुध्‍दपक्षास दिनांक-22/06/2017 रोजीची कायदेशीर   नोटीस पाठवून विक्रीपत्र नोंदवून देण्‍यास सुचित केले परंतु विरुध्‍दपक्षाने नोटीसला उत्‍तर दिले नाही वा नोटीसवर कोणतीही कार्यवाही केली नाही. विरुध्‍दपक्षास वेळोवेळी रक्‍कम अदा करुनही तक्रारदार भूखंड विक्री पासून वंचित राहिलेत त्‍यामुळे त्‍यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विरुध्‍दपक्षा कडून भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून मिळणे शक्‍य नाही अशी तक्रारदारांची खात्री पटल्‍या नंतर त्‍यांनी शेवटी अतिरिक्‍त ग्राहक मंच, नागपूर येथे प्रस्‍तुत तक्रारी दाखल केल्‍यात.

       

        सबब या तक्रारीं व्‍दारे दोन्‍ही तक्रारदारांनी खालील प्रमाणे  विनंती केली आहे की-

(1)    विरुध्‍दपक्षाचे मालकीचे  मौजे रायपूर तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-45, खसरा क्रं-87 मधील प्रस्‍तावित ले आऊट ले आऊट बाबत एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्‍त करुन तक्रारदारानीं आरक्षीत केलेल्‍या भूखंडाचे ग्राहक तक्रार क्रं-CC/17/158 मधील तक्रारदार               श्री संजय डोमाजी बडवाईक यांनी भूखंडाची संपूर्ण रक्‍कम दिलेली असल्‍याने तसेच ग्राहक तक्रार क्रं-CC/17/159 मधील तक्रारदार             श्री विजय कृष्‍णाजी डवरे यांचे कडून भूखंडाची उर्वरीत घेणे असलेली रक्‍कम रुपये-28,300/- प्राप्‍त करुन  त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या नावे करारा प्रमाणे नमुद भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून देऊन प्रत्‍यक्ष्‍य मोजणी करुन ताबे देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

(2)   किंवा  उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे  विरुध्‍दपक्षास भूखंडाचे विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसल्‍यास उपरोक्‍त परिशिष्‍ट- अ मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारदारांनी भूखंडापोटी भरलेली रक्‍कम वार्षिक-24% दराने व्‍याजासह  विरुध्‍दपक्षास  त्‍या-त्‍या तक्रारदारांना परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(3)   तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी रुपये-25,000/-, विरुध्‍दपक्षाच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे प्रत्‍येकी रुपये-25,000/- आणि तक्रारीचा खर्च आणि इतर खर्च म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-20,000/- या प्रमाणे रकमा विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.   अतिरिक्‍त ग्राहक मंचाचे मार्फतीने तक्रारनिहाय विरुध्‍दपक्षाचे नाव आणि पत्‍त्‍यावर  रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता, नोटीस मिळाल्‍या बाबतच्‍या पोच अभिलेखावर दाखल आहेत, परंतु नोटीस प्राप्‍त होऊनही तो मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्‍याने आपले लेखी निवेदनही दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्षा विरुध्‍द उपरोक्‍त नमुद प्रकरणां मध्‍ये तक्रार एकतर्फी चालविण्‍याचे आदेश दिनांक-09/11/2017 रोजी अतिरिक्‍त ग्राहक मंचाने प्रकरण निहाय पारीत केलेत.

      विरुध्‍दपक्षाने अतिरिक्‍त ग्राहक मंचाने त्‍याचे विरुध्‍द पारीत केलेल्‍या एकतर्फी आदेशा विरुध्‍द मा.राज्‍य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ, नागपूर यांचे समोर तक्रारनिहाय अनुक्रमे Revision Petition No.-RP/18/6 & RP/18/2 दाखल केल्‍यात, त्‍या रिव्‍हीजन पिटीशन्‍स मध्‍ये मा.राज्‍य आयोगाने दिनांक-22/02/2018 रोजी आदेश पारीत करुन विरुध्‍दपक्षास असे आदेशित केले की, त्‍याने प्रत्‍येक तक्रारकर्त्‍याला रुपये-10,000/- प्रमाणे खर्चा दाखल डिमांड ड्रॉफ्टव्‍दारे  अथवा अतिरिक्‍त ग्राहक मंच, नागपूर येथे रक्‍कम दिनांक-27/03/2018 रोजी किंवा तत्‍पूर्वी जमा करावी, अशी रक्‍कम मिळविण्‍याचे अधिकार त्‍या-त्‍या तक्रारकर्त्‍याला राहतील. विरुध्‍दपक्षाने मा.आयोगाचे आदेशा नुसार रक्‍कमा दिल्‍यास/जमा केल्‍यास त्‍याला उत्‍तर दाखल करण्‍यासाठी अतिरिक्‍त मंचाने योग्‍य तो वेळ द्दावा परंतु विरुध्‍दपक्षाने दिनांक-27/03/2018 पर्यंत आदेशा नुसार रक्‍कमा न भरल्‍यास रिव्‍हीजन पिटीशन मधील आदेश  विरुध्‍दपक्षास लागू होणार नसून त्‍यानंतर अतिरिक्‍त मंचाने कायद्दा नुसार तक्रारी निकाली काढाव्‍यात असे आदेशित करण्‍यात आले.

      परंतु विरुध्‍दपक्षाने मा.राज्‍य ग्राहक आयोगा समोरील रिव्‍हीजन पिटीशन मधील आदेशाचे अनुपालन दिनांक-27/03/2018 पर्यंत विहित मुदतीत केले नसल्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द अतिरिक्‍त ग्राहक मंचाने तक्रारनिहाय एकतर्फी पारीत केलेल्‍या आदेशांना कायमस्‍वरुप प्राप्‍त झालेले आहे.

 

04.   उपरोक्‍त नमुद तक्रारीं मध्‍ये तक्रारदारां तर्फे वकील श्री निलेश पुंड यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. विरुध्‍दपक्षा तर्फे मौखीक युक्‍तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्‍हते, त्‍याचे विरुध्‍द प्रकरणां मध्‍ये अगोदरच एकतर्फी आदेश पारीत करण्‍यात आलेला होता. तक्रारदारांची तक्रार, विरुध्‍दपक्षाने करुन दिलेल्‍या भूखंड बयानाच्‍या प्रती, भूखंडाच्‍या रकमा विरुध्‍दपक्षाला दिल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष फर्म तर्फे निर्गमित दाखल पावत्‍यांच्‍या प्रती आणि तक्रारदारां तर्फे तक्रारनिहाय लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करण्‍यात आले, यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचा तर्फे खालील प्रमाणे निष्‍कर्ष देण्‍यात येतो-

 

                          ::निष्‍कर्ष::

 

05.  तक्रारदारांच्‍या तक्रारी सत्‍यापनावर दाखल आहेत. विरुध्‍दपक्षाला अतिरिक्‍त ग्राहक मंचाचे मार्फतीने तक्रार निहाय नोंदणीकृत डाकेने पाठविलेल्‍या नोटीस मिळाल्‍या बाबत पोस्‍टाच्‍या पोच अभिलेखावर दाखल आहेत परंतु विरुध्‍दपक्ष हा अतिरिक्‍त मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्‍याने आपले लेखी निवेदनही दाखल केलेले नाही वा तक्रारदारांनी तक्रारीतून त्‍याचे विरुध्‍द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत.  किंवा अतिरिक्‍त ग्राहक मंच, नागपूर यांनी  विरुध्‍दपक्षा विरुध्‍द पारीत केलेल्‍या एकतर्फी आदेशा विरुध्‍द मा.राज्‍य ग्राहक आयोगा समोरील रिव्‍हीजन पिटीशन मधील आदेशाचे अनुपालन दिनांक-27/03/2018 पर्यंत  विरुध्‍दपक्षाने विहित मुदतीत केलेले नसल्‍याने अतिरिक्‍त ग्राहक मंचाचे विरुध्‍दपक्षा विरुध्‍दचे एकतर्फी आदेशास कायमस्‍वरुप प्राप्‍त झालेले आहे.

 

06.   या उलट, तक्रारदारांनी तक्रार निहाय त्‍यांचे कथनाचे पुराव्‍यार्थ विरुध्‍दपक्ष बोंदाडे डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स तर्फे भागीदार बंडू गोपालराव बोंदाडे याने तक्रारदारांच्‍या नावे करुन दिलेल्‍या भूखंड करारनाम्‍याच्‍या प्रती, विरुध्‍दपक्ष बोंदाडे  डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स नागपूर तर्फे तक्रारदारांच्‍या नावे निर्गमित पावत्‍यांच्‍या प्रती, तसेच विरुध्‍दपक्षास दिनांक-22/06/2017 रोजी नोंदणीकृत डाकेने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, पोस्‍टाच्‍या पावत्‍या, पोच पुराव्‍या दाखल सादर केलेल्‍या आहेत, या पुराव्‍यां वरुन तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथनाला बळकटी प्राप्‍त होते.

 

 

07.   तक्रारदारांच्‍या तक्रारी या मुदतीत आहेत,  या संदर्भात हे  ग्राहक मंच पुढील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निवाडयावर आपली भिस्‍त ठेवीत आहे-

 

      “Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti Kumar & Ors.”- 2005(2) CPR-1 (NC).

    सदर निवाडयामध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्‍जा संबधित ग्राहकास देण्‍यास किंवा त्‍याने जमा केलेली रक्‍कम परत करण्‍यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात  असेही   नमुद  केले  आहे की,  जर  भूखंडाचा  विकास  करण्‍यास विकासक/बांधकाम व्‍यवसायिक काही प्रयत्‍न करीत नसेल किंवा त्‍याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्‍ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्‍यामुळे असा आक्षेप जर विरुध्‍दपक्ष घेत असेल तर त्‍या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्‍याची गरज नसते.

 

08.    विरुध्‍दपक्ष बोंदाडे डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स, नागपूर तर्फे भागीदार बंडू गोपालराव बोंदाडे याने तक्रारदार व ईतरानां भूखंड विकत घेण्‍या बद्दल प्रवृत्‍त केले आणि त्‍यांचे कडून पैसे स्विकारुन त्‍यांची फसवणूक केली हे स्‍पष्‍ट दिसून येते. विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित मौजे रायपूर, तालुका हिंगणा, जिल्‍हा नागपूर या ले आऊटची सद्दस्थिती काय आहे या बाबतचे कोणतेही दस्‍तऐवज अतिरिक्‍त ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेले नाहीत, त्‍या ले आऊटला अकृषक मंजूरी तसेच नगररचना विभागा कडून ले आऊटच्‍या नकाशाला मंजूरी मिळाली किंवा नाही हे दस्‍तऐवजा अभावी समजून येत नाही.  ग्राहक तक्रार क्रं-CC/17/158 मधील तक्रारदार श्री संजय डोमाजी बडवाईक यांनी करारा प्रमाणे संपूर्ण भूखंडाची किम्‍मत रुपये-2,49,300/- विरुध्‍दपक्षाला अदा केलेली आहे तर ग्राहक तक्रार क्रं-CC/17/159 मधील तक्रारदार श्री विजय कृष्‍णाजी डवरे यांनी करारा नुसार भूखंडाची एकूण किम्‍मत रुपये-2,49,300/- पैकी रुपये-2,21,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्षास दिलेली असून उर्वरीत अत्‍यल्‍प रक्‍कम रुपये-28,300/- त्‍यांना विरुध्‍दपक्षाला देणे बाकी आहे आणि करारा नुसार उर्वरीत रक्‍कम देऊन ते भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍यास तयार होते व आहेत परंतु प्रत्‍यक्ष्‍य वेळोवेळी भेटी देऊन, रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठवूनही विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना आज पर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्‍यामुळे ग्राहक तक्रार क्रं-CC/17/158 मधील तक्रारदाराने भूखंडाची संपूर्ण किम्‍मत अदा केलेली असल्‍याने आणि ग्राहक तक्रार क्रं-CC/17/159 मधील तक्रारदार हे भूखंडाची उर्वरीत रक्‍कम देऊन एन.ए./टी.पी.मंजूरी प्राप्‍त भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्‍दपक्षा कडून नोंदवून मिळण्‍यास पात्र आहेत. विक्रीपत्र नोंदणीसाठी लागणा-या मुद्रांकशुल्‍क आणि नोंदणी फी चा खर्च तक्रारदारांनी सहन करावा. तसेच शासनमान्‍य देय विकासशुल्‍काच्‍या रकमेचा खर्च त्‍या त्‍या तक्रारदारानीं सहन करावा. परंतु  काही कायदेशीर तांत्रिक कारणास्‍तव जर विरुध्‍दपक्ष हा भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारदारांचे नावे नोंदवून देण्‍यास असमर्थ असल्‍यास तर त्‍या परिस्थितीत निकालपत्र पारीत दिनांक-15/05/2018 रोजी महाराष्‍ट्र शासनाचे नोंदणी व मुद्रांकशुल्‍क विभागाचे शिघ्रगणक पत्रका (रेडीरेकनर) नुसार त्‍या भागातील अकृषक भूखंडाचे जे दर आहेत, त्‍या दरा प्रमाणे येणारी रक्‍कम विरुध्‍दपक्षा कडून परत मिळण्‍यास उभय तक्रारदार हे पात्र आहेत. मात्र ग्राहक क्रमांक-CC/17/159 मधील तक्रारकर्ता श्री विजय कृष्‍णाजी डवरे यांना अद्दापही विरुध्‍दपक्षास भूखंडापोटी रुपये-28,300/- एवढी रक्‍कम देणे बाकी असल्‍याने तेवढी रक्‍कम कपात करुन नमुद केल्‍या नुसार उर्वरीत रक्‍कम विरुध्‍दपक्षा कडून मिळण्‍यास ते पात्र आहेत. तसेच विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे उभय तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी  रुपये-15,000/- आणि तक्रारखर्च प्रत्‍येकी रुपये-5000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळण्‍यास उभय तक्रारदार हे पात्र आहेत. 

 

09.    वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, नमुद दोन्‍ही तक्रारीं मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                  ::आदेश::

(1)    उपरोक्‍त नमुद दोन्‍ही तक्रारदारांच्‍या तक्रारी, विरुध्‍दपक्ष बोंदाडे डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स, न्‍यु बस स्‍टॉप जवळ, हिंगणा, नागपूर तर्फे भागीदार/प्रोप्रायटर बंडू गोपालराव बोंदाडे याचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येतात.

(2)     विरुध्‍दपक्षाला आदेशित करण्‍यात येते की, ग्राहक तक्रार क्रं-CC/17/158 मधील तक्रारकर्ता श्री संजय डोमाजी बडवाईक यांचे कडून करारा प्रमाणे संपूर्ण भूखंडाची किम्‍मत रुपये-2,49,300/- विरुध्‍दपक्षाला प्राप्‍त झालेली असल्‍यामुळे तसेच ग्राहक तक्रार क्रं-CC/17/159 मधील तक्रारदार  श्री विजय कृष्‍णाजी डवरे यांनी करारा नुसार भूखंडाची एकूण किम्‍मत रुपये-2,49,300/- पैकी रुपये-2,21,000/- एवढी रक्‍कम विरुध्‍दपक्षास दिलेली असून उर्वरीत  रक्‍कम रुपये-28,300/- (अक्षरी उर्वरीत रक्‍कम रुपये अठ्ठाविस हजार तीनशे फक्‍त) त्‍यांचे कडून स्विकारुन दोन्‍ही तक्रारदारांना करारा नुसार त्‍यांचे-त्‍यांचे एन.ए./टी.पी. मंजूरी प्राप्‍त भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देऊन प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर मोजणी करुन भूखंडाचे ताबे द्दावेत व ताबापत्र द्दावेत. विक्रीपत्र नोंदणीसाठी लागणा-या मुद्रांकशुल्‍क आणि नोंदणी फी चा खर्च  त्‍या-त्‍या तक्रारदारांनी सहन करावा. तसेच शासनमान्‍य देय विकासशुल्‍काच्‍या रकमेचा खर्च त्‍या त्‍या तक्रारदारानीं सहन करावा. 

(3)    परंतु काही कायदेशीर तांत्रिक कारणास्‍तव जर विरुध्‍दपक्ष हा भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारदारांचे नावे नोंदवून देण्‍यास असमर्थ असल्‍यास त्‍याच परिस्थितीत निकालपत्र पारीत दिनांक-15/05/2018 रोजी महाराष्‍ट्र शासनाचे नोंदणी व मुद्रांकशुल्‍क विभागाचे शिघ्रगणक पत्रका (रेडीरेकनर) नुसार त्‍या भागातील अकृषक भूखंडाचे जे दर आहेत, त्‍या दरा प्रमाणे करारा प्रमाणे नमुद भूखंडांची येणारी रक्‍कम विरुध्‍दपक्षाने उभय तक्रारदारांना परत करावी. मात्र ग्राहक क्रमांक-CC/17/159 मधील तक्रारकर्ता श्री विजय कृष्‍णाजी डवरे यांना अद्दापही करारा प्रमाणे विरुध्‍दपक्षास भूखंडापोटी रुपये-28,300/- (अक्षरी उर्वरीत रक्‍कम रुपये अठ्ठाविस हजार तीनशे फक्‍त) एवढी रक्‍कम देणे बाकी असल्‍याने उपरोक्‍त नमुद हिशोबा प्रमाणे येणा-या रकमे मधून त्‍यांना विरुध्‍दपक्षास देणे असलेल्‍या  रक्‍कमेची कपात करुन उर्वरीत रक्‍कम विरुध्‍दपक्षाने त्‍यांना परत करावी.

(4)     तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्‍येकी रुपये-15,000/- (अक्षरी प्रत्‍येकी रुपये पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून प्रत्‍येकी रुपये-5000/- (अक्षरी प्रत्‍येकी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना द्दावेत.

 (5)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष बोंदाडे डेव्‍हलपर्स एवं बिल्‍डर्स, हिंगणा, नागपूर या संस्‍थे तर्फे भागीदार/प्रोप्रायटर बंडू गोपालराव बोंदाडे याने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे.

(6)    निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन     देण्‍यात याव्‍यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार  क्रं-CC/17/158 मध्‍ये लावण्‍यात यावी आणि दुस-या ग्राहक तक्रारी  मध्‍ये निकालपत्राची प्रमाणित प्रत लावण्‍यात यावी.                

              

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.