सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 92/2009
तक्रार दाखल झाल्याचा दि.05/11/2009.
तक्रार निकाल झाल्याचा दि. 13/01/2010
श्री प्रभाकर वामन शेंडे
वय सुमारे 49 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.घर नं.1049, कृष्णलीला, पांडवनगर,
नाचणे, ता.जि. रत्नागिरी ... तक्रारदार
विरुध्द
श्री बांदेश्वर ग्रामीण बिगर शेती
सहकारी पतसंस्था मर्यादीत बांदा,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
करीता -
1) शाखा व्यवस्थापक,
श्री राकेश किसनदास केसरकर
वय सु.40 वर्षे, व्यवसाय – नोकरी
रा.आळवाडा, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
2) चेअरमन,
श्री प्रकाश पांडुरंग कामत
वय सु.50 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.देऊळवाडा, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
3) व्हाईस चेअरमन,
श्री विशांत रमेश पांगम
वय सु.36 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.मोर्येवाडा, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
4) संचालक,
श्री अभय दत्ताराम सातार्डेकर
वय सु.40 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.मोर्येवाडा, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
5) संचालक,
श्री अजय शंकर महाजन
वय सु.38 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.रामनगर, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ...विरुध्द पक्ष
6) संचालक,
श्री गोविंद अरविंद भांगले
वय सु.36 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.उभा बाजार, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
7) संचालक,
श्री दिलीप शांताराम नाटेकर
वय सु.52 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.उभा बाजार, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
8) संचालक,
श्री अनय पांडुरंग स्वार
वय सु.45 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.उभा बाजार, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
9) संचालक,
श्री श्रीप्रसाद गुरुनाथ वाळके
वय सु.40 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.उभा बाजार, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
10) संचालक,
श्री चंद्रकांत आनाजी कदम
वय सु.48 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा.हॉस्पिटल कट्टा, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
11) संचालक,
श्री किशोर कुशा बांदेकर
वय सु.34 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा. हॉस्पिटल कट्टा, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
12) संचालक,
श्री विद्याधर राधाकृष्ण पडते
वय सु.45 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा. गणेश नगर, वाफोली, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
13) संचालक,
श्री अशोक तुकाराम मोरे
वय सु.43 वर्षे, व्यवसाय – व्यापार
रा. जुना स्टँड, बांदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
14) संचालक,
सौ.पुनम शांताराम काणेकर ...विरुध्द पक्ष
वय सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा. उभा बाजार, बांदा, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का गावकर, सदस्या,
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री व्ही. एस्.. राऊळ व श्री पी.जी. काळसेकर
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री.एस्.जी. मसुरकर
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्रीमती वफा खान, सदस्या.)
नि का ल प त्र
(दि.13/01/2010)
1) विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेमध्ये गुंतविलेल्या ठेवींची रक्कम मागणी करुनही विरुध्द पक्षाने दिली नसल्यामुळे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांचे विरुध्द सदरचा अर्ज दाखल केला आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार हे पूर्वी व्यवसायाचे निमित्ताने मु.पो. इन्सुली, ता. सावंतवाडी येथे वास्तव्यास होते. त्यावेळी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेमध्ये दि.05/02/2005 रोजी कॉल डिपॉझिट या स्किममध्ये रु.2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) गुंतविले होते. तसेच सदर पतसंस्थेमध्ये क्र.1431 चे बचत खाते उघडले होते. तक्रारदार हे अत्यंत बिकट आर्थिक अडचणीत सापडल्याने व त्यांना पैशाची अत्यंत गरज असल्याने त्यांनी कॉल डिपॉझिटच्या रक्कमेची मागणी केली. दि.19/12/2008 रोजी सदर कॉल डिपॉझिट स्किमनुसार नियमाप्रमाणे मिळणारे दि.5/2/2005 ते दि.30/11/2008 पर्यंतचे एकूण व्याज रु.53,507/- (रुपये त्रेपन्न हजार पाचशे सात मात्र) विरुध्द पक्ष यांनी बचत खाते क्र.1431 मध्ये ट्रान्सफर केले व त्या बचत खात्यामधून रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) तक्रारदार यांनी स्वीकारले आहेत. त्यानंतर विरुध्द पक्ष पतसंस्थेकडे तक्रारदार यांनी दि.02/03/2009 रोजी कॉल डिपॉझिटच्या रकमांची लेखी अर्जाद्वारे मागणी केली, परंतु विरुध्द पक्ष पतसंस्थेने त्याच पत्रावर “सदर रक्कम दि.15/04/2009 पर्यंत पूर्ण करुन देऊ ” असे लिहून दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी आपल्या वकीलामार्फत दि.29/09/2009 रोजी पाठविलेली कायदेशीर नोटीस विरुध्द पक्षास मिळूनही तक्रारदार यांनी कॉल डिपॉझिटची रक्कम परत केली नाही म्हणून सदर रक्कमा व्याजासहीत विरुध्द पक्षाकडून मिळणेकरीता तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
3) सदर तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांना पाठवणेत आली. विरुध्द पक्ष मंचात हजर होऊन त्यांनी आपले लेखी म्हणणे प्रतिज्ञापत्रासह दाखल केले आहे. ते नि.क्र.23 व 24 वर आहे. सदर लेखी म्हणण्यामध्ये विरुध्द पक्षाने तक्रारदार यांनी ठेवलेल्या ठेवी मान्य केल्या असून त्या ठेवींचे व्याज रु.53,507/- (रुपये त्रेपन्न हजार पाचशे सात मात्र) सेव्हींग खाते क्र.1431 मध्ये वर्ग केल्याचे म्हटले आहे; तसेच संस्थेचे सर्व ठेवीदार आपल्या ठेवी परत मागत असल्याने व सर्व कर्जदार हप्त्यांनी कर्जाची परतफेड करीत असल्याने एकरक्कमी ठेवी परत करणे संस्थेला शक्य नाही; इतर ठेवीदारांप्रमाणेच तक्रारदार यांच्या ठेवी व्याजासहीत परत करणेत येतील असे लेखी म्हणण्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी स्पष्ट केले आहे.
4) तक्रारदार यांची तक्रार, त्यापुष्टयर्थ सादर केलेले कागदपत्र, विरुध्द पक्षाचे लेखी म्हणणे, उभय पक्षांचा युक्तीवाद विचारात घेता मंचापूढे खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्षाने तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये तृटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रार मंजूर करण्यास पात्र आहे काय ? | होय; अंशतः |
-का र ण मि मां सा-
मुद्दा क्रमांक 1- I) तक्रारदाराची तक्रार ही कॉल डिपॉझिटच्या रक्कमा विरुध्द पक्षाने मागणी प्रमाणे परत केल्या नाहीत या संबंधाने दाखल करणेत आलेली आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्था श्री बांदेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बांदा मध्ये दि.05/02/2005 रोजी कॉल डिपॉझिटच्या स्वरुपात प्रत्येकी रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) प्रमाणे पावती क्र.1534 व पावती क्र.1535 मध्ये गुंतविल्याचे नि.3/2 व नि.3/3 या दाखल पावत्यांवरुन दिसून येते. सदर दोन्ही पावत्यांमधील रक्कमा द.सा.द.शे.14 टक्के व्याजदराने विरुध्द पक्ष यांनी स्वीकारलेल्या होत्या. सदर रक्कमांची तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाकडे लेखी स्वरुपात मागणी केल्याचे नि.3/4 वर दाखल केलेल्या पत्राच्या झेरॉक्स प्रतींवरुन दिसून येते. त्यावर विरुध्द पक्ष पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी “सदर रक्कम दि.15/04/2009 पर्यंत पूर्ण करुन देऊ ” असे उत्तरादाखल लिहून दिल्याचे नि.3/4 वरुन दिसून येते. त्यानंतरही तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेच्या संचालकांना म्हणजेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांना दि.29/09/2009 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून तक्रारदारच्या रक्कमा 14 टक्के व्याजासह परत करणेचे कळवून देखील विरुध्द पक्षाने आजमितीपर्यंत तक्रारदारच्या कॉल डिपॉझिटची संपूर्ण रक्कम त्यामध्ये नमूद व्याजासह परत केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे सिध्द झालेले आहे.
मुद्दा क्रमांक 2 I) तक्रारदाराने विरुध्द पक्ष पतसंस्थेमध्ये कॉल डिपॉझिट पावती क्र.1534 व पावती क्र.1535 यामध्ये प्रत्येकी रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) गुंतविल्याचे दाखल कागद अनुक्रमे नि.3/2 व नि.3/3 वरुन दिसून येते. तक्रारदारने तक्रार अर्जात त्या संपूर्ण रक्कमांची दि.05/02/2005 पासून द.सा.द.शे.14 टक्के व्याजदराने मागणी केली आहे. तसेच सदर रक्कमांचे व्याजापोटी रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) इतकी रक्कम सेव्हींग खाते क्र.1431 द्वारे पोहोचल्याचे देखील कबुल केले आहे. तसेच पावती क्र.1535 (नि.3/3) चे अवलोकन करता पावतीचे मागील बाजूस “19/12/2008 – दि.5/2/2005 ते दि.30/11/2008 पर्यंतचे व्याज रु.53,507/- से. 1431 मध्ये वर्ग ” असा शेरा नोंदलेला आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या सेव्हिंग खाते क्र.1431 (नि.3/1) चे अवलोकन करता दि.19/12/2008 रोजी सदर खाती रु.53,507/- (रुपये त्रेपन्न हजार पाचशे सात मात्र) जमा झाल्याचे; तसेच सदर खात्यामधून तक्रारदार यांनी रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) वेगवेगळया तारखांना स्वीकारल्याची सुध्दा त्यामध्ये नोंद आहे. त्यामुळे सदर कॉल डिपॉझिटच्या व्याजाचे रक्कमेपोटी रु. 50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) तक्रारदार यांना पोहोच असल्याने व्याजाची संपूर्ण रक्कम मागणेस तक्रारदार हे पात्र नाहीत. विरुध्द पक्ष यांनी नि.23 वर दाखल केलेल्या लेखी म्हणण्यामध्ये; पतसंस्था आर्थिक अडचणीत असल्याने ठेवी रु.5,000/- च्या मासिक हप्त्याने देण्याचे कबुल केले आहे. परंतु, तक्रारदार हे सध्या गाव नाचणे, जिल्हा रत्नागिरी येथे राहत असल्याने तसेच स्वतःचे आजारपण व कौटुंबिक जबाबदारीने त्रासलेला असल्याने तक्रारदारला त्यांच्या सर्व रक्कमा एकरक्कमी स्वरुपात मिळणे हे नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करता गरजेचे आहे, असे मंचाचे मत आहे.
II) सदरची तक्रार हे सेवेतील तृटी संबंधाने आहे. तक्रारदारने श्री बांदेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, बांदा मध्ये कॉल डिपॉझिटच्या स्वरुपात ठेवी ठेवल्याचे दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होत आहे. विरुध्द पक्ष क्र.1 हे सदर पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक आहेत. विरुध्द पक्ष क्र.2 हे सदर पतसंस्थेचे चेअरमन असून विरुध्द पक्ष क्र.3 हे व्हाईस चेअरमन आहेत. तसेच विरुध्द पक्ष क्र.4 ते 14 हे सदर पतसंस्थेचे संचालक आहेत. तक्रारदारने ठेवलेल्या ठेवींच्या आर्थिक व्यवहाराशी विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 या कायदेशीररित्या जबाबदार व्यक्ती असल्याने सदर रक्कमा परत देण्याची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी त्यांचीच आहे.
III) वरील सर्व मुद्दयांच्या विवेचनावरुन हे सिध्द होते की, विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांनी तक्रारदारच्या कॉल डिपॉझिटच्या रक्कमा मागणीप्रमाणे परत केल्या नसल्याने, विरुध्द पक्ष यांचे हे कृत्य ग्राहकाला देण्याच्या सेवेतील तृटी दर्शविते. त्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मान्य करीत असून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
अं ति म आ दे श
1) तक्रारदारची तक्रार अंशतः मान्य करणेत येते.
2) श्री बांदेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बांदा आणि विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांचे कॉल डिपॉझिट पावती क्र.1534 ची रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) आणि त्यावर दि.05/02/2005 पासून दि.01/03/2009 पर्यंत 14 टक्के दराने व्याज द्यावे व तदनंतर मुळ रक्कमेवर दि.02/03/2009 पासून सदर रक्कमेची पूर्ण फेड होईपर्यंत 7 टक्के दराने व्याज देणेचे आदेश पारीत करणेत येतात.
3) तसेच कॉल डिपॉझिट पावती क्र.1535 ची पावती रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) आणि त्यावर दि.01/12/2008 दि.01/03/2009 पर्यंत 14 टक्के दराने व्याज द्यावे. तसेच मुळ रक्कमेवर दि.02/03/2009 पासून सदर रक्कमेची पूर्ण फेड होईपर्यंत 7 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश पारीत करण्यात येतात.
4) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल व प्रकरण खर्च मिळून एकूण रक्कम रु.3,500/- (रुपये तीन हजार पाचशे मात्र) विरुध्द पक्ष क्र.1 ते 14 यांनी तक्रारदार यांस दयावेत.
5) तक्रारदार यांच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात. तसेच तक्रारदारास पावती क्र.1535 च्या ठेवीवरील दि.05/02/2005 ते दि.30/11/2008 पर्यंतचे व्याज प्राप्त झालेमुळे या कालावधीचे व्याज वगळण्यात येते.
6) सदर आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत करणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 13/01/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-