Maharashtra

Satara

CC/15/9

shri bajirao ganpti patil - Complainant(s)

Versus

shri balaji turs - Opp.Party(s)

savnt

06 Jun 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                               मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                             तक्रार क्र. 9/2015.

                             तक्रार दाखल दि.8-1-2015.

                                    तक्रार निकाली दि.6-6-2015. 

 

श्री.बाजीराव गणपती पाटील,

रा.खेड नाका, कोयना सोसायटीजवळ,

सदर बझार, ता.जि.सातारा.                  ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

श्री.बालाजी टूर्स अँड ट्रॅव्‍हल्‍सकरिता-

श्रीमती राजश्री अशोक सपकाळ,

रसीक अपार्टमेंट, मानकर डोसा सेंटरशेजारी,

दशभुजा गणपती कर्वेरोड, पौडफाटा,

कोथरुड, पुणे 411 004.                      ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.एस.जे.सावंत. 

                      जाबदार - एकतर्फा.      

                               

                           न्‍यायनिर्णय

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

                                                    

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

       तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

      तक्रारदार हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी असून जाबदार हे पुणे येथील धार्मिक यात्रा, सहली आयोजित करणेचा व्‍यवसाय करतात.  जून 2012 मध्‍ये जाबदाराने तनिष्‍का मासिकामध्‍ये श्री.बालाजी ट्रॅव्‍हल्‍स शॉपी या नावाने भारतातील वेगवेगळी धार्मिक व प्रेक्षणीय स्‍थळे पहाणेसाठी सहलीच्‍या बुकींगसाठी जाहीरात प्रसिध्‍द केली होती.  या जाहीरातीस अनुसरुन तक्रारदाराने दि.15-9-2012 रोजी निघणा-या 15 दिवसांच्‍या चारधाम यात्रेसाठी जाणेचे ठरवून 3 व्‍यक्‍तींसाठी प्रवासखर्च व इतर खर्च किती येईल याबाबत जाबदाराशी फोनवर चर्चा केली व त्‍यानुसार तक्रारदाराच्‍या बँक ऑफ इंडिया शाखा सातारा येथील खात्‍यामधून एन.ई.एफ.टी.द्वारा दि.28-7-2012 रोजी रक्‍कम रु. 61,500/- (रु.एकसष्‍ट हजार पाचशे मात्र) चेक क्र.33800 ने रक्‍कम तक्रारदाराने जाबदारास देणेसाठी वर्ग केले होते आणि तीन व्‍यक्‍तींचे बुकींग केले होते. 

       जाबदाराला वर नमूद रक्‍कम मिळाल्‍यानंतर जाबदाराने दि.30-7-2012 तारखेची रक्‍कम रु.61,500/- मिळाल्‍याची बुकींग पावती क्र.1495 तक्रारदारास सातारा येथील पत्‍त्‍यावर पाठवून दिली होती.  अशा प्रकारे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत.  दि.4 सप्‍टेंबर 2012 रोजी तक्रारदारासह एकूण तिघांची यात्रेत जाणेची तयारी चालू असतानाच अचानकपणे जाबदारांकडून सदरची सहल/यात्रा रद्द केलेचे तक्रारदाराला यात्रेला नि घणेपूर्वी 8 ते 10 दिवस अगोदर समजले.  त्‍याबाबत तक्रारदाराने जाबदाराकडे चौकशी केली असता यात्रा रद्द केलेचे जाबदाराने तक्रारदारास सांगितले.  परंतु त्‍याबाबत कोणताही लेखी अगर तोंडी खुलासा जाबदाराने दिला नाही.  त्‍यामुळे नाईलाजास्‍तव तक्रारदाराने जाबदाराकडे बुकींगसाठी जमा केलेल्‍या रकमेची मागणी केली.  जाबदाराने सदरची रक्‍कम परत करणेचे नुसते आश्‍वासन दिले परंतु कोणतीही रक्‍कम तक्रारदारास परत केली नाही.  वारंवार तगादा लावला असता जाबदाराने दि.11-2-2013 रोजी बुकींग रकमेपैकी फक्‍त रक्‍कम रु.20,000/-(रु.वीस हजार मात्र) तक्रारदाराच्‍या बँक ऑफ इंडिया शाखा सातारा येथील खात्‍यावर जमा केली.  मात्र उर्वरित रकमेची मागणी तक्रारदाराने केली असता जाबदाराने वेळकाढूपणा केला व तक्रारदाराने जास्‍तच तगादा लावला असता जाबदाराने दि.2-3-2013 रोजी पुन्‍हा रक्‍कम रु.20,000/-(रु.वीस हजार मात्र) तक्रारदाराचे वर नमूद खातेवर जमा केले.  अशा प्रकारे तक्रारदाराने जाबदाराकडे जमा केलेल्‍या रकमेपैकी रक्‍कम रु.40,000/-(रु.चाळीस हजार मात्र) तक्रारदारास अदा केली आहे मात्र उर्वरित रक्‍कम रु.21,500/- (रु.एकवीस हजार पाचशे मात्र) तक्रारदाराने वारंवार मागणी करुनही जाबदाराने सदर रक्‍कम तक्रारदारास अदा केली नाही व तक्रारदाराने सदर रकमेची मागणी केली असता तक्रारदारास कोणतीही रक्‍कम जाबदाराने अदा केली नाही त्‍यामुळे तक्रारदाराने दि.7-11-2014 रोजी जाबदारांस वकीलांतर्फे नोटीस पाठवली परंतु सदर नोटीस जाबदारास मिळूनही जाबदाराने तक्रारदारास उर्वरित रक्‍कम अदा केली नाही. त्‍यामुळे सदर रक्‍कम जाबदाराकडून वसूल होऊन मिळणेसाठी मे.मंचात सदर तक्रारअर्ज दाखल केला आहे. 

2.        प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने जाबदारांकडून तक्रारदाराना येणे असलेली रक्‍कम रु.21,500/- वसूल होऊन मिळावी, तसेच तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व कोर्टाचा खर्च रु.3,000/- जाबदाराकडून मिळावा म्‍हणून विनंती केली आहे. 

3.         सदर कामी तक्रारदाराने नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/6 कडे अनुक्रमे जाबदार कंपनीने तनिष्‍का मासिकात दिलेली पर्यटन सहलीची जाहीरात, बालाजी टूर्स अँड ट्रॅव्‍हल्‍स कंपनीची तक्रारदाराकडून रक्‍कम स्विकारलेची पावती, तक्रारदाराचे बचत खात्‍याचे पासबुकची झेरॉक्‍स, जाबदाराने तक्रारदाराचे खात्‍यावर भरणा केलेबाबत बँकपासबुकची झेरॉक्‍स, तक्रारदाराने वकीलातर्फे जाबदारास पाठवलेली नोटीस, जाबदारास पाठवलेल्‍या नोटीसची पोस्‍टाची पावती व पोहोचपावती, नि.8 कडे मूळ तक्रारअर्जाचे सोबत दिलेले प्रतिज्ञापत्र हेच पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र समजणेत यावे अशी दिलेली पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत. 

4.       सदर कामी जाबदारांना नोटीस लागू होऊनही जाबदार हे या कामी मंचात हजर राहिलेले नाहीत, सबब जाबदारांविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित झालेला आहे.  जाबदाराने सदर कामी तक्रारदाराचे तक्रारीतील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. 

5.       वर नमूद तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचा अभ्‍यास करुन तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे.मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.              मुद्दा                                       उत्‍तर

 1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                       होय.

 2. जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?             होय.

 3. अंतिम आदेश काय?                         खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.

विवेचन-

6.        वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने जाबदारांकडे 3 व्‍यक्‍तींसाठी 15 दिवसाच्‍या चारधाम धार्मिक यात्रेस जाणेसाठी श्री.बालाजी ट्रॅव्‍हल्‍स यांचेकडे रक्‍कम रु.61,500/- एन.ई.एफ.टी.द्वारे चेक क्र.33800/- ने बँक ऑफ इंडिया शाखा सातारामधील खात्‍यातून जाबदाराला अदा करणेसाठी वर्ग केले होते.  प्रस्‍तुत रक्‍कम वर्ग केलेचे तक्रारदाराच्‍या नि.5/3 ची पासबुकामधील नोंदीवरुन स्‍पष्‍ट होते, तसेच जाबदाराने तक्रारदारास सदर रक्‍कम मिळालेची दिलेली पावती तक्रारदाराने नि.5/2 कडे दाखल केली आहे.  सबब तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार असलेचे स्‍पष्‍ट सिध्‍द होते, तसेच प्रस्‍तुत यात्रा रद्द झालेचे जाबदाराने तक्रारदारास कळविले, परंतु जादबाराने तक्रारदाराने जमा केलेले रक्‍कम रु.61,500/- पैकी फक्‍त रक्‍कम रु.40,000/- तक्रारदारास परत अदा केले आहेत हे पासबुकावरील नोंदीवरुन स्‍पष्‍ट होते.  परंतु उर्वरित रक्‍कम रु.21,500/- जाबदाराने तक्रारदारास अदयापपर्यंत अदा केलेली नाही हे सिध्‍द होते.  सबब जाबदारानी तक्रारदारास उर्वरित रक्‍कम रु.21,500/- परत केली नसल्‍याने जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवलेचे स्‍पष्‍ट सिध्‍द होते.  तसेच जाबदारांनीही सदर बाबतीत कोणताही पुरावा व म्‍हणणे मे.मंचात दाखल केलेले नाही व तक्रारदाराचे कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  सबब जाबदाराने उर्वरित रक्‍कम रु.21,500/- तक्रारदारास परत केलेले नसल्‍याने जाबदाराने तक्रारदाराना सदोष सेवा पुरवलेचे सिध्‍द होते म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे. 

        सबब जाबदारांनी तक्रारदाराना रक्‍कम रु.21,500/- उर्वरित रक्‍कम तसेच मानसिक त्रास व नोटीसचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- अदा करणे न्‍यायोचित होणार आहे. 

7.      सबब आम्‍ही सदर कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                         आदेश   

1.    तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो. 

2.    जाबदारांनी तक्रारदाराना त्‍यांची उर्वरित रक्‍कम रु.21,500/-(रु.एकवीस हजार पाचशे मात्र) अदा करावेत,  सदर रकमेवर बुकींग केलेली तारीख दि.28-7-2012 पासून रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

3.    जाबदाराने तक्रारदारास मानसिक त्रास व नोटीसच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- अदा करावेत.

4.  वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

5.  वरील आदेशाचे पालन जाबदार यानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारास कलम 25 व 27 नुसार जाबदाराविरुध्‍द कारवाई करणेची मुभा राहील.

6.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

7.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 6-6-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.