जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २७५/२०११
----------------------------------------------
१. श्री जयपाल भरमा चौगुले
वय ६०, व्यवसाय – सेवानिवृत्त
श्री पार्श्व, शारदानगर, कुपवाड रोड, सांगली
२. श्री सुनिल आण्णा चौगुले
वय ४२, व्यवसाय– शेती
मु.पो.भोसले, ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर
२. श्री बाहुबली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
जयसिंगपूर उपशाखा सांगली, ताराई कॉम्प्लेक्स,
गणेशनगर, दुसरी गल्ली, सांगली
३. श्री अजित आण्णासो देमापुरे, चेअरमन
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.ग.नं.९, जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर
४. सिकंदर इस्माईल गैबान
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.ग.नं.९, जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर
५. श्री महावीर बाळीशा सकाप्पा
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.दानोळी ता.शिरोळ जि.कोल्हापूर
६. श्री शरद श्रीपाल मगदूम
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.ग.नं.६, जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर
७. श्री आण्णा बाबू परीट
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.नांदणी ता.शिरोळ जि.कोल्हापूर
८. श्री बापू आप्पा पुजारी
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.निमशिरगांव ता.शिरोळ जि.कोल्हापूर
९. श्री विद्याधर शामराव मिणचे
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा. जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर
१०. श्री अशोक भूपाल पाटील,
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.आळते ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
११. श्री पायगोंडा नरसगोंडा पाटील
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.निमशिरगांवग ता.शिरोळ जि.कोल्हापूर
१२. श्री सावकर दत्तू कांबळे
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.निमशिरगांव ता.शिरोळ जि.कोल्हापूर
१३. श्री सुहास भाउसो मुरगुंडे
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा. जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर
१४. सौ राजमती महावीर मगदूम
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.निमशिरगांव ता.शिरोळ जि.कोल्हापूर
१५. श्री शांतीनाथ बापू चौगुले
वय सज्ञान, व्यवसाय – संचालक,
रा.अ.लाट ता.शिरोळ जि.कोल्हापूर .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
व्दारा – मा.सदस्या, श्रीमती गीता घाटगे
प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करुन घेणेचे मुद्यावर मंचासमोर प्रलंबित आहे. तक्रारअर्ज दाखल केलेनंतर प्रस्तुत तक्रारअर्ज एकत्रित दाखल करता येईल का ? या मुद्यावर युक्तिवाद करणेत यावा असा आदेश नि.१ वर करणेत आला. तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज आपल्या सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम परत मिळावी या मागणीसाठी एकत्रित दाखल केला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये तक्रारदारांचे एकमेकांचे नातेसंबंध नमूद केलेले नाहीत. तक्रारदार यांनी तक्रारअर्जात दिलेल्या पत्त्यावरुन तक्रारदार हे वेगवेगळया गावातील रहिवाशी आहेत ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत ग्राहक संरक्षण कायद्यातील १२(क) प्रमाणे परवानगी मागणारा अर्ज सादर केला आहे. तक्रारदार यांची तक्रार ही त्यांच्या बचत खात्यावरील रक्कम मिळणेसाठी आहे त्यामुळे सदरची तक्रार प्रातिनिधिक स्वरुपाची होणार नाही ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांची तक्रार ही प्रातिनिधिक स्वरुपाची नसल्याने तक्रारदार हे कलम २ (१) (ब)(iv) नुसार Numerous consumers having the same interest या स्वरुपात येत नाहीत ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे कलम १२(१) (क) प्रमाणे परवानगी देण्याचा कोणताच प्रश्न उद्भवत नाही असे या मंचाचे मत आहे. त्यानंतर तक्रारदार म्हणून कोण कोण सामील होईल याचे अवलोकन केले असता कलम २(१) (ब)(i) मध्ये ग्राहक स्वत: तक्रारअर्जाचे कामी सामील होऊ शकतो. “ग्राहक” या शब्दाची व्याख्या कलम २(१)(ड) मध्ये दिली असून ग्राहक म्हणजे एखादी “व्यक्ती” असे नमूद आहे. व्यक्ती या शब्दाची व्याख्या कलम २(१) (म) मध्ये नमूद आहे. त्यामध्ये हिंदू अविभक्त कुटुंबातर्फे तक्रार दाखल करता येईल. सदरचे सर्व तक्रारदार हे हिंदू अविभक्त कुटुंबातील आहेत हे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही व त्याबाबत खुलासा करण्यासाठी तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ उपस्थित राहिले नाहीत. तक्रारदार हे वेगवेगळया घरातील तसेच वेगवेगळया गावातील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांची बचत खाती वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तक्रारदार यांना एकत्रित तक्रारअर्ज दाखल करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही. सबब, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
दि.१६/०१/२०१२.
सांगली.
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.