Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/14/132

Shri Ambadas Devrao Raut - Complainant(s)

Versus

Shri Anandrao Dashrathji Chakole President Bhartiya Swatantra Dhanvruksha Nagri Sahkari Pat Sanshta - Opp.Party(s)

Shri Mahesh C. Falekar

14 Dec 2015

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/14/132
 
1. Shri Ambadas Devrao Raut
R/o Plot No. 16 Priti Layout New yerkheda Kamptee Tah Kamptee
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Anandrao Dashrathji Chakole President Bhartiya Swatantra Dhanvruksha Nagri Sahkari Pat Sanshta Ltd
Kamptee Tah Kamptee
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

      ( आदेश पारित व्दारा -श्री नितीन घरडेमा.सदस्य )

    - आदेश -

(पारित दिनांक  14 डिसेंबर 2015)

 

  1. तक्रारकर्त्याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली असुन तक्रारीचे स्वरुप असे आहे की,
  2. तक्रारकर्ता हा सेवानिवृत्त असुन विरुध्‍द पक्ष श्री आनंदरावजी दशरथजी चकोले भारतीय स्वतंत्र धनवृक्ष नागरी सहकारी पत संस्‍था मर्यादित कामठी रजि.क्रं.N.S.E.S./1668/1960 यांचे अध्‍यक्ष असुन संस्‍थेमार्फत ते पैशाची देवाणघेवाण करण्‍याचा व्यवहार करतात.उदा.सर्व प्रकारचे खाते उघडणे कर्ज देणे व वसुली करणे मुदत ठेवी स्विकारणे इत्यादी.
  3. तक्रारकर्त्याचे विरुध्‍द पक्ष संस्‍थेत बचत खाते असुन त्यांचा खाता क्रं.459 आहे व खात्यात 31,437/-रुपये जमा होते. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाकडे दोन मुदत ठेवी प्रत्येकी रुपये 1 लक्ष ज्याचा क्रं.1128 व 1129 असा आहे व त्याची परिपक्वता दिनांक एक वर्षे, म्हणजे दिनांक 10/11/2013 पर्यत होती.
  4. तक्रारकर्ता मुदत ठेवीची परिपक्वता झाल्यानंतर परिपक्वता रक्कम मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष संस्‍थेकडे गेले असता विरुध्‍द पक्षाने संध्‍या संस्‍थेत पैसे नसल्यामुळे तुम्ही पुन्हा मुदत ठेवीची गुंतवणुक करा जेव्हा तुम्हाला पैशाची गरज पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला पैसे देऊ असे सांगीतल्याने तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाच्या गोष्‍टीवर विश्‍वास ठेवून मुदत ठेव पुन्हा गुंतविली.
  5. तक्रारकर्ता पुढे असे नमुद करतात की, त्यांना त्याच्या मुलाचे लग्न व घराचे बांधकाम करायचे असल्याकारणाने पैशाची गरज पडली म्‍हणुन त्यांनी दिनांक 12/09/2013 रोजी एकुण रुपये 2,31,637/-देण्‍याचा अर्ज विरुध्‍द पक्षाकडे केला व त्यात नमुद केले की पैसे काढण्‍याकरिता लागणारा खर्च/व्याज/ दंड देण्‍यास तयार आहे.
  6. अर्ज करुनही विरुध्‍दपक्षाने रक्कम दिली नाही त्यामुळे दिनांक 16/09/2013 रोजी तक्रारकर्त्याने मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नागपूर यांचेकडे तक्रार केली. सहाय्यक सहकारी निबंधक संस्‍था कामठी यांनी तपासणी करुन दिनांक 22/11/2014 ला तक्रारकर्त्याला विरुध्‍द पक्ष संस्‍थेची माहिती दिली.
  7. तक्रारकर्त्याच्या दोन्‍ही मुदत ठेवीचे पैसे मुदत संपल्यानंतर आजपर्यत विरुध्‍द पक्षाने दिले नाही. बचत खात्यातील पैसे देखिल विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यास दिले नाही. तक्रारकर्ता वारंवार विरुध्‍द पक्षाकडे रक्कमेची मागणी करीत आहे परंतु विरुध्‍द पक्ष रक्कम परत करीत नाही त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रास होत आहे म्‍हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन मुदत ठेव क्रं.1128 व 1129 रुपये 1 लक्ष प्रत्येकी परिपक्वता रक्कमेसह मिळावे तसेच बचत खाता क्रं.459 मधील रक्कम व भागभांडवल व्याजासकट मिळावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरिक त्रासापोटी 50,000/-व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
  8. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत 6 दस्‍तऐवज दाखल केले आहेत. त्यात बचत खाते पुस्‍तीका, मुदत ठेव पावती, संस्‍थेकडे केलेला अर्ज व सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था ता.कामठी, यांनी तक्रारकर्त्याला दिलेले पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
  9. मंचामार्फत विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविण्‍यात आली असता विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष उपस्थित झाले व आपले लेखी उत्तर आक्षेंपासह दाखल केले.
  10.    विरुध्‍द पक्ष आपले उत्तरात पुढे असे नमुद करतात की, तक्रारकर्ता       त्यांचा ग्राहक होत नाही कारण त्यांने संस्थेत पैशाची गुंतवणुक व्याज   मिळविण्‍याकरिता केलेली होती. तसेच संस्‍थेचा व्यवहार ते एकटे   सांभाळत नसुन, संस्‍थेचे इतरही संचालक आहेत. त्यांना तक्रारीत पक्षकार बनविले नाही म्‍हणुन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्‍यास   पात्र आहे.
  11.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या सर्व गोष्‍टी नाकारल्या असुन तक्रार       चालविण्‍याचा या मंचाला अधिकार नाही असे नमुद केले. संस्‍थेने तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. तक्रारकर्त्याने     खोटी तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षाला त्रास देण्‍याचे उद्देशाने दाखल    केली आहे.
  12.    तक्रारकर्त्याने तक्रारीत प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला दोन्ही     पक्षाचा तोंडी युक्तीवाद एैकण्‍यात आला व दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे देण्‍यात येतो.

           -//- निष्‍कर्ष -//-

  1.    सदरची तक्रार ही तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष संस्‍थेत स्वतःवे बचत खाते क्रं.459 मधील रक्कम परत मिळण्‍याबाबत व त्याचप्रमाणे 1 लक्ष     रुपयाचे दोन मुदत ठेवी क्रं.1128 व 1129 प्रत्येकीवरील पैसे      व्याजासकट तक्रारकर्त्याला मुदत संपल्यावर सुध्‍दा विरुध्‍द पक्ष संस्‍थेने   दिली नाही ही विरुध्‍द पक्षाच्या सेवेत त्रुटी झाल्याचे निर्देशनास येते.
  2.    तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष संस्‍थेत बचत खाते आहे. विरुध्‍द पक्ष ही      संस्‍था असुन खाते धारकांना सेवा पुरविते त्यामुळे तक्रारकर्ता हा   विरुध्‍द पक्ष संस्‍थेचा ग्राहक ठरतो त्याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाचा पुढील    आक्षेप असा आहे की तक्रारकर्त्याने संस्‍थेच्या अध्‍यक्षांना पक्षकार केले   अन्य सभासदांना पक्षकार केलेले नाही. यावर मंचाचे असे मत आहे की     तक्रारकर्त्याने संस्‍था व त्यांचे अध्‍यक्ष यांना पक्षकार केले आहे. जर   संस्‍था पक्षकार असेल तर इतर सदस्यांना पक्षकार म्‍हणुन तक्रारीत   सामील करणे जरुरीचे नाही. कारण ही तक्रार संस्‍थेविरुध्‍द असुन संस्‍थेच्या सदस्यांविरुध्‍द वैयक्तीक कारणास्तव दाखल केलेली नाही.      तसेच तक्रारकर्त्याने ठेवलेल्या मुदत ठेवी या स्वतःच्या गरजेचेवेळी      उपयोगी पडावी म्‍हणुन ठेवलेल्या होत्या त्यात तक्रारकर्त्याचा     दुसरा कोणताही उद्देश दिसून येत नाही.
  3.    दाखल दस्‍ततऐवजांवरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याचे बचत खात्यावर रुपये 31,437/- रुपयाची नोंद दिसते व मुदत ठेव पावती       क्रं.1128 व 1129 रक्कम प्रत्येकी रुपये 1 लक्ष असुन त्यावर    द.सा.द.शे.10 टक्के व्याजदर असुन मुदत ठेव दिनांक 10/11/2012 व   परिपक्वता दिनांक 10/11/2013 अशी नमुद आहे. तक्रारकर्त्याच्या       मुलाचे लग्न असल्याने पैशाची गरज भासल्याने त्यांनी विरुध्‍द पक्ष      संस्‍थेकडे 12/9/2013 रोजी अर्ज सादर केला होता त्याची प्रत    अभिलेखावर दाखल आहे त्यांत त्यांनी हे सुध्‍दा नमुद केले की,   मुदतपुर्व ठेव रद्द फी व व्याज कापुन येणारी रक्कम मला परत करा.
  4.    त्याचप्रमाणे तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेले दिनांक     22/11/2014 चे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नागपूर यांचे       पत्राची प्रत दाखल केली आहे त्यावरुन संस्थेच्या मालकीची इमारत       विकुन संस्थेने सर्व प्रकारच्या ठेवीदाराचे व ठेवीच्या रक्कमा व    भागधारकाचे भांडवल रक्कम परत करण्‍यासाठी  संस्थेची इमारत विकण्‍याची परवानगी मागीतली आहे.
  5.    यावरुन तक्रारकर्ताच्या दोन मुदत ठेवी प्रत्येकी रुपये 1 लक्ष मुदत ठेव   पावती क्रं.1128 व 1129 व्याजासह व बचत खात्यातील रक्कम रुपये    31,437/-  मिळण्‍यास पात्र आहे. करिता हे मंच खालील प्रमाणे आदेश    पारित करित आहे.

                      अं ती म  आ दे श  -

     

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मुदत ठेव पावती क्रं.1128 व 1129 प्रत्येकी रुपये 1 लक्ष असे एकुण रुपये 2 लक्ष मुदत ठेव दिनांक 10/11/2013 पासुन द.सा.द.शे. 10 टक्के दराने येणारी रक्कम तक्रारकर्त्यास परत करावी. तसेच बचत खात्यात जमा असलेली रक्कम 31,437/-वर दिनांक 12/09/2013 पासुन द.सा.द.शे. 10 टक्के व्याज

अशी मिळून येणारी रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी.

  1. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- असे एकुण रुपये 12,000/- विरुध्‍द पक्षाने अदा करावे.
  2. वरील आदेशाचे पालन विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
  3. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्‍यात याव्या.
 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha Yashwant Yeotikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.