::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 4.11.2015)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी खास नझूल मोहल्ला समाधीपुरा स्थित नगर भुमापन क्र.12894 शीट नं.92, जुना नझूल प्लॉट नं.166, शीट नं.6, ब्लॉक नं.92, आराजी 4315 चौ.फु. जागेवर नगर परिषद, चंद्रपूर यांनीदि.12.7.2007 रोजी मंजुर केलेल्या नकाशाप्रमाणे सदनिकेचे 2 मंजील इमारत बांधण्याची योजना आणली. ही 2 मंजील इमारत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वसंत भाऊराव सिंगाभट्टी यांचे जागेवर त्यांचेकडून प्राप्त अधिकारान्वये बांधरण्याची योजना आणली होती. त्यावेळी अर्जदारास त्या योजनेचा नकाशा गैरअर्जदारांनी अर्जदाराला दाखविला. अर्जदार स्वतः करीता व कुंटूंबाकरीता अर्जदाराने सदनिका खरेदी करण्याचे ठरविले. त्यावेळी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तिस-या मजल्यावरील सदनिका फक्त बाकी आहे असे सांगीतले यामुळे अर्जदाराने तिस-या मजल्यावरील सदनिका खरेदी करण्याचे कबूल करण्याचे ठरविले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास सदर सदनिका 7 लाख रुपयास विकण्याचे कबूल केले व रुपये 6,65,000/- अर्जदाराकडून अग्रीम घेवून दि.15.3.2012 रोजी अर्जदाराचे लाभात लिहून दिला. गैरअर्जदाराने उर्वरीत मोबदला रुपये 35,000/- सदनिकेचा ताबा देतेवेळी किंवा विक्रीच्या वेळी घेणार असे ठरविले होते. गैरअर्जदाराने अर्जदारास 24 महिण्यात सदनिकेचे विक्रीपञ करुन देण्याचे कबूल केले होते. गैरअर्जदाराने अर्जदारासोबत अतिरिक्त करारनामा केला व सदर करार अर्जदाराला बॅंकेत कर्ज घेण्याकरीता करण्यात आले होते. अर्जदाराने बॅंकेत कर्जाची उचलना केली आहे व अर्जदाराने त्यानंतर वारंवार गैरअर्जदाराकडून उर्वरीत रकमेचा मोबदला घेवून सदनिकेचे विक्रीपञ करुन देणे व ताबा देण्याची मागणी केली असून गैरअर्जदाराने सदनिकेचे विक्रीपञ व ताबा दिला नाही व सदर सदनिकेचे मुल्य रुपये 25,00,000/- झाले असल्याने गैरअर्जदार अर्जदाराला विक्रीपञ व ताबा देण्यास टाळाटाळ करीत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.17.2.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून उर्वरीत मोबदला रक्कम घेवून गैरअर्जदाराने अर्जदारास विक्रीपञ करुन द्यावे व सदनिकेचा ताबा द्यावे अशी मागणी केली. गैरअर्जदाराने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही. सबब तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आलेली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराला सदनिकेचा विक्रीपञ करुन द्यावे व त्याचा ताबा अर्जदाराला देण्याचा आदेश व्हावा. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारांना नि.क्र.5 नुसार नोटीसची बजावणी झाल्यानंतर नि.क्र.6 नुसार मंचासमक्ष हजर झाले व नि.क्र.7 नुसार लेखीउत्तर दाखल करण्याकरीता परवानगी देण्यात आली, तरीही उत्तर दाखल केले नाही व दि.3.7.2014 रोजी नि.क्र.8 नुसार गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी उत्तर दाखल करण्याकरीता वेळ मिळण्यास अर्ज केला. सदर अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यानंतर, दि.22.8.2014 रोजी नि.क्र.1 वर गैरअर्जदाराविरुध्द लेखीउत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आले. नि.क्र.1 वर दि.14.7.2015 रोजी गैरअर्जदारांविरुध्द सदर प्रकरण गैरअर्जदारांचे शपथपञांशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आले. दि.7.9.2015 रोजी नि.क्र.1 वर गैरअर्जदाराचे लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
4. अर्जदाराची तक्रार, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? : होय
3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी खास नझूल मोहल्ला समाधीपुरा स्थित नगर भुमापन क्र.12894 शीट नं.92, जुना नझूल प्लॉट नं.166, शीट नं.6, ब्लॉक नं.92, आराजी 4315 चौ.फु. जागेवर नगर परिषद, चंद्रपूर यांनीदि.12.7.2007 रोजी मंजुर केलेल्या नकाशाप्रमाणे सदनिकेचे 2 मंजील इमारत बांधण्याची योजना आणली. ही 2 मंजील इमारत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वसंत भाऊराव सिंगाभट्टी यांचे जागेवर त्यांचेकडून प्राप्त अधिकारान्वये बांधरण्याची योजना आणली होती. त्यावेळी अर्जदारास त्या योजनेचा नकाशा गैरअर्जदारांनी अर्जदाराला दाखविला. अर्जदार स्वतः करीता व कुंटूंबाकरीता अर्जदाराने सदनिका खरेदी करण्याचे ठरविले. त्यावेळी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तिस-या मजल्यावरील सदनिका फक्त बाकी आहे असे सांगीतले यामुळे अर्जदाराने तिस-या मजल्यावरील सदनिका खरेदी करण्याचे कबूल करण्याचे ठरविले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास सदर सदनिका 7 लाख रुपयास विकण्याचे कबूल केले व रुपये 6,65,000/- अर्जदाराकडून अग्रीम घेवून दि.15.3.2012 रोजी अर्जदाराचे लाभात लिहून दिला, ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्र.4 वर दस्त अ-1 वरुन सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास सदर सदनिका 7 लाख रुपयास विकण्याचे कबूल केले व रुपये 6,65,000/- अर्जदाराकडून अग्रीम घेवून दि.15.3.2012 रोजी अर्जदाराचे लाभात लिहून दिला. गैरअर्जदाराने उर्वरीत मोबदला रुपये 35,000/- सदनिकेचा ताबा देतेवेळी किंवा विक्रीच्या वेळी घेणार असे ठरविले होते. गैरअर्जदाराने अर्जदारास 24 महिण्यात सदनिकेचे विक्रीपञ करुन देण्याचे कबूल केले होते. गैरअर्जदाराने अर्जदारासोबत अतिरिक्त करारनामा केला व सदर करार अर्जदाराला बॅंकेत कर्ज घेण्याकरीता करण्यात आले होते. अर्जदाराने बॅंकेत कर्जाची उचलना केली आहे व अर्जदाराने त्यानंतर वारंवार गैरअर्जदाराकडून उर्वरीत रकमेचा मोबदला घेवून सदनिकेचे विक्रीपञ करुन देणे व ताबा देण्याची मागणी केली, ही बाब अर्जदाराने नि.क्र.4 वर दस्त क्र.अ-1 ते अ-3 तसेच नि.क्र.8 वर दाखल अर्जदाराचे शपथपञावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदाराला सदनिकेचे विक्रीपञ करुन दिले नाही तसेच ताबाही दिला नाही ही बाब गैरअर्जदाराची अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविलेली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन अर्जदार खालील अंतिम आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदारांनी दि. 15 मार्च 2012 रोजी अर्जदारासोबत केलेल्या सदनिकेचा करारानुसार सदनिकेची उर्वरीत रक्कम रुपये 35,000/- घेवून अर्जदाराला सदनिकेची विक्रीपञ करुन सदनिकेचा ताबा आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आत करुन द्यावे.
3) गैरअर्जदारांनी व्यक्तीगत किंवा संयुक्तरितीने अर्जदाराला झालेल्या मानसिक ञासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांचे आत करुन द्यावे.
4) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 4/11/2015