Maharashtra

Nagpur

CC/17/2017

Sanjay Ghanshyam Sharma - Complainant(s)

Versus

Shri Akshay Ishwar Kolte, Prop. Akshay Construction - Opp.Party(s)

Adv. P.A.Dubey

15 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/17/2017
( Date of Filing : 11 Jan 2017 )
 
1. Sanjay Ghanshyam Sharma
R/o. Near Scating Ground, Gandhi Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Akshay Ishwar Kolte, Prop. Akshay Construction
R/o. R-2, Kolte Layout, Near Ishwar Petrol Pump, Near Godhani Railwy Station, Godhani Road, Nagpur 441111
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Feb 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याला गोधनी रोड नागपूर या भागात निवासी सदनिका विकत घ्‍यावयाची होती. विरुध्‍द पक्ष हा बिल्‍डर असून त्‍याने गोधनी रोड, नागपूर येथे दुमजली ईमारतीचे बांधकाम हाती घेतले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द  पक्षाचे बांधकामाबाबत ऐकल्‍यावर त्‍याने विरुध्‍द पक्षाशी बोलनी करुन विरुध्‍द पक्षाचे गोधनी रोड, नागपूर स्थित प्रस्‍तावित महानंदा कॉम्‍पलेक्‍स  मधील दुस-या माळ्यावरील सदनिका एकूण क्षेञफळ ८०० चौरस फुट एकूण रुपये १३,००,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचे ठरले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी रुपये १०,०००/- आगाऊ रक्‍कम दिनांक ३१/१०/२०१४ ला अदा केली व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन रक्‍कम रुपये १०,०००/- प्राप्‍त झाल्‍याबाबतची पावती तक्रारकर्त्‍याला अदा केली.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिकाचे विक्रीपञ करुन देण्‍याबाबत विनंती केली परंतु विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपञ करारनामा करुन देण्‍याबाबत टाळाटाळ करीत होता. त्‍यानंतर दिनांक ७/१२/२०१६ रोजी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ करारणामा करुन देण्‍याबाबत नकार दिला. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला सदनिकेचे विक्री करारणामा करण्‍यापोटी रुपये १३,००,०००/- देण्‍यास तयार होता. विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ करारनामा करुन देण्‍यास नकार दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलांमार्फत विरुध्‍द पक्षाला दिनांक ७/१२/२०१६ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍याव्‍दारे तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपञ करारनामा करुन देण्‍याबाबत कळविले किंवा सदनिका खरेदीपोटी अदा केलेली रक्‍कम रुपये १०,०००/- तक्रारकर्त्‍याला परत करण्‍याबाबत कळविले. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला नोटीसचे चुकीचे उत्‍तर पाठविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला गोधनी रोड, नागपूर येथील महानंदा कॉम्‍प्‍लेक्‍स मधील दुस-या माळ्यावरील सदनिका एकूण क्षेञफळ ८०० चौरस फुटचे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे किंवा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिका विक्रीपोटी स्विकारलेली बुकींग रक्‍कम रुपये १०,०००/- व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला अदा करावी. 
  2. मानसिक व शारीरिक ञासाकरीता तसेच तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्‍याला अदा करण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार विरुध्‍द पक्षाचा बांधकामाचा व्‍यवसाय असून विरुध्‍द पक्षाने गोधनी भागात दुमजली ईमारत बांधकाम केल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे तसेच तक्रारकर्त्‍याने ८०० चौरस फुट क्षेञफळ असलेली सदनिका विकत घेण्‍याची इच्‍छा तसेच तयारी दर्शविल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे. तक्रारकर्त्‍याने सदनिका बुकींगपोटी विरुध्‍द पक्षाला रुपये १०,०००/- दिल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे. विरुध्‍द पक्ष अक्षय कंन्‍स्‍ट्रक्‍शन चा मालक असल्‍याचे नाकारण्‍यात येत आहे. विरुध्‍द पक्षाचा अक्षय कंन्‍स्‍ट्रक्‍शनशी काहीही संबंध नाही आणि तो अक्षय कंन्‍स्‍ट्रक्‍शन चा आणि बिल्‍डरचा अधिकृत सिगनेटरी नाही आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला विक्री करारनामा करुन देण्‍यास बांधील नाही आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विक्री करारनामा करीता संपर्क केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षामध्‍ये व्‍यापार आणि ग्राहक हा संबंध प्रस्‍तावित झाला नाही.त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाकडुन तक्रारकर्त्‍याला न्‍युनतम सेवा दिल्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने चुकीची नोटीस विरुध्‍द पक्षाला पाठविली व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक १३/१२/२०१६ चे पञान्‍वये नोटीस ला उत्‍तर पाठविले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला रुपये १०,०००/- कधीही अदा केले नाही त्‍यामुळे तक्रारकर्ता रुपये १०,०००/- विरुध्‍द पक्षाकडुन परत घेण्‍यास पाञ नाही. तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर विरुध्‍द पक्षाकडुन रक्‍कम उकळण्‍याच्‍या उद्देशाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेली रुपये १०,०००/- ची पावती सिद्ध करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, प्रतिउत्‍तर,लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍द पक्षाचा लेखी जबाब, लेखी युक्‍तीवाद याचे वाचन केल्‍यावर व उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर  निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                          होय
  3. काय आदेश ?                                                                        अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे गोधनी रोड, नागपूर स्थित प्रस्‍तावित महानंदा कॉम्‍पलेक्‍स मधील दुस-या माळ्यावरील सदनिका एकूण क्षेञफळ ८०० चौरस फुट एकूण रुपये १३,००,०००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचे ठरले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी रुपये १०,०००/- आगाऊ रक्‍कम दिनांक ३१/१०/२०१४ ला अदा केली व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम मिळाल्‍याची पावती अदा केली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी उर्वरीत रक्‍कम देण्‍यास तयार होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी विक्रीपञ करारनामा करुन देण्‍याबाबत विनंती केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिका विक्रीपोटी विक्री करारनामा करुन देण्‍याचे नाकारले ही विरुध्‍द  पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती न्‍युनतम सेवा असून अनुचित व्‍यापार प्रथेचा वापर करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर सदनिका खरेदीपोटी दाखल केलेली बुकींग पावती क्रमांक ३६ दिनांक ३१/१२/२०१४ रुपये १०,०००/- ही खोटी असल्‍याचे सिद्ध करण्‍यात विरुध्‍द पक्ष अपयशी ठरला आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी अदा केलेली रक्‍कम रुपये १०,०००/- परत घेण्‍यास तक्रारकर्ता पाञ आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिका विक्रीपोटी स्विकारलेली बुकींग रक्‍कम रुपये १०,०००/- दिनांक ३१/१०/२०१४ पासून १० टक्‍के व्‍याज दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.