Prabhakar Shitaram Dhamnekar filed a consumer case on 18 Aug 2010 against Shri Akkamahadevi Nagri Sah Pat Sanstha Maryadit, Kolhapur in the Kolhapur Consumer Court. The case no is EA/09/268 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Kolhapur
EA/09/268
Prabhakar Shitaram Dhamnekar - Complainant(s)
Versus
Shri Akkamahadevi Nagri Sah Pat Sanstha Maryadit, Kolhapur - Opp.Party(s)
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
Shrenik Patil, Advocate for AppellantShrenik Patil, Advocate for Appellant
R R Wayangankar, Advocate for RespondentR R Wayangankar, Advocate for RespondentDinesh Patil, Advocate for RespondentS V Mane, Advocate for Respondent
Dated : 18 Aug 2010
JUDGEMENT
आदेश :- (दि.18.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुत प्रकरणी मुळ तक्रारीमध्ये पारीत केलेल्या आदेशाची सामनेवाला यांनी अंमलबजावणी न केल्याने तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 खाली सदरचा वसुली अर्ज दाखल केलेला आहे. या मंचाने सामनेवाला क्र.3, 7, 8, 9, 10 व 11 यांच्या मिळकतीद्वारे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 खाली वसुली करणेचे आदेश पारीत करावेत अशी विनंती तक्रारदारांनी केलेली आहे.
(2) सदर मुद्दयावर तक्रारदार व सामनेवाला यांचे वकिलांचे युक्तिवाद या मंचाने ऐकून घेतलेले आहेत. युक्तिवादाचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी सामनेवाला संचालक हे मूळ तक्रारीमध्ये पक्षकार नसल्याने व त्यांना जबाबदार धरणेत आले नसल्याने त्यांच्या मिळकतींद्वारे वसुली करता येणार असे प्रतिपादन केले आहे.
(3) प्रस्तुत प्रकरणी मूळ तक्रारीमध्ये या मंचाने सामनेवाला संस्थेने तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह द्याव्यात असे दि.19.03.1998 रोजी आदेश पारीत केले आहेत. मुळ तक्रारीमध्ये सामनेवाला क्र.2 ते 14 हे पक्षकार नसल्याने सदर आदेशामध्ये केवळ सामनेवाला क्र.1 यांना जबाबदार धरणेत आले आहे. त्यामुळे सामनेवाला संचालकांच्या मिळकतीद्वारे तक्रारदारांच्या रक्कम वसुली करणेचा दाखल देणेबाबत आदेश पारीत करता येणार नाही. सबब, प्रस्तुत अर्जाकरिता सामनेवाला क्र.1 संस्थेच्या मिळकतीद्वारे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 अन्वये वसुलीची कार्यवाही करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.