Maharashtra

Chandrapur

CC/15/82

Shri Suresh Madhukarrao Karlekar - Complainant(s)

Versus

Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur - Opp.Party(s)

Adv. Yadao

25 Jan 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/81
 
1. Shri Shailesh Madhukarrao Karlekar
Maharaja Apartment Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
Gorkshan Ward Ballarpur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/82
 
1. Shri Suresh Madhukarrao Karlekar
chandrapur
Chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
chandrapur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/83
 
1. Ku Pushpa Jiwan Aale
Ar Maharaja Appartment Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
At gorkhsan Ward Ballarpur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/84
 
1. Shri Ajaykumar Hanslal Dhurve
At Maharaja Appartment Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
At Gorkashan Ward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/85
 
1. Shri Purushotam Maroti Kannake
At Maharaja Appartment Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
At Gorkashan Ward Ballarpur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/86
 
1. Shri Prashant Bhalchandra Maitra
chandrapur
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
chandrapur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/87
 
1. Sau Hemlata Ravindar Thota
At Maharaja Appartment Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
At Gorkshan Ward Ballarpur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/88
 
1. Shri Kishor Hanumantrao Bansod At Bllarpur
At Maharaja Apparment Ballarpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Ajay Ishwardas Kapoor At Ballarpur
At Gorkdhant Ward Ballarpur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 25 Jan 2018
Final Order / Judgement

::: नि का :::

   निर्णयान्‍वये,  (मंचाचे मा. उमेश वि. जावळीकर, मा. अध्‍यक्ष)

 

(पारीत दिनांक :- 25/01/2018)

1.  गैरअर्जदार यांनी अर्जदारास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वय तरतुदीनुसार सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2.  अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करण्यास झालेला ३७० दिवसाचा विलंब क्षमा पित करावा असा अर्ज दाखल केला आहे सदर अर्जावर मंचाने दिनांक ४.०२.२०१६  रोजी अंतिम आदेशामध्ये अर्जावर आदेश पारित करण्यात येईल असे आदेश पारित केले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत. मौका चौकशीसाठी आयुक्त नियुक्त करण्याबाबत तसेच बोअरवेल मिळण्याबाबतचा अंतरिम अर्ज   अर्जदारांनी दाखल केलेला आहे.

3.  अर्जदार कुटुंबासह बल्लारपूर येथे राहत होते. गैरअर्जदार बांधकाम करून उभारीत असलेल्या महाराजा अपार्टमेंट गौरक्षण वर्ड बल्लारपूर येथे सर्वे क्रमांक ३१/०८व ३१/१४ एकूण क्षेत्रफळ0.35.5 हेक्टर आर(३०५०चौ. मि.).मधील गाळा क्रमांक ई-2  ब्लॉक पहिला मजला दि. २५.०३.२०१०   रोजी विक्रीपत्र दस्त क्रमांक १५२/१० नुसार एकत्रित रक्कम रुपये ६,७५,०००/- मध्ये खरेदी केले. कराराच्या अटी व शर्ती प्रमाणे संपूर्ण बांधकाम करून सदनिकेचा ताबा गैर अर्जदारांनी अर्जदारास दिला. ताबा दिल्यानंतर अर्जदाराच्या असे निदर्शनास आले की सदनिकेचे बांधकाम निर्धारित व मंजूर नकाशाप्रमाणे केले नसून पावसाळ्यामध्ये हॉल आणि बेडरूमच्या भिंतीत ओल्या झाल्यानंतर डाग पडतात त्यामुळे रंग दिल्यानंतरही डाग दिसतात व भिंतीचे पोफळे निघतात.संपूर्ण परीसरामध्ये व गॅलरीमध्ये पाणी साठवून डास निर्माण होतात. तसेच स्टाइल्स निघून साप येतात व कचऱ्यामुळे रोगराई वाढते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी शिडीची व्यवस्था नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे. अर्जदाराने प्रत्येक गाळेधारकांकडून रुपये ११,०००/- विद्युत फिटिंग व डीपी बसवण्यासाठी घेतल्यानंतरही गैरअर्जदाराने विद्युत फिटिंग व बटन  व रेगुलेटर बरोबर दर्जाचे लावलेले नाही व कित्येकदा अर्जदारांना स्वखर्चाने बदलावे लागले तसेच चारही अपार्टमेंट इमारती मिळून आजपर्यंत कोणतीच डीपी बसवली नाही. तसेच सदनिकेच्या बांधकामांमध्ये निकृष्ट काम केलेले आहे. गैरअर्जदार यांनी सदनिकाधारकांना सोबत दिनांक ०६.०६.२०११ रोजी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आश्वासन देऊन देखील त्यांची पूर्तता केली नाही. चार इमारत मिळून एकूण चार बोरवेल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. परंतु इमारत क्रमांक दोनचे बोरवेल चे संपूर्ण पाणी गैरअर्जदार त्यांचे बार रेस्टॉरंटसाठी वापरतो तसेच इमारत क्रमांक एकचे बोरवेल मधून गैर अर्जदाराने त्यांच्या घरामध्ये पाईपलाईन सोडून घेतली आहे. इमारत क्रमांक ३ अ व ३ ब चे खाली खोदण्यात आलेली बोअरवेल अगदी सुरुवातीपासून बंद असल्याने इतर बोअरवेल वर तान येतो. व बोरवेल नादुरुस्त होऊन वादविवाद निर्माण होतात.गैरर्जदाराने.अर्जदारांची नावे सात-बारावर न  केल्याने करारातील अटीची पूर्तता केलेली नसून मालमत्ता हस्तांतरीत न झाल्याने अर्जदारांनी सहकारी संस्था स्थापन करण्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे देऊन देखील व दिनाक.१०.०९.२०१४ रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूर यांचेकडे गैरअर्जदार यांनी दिनांक २९.१०.२०१४ रोजी आक्षेप दाखल करून सोसायटीची स्थापना करण्याचा विरोध दर्शवला. गैरअर्जदाराने सर्वे नंबर ३१/१४  चा सातबारा वेगळा करण्यात आल्यास अर्जदाराच्या कराराप्रमाणे हस्तातरण होणे श्यक आहे. गैर अर्जदारांनी यांनी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अभिलेखागार असलेल्या नोंदीप्रमाणे व मा. अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांची पारित आदेशाप्रमाणे मालमत्तेचा फेरफार करणे कामी कोणतीही उपाययोजना न केल्याने अर्जदारास त्रुटीपूर्ण सेवा दिल्याने अर्जदारास शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासापोटी एकंदरीत २,५०,०००/- देण्यास बांधील आहे. तसेच सदनिकेचे विक्रीपत्र करताना सदर मालमत्ता शासकीय जमीन असल्याची बाब अर्जदारास न सांगितल्याने गैरअर्जदारस  रक्कम रुपये २,००,०००/- दंड बसवण्यात यावा तसेच तक्रार मान्य करण्यात यावी अशी अर्जदाराने केली  आहे.
४   . गैर अर्जदारांनी तक्रारीतील मुद्याचे खंडन करून मोजा बल्लारपूर येथील भूमापन क्रमाक ३१ ही संपूर्ण जमीन तत्कालीन मालगुजार वासुदेवराव सराफ व त्यांचे पूर्वजांची होती. गैरअर्जदार यांचे पुर्वधीकार्यानी भूमापन ३१/८ व ३१/१४ जमीन मालकांकडून विकत घेतली होती. परंतु माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना चुकीची माहिती देण्यात आल्यामुळे आणि त्यास अर्जदार व इतर साथीदारांनी खतपाणी घातले याचा आधार दिनांक०६.०६.२०११ पासून झालेला विलंब शामापित करण्यासाठी अर्जदारास घेता येणार नाही. गैर अर्जदाराने कराराप्रमाणे अर्जदारास विक्रीपत्र करून दिले असून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अकृषक वापरातील बदल नियमानुकुल अर्जदाराने अर्ज केला होता. परंतु तो करण्याची गरज नव्हती व माननीय जिल्हाधिकारी यांचा प्रस्तुत तक्रारीशी कोणताही संबंध नाही. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूर यांच्याकडे ४५  सदनिकांपैकी १०  सदनिका गैरअर्जदार यांच्या मालकीची असल्यामुळे प्रस्तावित सोसायटी स्थापन करण्याच्या प्रस्तावावर गैरअर्जदाराची स्वाक्षरी नसून सचिव म्हणून पुरुषोत्तम मारुती कन्नाके व खजिनदार म्हणून सुरेश कारलेकर यांच्या विरुद्ध सदर परिसरातील विनोद अहिरकर यांचेशी वाद झाल्याने फोजदरी  प्रकरण सुरू असल्याने त्यांची नावे कार्यकारिणीतून वगळण्यात यावी असा आक्षेप अर्जदाराने दिला होता तसेच अन्य सदनिकाधारकांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. सदनिकाधारकांची सोसायटी स्थापन करण्यासाठी सहकार्य केले असून बोअरवेलच्या पाण्याबाबतची कथन  असत्य असून अर्जदाराने गैरअर्जदार बोअरवेल चे पाणी हॉटेल व्यवसायासाठी वापरतात ही बाब  असत्य नमूद केली असून १ एप्रिल २०१५  मध्ये हॉटेल बंद करण्यात आले आहे. महाराज अपार्टमेंटमध्ये एकूण ४८  सदनिका असून त्यापैकी ३८  सदनिका प्रस्तुत प्रकरण दाखल करण्यापूर्वी विकलेल्या आहेत केवळ आठ सदनिकाधारकांनी पाण्याची व इतर समस्येबाबत  तक्रार दाखल केलेली आहे .इमारत क्रमांक एक व दोन साठी 2 बोरिंग व दोन पाण्याच्या टाक्या असून इमारत क्रमांक ३ अ व ३ ब  ची पाण्याची टाकी एक असल्यामुळे एकच बोअरिंग लावून दिले आहे असे एकूण तीन बोरिंग असून  इमारत क्रमांक दोन च्या मागे गैर अर्जदारासाठी वेगळी  बोरिंग आहे. गैरअर्जदाराने पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी योग्य ती काळजी घेतली असून सन २०११ मध्ये काही सदनिका धारकांनी इमारत क्रमांक३ अ व ३ ब    ची पाईप लाईन बोरिंग बुजवून इमारत क्रमांक दोनच्या बोरिंग ला इमारत क्रमांक 3 अ व ३ ब  ची पाईपलाईन जोडलेली आहे. सदनिकेमध्ये प्रसाधन गृह व इतर भागातील दुर्गंधी बाबत सदनिकाधारक जबाबदार असून स्वच्छते काळजी न घेतल्याने गैरअर्जदार ह्यांची जबाबदारी नाही. पाण्याच्या टाकीला शिडी लावल्यास लहान मुलगा अथवा अन्य व्यक्ती विनाकरण वर गेल्यास टाकीमध्ये पडून दुर्घटना होऊ शकते ही बाब टाळण्यासाठी शिडी बसवलेली नाही. तसेच महाराजा apartment साठी दिनांक ०९.०८.२०१७ रोजी दाखल छायाचित्रावरून स्वतंत्र शिडीची  तरतूद गैरअर्जदार यांनी केल्याचे दिसून येते. महाराजा अपार्टमेंट साठीचा डीपी  मेन रोडवर दिलासा ग्राम शाळेच्या समोर असून त्यापासून  सहा पोल लाऊन  शेवटचा पोल गैरअर्जदाराच्या घराच्या मागच्या बाजूला असून सर्व सदनिकेमध्ये आयएसआय प्रमाणित उपकरणे लावलेली असून दिनांक ३०.०५.२०१२ रोजीच्या करारनाम्यातील अटी नुसार मालकी हक्काबाबतचे कागदपत्रे अर्जदाराने पाहिलेली असून त्याबाबत कोणताही आक्षेप अर्जदारास नाही असे नमूद आहे. अर्जदाराच्या निष्काळजीपणा बेजबाबदारपणा व व्यवस्थापनातील गलथानपणामुळे अर्जदारांना गैरर्जदारयांच्या कोणत्याही त्रुटीपूर्ण सेवेशिवाय अडचणींना समोरे जावे लागत असून त्यांची जबाबदारी केवळ अर्जदारांवर आहे. मोका चौकशीसाठी आयुक्त नियुक्त करण्याबाबतचा तसेच  बोरवेल मिळण्याबाबतचा अंतरीम अर्ज  मुदतबाह्य बिनबुडाचा अर्थहीन  किंवा निरर्थक आहे .दिनांक १२.०९.२०१७ रोजी दाखल केलेले दास्तेवज दाखल करण्याचा अर्ज तक्रारीशी असंबद्ध व मुदतबाह्य बाबींसंबंधात असल्याने अमान्य करण्यात यावा .प्रस्तुत तक्रार व तक्रारीतील  कथने अर्थहीन व असत्य असून गैरअर्जदारास हेतु पुरस्पर त्रास देण्याच्या उद्देशाने केली असून विलंब  अर्ज मोका चौकशी अर्ज ,अंतरिम अर्ज व मूळतक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे

५ . अर्जदाराची तक्रार कागदपत्रे पुरावा शपथपत्र लेखी युक्तिवाद गैरअर्जदार यांचे कागदपत्र पुरावा शपथपत्र लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालीकामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे

मुद्दे                                                  निष्‍कर्ष

१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदनिका खरेदी करारा प्रमाणे                    होय

  सेवा सुविधा पुरविण्यास कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय

   (2)  गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदनिका खरेदी करारा प्रमाणे                   होय

       सेवा सुविधान पुरविल्यामुळे नुकसान भरपाई अदा करण्यास पत्र आहे. 

   (3)  आदेश काय  ?                                         अंतीम आदेशाप्रमाणे.

 

कारणमीमांसा

मुदा क्र. १ व २ बाबत    

६. अर्जदारांनी गैरअर्जदार बांधकाम करून उभारीत असलेल्या महाराजा अपार्टमेंटमध्ये सदनिका क्रमांक 2 पहिल्या मजल्याची नोंदणी केली गैरअर्जदार सदर apartment ची बांधकाम परावर्तित सर्वे क्रमांक ३१/८ व ३१/१४  यावर केलेल्या आहे, असे विक्री पत्रात नमूद आहे. दिनांक २५.०३.२०१० मध्ये सदर  सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून सदनिकेचा ताबा दिला . ही बाब दस्तावेजात स्पष्ट होते सदर प्रकरणात अर्जदारांनी विलंब माफी अर्ज दाखल केला होता. त्यावर गैर अर्जदारांनी उत्तर दाखल केले मंचाने दिनांक ४.०२.२०१६ रोजी मूळ अर्जासह उशिरा माफी अर्जावर न्याय निर्णय घेण्यात  येईल असा आदेश केला होता. दाखल कागदपत्राची अवलोकन केले असता दिनांक ०६.०६.२०११ रोजी सदनिकाधारकांसोबत गैरअर्जदारांनी  समस्यांबाबत चर्चा केली. सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन करून देणे तसेच इतर सर्व कायदेशीर मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधीची मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. .उभय पक्षांनी मंचा समक्ष दाखल केलेल्या समझोता प्रस्तावाचे अवलोकन केले असता गैरअर्जदारांनी सदर प्रस्तावा प्रमाणे  काही कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली असून त्यापैकी सहकारी संस्थेची स्थापना गैरअर्जदार यांनी केलेली नव्हती परंतु सदर तक्रार मंचात प्रलंबित असताना गैरअर्जदाराने सहकारी संस्थेची स्थापना करून दिलेली आहे.परंतु सोसायटीतील  गैरअर्जदार यांनी अर्जासोबत केलेल्या करारनाम्याचे अवलोकन केले असता गैरअर्जदारानी पदाधिकाऱ्यांचे समिती गठीत करून दिलेली नसल्यामुळे सोसायटीचे काम चालू झालेले नाही. अर्जदारास दिनांक ६.०६.२०११ रोजी केलेल्या चर्चेमध्ये करारनाम्यातील अटी प्रमाणे अनेक बाबींची पूर्तता न केल्या बाबतची छायाचित्र मंचात दाखल आहे. गैर अर्जदारांनी कराराप्रमाणे सदनिकाधारकांची सहकारी संस्था स्थापन करून दिली. सदनिकेत अंतर्गत उच्च दर्जाचे वीज साहित्य रंगरंगोटी स्टाईल, दरवाजे ,पावसाळ्यामध्ये पाणी साठण्यास योग विल्हेवाट याची व्यवस्था सदनिकेत अंतर्गत बांधकामाचा दर्जा योग्य नसने , सार्वजनिक वापराच्या जागेत योग्य विद्युत व्यवस्था नसणे, पाण्याची टाकी नियमितपणे स्वच्छ न करणे सदनिकाधारक साठी मोकळ्या जागेतील मैदान शिक्षा सुरक्षित नसणे, बोरवेल चे पाणी सर्व सदनिकेसाठी पुरेसे नसणे,  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बल्लारपूर यांच्याकडे सहकारी संस्था स्थापन करने संबधी कोणतीही कारवाई न  करणे तसेच बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त करून  जमीन हस्तांतरण न केल्याची बाब सिद्ध होते. गैरअर्जदारांनी कायम फरोक्तखत विहित मुदतीत न करून दिल्याने अर्जदाराची तक्रारीतील मागणी करार दिनांकापासून तक्रार दाखल करण्यास सातत्याने घडणारे कारण असून अर्जदाराने दाखल केलेला विलंब माफी अर्ज मान्य करणे न्यायोचित आहे. सबब विलंब माफी अर्ज मान्य करण्यात येतो. अर्जदाराने  मोका चोकाशीसाठी दाखल केलेला अर्ज दाखल कागदपत्रे वरून व छायाचित्रावरून आवश्यक नसल्याने अमान्य करण्यात येतो. बोअरवेल मिळण्याबाबतचा अंतरिम अर्जावरील आदेश या आदेशामध्ये करण्यात येतात. दिनांक १२.०९.२०१७ रोजी दाखल केलेले दास्तेवेज दाखल करण्याचा अर्ज न्यायाचीत असून करारातील बाबी संदर्भात असल्याने मंजूर करण्यात येतो. गैरअर्जदार यांनी उपस्थित केलेले मुद्दे तांत्रिक स्वरूपाची असून कराराप्रमाणे कायदेशीर जबाबदारी पार पाडल्याची बाब  गैर अर्जदारांनी सिद्ध केली नाही.सबब अर्जदाराने तक्रारीत उपस्थित केलेले मुद्दे यांचे कायदेशीर निराकरन गैरअर्जदार यांनी केले नसल्याने ती करण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांचे आहे. या निष्कर्षाला मंच आला  आहे. उभय पक्षाच्या लेखी व तोंडी युक्तिवादावरून गैरअर्जदार यांनी अर्जदारास कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात   कसूर   केल्यामुळे नुकसान  भरपाई अदा करण्यास पात्र आहे. असे मंचाचे मत आहे.मुदा क्र. 1 व 2 चे उत्तर  होकारार्थ्री देण्यात येते.    

मुद्दा क्रमांक 3 बाबत

 ७. सबब  मुद्दा क्रमांक एक व दोनच्या विवेचनावरून आणि खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.

आदेश

1. ग्राहक  तक्रार क्रमांक ८२/२०१५ अशतः मान्य करण्यात येते

2 गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदनिका खरेदी कराराप्रमाणे ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवा सुविधा देण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते

3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदनिका खरेदी कराराप्रमाणे या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसात उर्वरित सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदनिका खरेदी कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरवण्यास कसूर करून तक्रारदार यांना मानसिक शारीरिक आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये ३०,०००/-  या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसात अर्जदार यांना अदा करावे

5. उभय पक्षाना  आदेशाची प्रत तात्काळ  पाठविण्यात यावी     

 

  

( अधि.कल्‍पना जांगडे(कुटे) ( अधि. किर्ती गाडगिळ) (श्री.उमेशव्‍ही.जावळीकर)                  मा.सदस्या.                   मा.सदस्या.               मा.अध्यक्ष

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.