जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १४३/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २९/०८/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ०६/०६/२०१३
१) मुक्तार शे. सत्तार खाटीक
वय सज्ञान, धंदा – व्यापार
२) अन्सार शे. सत्तार खाटीक
वय सज्ञान, धंदा – व्यापार
३) अकिलाबी शे. सत्तार खाटीक
वय सज्ञान, धंदा – व्यापार
४) इकबाल शे. सत्तार खाटीक
वय सज्ञान, धंदा – व्यापार
५) आयुब इस्लाम खाटीक
वय सज्ञान, धंदा – व्यापार
६) आसिफ फीरोज खाटीक
वय सज्ञान, धंदा – व्यापार
सर्व रा. गौसिया नगर, दोंडाईचा
ता. शिंदखेडा, जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे
पुर्ती बिल्डींग, आग्रा रोड धुळे,
ता.जि. धुळे. ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एन. पी. आयाचित)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ. एस.एस. जैन)
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
(१) मुदत ठेव पावती क्रं.२३५०१, ठेविदाराचे नाव अन्सार सत्तार
खाटीक, मुदत ठेविची रक्कम रू.५०,०००/- मुदत ठेव ठेवल्याचा
दि.१७/०५/२००६, ठेविची मुदत ८४ महीने, व्याजाचा दर द.सा.द.शे.
१०% मुदत ठेव परत मिळण्याची दि.१७/०५/२०१३, प्रमाणे मुदती
अंती परत मिळणारी रककम रू.१,००,०००/-.
(२) मुदत ठेव पावती क्रं.२३९४९, ठेविदाराचे नाव अकीलाबी शे. सत्तार खाटीक, मुदत ठेविची रक्कम रू.२०,०००/- मुदत ठेव ठेवल्याचा दि.०२/०५/२००२, ठेविची मुदत ८४ महीने, व्याजाचा दर द.सा.द.शे. १०% मुदत ठेव परत मिळण्याची दि.०२/०२/२०१४, प्रमाणे मुदती अंती परत मिळणारी रककम रू.४०,०००/-.
(३) मुदत ठेव पावती क्रं.२५३३१, ठेविदाराचे नाव असिफ फिरोज खाटीक, मुदत ठेविची रक्कम रू.९५,०००/- मुदत ठेव ठेवल्याचा दि.१७/०२/२००९, ठेविची मुदत ३० दिवस, व्याजाचा दर द.सा.द.शे. ५% मुदत ठेव परत मिळण्याची दि.१९/०३/२००९, प्रमाणे मुदती अंती परत मिळणारी रककम रू.९५,३९०/-.
(४) मुदत ठेव पावती क्रं.०१७५४३, ठेविदाराचे नाव असिफ फिरोज खाटीक, मुदत ठेविची रक्कम रू.१०,०००/- मुदत ठेव ठेवल्याचा दि.२८/०७/२००५, ठेविची मुदत ७६ महीने, व्याजाचा दर द.सा.द.शे. ११% मुदत ठेव परत मिळण्याची दि.२८/११/२०११, प्रमाणे मुदती अंती परत मिळणारी रककम रू.२०,०००/-.
(५) मुक्तार शे सत्तार खाटीक यांचे सेव्हींग खाते नं.८१४ दि.०९/०३/२०११ रोजीची अखेर रक्कम रू.१,१०,४५८/-.
(६) इक्बाल शे सत्तार खाटीक यांचे सेव्हींग खाते नं.७०९ दि.०५/०३/२००९ रोजीची अखेर रक्कम रू.१०,३०४/-.
(७) अयुब इस्लाम खाटीक यांचे सेव्हींग खाते नं.८५५ दि.०९/०३/२०११ रोजीची अखेर रक्कम रू.१,१०,४२९/-.
२. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावत्यांमधील एकूण देय रक्कम व बचत खात्यांमधील एकूण देय रक्कम व्याजासहीत मिळावी. तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी रू.२५,०००/- प्रत्येकी व तक्रार अर्जाचा खर्च सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.१५ ते २१ वर मुदत ठेव पावत्या व बचत खाते पासबुकच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
३. सामनेवाला यांना नोटीस मिळूनही मुदतीत हजर झाले नाही. म्हणून सामनेवाला यांचे विरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
५. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.१५ ते २१ वर मुदत ठेव पावत्या व बचत खाते पासबुकच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतीतील व बचत खात्यामधील रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतीतील व बचत खातेमधील असलेली रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
६. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.३- तक्रारदार हे सामनेवाला ‘श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे’
यांचेकडून मुदत ठेव पावतींमधील व बचत खातेमधील एकूण रक्कम रू.४,८६,५८१/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.५- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतींतील व बचत खात्यामधील असलेली एकूण देय रक्कम रू.४,८६,५८१/- (अक्षरी रूपये चार लाख शहयांशी हजार पाचशे एकयांशी मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.