Maharashtra

Dhule

CC/12/142

Shri Juned Shaikh Salim Kureshi & Other - Complainant(s)

Versus

Shri Agrasen Sahkari Patpedhi Ltd, Dhule, - Opp.Party(s)

Shri N.P. Ayachit

23 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/142
 
1. Shri Juned Shaikh Salim Kureshi & Other
Gausiya nager, Dondaicha Tal Shindkheda
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Agrasen Sahkari Patpedhi Ltd, Dhule,
Purti Building, Agra Rd.Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                               


 

                                 ग्राहक तक्रार क्रमांक –   १४२/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – २९/०८/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २३/०५/२०१३


 

 


 

१)  जुनेद शे. सलीम कुरेशी  


 

    वय - , धंदा – व्‍यापार


 

२) साजिद शे. सलीम खाटीक


 

    वय - , धंदा – व्‍यापार


 

    दोघे रा. गौसिया नगर, दोंडाईचा


 

    ता. शिंदखेडा, जि. धुळे.                        ................ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे


 

पुर्ती बिल्‍डींग, आग्रा रोड धुळे,  


 

ता.जि. धुळे.                                      ............ सामनेवाला


 

 


 

 


 

न्‍यायासन  



 

(मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.एन. पी. आयाचित)


 

(सामनेवाला तर्फे – एकतर्फा)


 

 


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.सदस्‍या – सौ. एस.एस. जैन)


 

 


 

तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍या पतसंस्‍थेत पेन्‍शन ठेव योजने अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे(यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत पेन्‍शन ठेव योजने अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती. पेन्‍शन ठेव योजनेचा तपशील खालील प्रमाणे आहे.


 

 


 

(१)    पेन्‍शन ठेव योजना पासबुक क्रं.११३६, ठेविदाराचे नाव जुनेद शे. सलिम, मासिक हप्‍ता रक्‍कम रू.५००/-. द.सा.द.शे. १२% प्रमाणे, खाते उघडण्‍याची दि.२८/१०/२००३, ठेविची मुदत ६९ महिने, मुदती अंती परत मिळणारी रक्‍कम रू.५१,२५०/-.


 

 


 

(२)    पेन्‍शन ठेव योजना पासबुक क्रं.११७९, ठेविदाराचे नाव साजीद शे. सलिम, मासिक हप्‍ता रक्‍कम रू.५००/-. द.सा.द.शे. १२% प्रमाणे, खाते उघडण्‍याची दि.२९/०१/२००४, ठेविची मुदत ६९ महिने, मुदती अंती परत मिळणारी रक्‍कम रू.५१,२५०/-.


 

 


 

२.   तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे वर नमुद प्रमाणे पेन्‍शन ठेव योजनेत नियमीत प्रमाणे रक्‍कम गुंतवीत असतांना सामनेवाला यांनी त्‍यांचे दोंडाईचा येथील कार्यालय बंद केले व मासिक हप्‍ते स्विकारणे देखील बंद केले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी मासिक भरलेल्‍या रकमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून पेन्‍शन ठेव योजनेत मासिक हप्‍तादवारे भरलेली एकूण रक्‍कम रू.४६,५००/- द.सा.द.शे. १०% दराप्रमाणे  व्‍याजासहीत  मिळावेत. तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च सामनेवाला यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला.    


 

     तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.१२ ते १६ वर पेन्‍शन ठेव योजनेच्‍या पासबुकच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत.


 

 


 

३.   सामनेवाला यांना नोटीस मिळूनही मुदतीत हजर झाले नाही. म्‍हणून सामनेवाला यांचे विरूध्‍द एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला आहे.


 

    


 

४.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?                होय


 

२.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   होय


 

३.     तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

४.     तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍याकडून मानसिक


 

त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन


 

मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

५.     अंतिम आदेश ?                                 आदेशाप्रमाणे


 

 


 

५.   मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांनी नि.१२ ते १६ वर पेन्‍शन ठेव योजनेच्‍या पासबुकच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची पेन्‍शन ठेव योजनेतील रक्‍कम नाकारलेली नाही. पेन्‍शन ठेव योजनेत भरलेली रक्‍कम याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा क्र.१  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

६.   मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पेन्‍शन ठेव योजने अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

७. मुद्दा क्र.३- तक्रारदार हे सामनेवाला ‘श्री अग्रसेन सह. पतपेढी मर्यादीत धुळे’


 

यांचेकडून पेन्‍शन ठेव योजनेमधील एकूण रक्‍कम रू.४६,५००/- सदर आदेश तारखे पासून रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के दरा प्रमाणे व्‍याजासह, अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.३ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली पेन्‍शन ठेव योजनेतील व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाला यांच्‍याकडुन परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुदद क्रं.४ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

. मुद्दा क्र.५-  तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली सर्व कागदपत्रे व वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

आ दे श


 

 


 

१.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.  सामनेवाला यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे


 

     आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(१) पेन्‍शन ठेव योजनेमधील असलेली एकूण देय रक्‍कम  रू.४६,५००/- (अक्षरी शेहचाळीस हजार पाचशे मात्र)  व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.


 

(२) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व


 

 अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.


 

 


 

३.  वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी करावी.  तसेचक्र.मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास,  त्‍यावर कर्ज      दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

 


 

              (सौ.एस.एस. जैन)                  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

              सदस्‍या                            अध्‍यक्षा


 

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.