(निकालपत्राचे कथन मा.अध्यक्षा सौ.सुजाता पाटणकर यांनी केले) नि का ल प त्र (1) अनेक दिवसांचे लोकमत या वर्तमानपत्रातील जाहिरातीने व मिळालेल्या माहितीपत्रकाने सुयोग्य गुंतवणुकीसाठी अर्जदार प्रतिवादी यांचेकडे आकर्षीत झाले. त्याप्रमाणे गुंतवणूक केली. गुंतवणूक व त्यावरील आकर्षक व्याज यानुसार श्री. अजय वासुदेव क्षेत्रिय यांचे ऑफिसमध्ये जाऊन रु.100/- चे नॉन ज्युडीशिअल स्टॅम्पवर दोन गुंतवणूका केल्या. दिनांक 01/12/2011 रोजी दोन हमीपत्रे करुन घेतली. हमीपत्रात ठरल्याप्रमाणे प्रिन्सीपल अमाऊंट रु.5,50,000/-(रु.4,50,000/- अधिक रु.1,00,000/-), ठरलेल्या व्याजासाठी रक्कम रु.3,31,111/- अशी एकूण प्रिन्सीपल रक्कम रु.8,81,111/- या रक्कमेवर जुन-1913 अखेरपर्यंत दर महिन्याला 1.5 टक्के व्याजासह देणेचे ठरले. अंडरटेकींग प्रमाणे प्रतिवादी यांनी पहिला हप्ता दि.06/01/2012 मध्ये रक्कम ग्राहक तक्रार क्र.72/2012 रु.4,50,000/- हया प्रिन्सीपल रकमेसाठी व्याज रुपये 7,209.09/-इतकी मिळाली व रु.1,00,000/- प्रिन्सीपल रक्कमेवर पहिला हप्ता दि.10/01/2012 ला रु.1,602.02/- इतके व्याज मिळाले. परंतु पुढचा फेब्रुवारी-2012 या महिन्याचे हप्त्याचे पैसे घेणेसाठी गेला असता ऑफिस बंद करुन बोर्ड वगैरे काढून प्रतिवादी गायब झाले. त्यांचा अदयाप ठावठिकाणा नाही. दि.4/10/2012 रोजी अर्जदार यांनी सदरचे प्रकरण बोर्डावर घेण्यासाठी अर्ज दिलेला आहे व त्यात सदर तक्रार अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्ती अर्ज शपथपत्रासह दाखल केलेला आहे. सदर दुरुस्ती अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. सदर दुरुस्ती अर्जात प्रीन्सीपल रकमेवर व व्याजासह दि.1/12/2011 च्या दोन हमीपत्राप्रमाणे एकूण रक्कम रु.8,81,111/- सामनेवाला यांचेकडून अर्जदारास मिळण्याचा आदेश व्हावा,प्रिन्सीपल रक्कम रु.5,50,000+रु.3,31,111/-. मानसिक त्रासाबाबत व धक्याबाबत रु.15,000/- मिळावेत, कोर्टाचा खर्च रु.10,000/- तसेच टपाल खर्च, फोन खर्च असे मिळून रु.10,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. (2) अर्जदार यांनी अर्जासोबत शपथपत्र व कागदयादीने वर्तमानपत्रातील जाहिरातीचे कटींग झेरॉक्स प्रत, समृध्दी वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि. यांचे माहितीपत्रक, प्रॉमिसरी नोट, अंडरटेकींग, दोन नोटीसचे परत आलेले लखोटे इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. (3) या अर्जाचे कामी सामनेवाला यांना मे. मंचामार्फत वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस/समन्सची बजावणी होऊनही सामनेवाला या मंचात हजर राहिलेले नाहीत. सबब त्यांचेंविरुध्द एकतर्फा आदेश दि.09/08/2012 रोजी करण्यात आलेला आहे. (4) अर्जदार यांचे अर्जातील कथन सामनेवाला यांनी हजर राहून नाकारलेले नाही. त्यामुळे अर्जदार यांचे अर्जातील कथन व कथनाचे पुष्टयर्थ दाखल केलेली कागदपत्रे अबाधीत राहिलेली आहेत. (5) वरील सर्व विवेचनाचा विचार करता खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षाकरिता उपस्थित होतात. - अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत का ? -- होय.
ग्राहक तक्रार क्र.72/2012 - सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये कमतरता केलेली आहे का? -- होय.
- आदेश?--अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र.1- अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.5,50,000/- एवढी गुंतवलेली आहे. त्याबाबतची सामनेवाला यांची प्रॉमीसरी नोट व अंडरटेकिंग अर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेले आहे सदरची बाब सामनेवाला यांनी या अर्जाचे कामी हजर राहून नाकारलेली नाही. अर्जदारांचा अर्ज, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेली प्रॉमीसरी नोट व अंडरटेकींग याचा विचार करता अर्जदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्दा क्र.2- अर्जदार यांनी जाबदेणार यांचेकडे रक्कम रु.5,50,000/- ही अनुक्रमे दि.6/12/2010 रोजी रक्कम रु.4,50,000/- व दि.10/12/2010 रोजी रक्कम रु.1,00,000/- अंडरटेकिंगमध्ये नमूद केल्याप्रमाणे गुंतवलेली आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार सामनेवाला यांनी अंडरटेंकिंगप्रमाणे रक्कम रु.4,50,000/-वर व्याजापोटी रक्कम रु.7,209.09पैसे एवढी अर्जदारांना अदा केलेली आहे तसेच दि.10/1/2012 रोजी रक्कम रु.1,00,000/- वर व्याजापोटी रक्कम रु.1,602.02पैसे एवढी अर्जदार यांना अदा केलेली आहे. म्हणजेच अर्जदार यांना जानेवारी महिन्यामध्ये पहिला हप्ता मिळालेला आहे. फेब्रुवारी 2012 पासून अर्जदार यांना अंडरटेकिंगप्रमाणे व्याजाची रक्कम सामनेवाला यांनी अदा केलेली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी सामनेवाला यांना दि.2/4/2012 रोजी रजिस्टर पोष्टाने डिमांड नोटीस पाठविल्याचे दाखल डिमांड नोटीस व लेफट अशा शे-यासह परत आलेल्या लखोटयावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी मागणी करुनही सामनेवाला यांचेकडे गुंतवलेली रक्कम अर्जदार यांना कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना देण्याचे नाकारलेले आहे याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. ग्राहक तक्रार क्र.72/2012 अर्जदार यांनी रक्कम रु.5,50,000/- एवढी रक्कम सामनेवाला यांचेकडे गुंतवल्यानंतर सामनेवाला यांनी अर्जदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या अंडरटेकिंगप्रमाणे अर्जदार यांना व्याजापोटी फक्त एकाच हप्त्याची रक्कम अदा केलेली आहे. त्यानंतर आज अखेर सामनेवाला यांनी अर्जदार यांना व्याजापोटी ठरलेली रक्कम अगर मुळ मुद्दल अर्जदार यांच्या मागणीप्रमाणे अदा केलेली नाही. त्यामुळे अर्जदार हे मुळ मुद्दल रक्कम रु.5,50,000/- व सदर रकमेवर दि.01/02/2012 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत 9टक्के व्याजासह होणारी एकूण रक्कम वसूल करुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांची रक्कम रु.5,50,000/- एवढी रक्कम सामनेवाला यांनी कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना स्वतःकडे आज अखेर गुंतवून ठेवलेली आहे. सदर रकमेचा अर्जदार यांना स्वतःचे गरजांसाठी विनीयोग करता आलेला नाही. त्यामुळे अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.10,000/- नुकसान भरपाई पोटी वसूल करुन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांची मुळ मुद्दल रक्कम रु.5,50,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल करुन मिळण्यासाठी अर्जदार यांना या मे. मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे त्यामुळे अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3000/-वसूल करुन मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे. आदेश - तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येत आहे.
- सामनेवाला यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रक्कमा अदा कराव्यात.
अ. दि.22/12/2011 रोजीच्या अंडरटेकिंगप्रमाणे दि.6/12/2010 रोजी गुंतवलेली रक्कम रु.4,50,000/-व दि.10/12/2010 रोजी गुंतवलेली रक्कम रु.1,00,000/- ग्राहक तक्रार क्र.72/2012 अशी एकूण मिळून रक्कम रु.5,50,000/- द्यावेत व सदर रकमेवर दि.1/2/2012 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत 9टक्के व्याजासह होणारी एकूण रक्कम द्यावी. आ. नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- दयावेत. इ. अर्जाचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांनी अर्जदारास अदा करावेत. - सदर आदेशाची अंमलबजावणी सामनेवाला यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 30 दिवसांत करावी.
|