आदेश पारीत व्दारा – सौ. मोहिनी ज.भिलकर, सदस्या.
अर्जदार, श्रीचरणदास डोनूजी गेडाम, यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय थोडक्यात असा की,
... 2 ...
... 2 ....
अर्जदार यांनी स्वतःच्या घरातील एका मीटरवर पुन्हा दोन सब मीटर घेतलेले आहे. त्याचे वीज देयक अवाजवी येत आहे, असे अर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदार यांचेकडे दिनांक 21/5/2008 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनी, गडचिरोली हे मीटर तपासणीकरीता आले असता, मीटर क्रमांक RLA –5261 स्लो आहे, ते बदलवून नविन मीटर लावतो, असे सांगून थोडयाच वेळात पुन्हा तुमचे तिनही मीटर स्लो फीरत असल्यामुळे तिनही मीटर बदलावे लागतात, असे सांगितले, तेंव्हा, अर्जदार यांनी त्यास विरोध केला. गैरअर्जदार यांनी पैशाची मागणी केली असता अर्जदार यांनी ती नाकारली, तेंव्हा गैरअर्जदार यांनी एकच मीटर बदलवून देऊ, असे सांगून निघून गेले.
दिनांक 23/5/2008 रोजी गैरअर्जदार यांनी सक्तीने, अर्जदार यांचे तिनही मीटर बदलवले व तुम्हाला जे करायचे ते करा, असे सांगितले. तेंव्हा, अर्जदार यांनी ताबडतोब गैरअर्जदार यांचेकडे जाऊन चौकशी केली असता, त्यांचे म्हणणे ऐकुण घेतल्या गेले नाही.
अर्जदार म्हणतात की, जर मीटर स्लो होते तर गैरअर्जदारांनी वेळीच दाखल कां घेतली नाही. तसेच, नविन मीटर लावण्याची मोहीम सुरु असेल तर, प्रत्येक वीज ग्राहकांकडे नविन मीटर कां लावण्यात आले नाही. गैरअर्जदार यांनी माझेवर बुध्दीपुरस्पर अन्याय केला आहे.
यासंबंधी, अर्जदार यांनी दिनांक 26/5/2008, दि. 5/6/08 व 20/8/08 रोजी गैरअर्जदार यांना निवेदन दिले, परंतु कोणतीच माहीती कळविण्यात आली नाही. अर्जदार म्हणतात की, मी वीज चोरी केलेली नाही, तसेच मीटर छेडले नाही, त्यामुळे मी अपराधी नाही. गैरअर्जदार यांनी अधिकाराचा दुरुपयोग केलेला आहे.
अर्जदार मागणी करतात की, नविन मीटर अति जलद फीरतात ते बदलवून मिळण्यात यावे. एक वर्षा पासुनचे अवैध वीज देयक रद्द करण्यात यावे. मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदार
... 3 ...
... 3 ...
यांचेकडून मिळावेत. तसेच, ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 6,000/- गैरअर्जदार यांनी द्यावे.
गैरअर्जदार आपल्या लेखी उत्तरात नि.क्र. 5 वर म्हणतात की, माहे- मे महिन्यात ‘’वीज चोरी अभियान’’ राबविण्यात आले होते. त्या अभियानानुसार दिनांक 21/5/2008 रोजी, पथक अर्जदार यांचे घरी गेले असता, तपासणी अंती मीटर क्रमांक RLA –5261 व RLA –5256 हे स्लो फीरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे, ते दिनांक 23/5/2008 रोजी बदलण्यात आले. कंपनीच्या नियमाप्रमाणे रिकव्हरी करण्यात आली. रिकव्हरी चुकीची करण्यात आली असल्याचे पञ अर्जदार यांनी, गैरअर्जदार यांना दिल्यावर त्यांनी दोन्ही मीटर तपासणीकरीता पाठविले. त्यात मीटर क्रमांक RLA –5261 हे मीटर 20.32 % स्लो RLA –5256 हे मीटर 9.85% स्लो असल्याचे अहवालात आढळून आले. अहवालानुसार रिकव्हरीची जास्तीची रक्कम ऑक्टोंबर-2008 च्या वीज देयकात कमी करुन देण्यात आली आहे.
अर्जदार यांचा मीटर क्रमांक RLA –5261 चा मार्च-08 ते मे-08 चा तिन महिन्याचे फक्त 28 युनिटचे व नविन मीटर बदलल्यावर जुन-08 ते ऑगष्ट-08 चा तिन महिन्यात 602 युनिटचा वापर झाला. तसेच, मीटर क्रमांक RLA –5256 चा मार्च-08 ते मे-08 या तिन महिन्यात 102 युनिट व नविन मीटर बदलल्यावर 125 युनिट वापर झाला. यावरुन, जुने मीटर किती स्लो होते, हे दिसुन येते.
गैरअर्जदाराने पुढे नमुद केले आहे की, रिकव्हरीची कार्यवाही कंपनीच्या नियमानुसार व विद्युत कायदा-2003 नुसार व वीज चोरी अभियान अंतर्गत केलेली आहे. त्यामुळे, अर्जदार यांचेवर बुध्दीपुरस्पर अन्याय किंवा मानसिक ञास देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदार यांची तक्रार संपूर्ण खोटी असून, दिशाभूल करणारी आहे, म्हणून खारीज करण्यात यावी.
.... 4 ...
.... 4 ....
// कारणे व निष्कर्ष //
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञे, शपथपञे, रेकॉर्डवर असलेला पुरावा व दोन्ही पक्षानी केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांचेकडे नविन मीटर लावले. परंतु, विज देयक पाठवितांना नविन मीटरच्या रिडींग प्रमाणे वीज देयक न पाठवीता, जुने मीटर स्लो फीरत असल्यामुळे, रिकव्हरीच्या आधारावर वीज देयक अर्जदार यांना देण्यात आले आहे, हा गैरअर्जदार यांच्या सेवेतील दोष आहे.
अर्जदार यांच्या जुन्या मीटरची रिकव्हरी जुलै-08 च्या वीज देयकात जोडून दिल्यामुळे वीज बिल अवाजवी आलेले आहे. जे त्यांनी भरलेले दिसत नाही. गैरअर्जदार यांनी रिकव्हरी वीज देयक काढणे हे न्यायोचित नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी मीटर बदलवतांना, अर्जदार यांना पूर्व सूचना द्यावयास पाहिजे होते. मीटर बदलवतांना मीटरचे रिडींग किती होते, याचा पंचनामा गैरअर्जदार यांनी केलेला नाही व नविन मीटर सुध्दा टेस्ट करुन लावलेले आहे किंवा नाही, याबद्दलचा अहवाल, अर्जदार यांना सादर केलेला नाही. यावरुन, नविन मीटर सुध्दा बरोबर असेल की नाही, हे सांगता येत नाही. यावरुन, गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्युनता लक्षात येते.
गैरअर्जदार यांनी स्थळ अहवालात दिनांक 21/5/2008 रोजी कुठेही वीज चोरीचा उल्लेख केलेला नाही. परंतु वीज देयक देतांना विज चोरी दाखवून रिकव्हरी बिल दिलेले आहे. त्यावरुन, चोरी ही सिध्द होत नाही. याच आशयाचे मत, ‘आदरणीय पंजाब ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंदीगड’ यांनी पंजाब राज्य इलेक्ट्रीसीटी बोर्ड – विरुध्द – जसबीर सिंग, (III)- 2003 सी.पी.जे.-393 (पंजाब) यात दिले आहे, त्यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडतो, त्यातील महत्वाचा भाग खालीलप्रमाणे.
Consumer Protection Act, 1986 ---Section 15-- Electricity --- Theft of energy not proved –site inspection report was not prepared –
.... 5 ...
... 5 ...
-- Allegation of electricity theft not proved --- O.P. liable to refund penalty charged with interest @ 15 % p.a.
......... ......... .........
गैरअर्जदाराने, मीटर तपासणी ही अर्जदारासमोर करण्यात आलेली नाही. तसेच, गैरअर्जदाराने, अहवालात 20.32 % व 9.85% मीटर स्लो होते असे सांगीतले यात बरीच तफावत दिसुन येते. RLA – 5261 चे घटनास्थळ निरिक्षण मध्ये 25 % मंदगती असल्याचे नमुद आहे. त्यात खोडाखोड दिसून येतो, तर तोच मीटर टेस्टींग लॅबमध्ये 20.32 % स्लो असल्याचा रिपोर्ट दिला आहे. त्याप्रमाणे, RLA – 5256 स्थळ निरीक्षण अहवालात 20 % स्लो दाखविले आहे आणि लॅब रिपोर्ट मध्ये 9.85 % स्लो नमुद केले आहे. गैरअर्जदार यांनी मीटर टेस्ट 17/10/2008 ला केले त्यात मीटर 20.32 % आणि 9.85 % स्लो असल्याचा रिपोर्ट दिला आहे. परंतु, दाखल दस्ताऐवजावरुन अर्जदारास देयक दिनांक 8/8/2008 ला देण्यात आले, त्यात चोरीचे बिल म्हणून नमुद करुन रुपये 1,393.10/- दाखविले, यावरुन असे सिध्द होतो. गैरअर्जदार यांनी RLA No. 5261 आणि RLA -5256 चे बिल स्थळ निरीक्षण अहवालाचे आधारावर स्लो मीटरची रिकव्हरी बिलात समावेश करुन दिले असल्यामुळे, ती रिकव्हरी रद्द होण्यास पाञ आहे. यावरुन, गेरअर्जदार यांचा अहवाल ग्राह्य धरता येत नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे.
अशास्थितीत, उपरोक्त विवेचनावरुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना दिलेल्या वीज देयकातील जुन्या
मीटरची रिकव्हरी न घेता, नविन मीटरच्या रिडींग प्रमाणे वीज
देयक देण्यात यावी.
.... 6 ...
... 6 ...
(3) गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांचे लावलेले तिनही मीटर अर्जदार
यांचेसमोर टेस्ट करुन, तसा अहवाल अर्जदार यांना 30 दिवसांचे
आंत सादर करावा.
(4) अर्जदार यांना झालेल्या शारीरीक व मानसिक ञासाबद्दल, गैरअर्जदार
यांनी, अर्जदार यांना रुपये 2,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च
रुपये 1,000/- अर्जदार यांना, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून
30 दिवसांचे आंत देण्यात यावे.