::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 16/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने आममुखत्यार पञ देवून श्री चरणदास मडावी यांना सदर तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिले आहे. अर्जदाराने गैरअर्जदारापासून दि. 26/7/03 ला जमीन खरेदी करण्याचा करारनामा केला. त्या करारनाम्याच्या अनुषंगाने गैरअर्जदाराला प्लॉटची पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर प्लॉटचा ताबा अर्जदाराला दायचा होता परंतु अर्जदाराने करारनाम्यानुसार विक्रीची रक्कम पेक्षा जास्त रक्कम गैरअर्जदारांना देवून सुध्दा अर्जदाराला सदर प्लॉटची विक्री करारनामा किंवा ताबा दिला नाही. अर्जदाराने दि. 16/07/06 ला गैरअर्जदाराला सदर प्लॉटची शेवटची किस्त दिली. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर प्लॉटची रजि. विक्रीपञ करुन देण्याची विनंती करुन सुध्दा गैरअर्जदार भुखंडाची विक्री करुन दिली नाही. ऑगस्ट 2014 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदाराला सदर भुखंडाची रजि. विक्री करुन देण्यास नकार दिला सबब गैरअर्जदाराला दि. 16/09/14 ला वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवून सदर भुखंडाची विक्री करुन देण्याची विनंती केली. सदर नोटीस प्राप्त होवून सुध्दा गैरअर्जदाराने त्यावर दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली केली आहे.
2. अर्जदाराची तक्रार दाखल होवून अर्जदाराच्या वकीलातर्फे प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदाराच्या प्राथमिक युक्तीवादात व तक्रार व दस्ताऐवजाची पडताळणी करुन सदर मंच खालील असलेले कारणे व निष्कर्षानुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
कारणे व निष्कर्ष
3. अर्जदाराने नि. क्रं. 2 वर दस्त क्रं. 2 (करारनामा) ची पडताळणी करतांना असे दिसते कि, अर्जदाराने वादातील प्लॉटची विक्री किंमत गैरअर्जदाराला मिळाल्याच्या नंतर प्लॉटचा ताबा अर्जदाराला देण्यात येईल. अर्जदाराने तक्रारीत असे नमुद केले आहे कि, दि. 16/7/06 ला अर्जदाराने गैरअर्जदाराकडे प्लॉटची ठरलेली रक्कम पेक्षा जास्त रक्कम दिली तरी सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराला प्लॉटची रजि. विक्रीपञ करुन दिली नाही व ताबा दिला नाही. सबब मंचाच्या मताप्रमाणे सदर तक्रार दाखल करण्याचे कारण 17/7/06 ला घडले. ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 24 (अ) (1) प्रमाणे सदर तक्रार कारण घडल्याचे मुदतीच्या आत दाखलकरण्यात आली नसल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
//अंतीम आदेश//
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति परत देण्यात याव्या.
(3) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 16/12/2014