::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, श्री.मिलींद पवार (हिरूगडे) मा.अध्यक्ष (पारीत दिनांक : 26.03.2013) 1. अर्जदारांनी सदर तक्रारी, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये अर्ज दाखल केल्या आहे. वरील सर्व तक्रारकर्त्यांनी सारख्याच व्यक्तींना गै.अ.क्र.1, 2 व 3 म्हणून सामील केलेले आहे. सर्व तक्रारी मधील तपशीलाचा भागात काही फरक वगळता बहुतांश वस्तुस्थिती आणि कायदेविषयक बाबी समान आहेत. म्हणून ह्या सर्व तक्रारींचा एकञितपणे निर्णय देण्यात येत आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 2. गै.अ.क्र.1, 2 व 3 हे श्री गुरुमाऊली असोसिएटस्, वरोरा चे भागीदार आहेत व ते श्रीया डेव्हलपर्स या नांवाने भुखंड विक्रीचा व्यवसाय करतात. सन 2004 या वर्षी गै.अ. हे अर्जदारांना भेटले व त्यांच्या प्रस्तावित निवासी वापराकरीता उपलब्ध असलेल्या लेआऊट मधील नियोजित भुखंडाविषयी सांगितले. त्यांचे म्हणणेनुसार त्यांचे ताब्यात असलेले शेत भुमापन क्र.1/7, 1/9, व 1/12 आराजी 0.85 हेक्टर, 2.10 एकर मौजा बोर्डा, ता.वरोरा, जि. चंद्रपूर हक्क भोगवटदार वर्ग 1 ह्या शेतामध्ये गुरुमाऊली नगर भाग-2 या नावाने लेआऊट तयार केले. भुमापक क्रं. 1/7 मध्ये 33 भुखंड, भुमापक क्रं. 1/9 मध्ये 38 भुखंड आणि भुमापक क्रं. 1/12 मध्ये 29 भुखंड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भुमापक क्रं. 1/7, 1/9 व 1/12 मधील क्षेञ 2.10 एकर हे सारखेच आहेत. त्याप्रमाणे वर नमुद लेआऊट मधील भुखंड खरेदी करणे करीता अर्जदारांना आमंञित करण्यात आले. अर्जदारांनी गै.अ.यांचा प्रस्ताव कबुल केला. व नियोजित लेआऊट मधील क्रमांकातील वेगवेगळे भुखंड लिहून घेण्याचा करार गै.अ.सोबत केला. अर्जदारांनी करार करतेवेळी जमेल तेवढी रक्कम विसारादाखल गै.अ.यांना दिली व त्यानंतर पसंत केलेल्या भुखंडाच्या ठरलेल्या एकूण रक्कमेपैकी ब-याच रकमा गै.अ.यांना वेळोवेळी दिल्या आहेत. परंतु त्यानंतर अर्जदारांना सदर लेआऊट मध्ये कुठलाही विकास दिसुन आला नाही. तेव्हा अर्जदारांनी पूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवून कराराप्रमाणे सदर भुखंडाची विक्रीपञ. नोंदवून मागितले. तेव्हा गै.अ.यांनी वेगवेगळी कारणे सांगून विक्रीपञ नंतर करुन देवू असे आश्वासन दिले. 3. खालील नमुद परिशिष्ट अ मध्ये सर्व तक्रारदारांनी केलेले कागदपञे, ठरलेली भुखंड, भुखंडाची एकूण किंमत, इसारापोटी दिलेली रक्कम, वेळोवेळी गै.अ.यांचेकडे जमा केलेली रक्कम, शिल्लक देणे एकूण तपशील दिलेला आहे. परिशिष्ट – अ
अ.क्र. | 1 | 2 | 3 | 4 | 5 | ग्राहक तक्रार क्र. | 197/2011 | 198/2011 | 199/2011 | 200/2011 | 201/2011 | (A ) तक्रारदाराचे नांव | पुष्पा विनायक माहुरे | मधुकर काशिनाथ वरुटकर | अरविंद वामनराव खोकले | दशरथ हरिभाऊ ढोले | प्रदीप गजानन बुर्लावार | (B) करारनाम्याचा दिनांक | 18.9.2003 | 18.9.2003 | 20.1.2004 | 12.2.2004 | 20.1.2004 | (C) भुमापन क्रं. | 1/7 | 1/7 | 1/7 | 1/9 | 1/7 | (D) प्लॉट नंबर व क्षेञफळ | 6 व 7 3382.90 चौ.फुट | 19 1937.52 चौ.फुट | 7 1776.06 चौ.फुट | 6 1614.60 चौ.फुट | 13 2316.15 चौ.फुट | (E) कराराच्या वेळी दिलेली रक्कम | 25,000/- | 8,000/- | 10,000/- | 10,000/- | 10,000/- | (F) प्रत्यक्ष पावत्या प्रमाणे दिलेली रक्कम | 60,000/- | 26,000/ | 40,000/- | 43,000/ | 50,000/- | (G) एकञ दिलेली व भरलेली रक्कम | 85,000/- | 34,000/- | 50,000/- | 53,000/- | 60,000/- | (H) राहिलेली देणे रक्कम | 33,401/- | 33,813/- | 12,162/- | 2711/- | 21,093/- | (I) प्लॉटची खरेदीची ठरलेली किंमत | 1,18,401/- | 67,813/- | 62,162/- | 56,511/- | 81093/- | (J)नोटीस पाठविल्याचा दिनांक | 11/11/2011 | 11/11/2011 | 11/11/2011 | 11/11/2011 | 11/11/2011 | (K) गै.अ.यांना झालेचा दिनांक | 15/11/2011 | 15/11/2011 | 15/11/2011 | 15/11/2011 | 15/11/2011 | (L) मागणी केलेली विनंती | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | (M) मागितलेली नुकसान भरपाई व खर्चाची रक्कम | 20,000/- | 20,000/- | 20,000/- | 20,000/- | 20,000/- |
परिशिष्ट – अ
अ.क्र. | 6 | 7 | 8 | ग्राहक तक्रार क्र. | 202/2011/ | 203/2011 | 204/2011 | (A) तक्रारदाराचे नांव | दामोदर पुंडलीक भासपाले | राजेश व्यंकटरम्य्या पडिशाळवार | सौ.निशा लोकराम भगत | (B) करारनाम्याचा दिनांक | 20.1.2004 | 12.2.2004 | 7.7.2003 | (C) भुमापन क्रं. | 1/7 | 1/12 | 1/7 | (D) प्लॉट नंबर व क्षेञफळ | 6 2018.25 चौ.फुट | 26 2107.69 चौ.फुट | 14 2274.16 चौ.फुट | (E) कराराच्या वेळी दिलेली रक्कम | 10,000/- | 20,000/- | 10,000/- | (F) प्रत्यक्ष पावत्या प्रमाणे दिलेली रक्कम | 35,000/ | 60,000/- | 37,000/ | (G) एकञ दिलेली व भरलेली रक्कम | 45,000/- | 80,000/- | 47,000/- | (H) राहिलेली देणे रक्कम | 25,639/- | 35,913/- | 32,596/- | (I) प्लॉटची खरेदीची ठरलेली किंमत | 70639/- | 115923/- | 79596/- | (J) नोटीस पाठविल्याचा दिनांक | 11/11/2011 | 11/11/2011 | 11/11/2011 | (K)गै.अ.यांना झालेचा दिनांक | 15/11/2011 | 15/11/2011 | 15/11/2011 | (L) मागणी केलेली विनंती | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | ठरलेल्या भुखंडाचे विक्रीपञ करुन दयावे किंवा भरलेली रक्कम व त्यावर 24%व्याज | (M) मागितलेली नुकसान भरपाई व खर्चाची रक्कम | 20,000/- | 20,000/- | 20,000/- |
4. अर्जदारांना चौकशीअंती असे लक्षात आले कि, उपरोक्त भुखंड कसल्याही प्रकारे विकसीत करण्यात आलेला नसून गै.अ.नी वरील भुखंडाच्या विक्री करीता आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता केलेली नाही. अर्जदारांना असे सांगण्यात आले कि, सध्या विक्री बंद असल्यामुळे ती करता येणार नाही. त्यामुळे, जेंव्हा विक्री सुरु होईल त्यावेळेस करुन देण्याचे आश्वासन दिले. अर्जदारांनी उर्वरीत रकमेचा भरणा करण्याचे थांबविले व गै.अ.यांना विक्रीसंबंधी आवश्यक कागदपञांसंबंधी विचारले असता, दि.5.5.2007 रोजी गै.अ.नी अर्जदारांना अकृषक परवानगी (N A) मिळाली नसल्याचे सांगितले व विक्रीची मुदत गै.अ. च्या अडचणी दूर होऊन अकृषक परवानगी मिळेपर्यंत वाढविण्यात आल्याचे कळविले. 5. अर्जदारांनी, दि.7.3.2008, दि. 15.10.2009, दि. 4.5.2010 दि. 30.7.2010 या दिवशी गै.अ.ना विक्रीसंदर्भात विचारले असता परवानगी मिळाल्यावर विक्री करता येईल असे सांगण्यात आले व आजपर्यंत गै.अ.नी अर्जदारांना अकृषक परवानगी मिळाली किंवा नाही याबद्दल सांगितलेले नाही. वरील सर्व बाबींमुळे अर्जदारांना मानसिक, शारिरीक ञास, तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असल्यामुळे अर्जदारांनी गै.अ.ना त्याचे वकीलाकडून कायदेशीर नोटीस बजावली, ती नोटीस गै.अ.ना मिळून सुध्दा त्याचे उत्तर देण्याचे टाळले आहे व अर्जदारांना भुखंडाची विक्री करुन देण्यात आलेली नाही. 5. गै.अ.नी करारनाम्यामध्ये नमूद अटींची पुर्तता करण्यास कसुर केल्यामुळे अर्जदारांची फसवणूक झालेली आहे. म्हणून, उपरोक्त ञुटीपूर्ण सेवे करीता गै.अ.जबाबदार आहे. करारनाम्यामध्ये नमूद अटींची पुर्तता करण्यास अर्जदार सर्वदा तयार होते व आजही तसे करण्यास ते तयार आहेत, त्या अनुषंगाने अर्जदारांनी विक्रीची मोठी रक्कम गै.अ.कडे जमा केलेली आहे. अर्जदाराने या अर्जासोबत दस्ताऐवज, पावत्या दाखल केलेल्या आहेत. गै.अ.नी, अर्जदारांना दिलेल्या ञुटीपूर्ण सेवेकरीता दोषी ठरवून गै.अ.ना वर निर्दिष्ट निवासी भुखंडाचे विक्रीपञ अर्जदारांना करुन देण्याचे आदेश द्यावेत. किंवा विक्रीपञ नोंदणी करण्यास काही कायदेशीर अडचणी असल्यास अर्जदारांनी भरलेली रक्कम द.सा.द.शे.24 टक्के दराने परत करण्याचे आदेश देण्यात यावेत, अर्जदारांना झालेल्या मानसिक ञासापोटी व झालेल्या खर्चापोटी रुपये 10,000/- देण्याचे आदेश गै.अ.ना द्यावेत, तसेच प्रकरणाला लागलेला खर्च रुपये 10,000/- नुकसान भरपाई म्हणून अर्जदारांना देण्याचा आदेश द्यावेत, म्हणून प्रस्तुत तक्रारी अर्ज में.न्यायमंचात दाखल केले आहे.. अर्जदारांनी तक्रारी अर्जासोबत भुखंडाचे लेआऊट, करारपञ, पैसे भरल्याच्या पावत्या, वकीलांचे नोटीस इत्यादी दस्ताऐवज दाखल केले आहेत. अर्जदारांची तक्रार नोंदणी करुन गै.अ.क्रं. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1 व 2 यांना बजावणी झाली व ते मंचात वकीलामार्फत दाखल झाले.माञ म्हणणे न दिल्यामुळे त्यांच्याविरुध्द नो-से आदेश झाला .तर गै.अ.क्रं 3 यांना पाठविलेला नोटीस Not Claimed म्हणून परत आला. त्यामुळे गै.अ.क्रं. 3 यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावा असा आदेश नि. क्रं. 1 वर पारीत करण्यात आला. 6. अर्जदाराची तक्रार, दाखल कागदपञे, अर्जदाराचे वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा साकल्याने विचार करता पुढील मुददे (Points of Consideration) मंचाचे विचारार्थ उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे
1) प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे काय ? होय. 2) गै.अ.यांनी सेवेमध्ये ञुटी केली आहे काय ? होय. 3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्रं. 1 7. गैरअर्जदार व अर्जदार यांचे मध्ये करार भुखंड विक्रीबाबत करार झालेला आहे. तो करार नि.8/2 कडे दाखल आहे. व लेआऊट नकाशा नि. 4/1 कडे आहे. सदर कराराने अवलोकन करता अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये काही रक्कम घेवून भुखंड विक्री बाबत व्यवहार होता हे स्पष्ट होते. अर्जदारांनी दि. 07/03/2008, 5/10/2009, 04/05/2010 व 30/07/2010 रोजी वेळोवेळी भुखंड विक्री करुन देणेबाबत विचारले होते. सदर नि. 4/2 च्या कराराचे बारकाईने अवलोकन करता सदर करारापञातील कलम 6 मध्ये नमुद अटींप्रमाणे “जर पार्टी नं. 1 म्हणजेच गै.अ.यांनी विक्रीपञ करुन देण्यास कसुर झाल्यास पार्टी नं. 2 म्हणजेच अर्जदार यांना विपक्रीपञाची नोंदणी होवून मिळणेसाठी कायदेशीर कार्यवाही करण्याचा अधिकार राहील “ असे स्पष्ट लिहिले होते. त्यामुळे जेव्हा गै.अ.हे विक्रीपञ करुन देणेची टाळाटाळ करीत आहेत हे लक्षात आल्यावर अर्जदार यांनी दि. 11/11/2011 रोजी वकीलांकडून गै.अ. यांना नोटीस पाठविली. सदर नोटीस नि. 4/4 कडे दाखल आहे. सदर नोटीस गै.अ. क्रं. 1 ते 3 यांना मिळालेली आहे. हे नि. 4/6, 6 A व 6 B वरुन स्पष्ट होते. यावरुन सदर नोटीसीवरुन कायदेशीर कार्यवाही अर्जदार यांनी दि. 11/11/2011 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवून कराराप्रमाणे सुरु केली यावरुन तेथुन पुढे प्रस्तुतची तक्रार मुदतीत दाखल आहे हे स्पष्ट होते. 8. तसेच प्रस्तुत काही नि.4/7 नुसार दि.05/05/2007 रोजी कागदपञावरुन गै.अ.यांनी अकृषक (N A) परवानगी मिळे पर्यंत खरेदी पञाची मुदत वाढविण्यात येत आहे. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावरुन हे स्पष्ट होते की, जो पर्यंत अकृषक परवानगी मिळणार नाही तोपर्यंत खरेदीपञ होवू शकत नाही त्यामुळे मुद्दा क्रं. 1 यांचे सदर तक्रार मुदतीत आहे. या निर्णयाप्रत हे मंच आले आहे. मुद्दा क्रं. 2 9. गै.अ.यांनी अर्जदारांनी भुखंड विक्रीचा व्यवहार केला आहे व तसा करार केला आहे. त्या विक्रीच्या संदर्भातील हा वाद असल्याने अर्जदार हे गै.अ.यांचे ग्राहक ठरतात. 10. अर्जदारांनी कराराच्या वेळी रक्कमा दिल्या असुन त्यानंतर ही वेळोवेळी गै.अ.यांना रकमा दिल्या आहेत. त्यांना पावत्याही गै.अ.यांनी दिलेल्या आहेत. परंतु काही कालावधीनंतर गै.अ.हे विक्रीपञ करुन देण्यास टाळाटाळ करु लागले त्यामुळे अर्जदारांनी उर्वरीत रक्कम देणे थांबविले. त्यानंतर वारंवार अर्जदार यांनी विक्रीपञ करुन देण्याची विनंती करुनही गै.अ.यांनी ती पूर्ण केली नाही.
11. गै.अ.यांनी गुरुमाऊली या नावाची फर्म स्थापन करुन त्या माध्यमातुन अर्जदारांशी भुखंड विक्रीचा करार केंलेला आसहे. व त्या मोबदल्यात काही रक्कमा ही स्विकारलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याप्रमाणे अकृषक परवानगी नसतांना लोकांना भुलथापा देवून लोकांच्या कडून पैसे घेणे, करार करणे व तो भंग करणे हा ग्राहक संरंक्षण कायदयात अनुचित व्यापार पध्दतीत मोडतो. व तो गै.अ.यांनी केला आहे.
12. सदर प्रकरणातील अवलोकन करता गै.अ.यांनी अर्जदारांशी करार करुन त्याचा भंग केल्यामुळे ही अनुचित व्यापार पध्दती असुन अर्जदाराचे संदर्भात ञुटीपूर्ण सेवा आहे. अर्जदाराकडून रकमा स्विकारुनही गै.अ.यांनी अर्जदारांना आजपर्यंत विक्रीपञ करुन दिले नाही. तसेच अर्जदारांनी पाठविलेली वकीलांचे नोटीस मिळूनही त्यांची गै.अ.यांनी दखल घेतली नाही. प्रस्तुत केसमध्ये ही गै.अ.क्रं. 1 व 2 हे हजर होवूनही म्हणणे दिले नाही तर गै.अ. क्रं. 3 यांनी मे. मंचाची नोटीस न स्विकारल्यामुळे (Not Claimed) म्हणून परत आली आहे. यावरुन गै.अ.यांची नकारात्मक मानसिकता सिध्द होते. त्यामुळे अर्जदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक ञास सोसावा लागला म्हणून सदर ञासाची भरपाई मिळण्यास पाञ आहेत व ती देणेस गै.अ.क्रं. 1 ते 3 हे वैयक्तिक व संयुक्तीक रित्या जबाबदार आहेत. तसेच गै.अ. गै.अ.शंनी दिलेल्या ञुटीपूर्ण सेवेमुळे या न्यायमंचात तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. व त्यास गै.अ.जबाबदार आहेत, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले असल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहेत. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.करण्यात येत आहे. (2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वादग्रस्त मौजा बोर्डा येथील तह. वरोरा येथील भुमापन क्रं. 1/7, 1/9 व 1/12 मधील गुरुमाऊली नगर मधील अर्जदारांशी झालेल्या कराराप्रमाणे उवर्रीत रक्कम वर नमुद परिशिष्ट अ मधील अ. क्रं. H नुसार घेवून संबधित अ. क्रं. (1) प्रमाणे विक्रीपञ करुन 2 महिण्याचे आत प्रत्यक्ष ताबा अर्जदारास द्यावा. किंवा गैरअर्जदार हे विक्रीपञ करुन देण्यास असमर्थ असतील तर त्यांनी अर्जदार क्रं. 1 ते 8 यांचे कडून स्विकारलेल्या वर नमुद परिशिष्ट अ मधील अ. क्रं. G प्रमाणे संपूर्ण रकमा द.सा.द.शे. 18 % दराने व्याजासह कराराच्या दिनांकापासुन रक्क्म हाती पडे पर्यंत गै.अ. क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिक रित्या द्याव्यात. (3) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिक रित्या रु. 10.000/- प्रत्येक अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी व आर्थिक ञासापोटी रु. 1,000/- तक्रारी अर्जाचा खर्च म्हणून प्रत्येक अर्जदारास द्यावेत. (4) सर्व पक्षांना आदेशाची प्रत द्यावी. (5) सर्व तक्रारींमध्ये एकञित आदेश पारीत झाला असून मुळ आदेश तक्रार क्र.197/2011 सौ. पुष्पा विनायक माहुरे यांचे प्रकरणात लावण्यात आली व इतर तक्रारीमध्ये प्रबंधक यांनी सदर आदेशाची प्रमाणित केलेली प्रत लावण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :26/03/2013 |