::: नि का ल प ञ::: मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या 1. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहीवासी असून त्याने स्वयं रोजगारासाठी दिनांक 26/01/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 4 कडून वाहन क्र. 34 एम 5194 या वाहनचे विक्रीपत्र केले. सदर विक्रीपत्रानुसार वाहनाची किंमत रक्कम रुपये 7,25,000/- निश्चित करुन अर्जदाराने 2,05,000/- रोख अदा केली व उर्वरीत रक्कम रुपये 5,30,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून वित्त सहाय्य घेतले. वाहनाचे चालु कर्ज रक्कम संपूर्णपणे अदा केल्यानंतर वाहन अर्जदाराचे नावाने करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र 4 यांची होती. परंतु गैरअर्जदार क्र. 4 यांनी वाहन अर्जदाराचे ताब्यात दिले परंतु नावाने करुन दिले नाही. वाहन अर्जदाराच्या नावाने नसल्यामुळे रोडवर चालवीता न आल्याने विनावापर राहीले. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र 1 व 2 यांच्याकडे दरमहा कर्ज रक्कम रुपये 22,400/- परतफेड करत होते. दिनांक 02/03/2012 पर्यंत रक्कम रुपये 1,99,000/- अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरले. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर वाहनाचा विमा अर्जदाराचे नावे नसतांना अर्जदारांचे नावे करुन दिला. अर्जदाराला दरमहा कर्ज रक्कम भरण्यास अडचण येत असल्यामुळे गैरअर्जदार क्र 1 व 2 यांनी अर्जदारास वित्तसहाय्य देण्याची तयारी दाखविली. परंतु यापुर्वी वित्तसहाय्य केलेली रक्कम थकबाकीत असल्याने अर्जदाराचे वाहन गैरअर्जदार क्र. 1 व 2 जप्त करतील या भीतीने रक्कम रुपये 25,000/- दिनांक 06/06/2012 रोजी अर्जदाराने जमा केले. परंतु तरीही गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराला नोटीस पाठवून थकीत रक्कमेची मागणी केली. त्यामुळे गैरअर्जदारानी अवलंबिलेली पध्दत चुकीची असल्यामुळे तसेच गैरअर्जदार यांना वाहन अर्जदाराच्या नावाने करुन दरमहा परतफेड रक्कम मध्ये भरलेली रक्कम समायोजीत करुन उर्वरीत रक्कम वित्त सहाय्य न केल्याने अर्जदारानी सदर तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी सदर वाहन अर्जदाराचे नावाने करुन द्यावे, अर्जदारानी अदा केलेली कर्ज रक्कम रुपये 2,00,000/- अर्जदाराला व्याजासह देण्यात यावी तसेच वाहन घेतल्यापसून प्रतिदिवस रक्कम रुपये 2000/- नुकसान भरपाई व मानसीक, शारीरीक त्रासापोटी रक्कम अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अदा करावी अशी विनंती अर्जदारानी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन, विद्यमान मंचाने अर्जदाराचा अंतरीम अर्ज मंजुर करुन अर्जदाराला रक्कम रुपये 50,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे जमा करण्याचा आदेश केला होता. परंतु अर्जदाराने सदर रक्कम भरली नाही. अर्जदाराने सदर वाहन गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडून विकत घेतले आहे. सदर वाहनावर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांना वाहन कर्ज दिले होते. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडून वाहन कर्ज घेतले. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडून सदर वाहन खरेदी केले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास रक्कम रुपये 5,28,908/- वाहन कर्ज दिले. गैरअर्जदार क्र. 4 हे वाहन कर्जाचे थकबाकीदार असल्यामुळे रक्कम रुपये 5,28,908/- मधुन रक्कम रुपये 4,50,347/- गैरअर्जदार क्र. 4 यांच्या वाहन कर्ज खात्यात जमा केले. उर्वरीत रक्कमेचा धनादेश गैरअर्जदार क्र. 1 व 2 यानी गैरअर्जदार क्र. 4 यांना दिला. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडून कर्ज रक्कम रुपये 18,500/- घेऊन वाहनाचा विमा घेतला. सदरहू वाहन अर्जदार यांच्या नावे करुन घेण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे. अर्जदार सदर वाहन नियमीतपणे वापरून व्यवसाय करीत आहे. वाहन स्वत:च्या नावावर करुन घेण्याची जबाबदारी अर्जदाराची असून अर्जदाराला गैरअर्जदाराची थकीत रक्कम अदा करावयाची नसल्यामुळे अर्जदारानी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली आहे. सबब तक्रार न्यायोचीत नसल्याने अमान्य करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे. 3. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद पुरशिस व गैरअर्जदार क्रमांक १ व २ यांचे जवाब, कागदपत्रे, पुरावा शपथपत्राबाबत पुरशीस, लेखी युक्तिवाद व लेखी युक्तीवादाबाबत पुरशिस यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. मुद्दे निष्कर्ष 1. अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे काय? होय 2. अर्जदार गैरअर्जदार क्र. 3 व 4 चा ग्राहक आहे कायॽ नाही 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार सिध्द करतात काय ? नाही 4. आदेश ? तक्रार अमान्य कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 : 4. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडून वाहन कर्ज घेऊन वाहन खरेदी केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्र. 3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे वाहन कर्ज नियमितपणे परतफेड न केल्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांना रक्कम वसुलीसाठी नोटीस पाठवून थकीत रकमेची मागणी केली. तरीदेखील सदर रक्कम गैरअर्जदार क्र. 3 यांनी अदा न केल्याने तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरुन अर्जदारांनी वाहन कर्ज रक्कम परतफेड न केल्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराविरुध्द थकीत रक्कमेची वसुली करणेसाठी नोटीस पाठविली आहे. सबब अर्जदार व गैरअर्जदार क्र 1 व 2 यांच्यामध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते संबंध असल्याची बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. मुद्दा क्र. 2 : 5. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 3 व 4 हे आवश्यक गेरअर्जदार नसल्याने त्यांना प्रस्तुत तक्रारीमधुन वगळण्यात यावे अशी पुरशीस दिल्याने गैरअर्जदार क्र 3 व 4 यांचेविरुध्द कोणतेही आदेश पारीत करणे न्यायोचीत नसल्याने मुद्दा क्रं. 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. मुद्दा क्र. 3 : 6. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना वाहन कर्ज रक्कम करारनाम्याप्रमाणे परतफेड न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होते. अर्जदार यांनी कराराप्रमाणे दिनांक 06/06/2012 नंतर कर्ज रक्कम अदा केलेली नाही. मा. राष्ट्रीय आयोगाने जलेश्वर शहा विरुध्द मे. चोलामंडलम इन्वेस्टमेंट अॅण्ड फायनंस कंपनी लि. [2017 (2) CPR 95 (NC)] या न्यायनिर्णयात नमुद केलेल्या न्यायतत्वाचा आशय या प्रकरणाला लागू पडत असून सदर तक्रार खारीज होण्याबाबतचे प्रमाण या पकरणातल्या बाबींना लागू पडत असल्यामुळे सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 6. वर नमुद निष्कर्षावरुन खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 109/2012 अमान्य करण्यात येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत. 3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ (अध्यक्ष) (सदस्या) |